आयला लाईन चुकली राव!!!
नुकतेच एक पुस्तक हाती आले.आजकाल पुस्तके घरी येत असतात, पण वाचायला वेळ मिळेलच असे नाही. मिळाला तरी सलग पुस्तक वाचुन होत नाही. रोज थोडे थोडे वाचुन लिंक लागतेच असे नाही.तरी वाचायची हौस काही जात नाही. जित्याची खोड....
तर ह्या पुस्तकाचे नाव निसर्गपूर्ण. कोणी एक लेखक नाही पण दोन संपादक. पुस्तकाची टॅगलाईनच सांगते की निसर्गाच्या विशिष्ट पैलूंचे अभ्यास आणि जतन करणार्या निसर्गप्रेमींचे आत्मकथन.पुस्तक हाती आले आणि एकामागुन एक प्रकरणे वाचत गेलो. प्रत्येक प्रकरणाचा लेखक त्याच्या विषयात मास्टर.
मिसळपाव