Skip to main content

अनुत्तरीत प्रश्न

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 02/05/2015 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
लहानाचा झालो मोठा, पंखात आले बळ, बुडलो ज्या रंगात तो माझाच रंगच होई, होती स्वप्न डोळ्यात, होते बळ पंखात, मागे न बघता, स्वप्नात जगत राही, सरले सगळे दूर, ठेविले सगळे मागे, आठवणींना सुद्धा आसवात बुडवित राही, झोकून देई स्वतःला, गुलाबी या चिखलात, शोधितो असे काय, न मिळून कशात राही, उघडून पाहतो मुठ, हात रिते दिसतात, रेषांची जाळी मात्र, सामोरी भुलवत राही, काही करू तरीही, तहान ही शमेना, वासनेच्या दलदलीत, अडकत मी राही, मृगजळामागे भ्रमाच्या, नेहमी धावत आहे, थकून जातो जेव्हा, घेरून निराशा राही, शोध हा संपेल, का होईल तो सुरु आता, अजणतेच्या अंधारात, मी घुटमळत आता राही, घेतला श्वास पहिला,
काव्यरस

अर्जंट माहिती हवी आहे .

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 01/05/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई अबुधाबी म्युनिक मार्गावर चेक्ड इन लगेज मध्ये एव्हरेस्ट मसाले सीलबंद पाकिटे टाकली आणि त्या मसाल्यातला एक घटक खसखस असेल तर काही झोल होतील का नाही ?? कृपया लौकर सांगा

जय महाराष्ट्र!!

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी शुक्रवार, 01/05/2015 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी ओमान मधल्या शिक्षण खात्याच्या एका बैठकीला उपस्थिती लावली. विषय शैक्षणिकच होते. त्या बैठकीला मस्कत मधल्या सर्व खाजगी आणि आंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नेहमीचे शैक्षणिक विषय चर्चिले गेल्यावर शंका समाधान आणि समस्या निवारणाचा कार्यक्रम पार पडला. जे काही अमेरिकन आणि ब्रिटीश शाळांचे प्रतिनिधी होते त्यांनी अशी समस्या उपस्थित केली कि शिक्षण खात्याची जी परिपत्रके असतात ती अरेबिक मधून पाठवली जातात. आम्हाला ती इंग्रजीत भाषांतरित करून घ्यावी लागतात.

मिस्टिसिझम - एक चिंतन - २

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 01/05/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टिसिझम - एक चिंतन - १ --------------------------------------------------------------------------------------------------- चित्रगुप्त काकांच्या या लेखात मिस्टिक अनुभवाचे वर्णन छान आले आहे. --------------------------------------------------------------------------------------------------- आधी म्हण्टल्याप्रमाणे 'मिस्टिसिझम' या शब्दाच्या व्युत्पत्तीमधून आपल्या हाती फारसं काही लागत नाही पण येवढं नक्की की या शब्दाचे सामान्यतः दोन अर्थ लागतात.

मालगाड़ी

लेखक Vimodak यांनी शुक्रवार, 01/05/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला आय नाय, बाप हाय. आगीवाले डोळे त्याचे, अन जबान चाबुक हाय. निघतो रोज सकाळपारी धूर सोडत इंजनवाणी, जणू पटरी पायाखाली. ठरली ठेसनं ठरलं काम, येगळी माणसं येगळा दाम. येतो झिजून रातपारी धूर सोडत इंजनवाणी, वेडीवाकडी पटरी घेउन पायाखाली. पाठ लाऊन भिताडाला घाम पाजीत बसतो अन, 'काय केलस दिसभर?' जणू इचारतो सोताला.. 'काय नाय' जवाब मातूर माझा हाय. आगिवाले डोळे ओकतो, चाबुकवाली जबान ठोकतो, हातालाभी लई जोर, हाणतो मात्र आंगचोर. विडी-चूल पेटवून आत, रोजच्यावाणी डाळ-भात, खाऊन पडतो गपगार.. पाहत राहतो उदयापार. 'काय करणार?'

साधु हास्यानंद 1

लेखक mohite jeevan यांनी शुक्रवार, 01/05/2015 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाव होते.नाव होते आनंदपुर.गाव लहान होते पण गावचे लोक खुप आनंदी आसे. त्याचे एकच कारण होते ते म्हणजे त्या गावात एक साधु बाबा राहत. त्याचे नाव त्याच्या स्वभावा नुसार पडले होते. त्याचे नाव होते साधु हास्यानंद . लोक त्याना हासरे बाबा नावाने ओळखत. गावातील जवळ जवळ सर्वच लोक त्याचा सल्ला घेत. त्यामुळे गावातील लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला दिसत. एक दिवस गावातील लोकांनी त्याचा प्रवचनाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरविले.

ऐक स्वखे त्रिधारा : भाग ५

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 01/05/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तू भाग २: माझ्या लेकीच्या नणदेचा करूण अंत फार मोठा आघात होता. पण लेक मोठी धीराची. तीने स्वतःला आणि नवर्‍याला यातून सावरले.

कविता - हापूस

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 01/05/2015 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात.

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

लेखक योगविवेक यांनी गुरुवार, 30/04/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)

23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता.

सत्यकथा .. अध्याय १ आणि २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 30/04/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
..................................................अध्याय पहिला...................................................................... नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.