Skip to main content

बजेटनुसार चांगले कॅमेरे

लेखक नांदेडीअन यांनी गुरुवार, 25/12/2014 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेर्‍याचे ‘साधारणतः’ तीन प्रकार असतात. (साधारणतः यासाठी की सध्या तरी बाजारात या तीन कॅमेर्‍यांचाच खप जास्त आहे.)

नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........

लेखक चेतन677 यांनी गुरुवार, 25/12/2014 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील?

ओळखा पाहू ?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 25/12/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
टक्कल डोक्याला चष्मा डोळ्यांना बाळ माझा होईना मोठा. जिथे जातो तिथे पडतो आधार ताईचा वाटतो घ्यावा. मी कोण?

वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 25/12/2014 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग : वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना वाहनविश्व : भाग २ इतिहास
सर्वात आधी पुढचा भाग टाकावयास एवढा उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. कार्य बाहुल्यामुळे टंकायला वेळ झाला नाही.

’एस्सेल वर्ल्ड"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/12/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट जुनी आहे....... . कारखान्यात कामे लावून दिली होती.. शांतपणे डेटर/क्रेडिटर च्या याद्या काढत बसलो होतो....साधारण ११ वाजत आले होते अन एक कस्टमर आत आला.. आल्यावर पाणी पिणे इत्यादी झाल्यावर..कळले तो एक सीनियर ट्ल रुम इंजिनियर आहे..नाव आठवत नाही पण जोशी बापट असे असावे..

मुळ्याचा ठेचा

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 25/12/2014 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
m साहित्यःमुळा चकत्या १ मोठी वाटी मुळ्याचा पाला १ मोठी वाटी कोथिंबिर २ चमचे मिरच्या ७ ते ८ (आवडिनुसार) लसुण ३ पाकळ्या जिरे १/२ चमचा लिंबु रस १ चमचा मीठ साखर तेल

माहिती हवी आहे - हिरे, माणिक, मोती, पोवळा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 25/12/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.

अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 25/12/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन अनाहीतांनी कट्टा करायचे ठरवले होते, सगळ्यांच्या वेळा जुळवुन २१ डीसेंबरला ठरले. अनाहीता म्हणजे झाशीच्या राण्या काही अनाहीता म्हणजे त्रिवेणी, मितान आणि मिता पुण्याहुन येणार होत्या अन मी ही जरा लांबुनच येणार होते बाकीच्या मुंबईतल्याच होत्या. घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्यल्या व्हिलेज सोल ऑफ इंडिया मध्ये १२.३० वाजता प्रवेश मिळत असल्याने सर्वांनी दुपारी १२ वाजता मॉल मधे जमुन एकत्रच प्रवेश करायचे ठरले.

एक जोरदार मिपाकट्टा करू या का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 25/12/2014 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता. त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते. "मिपा" हे पण एक आभासी जग आहे. मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो. स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले. तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?