Skip to main content

मन

लेखक गुलमोहर यांनी रविवार, 21/12/2014 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज मनाचा काही कळतच नाही, मनाचा मनाला काही पत्ताच नाही, का असं होतं काही केल्या उमगतच नाही, पण आज मन कुठे रमतच नाही!!!!

कथा bigger cypher ची

लेखक येडाफुफाटा यांनी रविवार, 21/12/2014 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार- लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे! यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला. म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे! bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते.

बाईक्स घेताना - भाग १

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 20/12/2014 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचे शिर्षक वाचून बर्याच जणांच्या भुवया वर गेल्या त्यामुळे नाम मे चेंज होना हा धागा लिहिण्याची प्रेरणा म्हणजे मुविंचा http://www.misalpav.com/node/29773 हा धागा … मी स्वतासाठी आत्तापर्यंत ४ बाईक्स घेतल्या आहेत …आणि वापरून झाल्यावर परत विकल्या … त्यामुळे इथे दुसर्यांना बाईक्स बघताना थोडी मदत व्हावी या उद्देशाने हा लेख (… म्हणा जिल्बी चायला ) बहुतांशवेळा लोकं बाईक घेताना खालील मुद्दे विचारात घेतात १. दमड्या २. मायलेज … "कितना देती है" ३. दिसणे ४. ताकद (power) ५. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा ) ६.

देवास

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 20/12/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या तथाकथित पुढार्‍यांनी हा व्हिडिओ जरुर पहावा. नुसतेच राजकारण करुन सरकारच्या नावाने गळा काढून पॅकेज मागणे सोडून असे काहीतरी करावे म्हणजे शेतीमुळे आत्महत्येची वेळ येणार नाही. यावर कोणी म्हणेल की येथेही शेततळी आहेत पण प्रमाण बघा व ती चळवळ बघा. पण आपल्या पुढार्‍यांना (जे शेतकरीच आहेत) त्यांना हे नको आहे कारण मग यांच्या पदरात काय पडणार ? उरला प्रष्न अतीवृष्टीचा. जर या व्हिडिओत दाखवलेली शेती असेल तर मला नाही वाटत शेतकरी एकदुसर्‍या संकटाने डगमगून जाईल. नुसतीच आंदोलने करणार्‍या संघटनांपासून शेतकर्‍यांना वाचव ही प्रार्थना करण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित.

पान,चुना..तंबाखु!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 20/12/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी:- राम राम मंडळी... मंडळी:- राम राम... काय? झाली का कामं? मी:- हो...झाली की! मंडळीतले तात्या:- या...मग बसा! .. ए गेनू.. च्या आन रे! मी:- नको राव. लै झालाय आज. चहा नको.. तात्या:- बरं..र्‍हायलं..मंग पान खा! येश्या:- का गुटखा देऊ? तात्या:- भाड्या..गुर्जिला परत गुटखा इचारला,तर तीच पुडी सारीन तुज्यात! शामू:-तात्या आज बिनपाण्यानी करणार काय येश्या'ची? .. ह्या ह्या ह्या ह्या!!! तात्या:- तसं नाय हो. पण पान कुटं..आनी गुटखा कुटं? येश्या:- बरोबर (आ)हे...आपलं त्ये पान,लोकाचा तो गुटखा! तात्या:- तुज्यायचा तोंड फुटका तुज्या...गप र्‍हा जरा.. शामू:- ख्या ख्या ख्या ख्या...

शोध थंडीच्या मीटरचा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/12/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
तापमान मोजण्याच्या यंत्रा बाबत तर सर्वाना माहित आहे, पण थंडीचे मीटर हा काय प्रकार आहे , कुणी शोध लावला आणि याने थंडी कशी काय मोजतात, ही उत्सुकता मनात जागृत होणारच. जीवाची मुंबई या महानगरात आमचे एक जिवलग (?) नातेवाईक राहतात. बेचारे सीधे-साधे सरळमार्गी चालणारे, सरकारी कर्मचारी. सकाळी नऊ वाजता घरातून नौकरीसाठी प्रयाण करणारे आणि संध्याकाळी घरातल्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळानी साडेपाचचा टोळा देत्याच क्षणी, घरात पुनरागमन करणारे. एकदम शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी सारखी त्यांची साधी राहणी. अर्धा डिसेंबर उलटताच मुंबईत गुलाबी थंडी पडते.

वाणप्रस्थाश्रम,मेंढपाळ -राजा आणी काहीबाही...

लेखक जेपी यांनी शनिवार, 20/12/2014 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीच काळ आणी रात्रीचा वेळ,यष्टीतुन प्रवास करताना मस्त पेकी डुलकी लागत होती.. तेवढ्यात डोक्यावर टपली बसली,चिडुन मागे पाहील..मक्या होता "अय लिंबुटीबुं काय झोपतो..

बाइक कुठली घेवू?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 20/12/2014 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाला नविन बाइक घेवून द्यायची आहे. मला त्यातले काही समजत नाही. त्यामुळे नेहमी प्रमाणे "कठीण समय येता, मिपाकर मदत करतात" हा अनुभव असल्याने, विचारणा करत आहे. बजेट : ७० ते ८० हजार वापरण्याचा कालावधी : जास्तीत जास्त ५ वर्षे. मायलेज : जितके जास्त तितके उत्तम रोजचा प्रवास : जास्तीत जास्त १०-१५ किमी. सलग ५-६ किमी. वापरणार : आकुर्डी (पुणे) शक्यतो सेकंड हँड नको आहे, पण कुणा मिपाकराची असली तर नक्कीच प्राधान्य.

वांगे पावटे भाजी

लेखक hitesh यांनी शनिवार, 20/12/2014 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य .. हिरवी वांगी पाव किलो , पावटे पाव किलो तेल , मोहरी , जिरे , हळद एक कांदा , एक टोमॅटो , लसूण पाकळ्या , कढीपत्ता. कांदा व टोमॅटो किसुन घ्यावे. तिखट , मीठ , गूळ , गरम मसाला / भाजी मसाला दोन चमचे दही. ------------------------------------------- कृती.. पावटे उकडुन बाजुला ठेवावेत. थोड्या तेलात मोहरी व जिर्‍याची फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या व कढीपत्ता घालावा.हळद घालावी. मग कांद्याचा कीस घालुन परतावे. मग टोमॅटो कीस घालुन परतावे. या मसाल्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजवावे. वांगी अर्धवट शिजली की उकडलेले पावटे घालावेत.

लेह आणि बरंच काही................

लेखक किल्लेदार यांनी शुक्रवार, 19/12/2014 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच लेह ची ट्रीप मारून आलो. खूप लोकांनी डिसेंबर च्या थंडीची भीती घातली पण मी तिला भीक न घालता ८ दिवस आरामात फिरून आलो. जी काळजी घ्यायला सांगतात त्याच्या बरोब्बर विरुद्ध कृती केली. (आगाऊपणा म्हणून नव्हे तर सवय म्हणून :) ) उदा. गरम पाणी प्यावे !!! मी जवळपास रोज थंड बीअर घ्यायचो. पहिल्या दिवशी बाहेर फिरू नये !!! मी २ तास झोप घेऊन बाजारहाट करून आलो. उणे २ ते उणे १० पर्यंत तापमान होते पण रोजची अंघोळीची सवयही मोडता आली नाही. थोडक्यात काय नशीब बलवत्तर आणि शरीराला गेल्या ४ वर्षात हिमालयाच्या थंडीची झालेली सवय म्हणून काही झाले नाही.