छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" प्रवेशिका आणि मतदान....
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील पाचवं पुष्प, विषय 'भूक' या विषयानुरूप आलेल्या या प्रवेशिका.
आजपासून २९ डिसेंबरपर्यंत मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहून गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्यावं ही विनंती.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
एखाद्या सदस्याने स्वतःच्याच छायाचित्र प्रवेशिकेला मत दिलेले असल्यास ते मत ग्राह्य धरले जाणार नाही.
१.उजवे - डावे प्रतिसाद ..??..
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच.
एकवीसाव्या शतकात एखाद्या समुहाला वंशसंहाराला सामोरे जावे लागेल असा विचारही येऊ नये त्या काळात इराक मध्ये याझिदी समुदायावर गेली तीन साडेतीन वर्षे उघड दमनचक्र चालले.
आजी-आजोबा
कलमनामा – २१/१२/२०१४ – लेख ११ – आजी-आजोबा
http://kalamnaama.com/aaji-ajoba/
आजी-आजोबा
आज लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा झाला. बायकोने सगळ्या पाहुण्यांसमोर तोंडभरून आपल्या नवर्याचं कौतुक केलं. नवर्यानेदेखील बायकोचं कौतुक केलं. कौतुक करताना दोघांचेही डोळे आनंदाने भरून आले होते. पण या सगळ्यापेक्षा विशेष होतं ते मुलांनी केलेल्या कौतुकाचं. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला असं म्हणून दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची एकप्रकारे शाब्दिक भेटच दिली. सगळे पाहुणे गेल्यानंतर सवयीप्रमाणे दैनंदिनी लिहायला वडील बसले.
अत्तरायण..! भाग - ३
अत्तरायण..! भाग - १
अत्तरायण..! भाग - २
आठ वर्षापूर्वीची घटना..
गणपतिचा पहिला दिवस..
नेहमीप्रमाणे मी माझ्या पहिल्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि काम अवरल्यावर आलेला चहा पीत असताना,त्या यजमानानी मला "गुरुजी हात पुढे करा!" असं फर्मावलं. मी आपला मनात,'आज यांना काहि खटकलय कि काय?' 'अथर्वशीर्ष तर सावकाशच म्हटलं होतं' वगैरे बाळबोध आत्मशंका घ्यायला लागलो.
अंधार क्षण भाग ४ - टोइव्ही ब्लाट (लेख २१)
अंधार क्षण - टोइव्ही ब्लाट
नाझींच्या ताब्यातील पोलंडमध्ये राहणं हा एक घुसमटवून टाकणारा अनुभव होता. तुम्ही जर ज्यू असाल तर तुमच्या हालअपेष्टांना सीमाच नव्हती. पोलंड हा ज्यूबहुल असल्यामुळे नाझींना तिथल्या ज्यूंना सर्वात प्रथम संपवणं हे तर्कसंगत वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी नाझींनी ट्रेब्लिंका, चेल्मनो, आॅशविट्झ, मायदानेक अशा अनेक मृत्युछावण्या पोलंडमध्येच बनवल्या होत्या. यामधलंच एक नाव म्हणजे साॅबिबाॅर. जवळजवळ २,५०,००० ज्यूंचे बळी घेणा-या साॅबिबाॅरमधून वाचलेल्या थाॅमस ' टोइव्ही ' ब्लाट या माणसाला भेटणं हा एक संस्मरणीय अनुभव होता.
टोइव्ही ब्लाटच्या या मुलाखतीतून मी बरंच काही शिकलो.
कथा-कॉलेज कट्टा भाग १
या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे.
तो अमावस्येचा दिवस होता.मध्यरात्रीचे बारा वाजत आले होते.थंडीचे दिवस होते.पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळ दोन भिकार्यांचा संवाद चालु होता.
" यार तुला झोपायला दुसरी जागा नाही सापडली का?" पहिल्याने विचारले.
"का रे काय झालं?
ब्रम्हराक्षसाच्या पाठी …
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची. नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला.
जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो.
चीनच्या प्रमूखांना वजन कमी करण्याचा सल्ला !
शाळांमध्ये निबंध लेखना प्रमाणेच पत्र लेखन आपल्याकडे विद्यार्थ्यांकंडून करून घेतले जाते तसे ते चीन मध्येही करून घेतले जाते. असेच पत्र लेखन Niu Ziru, नामक Zhengzhou येथील चौथी इयत्तेत शिकणार्या मुलाने चीनचे सध्याचे सर्वेसर्वा "षी चिन्पिंग" (Xi Jinping) यांना उद्देशून केले. सर्वसामान्य शालेय विद्यार्थी लिहिल तसेच ते पत्र आहे. त्यात "षी चिन्पिंग" यांना उद्देशून मंगळावर उतरण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आवाहन आहे. पण हे पत्र वृत्त माध्यमांच्या चर्चेत वेगळ्याच कारणाने आले. बाळ Niu Ziru ने आपल्या उर्वरीत पत्रात चीनी प्रमूखांना तुम्ही जरा चबी दिसता.
सारे तिचेच होते
उदंड रसिकता असलेल्या, जीवनावर रंगून जाऊन प्रेम करणार्या, एका साठीतल्या व्यक्तीच्या, आपण त्यांना रंगराव म्हणू , व त्यांच्या एका तरुण मित्राच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.
मिसळपाव