Skip to main content

आमच्या विवाहाची कहाणी - ४

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 09/04/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 आमच्या विवाहाची कहाणी - ३- http://www.misalpav.com/node/30795 गुरुवारी हा निर्णय आला होता कि मुलीला पण मुलगा पसंत आहे. म्हणजे आता लग्न ठरले होतेच. रविवारी काय होते याची मला फारशी चिंता नव्हती. शुक्रवार आणि शनिवार आपण तिला फोन करावा कि न करावा या बद्दल मी विचार करत होतो.

प्राइम टाईम आणि व्यक्तिस्वातंत्र्य

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 09/04/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी एक स्तुत्य असा निर्णय घेतला. राज्यातील मल्टीप्लेक्स चालकांना संध्याकाळी ६-९ अशा मोक्याच्या वेळी मल्टीप्लेक्स मधील एका स्क्रीनमध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केले आहे. हे न पाळणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करण्यात येईल. हा निर्णय जाहीर करताच त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मराठी कलाकार आणि मराठी रसिक नक्कीच या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करतील. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील काहीजणांना हे पचलेले दिसत नाही. महेश भट, शोभा डे अशा कुठल्याही विषयावर बडबड करणाऱ्या स्वयंघोषित विचारवंतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

आसवांच्या प्रतिबिंबात

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 09/04/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
चेहयावरचे कापड न हटविण्यास सांगितले म्हणुन आसवांच्या प्रतिबिंबात त्यास पाहिले रक्ताळलेला पोराचा हात हाती घेतला टाहो माझा आभाळ छेदुन गेला हुतात्मांच्या नावात एकाची भर होती युद्धाच्या अग्निकुंडाने पोराचीही आहुती घेतली खांदयावर माझ्या सुनेने हात ठेवला अभिमानाने चेहरा होता प्रफुल्लित झालेला "इथे समोर त्यांचे पदक लावेन आयुष्यभर मी त्यातुन त्यांना पाहेन" "एका पदकासाठी मी पोराला गमावले लाखोंच्या बळीतुन कोणी काय साधले? अव्याहत प्रवास हा का आरंभला बलिदानाचा सोहळा दोन दिवस चालला" "व्यक्तिसापेक्षतेची इथे अपेक्ष्ाच नसते परि पदसापेक्षतेला अनेक मुजरे झडले"

लोकल (लघु भयकथा)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 09/04/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
पण माझीच चूक आहे असं का वाटतंय मला? साला हा एक विचार मनातून जातच नाहीये, आजचा दहावा दिवस. घरी बसून आहे मी, उद्यापासून ऑफिस ला जावच लागणार, नाहीतर नोकरी जायची. कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी ती रात्र डोक्यातून जातच नाही. ट्रेन चा भयंकर गोंधळ झाला होता त्या रात्री.नाहीतर ११ :३५ ची कसारा किती रिकामी असते. पण त्या दिवशी तब्बल ३ तास ट्रेन बंद होत्या, आणि त्यानंतर सुटणारी हि पहिली ट्रेन होती. काय भयंकर गर्दी होती.मी कसाबसा लटकत भायखळ्याहून आत चढलो. आत कसला जेमतेम दारात उभं राह्यला मिळेल इतकीच जागा होती.ट्रेन दणदणत निघाली,पुढील स्टेशन दादर. मागून लोंढा अंगावर कोसळला, पण आत जायला जागाच नव्हती.

सुगंधा - भाग ३ (अंतिम)

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 09/04/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमोघला आपल्या कानावर विश्वासच बसेना, "अपंग मुल दत्तक घ्यायची काय गरज आहे? आपल्याला मुल होणार नाहीये का? " रागातच तो तीच्यावर ओरडला, त्याने कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. अपंग मुल तर सोडाच पण कधी नॉर्मल अनाथ मुल दत्तक घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. "हे काय ऐकतोय मी? आपण दुसर्‍याचं मुल दत्तक घ्यायचं, त्या मुलाची काही माहीती नाही, कोण , कुठलं, कोण त्याचे आईवडील काही माहीत नसताना? आणि मुळात आपण ते मुल दत्तक घ्यायचंच का?" ती पार गोंधळुन गेली, "अमोघ माझं ऐकुन तर घ्या ..

एक विचारवंत -शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते. अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

रोगप्रतिबंधात्मक उपाय २

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 09/04/2015 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोगप्रतिबंधात्मक उपाय व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते. आपल्याला जर अधिक सुखी, अधिक आनंदी व्हायचे असेल तर मात्र आपण स्वत: (वेळेआधी) ठरवून जे हवे ते (कालांतराने) मिळवू शकतो. याचाच अर्थ मनुष्यजीवनात काय हवे आहे ते आधी ठरवावे लागते व नंतर आपण ठरवलेले मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते.

गोष्टी एकेकाच्या! --Revised

लेखक चिनार यांनी गुरुवार, 09/04/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोकं भानंच ठेवत नाही. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे. वधु संशोधनाचे दिवस होते त्यावेळेची गोष्ट. नागपूरला 'पाहण्याचा' कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात साधारण चाळीशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वे मध्ये कुठल्याश्या विभागात क्लरीकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरवात केली. "तुमचं इंजिनीरिंग कुठल्या विषयात झालंय ?" "मेकॅनिकल!”(मनात: बायोडाटा बघितला नाही का बे?) "अरे वा!

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 09/04/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन.

इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी

लेखक मोदक यांनी बुधवार, 08/04/2015 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
"मोदक.. यावेळी नक्की इंदूर ला जावूया." हाफिसातला शेजारी आणि मूळचा 'इंदौरी' असलेल्या भुषणने पुन्हा एकदा इंदूरवारीच्या चर्चेला सुरूवात केली. इंदूर, सराफा आणि ५६ दुकान या तीन गोष्टींमुळे या ट्रीपला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आमचा सर्वात आधी ठरलेला बेत होता "इंदूरमध्ये होळी साजरी करणे" परंतु हाफिस आणि इतर कामांमुळे त्याला जमले नाही. (म्हणून मी घाटवाटांवरची सायकल राईड करून आलो!) इंदूरचा प्लॅन त्याला विचारताच त्याने पठडीतले उत्तर दिले. "रात्री पुण्यात बसमध्ये बसायचे, सकाळी इंदूर. ११ / १२ तास लागतात!" या प्रस्तावाला मी फारसा उत्सुक नव्हतो.