अनवट किल्ले ५ : असाच लोभ असावा (Asawa )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
28 Apr 2017 - 6:04 pm

पालघर डोंगररांगेतला सर्वात उत्तरे कडला किल्ला "असावा" बघण्याचा प्लॅन केला. आज सोबत कोणीच नव्हते, त्यामूळे एकला चालो रे ला पर्याय नव्हता. बोईसर स्टेशनला उतरलो आणि पुर्वेकडे नजर गेल्यानंतर सपाट माथ्याच्या डोंगराचे दर्शन झाले. हाच असावा गड असणार याची खुणगाठ बांधून स्टेशन बाहेर आलो आणि चिल्हार फट्याकडे जाणारी सहा आसनी रिक्षा पकडली आणि निघालो आणखी एका मोहिमेवर. किल्ला पुर्वेला असला तरी चिल्हार फाट्याकडे जाणार्‍या बस किंवा सहा आसनी रिक्षा बोईसर पश्चिमेकडुन सुटतात हे ध्यानात ठेवावे.

मिसळपाव भटकंती विशेषांक : १) ताम्हीणी घाट

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in भटकंती
28 Apr 2017 - 5:49 pm

मिसळपाव भटकंती विशेषांक : १) ताम्हीणी घाट

आत्ताशी कुठे वैशाख सुरु झालाय , अजुन अख्खा ज्येष्ठ यायचाय आणि आजकाल तर आषाढस्य प्रथमे दिने ही नुसता रखरखाटच असतो. पण आपल्याला मात्र आत्ता पासुनच श्रावणाचे वेध लागायला लागलेत. कसं आहे की "पाऊस तर मनात असतो ना " असं कोणीतरी पुर्वी म्हणालं होतं तेव्हा पासुन मनात ढग दाटुन येतात आणि आपण आपले चिंब चिंब होऊन जातो ...

हां तर ते असो . तुर्तास तो विषय नाही .

चला, चित्रकलेची सुरुवात करूया... (भाग १: रेखाटन)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in मिपा कलादालन
28 Apr 2017 - 5:42 pm

मित्रहो, "आपण आता चित्रकलेची सुरुवात केली पाहिजे" असे नेहमी वाटत राहणाऱ्या, पण नेमके काय करावे, कसली चित्रे काढावीत, ती कशी निघतील, लोकांना ती आवडतील का, कोणते रंग-ब्रश-कागद वापरावेत, कोल्ड प्रेस कागद बरा की हॉट प्रेस, ऍसिड फ्री बरा की साधाच बरा, ऍक्रेलिक की ऑइल की पोस्टर कलर की जलरंग की पेस्टल वापरावेत, चित्रांचा आकार किती असावा, झालेले चित्र बेडरूमात लावावे की जिन्यात की कुठे, फ्रेमिंग कुठून करवावे, फेसबुकावर लाईक्स मिळतील ना ? मिपावर दंगा तर होणार नाही ? ..... छे..... काहीच कळत नाही बुवा/बाई..... आणि अगदी आत्ताच सुरुवात केली पाहिजे असे कोणी सांगितले ? चला, नंतर बघू कधीतरी....

रेखाटन

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in मिपा कलादालन
28 Apr 2017 - 12:05 pm

बर्‍याच दिवसांनी पेन हातात घेतलाय. हो, पेन्सील न वापरता थेट काळ्या शाईचा पेन वापरून स्केचेस करण्याचा प्रयत्न करतोय.त्यामुळे खाडाखोड करण्याला वाव नाहीये, कारण इरेझर वापरणे शक्य नाही. बराच गॅप पडलेला असल्याने लाइन्स आणि स्ट्रोक्स खुप कमजोर झालेत. पण जमेल हळूहळू सरावाने. दोन्ही स्केचेसला लागलेला वेळ साधारण १५ ते ३० मिनीटे. मोराचे स्केच निव्वळ कल्पनेतल्या चित्रावरून केलेय. गेट वे ऑफ इंडिया मात्र समोर बसून करायचा प्रयत्न केलाय. कसं झालय ते सांगा...

धन्यवाद !

१. मोर

ॐ नम: शिवाय

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Apr 2017 - 10:01 am

देवाधिदेव महादेव स्मशानात बसलेले असतात...
त्यांचे गण बेभान होऊन ॐ नम: शिवाय म्हणत नाचतं असतात..
शिवरात्र असते...महादेव आपल्या भक्ता समवेत,,शिवरात्रीचा आनंद लुटत असतात..अनेक भक्त महादेवाच्या भेटीस येत असतात..
त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेत असतात..
असाच एक बुद्धिवादी भक्त महादेवाच्या भेटीला आला...
उघडे नागडे भस्म चर्चित अनेक गण बेभान होऊन नाचत होते..
ते पहाताच तो महादेवास म्हणाला स्वामी आपण ब्रह्मांड निर्मिते..सा-या तंत्र विद्ये चे आपण जनक.. अन अश्या उघड्या नागड्या गांजेशस गणात आपण कसे रमता? ॐ नम: शिवाय चा अर्थ तरी याना माहीत असेल का?

तंत्र

विनोद खन्ना

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Apr 2017 - 9:52 am

आज विनोद खन्ना आपल्या मध्ये नाहीत
एक आठवण
......
गोष्ट जुनी आहे..
अभिनेता विनोद खन्ना यांच्या आयुष्यातला नाजुक काळ होता तो
पत्नी गीतांजली बरोबर फाटले होते.. स्मिता पाटील त्यांच्या जवळ येत होती..
त्या सुमारात विनोद ओशो कडे सल्ल्या साठी गेले होते..
आपली समस्या सांगितल्यावर भगवान ओशो म्हणाले..
"फिल्म जीवन मे तो आप ऍक्टींग कर रहे हो उसे जीवन समजो और निजी जीवन जो जि रहे हो उसमे ऍक्टींग करो"
Act like you are living life
Live life like you are acting

इतिहास

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
27 Apr 2017 - 7:36 pm

भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता?

परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.

संस्कृतीआस्वाद

शेक्सपिअरचे “यक्ष”गान

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
27 Apr 2017 - 5:46 pm

"द टेम्पेस्ट –(झंझावात)".

भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक.

त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं.

त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी.

त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान.

या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो.

कविताआस्वाद

जन पळभर करतिल हाय हाय

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
27 Apr 2017 - 11:56 am

भा रा ताम्ब्यान्ची क्षमा मागून _/\_

जन पळभर करतिल हाय हाय

(एका मुम्बई लोकल मध्ये ऑफीस गर्दीच्या वेळी प्रवास करणार्‍या चाकरमान्याच्या मनस्थितीचे वर्णन)

(डब्यात चढण्या पूर्वीच्या स्थितीचे वर्णन)

जन पळभर करतिल, 'हाय हाय !'
(कुणी उद्धरतील हे आय माय)
डब्या शिरता खन्त काय ?

(डब्याच्या पॅसेज मधल्या स्थितीचे वर्णन)
कुणी ढकलतील, कूणी सरकतिल;
सारे अपुला मार्ग आचरतिल,
तसेच सारे खडे राहतिल,
असेच पन्खे बन्द राहतिल ?

vidambanविडंबन