हे बुद्धिच्या ईशा
कानही बधीर आणि सहवेदनाही
नवसाचा बोगस क्लेम
मोदकांच अपचन
मंत्रजागराची तीनपत्ती
आणि मिरवणूकीत सैराटच्या गाण्यांवर
बेधुंद नाचणारा समाज पाहून
विकट हसलो तुझ्या दैवत्वावर
की माझ्या या बांधवांच्या उन्मादावर
समजेनासे झालंय हल्ली सार
हे बुद्धीच्या ईशा ,तुझ्या असण्यात
तरीही हवहवस वाटत काही
उत्सवातली शांतता असेल
उज्वल भविष्याची नांदी
हे उमजेल तो दीन उगवू दे