मीटर डाऊन
ऑफिस मधून निघालो, बस स्टँड वर आलो तर हा धो धो पाऊस परत सुरु, चायला अख्खा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, थांबायचे नाव नाही. मुंबईतला पाऊसच घाणेरडा चायला. मला २६ जुलै ची आठवण आली. FM वर सांगत होते, अर्धी मुंबई भरलीये पावसाने. बहुतेक ऑफिसेस दुपारीच सोडून दिली.आमचा बॉस हलकट पण एक नंबरचा, तो बाजूलाच राहतो. त्याला काय घेणंदेणं? अजिबात सोडले नाही आम्हाला. काम संपवून बाहेर पडेपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती. गेला अर्धा तास बसची वाट बघतोय. ना बस ना टॅक्सी.हा रोड पण भरायला लागलाय पाण्याने.
एरवी हे असले वातावरण मला जाम आवडले असते, एकदम थ्रील वाटते.
मिसळपाव