मिस्टिसिझम - एक चिंतन - १
मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे.
मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा?
मिसळपाव
