Skip to main content

दर्शन

दर्शन

Published on 18/03/2015 - 00:04 प्रकाशित मुखपृष्ठ
गवताच्या एका पात्याने पिंपळाच्या प्रचंड सावलीकडे तक्रार केली, 'तू सारखी इकडून तिकडे हलत राहतेस, माझी शांतता भंग पावते!' सावलीने उत्तर दिले, 'मी हलत नाही. जरा वर पहा, तिथे एक झाड आहे आणि ते वाऱ्याने चहूबाजूंनी हलते!' गवताच्या पात्याने आपले इवलेसे डोळे वर करून पहिले........ ........ आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला आपल्यावरील वृक्षाच्या विराट रूपाचे दर्शन घडले! ते पाते मनातल्या मनात म्हणाले, ' माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे!' ..... तेव्हापासून ते पाते शांतचित्त झाले. खलील जिब्रानच्या 'The Shadow'या लघुकथेचा भावानुवाद.
लेखनप्रकार

याद्या 3452
प्रतिक्रिया 10

रूपांतरित कथा आवडली. इसापनीती मध्ये वाचलेली अशीच थोडी वेगळी कथा आठवली. पाणी प्यायला आलेला लांडगा आणि बकरीची !

माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे
ही ओळ थोडी बदलता आली तर पहा. मूळ कथा वाचल्यावरच मला कळलं की नक्की काय म्हणायचं आहे. बाकी अनुवाद सुंदरच! धन्यवाद...!