मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहा रूपयांची सत्ता

आतिवास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला.

वाल्मिकीचा वाल्या कोळी होतो तेव्हा ….

चिन्मय श्री जोशी ·
फडणवीस नानांना सोशल मिडिया वरून पडणारे शिव्या शाप बघून खरच वाईट वाटलं … गेली ५ वर्ष स्वतःचे ईमान न विकता सत्ताधार्यांचे वाभाडे काढणारे फडणवीस अक्षरशः केविलवाण्या चेहऱ्याने स्वताचा बचाव करत होते … त्यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता लपत नव्हती …पण हे सारे असे का घडले ? भाजपला मिळालेल्या यशाचा इतका माज चढला का ? का सेनेचा मूर्खपणा सगळ्यांना नडला ? शरद पवारांचे मुरब्बी राजकारण सगळ्यांना भारी पडले म्हणावे ? का आपमतलबी आणि अप्पलपोटेपणाचा नमुना म्हणायचा ? या सगळ्या प्रश्नांची माझ्या परीने केलेली हि उकल … भाजप ला यश पचवत आले नाही हे तर खरेच आहे… लोकसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारे मोदी कुठे आणि बहुज

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

माहितगार ·
लेखनप्रकार
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

स्वप्नांचे पान मुंबई

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रस्तावना : आमचे परम मित्र गडप्रेमी वल्ली यांचा कवितेस आग्रह आहे, पण काय करणार कविता करणे २-३ वर्षे झाले सोडले आहे, आणि आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये.. तरीही गेल्या महिन्यात ७ वर्षांनंतर मुंबई सोडली.. आणि जिवनाची एक खरीखुरी मज्जा.. एक अप्रतिम लज्जत.. याला आपण यापुढे मुकनार असे वाटत आहे. लोकांची माणुसकी .. मदत करण्याची तत्परता.. एक आपुलकी. असे बरेच काही मुंबई देवुन गेली. मुबई .. आय मीस यु. म्हणुन माझी ही जूनी कविता येथे देत आहे. जी की मी मंबईत गेल्या गेल्या केली होती. तो काळ वेगळा होता. आज काल दुसर्यांच्या कविता आणि लेख वाचण्यातच जास्त मजा येते.

ती.... भाग २

सविता००१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ती...भाग १ आता मी पण मोठी होत होते. आमचे बोलायचे विषय बदलले. आता सतत तिच्या बोलण्यात येऊ लागलं... ‘ मलाही माझा आयुष्य जगण्याचा हक्क आहे हो ना सवी?’ मी ठासून हो म्हणायची. तिसरीत काय कळतंय? पण जेव्हा हे मी आईला सांगितला तेव्हा ती गंभीर झाली. बाबा-आजी-आजोबांशी बोलून तिने मावशीच्या आईला बोलावून घेतलं. मालू मावशीच दुसरं लग्न करून देण्याबद्दल विषय काढला आणि तिच्या आईचं बोलणं ऐकून आमच्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यात धोंडा पडला. काय म्हणावं तिच्या आईने? ‘हे बघ पद्मजा,’ – म्हणजे माझी आई, ‘तिच्या नशिबात नाही हे सुख. पाहिलं ना आपण?

एकटेपणा

शिरीष फडके ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकटेपणा आपल्या आयुष्यात, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही संस्कार, परंपरा यातून काही अंगवळणी पडलेल्या असतात. अशाच गोष्टी, प्रसंग यांचा अन्वयार्थ शोधणारं हे नवं सदर… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा… एक चित्रकार. तसा तो या कलेच्या क्षेत्रात नवीनच. फारसं नाव नसलेला किंवा या क्षेत्रापुरतं म्हणायचंच झालं तर अनोळखी. या चित्रकाराचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे त्याला आवडणार्या एका सुंदर व्यक्तिचं रूपचित्र (Portrait) काढणं. अर्थात त्याकाळी ती व्यक्ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान असल्यामुळे आपलं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल की नाही याबद्दल त्याला स्वतःलाच थोडी शंका होती.

हेल्मेटसक्ती

प्रकाश घाटपांडे ·
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत.

देढ इश्कीयां अर्थात दोन बायकांचा दादला अजून कुंवारा!

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाच अंकी आधारित राजकीय नाटक अंक १ प्रवेश १ फ़्लॆश फ़ॊरवर्ड... वाड्यामधील दिवाणखान्यात, डुगडुगत्या खुर्चीवर देवाजी एकटाच बसला आहे. लग्नाचे व-हाड घेऊन इथे आलो होतो. आणि दोन बायांचा तमाशा पहावा लागला. माझी आज ना...ती, ना...ही अशी स्थिती झाली आहे.......... देवाजीच्या नजरेसमोर घटनापट उलगडत होता.... मुंबईतील वाड्यामधे नरुभाऊंच्या कुटुंबातील कोणी निवास करून एकोणीस वर्षे होऊन गेली. देवाजी आता खरे तर घोडनवरा झाला होता. आज इतक्या वर्षांनी मुंबईमधल्या आलीशान वाड्यात घर बसवायचा चानस आला होता. नरुभाऊंना हर्षाच्या उकळ्या फ़ुटत होत्या.

अंधार क्षण भाग ३ - जेम्स ईगल्टन (लेख १०)

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण - जेम्स ईगल्टन तलसा, ओक्लाहोमा. मी माझ्या मोटेलमध्ये आलो आणि त्याच वेळी रेल्वे एंजिनाचा आवाज ऐकला. अगदी अमेरिकन आवाज. असंख्य हाॅलिवूड चित्रपटांमध्ये ऐकलेला. लोकांच्या सवयीचा. पण मला मात्र त्या आवाजाने अस्वस्थ केलं. तलसाला येण्याआधी मी जपानच्या जवळ असलेल्या ओकिनावा बेटावर चित्रीकरण केलं होतं. ओक्लाहोमामधले अनेक तरूण ओकिनावाच्या लढाईत जपान्यांशी लढले होते. जेम्स ईगल्टन, ज्याची मी पुढच्या दिवशी मुलाखत घेणार होतो, त्यांच्यातलाच एक.

बाबा वाक्यं प्रमाणम....२ भिकारी....

मुक्त विहारि ·
गेले कित्येक महिने "मिपा"वर ह्या ना त्या स्वरूपात डू.आय.डीं.चा विषय निघतो. मला अद्याप तरी मिपाच्या अंगणातून बाद करण्यात आलेले नाही.किंबहूना, असे अपमान सहन करायची पाळी आणू नये, असेच संस्कार झालेले असावेत.पण काय तो एकदा सोक्षमोक्ष लावूनच टाकू या, म्हणून नेहमीप्रमाणे बाबांकडे गेलो.(आमचे बाबा जरा बरे सल्ले देतात.) नेहमीचा नमस्कार झाला आणि आम्ही विषयाला सुरुवात केली. मी : बाबा एक शंका होती, बाबा: बोल..ऐकतोय. मी : आजकाल आमच्या मिपावरती डू.आय.डींचे प्रमाण फारच वाढले आहे.तर काही उपाय सुचतोय का ते बघा ना? बाबा : तुला रे लेका कसला त्रास? मी : अहो, परवाच तर मुंज झाली आणि आत्ता भीक मागायला सुरुवात