डेरेदार वृक्षांची ह्या पडे गर्द छाया..
नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया..
बुजगावणेही डोळे मिटुनि निवांत
पाखरांच्या संगतीत उभारले शांत
दूर पास नाही कोणी दोघांस पहाया..
रोमरोम मोहरते तनु माझी बाई..
मोहरली आहे जशी गर्द आमराई..
कोकिळही गातो आहे मन रिझवाया..
तुमच्या तनुला येता शेताचा सुवास..
मनातले पाखरु अन होते कासावीस..
मन उतावीळ झाले पिंजर्यात जाया...
सावलीत सावली ही एकरुप झाली.
दुपारीच चांदण्यांची बरसात झाली.
शेतसुगंधाने झाली तृप्त माझी काया..
----- योगेश
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2805
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास लावणी !
एकच नंबर!
क्या बात! झकास!
कविता आवडली. मस्तच आहे.
यु सेड इट सर!
In reply to कविता आवडली. मस्तच आहे. by ज्ञानोबाचे पैजार
गुड गुड गुड !
फर्मास हो!
नक्की कुठे गडबड आहे सांगु
In reply to फर्मास हो! by एस
तरूंची या
In reply to नक्की कुठे गडबड आहे सांगु by कानडाऊ योगेशु
तरूंची मधल्या "त" वर एक
In reply to तरूंची या by खटासि खट
आंब्याचंच झाड का बरं ?
In reply to तरूंची मधल्या "त" वर एक by कानडाऊ योगेशु
१. कारण पुढच्या कडव्यात आमराई
In reply to आंब्याचंच झाड का बरं ? by खटासि खट
झकास ! आवडली ही फर्मास रचना !
मस्तच..
धन्यवाद चौथा कोनाडा आणि