ढुस्क्लेमर्स : सदर लेखाचा कोणशीही वैयक्तिक संबंध नाही, संबंध वाटल्यास आपण स्वतःला जालिय हुच्चभ्रू म्हणून मिरवायला हरकत नाही. लेख पचायला अंमळ जड आहे , जमालगोटा जवळ ठेवल्यास वाचल्यानंतरचे त्रास टाळू शकता. जालावर फिरताना एक जड लेख वाचनी पडला , सहज विचार केला ... हे लोकं आपल्या घरी सुद्धा असंच बोलत असतील ? तर ? आणि कथा सुचली ! कथा काल्पनिक , पात्र वातावरणातली !! :)
स्थान : अंतरजालावर जड जड प्रतिसाद देणार्या काकाचं घर
पात्र :
गृहस्थ : सदानंद लिमये , जिवनाची आख्खी २५ वर्षे शिक्षणात घालवली, सी.ए. जरी असले तरी मराठीचे सुद्धा डॉक्टर आहेत. शुद्धलेखन आणि अतिशय शुद्ध भाषा ह्याचे हटयोगी आहेत. एका सरकारी बँकेत मॅनेजर आहे , अर्थात कार्यालयात काही काम नसते , तेंव्हा पुर्ण वेळ मराठी जालावर लोकांच्या डोक्याला शॉट देण्यास सज्ज असतात.
गृहिणी : गंगाबाई लिमये, हाडाच्या गावठी , सदानंदाने ह्यांच्या भाषेला नागरी बनवता बनवता आपल्या (डोक्यावरच्या) केसांची कुर्बाणी दिली , पण फरक नाही , सदोबांचे प्रयत्न थांबले नाहीयेत.
मोठा पोरगा : जयकिशन लिमये उर्फ जॉकि , आपल्या बुद्धीमान पप्पांच्या एकदम विरुद्ध ! स्वकौशल्यावर शिक्षणात आपला निभाव लागणार नाही हे त्यानं जाणलं होतं , आता झोल करून एन्टी-३ चं कास्ट सर्टिफिकेट बापाच्या नकळत मिळवून घेतलं आहे, त्याच्यासारखीच पोरं भेटल्यानं त्याची विचारसरणी तशीच झालीये, ओपनवाल्यांना शिव्या घालणे हा त्याचा हल्लीचा उद्योग. वडिलांनी इंजिनियरींगला टाकला होता, तब्बल ८ वर्षे प्रचंड मेहनत करून सेकंडक्लास मिळवला आहे, सॉफ्टवेयर इंजिनियर झालाय , म्हणतो जॉब करेल तर अशा कंपनीत , जिथे मला आरक्षण मिळेल (आत्तापर्यंत एकही पहिल्या राऊंडची अॅप्टीट्यूड टेस्ट सुद्धा क्लियर करता आली नाही असं त्याचा मित्र मध्या म्हणत होता)
छोटा पोरगा : विभाकर लिमये , लहान पोरानं वडीलांचं नाव अगदी उजळवलंय, लहानपणीच कोबी सारखा गोंडस होता म्हणून सगळेच लाडाने "कोबी" म्हणतात . बालवाडीत असल्यापासून त्याला लेखनाची प्रचंड आवड आहे , तो शाळेत असताना , त्यानेच लिहीलेले धडे आणि निबंध तिथल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले होते. जाईल तिथे पहिला नंबर मिळायचा , म्हणून लिमयांचं शेंडेफळ , पण कॉलनीतली टवाळ पोरं त्याच्या पुस्तकी बोलण्याला कंटाळून त्याची टर उडवतात म्हणून सारखा बाबांच्या कुशीत जाऊन रडे, बाबाही रडत.
थोरली पोरगी : शारदा लिमये , हिचं एम ए झालंय , कविता करण्याचा भलताच छंद , नेहमी तिच्याच भावविश्वात मग्न , तिकडे बाप काय बोलतोय आणि आई काय ओरडतेय , कश्शाकश्शाकडे लक्ष नाही , कानात आयपॉड घालून इंग्रजी , हिंदी मराठी कविता ऐकत बसते .
वेळ : लिमयांच्या घरातली सकाळची कार्यालय / महाविद्यालयात पळायची वेळ .
सदानंद लिमये : अगो, श्रवलीस काय? आज सुप्रभाती न्याहार्यर्थ काय आहे काय? आणि भोजनार्थ डब्बकामधे काय बरे ठेविले आहेस?
गंगाबाई लिमये : आवो , आंक्षी दम धरा की .. यक तं काय ब्वालता त्ये कळायला दोन दिस जात्यात..हानिमुनला शिमल्याला ग्येल्तो तवा काय काय बडवडच व्हता .. ते पार घरी आल्याव कळ्ळं .. आत्याबाई म्हणत व्हत्या ही आशी काय लाजंती इनाकारन मिर्च्या कुटताना .. कसल्ये समज व्हत्यात वो.. .. आंडी ठिवलीत उकडायला प्वारांसाठी , पुरीला म्यागी ... तुमास्नी काल राच्च्याला भिजत घातलेलं उडत आणि मुगडाळी हायत ! डब्यास्नी बी त्येच .
सदानंद : (स्वगतः हरे रामा, काय काशीनगरी कृतली आणि हा पाषाणखण्ड कण्ठीबन्धकृत करून घेतला कोणास ठावे, मम बुद्धी काही वैचारिक लेख लेखिण्यात मग्न जाहली असावी कदाचित्) अगो किती वर्षे ती जाहली, तव भाषा कधी गो सुधारितणार? ते 'आवो' नसते गो मम महामाये, "अहो" असते.. अ.. 'ह'स ओकार हो.. अ.. हो.. मराठीभाषावैद्य म्हणून माझी आंतरजालावरी काय ती कीर्ति.. (स्वगत : त्या दिनी 'शिवाली'नामक कन्यकेने माझ्या प्रतिसादाचे किती कौतूक केले.. कसा सर्रार्थ काटा आला होता तो प्रतिसाद पाहून, म्हणून सांगू) छे छे.. किं एतत अभद्रलक्षणं.. मजला न्याहारी मिळेल काय कामकाजार्थ कार्यालयी गमन करण्याआधी? कार्यालयाचा समय होत आलेला आहे. नपेक्षा किमान चहापेय उपलब्ध केले गेल्यास गिळंकृति करता येईल आणि शांतपणे गमन करता येईल. दे पाहू त्वरित अन्यथा मम समयपरिपालकव्यक्तिरेखेवर कार्यालयातील सर्व क्षुद्रजनांना ताशेर्य ओढावयास आयतीच संधी दौडून येईल. उणेपणा घ्यायला लागेल तो अन्यच..!
गंगाबाई : आत्तां !! मल्काय च्यार च्यार हात हाईत व्हय ? कुनाकुनाचं कराचं यकाचं येळेला .. ते मोठं दिवसभर क्वालनीच्या पोरात उनाडक्या करतंय .. शिकून म्हवटा विंजिनर क्येलाय न फिरतंय समद्या गावगुंडाबरबर .. त्यो कोण कांबळ्याचा हैबत हुबा रायलाय त्येच्या पार्टीची कामं करतंय ..जरा च्यार गुष्टी सांगा .. (मध्येच) आरं ए कोब्या .. आरं खाली यं .. किती आभ्यास करचिल ? साळंत जायचं नव्ह ? यं .. आंडी उकडल्याय पग माज्या सोन्या ..
सदानंद : अहो, जरा श्रवण करा, त्रागा उणा करत चला, आपली बालके वर्धितली आहेत, आपला कोबुकुमार देखिलास का ? मी त्याचे नाम अखिलभारतीय निबंधस्पर्ध्यर्थ नोंदविले आहे. मजला तर अगदी १००% खात्री आहे , आपल्या तातश्रींच्या नामाभिधानाचे अधःपतन तो खचितच होऊ देणार नाही असे, बालपणापासून त्यास माझी शिक्षा आहे! मी ३० वर्षाचा जाहलो त्यासमयीदेखील त्याच्यासम भाषासंपदा माझी नव्हती, माझीच दृष्ट लागते की काय त्यास, न कळे!
कोब्या : (जिन्यातुन खाली येत) काय बाबा , गुड मॉर्निंग , आई , कशी आहेस काय म्हणतेस ? आज काय विषेश चाललंय तुझं ? माझा नविन निबंध वाचलास का ? आधी वर जा वाच आणि हो, खाली येउन मला पटकन प्रतिक्रिया दे (कोब्याची रोजच्या दिवसाची सुरूवात अशी होते , गंगाबाईनी ही नेहमीप्रमाणे इग्नोर केलं) बाबा बाबा , मला एक नविन संकेतस्थळ चालू करावं असं मनात आहे , आणि हो, बर्याच जणांना शब्द टाकलाय पण ते काय म्हणतात ना "फाट्यावर मारणे" का काय ते, तसा काहीसा त्यांचा रिस्पाँस आहे . काय करू ?
सदानंद : भो कोबु, ह्या गोष्टी तू उत्तेजनार्थ घे, लोक कितीही उपहासात्मक बोलली तरी आपण आपली विचारसरणी सकारात्मक राखावी. तू गांधीजी देख, संत एकनाथ देख; तुका-ज्ञानोबां ह्यांची उदाहरणे तर अगदी गेल्या दोन किंवा चार शतकांतली आहेत, त्यांचे मुळीच विस्मरण होऊ देऊ नयेस. त्यांची आणिक पुस्तके मी तुज आणून देईन, ती केवळ तुझ्या संग्रही ठेवूं नकोस तर पाणन् पान स्मृतित ठेव. हेच सत्य जीवनमूल्य होय रे मम बालका!.
कोब्या : होय बाबा , मी ही सगळी पुस्तकं वाचली आहेत, आणि हो लक्षातही ठेवली आहेत !
सदानंद : पुनःश्च वाचन करावे , ज्ञानार्जनात कदापि कामचुक्री करू नये, लक्षात ठेव लघुरथ्या हा कधीच यशशिखरी नेत नाही!
(वरच्या रूम मधून जॉकि भाई डोळे चोळत खाली येतात , फक्त जॉकीवरंच असतात , केस कसे चुरगळलेले, डोळे रात्री उशीरा झोपल्यानं सुजलेले , आमावस्या किंवा पौर्णिमेलाच दाढीवर वस्तारा फिरवण्याचा चंग बांधल्याने, खुटले नेहमी प्रमाने वाढलेले, तेच खाजवत खाली उतरतो तोच.. सदानंदराव नेहमी प्रमाणे खेकसतात)
सदानंद : अरे गर्दभकुमारा, झाली का तुझी प्रभात? मग? आजच्या दिनाच्या २४ कला घालवण्याची काय योजना बनविलीत? कालच नवे टौपाझ्य घेऊन आलो आहे आपल्यासाठी, ते शिवधनुष्य उचला आणि अंमंळ गाल खाजवा त्याने! , नव्हे, मनुष्यात आल्यासारखे वाटाल!! आणि हे काय? फक्त लंगोट घालून काय फिरताय? ह्या अवनीतलावर आपण केवल एवटेच उरले आहात काय ? कमरेभवती काहीतरी गुण्डालन करा हे सांगणे का लगे? आमचे उपदेश जर स्विकारार्ह वाटले तर योग्य ती उपाययोजना करा!
जॉकि : ओ बाबा, जास्त बोलायचे काम नाही , समजले काय ? त्या आईने डोक्यावर तांब्या उलटा केला म्हणून ऊठलोय अजुन झोपेतच आहे ,समजले काय ? म्हणून सुचलं नाही , समजले काय ? .. ............
(समजले काय ? हा जॉकि साहेबांचा तकिया कलाम आहे , कसाही कुठेही वापरतात)
सदानंद : (जॉकिला तोडत) तसेही आपण गेली २५ वर्षे निद्रितावस्थेतच आहात बरे! दिनकर तव शिरोपरि आगमून विराजमान झालेत .......
जॉकि : (दचकत्) कोण ?
कोब्या : अरे दादा , दिनकर म्हणजे सुर्य रे , जसा बोर करणारा बोरकर तसा , रात्रीतून दिवस करणारा दिनकर , हो की नाही हो बाबा ?
सदानंद : हो हो , अतिशय सुयोग्य उकल केलीस बघ , मम पुत्र शोभतोस तू..
जॉकि : असं होय ? मग "सुकर" म्हणजे 'सू' करणारा का ? (जिन्यातून खाली येता येता)
जॉक्या जोरात हसायला लागला पण सफानंदाच्या चेहर्यावरच्या ३ रेषा पाहून तो गप्प झाला. आणि गुमान नाष्ता रचू लागला. तेवढ्यात पुर्वेकडून एक सुर्यकिरणांची रेघ घरातला मंद उजेड दिरत कोब्या खात असलेल्या अंड्यांच्या प्लेट वर पडली. पुर्वेकडची रूम म्हणजे आपल्या शारदा दिदि ची , दिदि आल्या त्या त्यांच्या कविता मोड मधे.
शारदा :
असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
कोब्या : टाळ्या !!!! शारदा दिदि , तसा मी कोणाच्याही कवितेवर किंवा लेखावर असा प्रतिसाद देत नाही, पण तुझा तसा गैरसमज होऊ नये म्हणून बोललो ! तसा मी आज सकाळी उठून एक निबंध लिहीलाय , तो वाच आणि प्रतिक्रिया दे मला !!
शारदा : (हिला ही कोब्याला इग्नोर करण्यात धन्यता आहे हे कळते) सोड रे अजुन एक सुचतंय
अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली
घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली
घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी
समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी
(तोडत )
कोब्या : वा वा शारदा दिदि वा !! काय सुचतंय तुला , बाबा संध्याकाळी आलात की हिच्या कवितेचं रसग्रहण करा हो , आणि हो , बँकेत जाऊन माझा निबंध नक्की वाचा , मी तुम्हाला लिंक दिलेली आहे , माझा धागा खाली गेला असेल त्याला कृपया वर आणा
सदानंद : असा चिंतित तू होऊ नयेस, तू निश्चिंत मनाने जावे महाविद्यालयात, मी तुझ्या लेखणार्थ एक पुर्ण वैचारिक प्रोत्साहनात्मक प्रतिसाद तुला लिहेनच , उपहासात्मक प्रतिसादांचे ते काय मनावर घेऊ नकोस
जॉकि : बाबा ,तुम्ही फक्त त्याच्या त्या रटाळ निबंधांना प्रतिसाद देतात , मी लिहीलेल्या " भारताचा विकास : जातिय आरक्षण " ह्यावर तुम्ही अजुन प्रतिसाद देताहात! तो धागा आता बारा पानं मागे गेला !
सदानंद : हे देख जयकिशना, तुझ्या लेखणार्थ प्रतिसाद लिहीण्यास काहीच कष्ट नाहीत, परंतु त्या लेखाचे वाचन करिताना माझ्या अतिसंवेदनशील मनास ज्या सहस्रावधी यातना होतात त्या मी सहन करु इच्छित नव्हे. तुझी भाषासंपदा केवल एखाद्या क्षुद्र लेखकासम आहे. अरे कोबुकडून शिक काहीतरी... मनुष्य जीवनांतापर्यंत ज्ञानाभिलाषी असलाच पाहिजे !
जॉकि : राहू द्या तुमचं तत्वज्ञान .. मला नको काही तुमचा प्रतिसाद ... मी त्यात जातीविषयक काहीतरी लिहीतो .. माझे १०० प्रतिसाद अस्से (चुटकी वाचवत) होतील.
कोब्या : चला हो बाबा , उशिर होतोय , रुपेश माझी वाट पहातोय आम्ही एकांकीका बसवणार आहोत !
सदानंद : उतलास, मातलास.. बालका एकांकीका नव्हे, एकांकिका, कि हा र्हस्व आहे दीइइइर्घ नव्हे! तुझी एकांकिका आहे, नाही काय? चल चल मी सोडतो तुला, ११ क्रमांकाने गमनावे का आज?
(सदानंद आणि कोब्या निघून जातात)
गंगाबाई : आगं ए भवाने , त्ये म्यागी गार व्हतंय की ... हादड पट्टदिशी .. मला ब्लावजं शिवायची पडल्यात अजुन खंडीभर !!
शारदा :
आली आली चाबुकवाली , शब्द कापिले माझे अमुलबटर वानी,
गेले मन माझे घायाळूनी , चला घ्या पटकन म्यागी खाऊनी
जॉकि : ए आई , मी चाल्लोय मंडळात , आपला आबा उभा राहिलाय "रिडालोस" चं टिकीट मिळालंय त्याला , निवडून आला तर आय.टी. कंपन्यात सुद्धा आरक्षण आणू असं म्हंटलाय मला ! त्यालाच मत द्यायचं बरका !! ये तायडे .. कळ्लं का ?
शारदा :
रिडालोस रिडालोस ... लोस लोस रिडालोस ..
घडलोस बिघडलोस .. रिडालोस रिडालोस ..
पडलोस उठलोस ..भरघोस भरघोस ..रिडालोस रिडालोस
गंगाबाई : आत्तां ? आता ह्यो कोन नविन ? मागल्या येळेला लोकसभेत आपटला ना रं त्यो ? आन मग आता इदानसभंला कसा काय निवडून यील ? काय करत्यात त्येंच त्येंन्ला म्हाईत ..
जॉकि : त्याची काळजी करायची नाही आं आई ,,, मी परवाच एक नवा कौल काढलाय , त्यात आम्ही मित्र मिळूनच सगळी मतं रिडालोस ला दितीयेत .. म्हणजे किमान अशी हवा तरी केलीये , ह्या वेळेस ... येउन येउन येणार कोण ? "रिडालोस " शिवाय आहे कोण ?
शारदा :
घोषणा मोठ्या करती,
नेहमी तोंडावर पडती,
तरी न अक्कल सुचती,
भारत माता की जय
जॉकि काही नं ऐकल्या सारखं करत निघून गेला.
(बस स्टॉप वर : नाना खवट ही तिथेच उभा होता. अजुन चार पाच टाळकी होती )
सदानंद : काय हो महाशय, ही ११ अंकाची यात्रीवाहिका गच्छली का हो?
नाना : नाही , कल्पना नाही , एक शववाहिका गेली , माझ्याकडे नंबर आहे , बोलावू का परत ?
सदानंदांना झक मारली नी काशी केली असं झालं , ते पुन्हा बसची वाट पाहू लागले.
कोब्या : बाबा , मला ह्याच्या भाषेवरून संशय येतोय , ह्यानेच माझ्या एका लेखाची निबंध म्हणून वाट लावलेली तिकडे !
तेवढ्यात बस येते , बाबा नेहमीप्रमाणे कोब्याला उत्तेजनार्थ घेण्याचा सल्ला देऊन चढतात !
(सदानंदराव बँकेत पोचतात , अगदी १०च्या ठोक्याला)
सदानंदराव :(घर्मबिन्दु टिपत) हा हन्त हन्त! अलिकडे ह्या भूतापामुळे उष्मा काय प्रचंड वर्धितला आहे म्हणून सांगू तुम्हास कुलकर्णी भगिनी, लाजाहोम होतो आहे जिवाचा!१२ जुलै २००१ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे कोलकाता शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, महाराष्ट्राच्याच्या दुष्काळी क्षेत्रांत, अंमळनेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती. अलीकडील सहा वर्षांत काढलेल्या पश्चिम पाँडेचेरी आणि ब्रह्मदेशाच्या उपग्रह प्रकाशचित्रांत असे लक्षात आलेले आहे की पूर्वी दिसणार्या २११ बेटांपैकी फक्त १२ बेटेच हल्ली दिसून येत आहेत. माझ्या मते, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे बाकी बेटे पाण्याखाली बुडाली आहेत व म्हणून दिसेनाशी झालेली आहेत. अनेक वर्षांपूर्वीही, या बेटांवर सुंदरी तरूणी आढळत असत आणि कॅलिफोर्नियाचे (पिवळे) डांबिस लोक लाईनी मारत फिरत असत. २००८ दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, ब्रम्हदेश आणि उत्तर-पूर्व भारतात पावसाळा जवळपास एक महिना पुढे सरकला आहे...................................
(कुलकर्णी मॅडम आपलं काम करत २० वेळा गेल्या २० वेळा आल्या तरी सदानंद रावांची बडबड असख्खलितपणे चालू होती. ) इकडे तिकडे पाहिल्यावर कोणी आपल्याकडे पहात नाही हे पाहून लिमये शांत झाले.
कारकुन : सायेब , जरा त्या अभ्यंकराच्या फायलीचं काय झालं ? ते लै दिवसांपासून चकरा टाकून र्हायलेत.
सदानंद : शी शी! अरे काय ही तव भाषा ? तव चुक्री ती काय म्हणा! तू आलाचेस त्या अभ्यंकराच्या कर्मार्थ ! तो ही तसाच न तु ही! अरे सभ्य देशाचे सभ्य नागरिक रे आपण!! त्या देशार्थ काही तरी उपकारार्थ करा रे ! ह्याच देशाचे पदार्थ खातो आपणे हे सांगणे लगे?
(कारकून केंव्हाच निघून गेला होता)
(जमल्यास क्रमशः)
आगामी आकर्षक पात्र :
मित्र १ : शिवाजी सावंत, लिमयांचे खास दोस्त , दोघांची मैत्री जालावरच झाली , अत्यंत वैचारील सातव्या मजल्यावरून जाणारे उच्च लेख लिहीण्यासाठी सावंत काकांचा हातखंडा आहे , लिमये आणि सावंत रोज जॉगिंगला जातात. दोघे आहारार्थ काय खावे ह्यावर भरपुर चर्चा रटवतात. बाकी म्हातार्यांनी त्यामुळे आपला वेगळा गृप बनवला, वेळ आणि स्थळ दोन्ही बदलले.
मित्र २ : व्हि'नायक शंभू , कॉलनीत हिरवट म्हातारा म्हणून प्रसिद्ध ! Sigmund Freud चं एक पुस्तक वाचून हे एवढे प्रेरित झाले की त्यांना जगंच हिरवं हिरवं दिसायला लागलं ! लिमयांचा हा बालपणचा एकुलता एक मित्र.
शेजारी : गोविंद भांडणकर , ह्याची आणि लिमयांची नेहमीची कडाक्कड कडाक्कड भांडणं ठरलेली ! कॉलनीतल्या पोरांना पार्ट्या देऊन ह्यानं आपलंस केल्यानं लिमये ह्याच्याशी जरा दबकून आहेत
प्रतिक्रिया
30 Sep 2009 - 2:14 am | घाटावरचे भट
म आणि हा आणि न!!! टार्या फॉर्मात!!!
पयला परतिसाद आपलाच च्यामायला... आपन नि टार्या यकाच कंपूतले, हाय का नाय बे टार्या?
30 Sep 2009 - 3:37 pm | गणपा
निव्वळ अफलातुन
जसा बोर करणारा बोरकर तसा , रात्रीतून दिवस करणारा दिनकर
=)) =)) =)) =)) =))
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
30 Sep 2009 - 2:31 am | नंदन
कं लिवलंय, कं लिवलंय =)) =)). एकाच लेखात किती म्हणून पक्षी मारायचे भौ! पुढचे भाग येऊ द्या.
- नशीब लिमयांकडे स्कूटर नव्हती, नायतर कोटा पूर्ण झाला असता (नानाचा की लिमयांचा हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून :))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Sep 2009 - 2:37 am | घाटावरचे भट
चिंताच नको. मिपाचे वाचक फारच दांडग्या कल्पनाशक्तीचे आहेत. ;) आता आम्ही तुम्हाला कोणती म्हणून उदाहरणे देणार? तुम्ही शिणियर आहात (अजून काका नायतर आजोबा नाय म्हणून काय झालं?), समजून घ्यालच!!
30 Sep 2009 - 5:45 pm | सूहास (not verified)
उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ
प्रेषक टारझन ( मंगळ, 09/29/2009 - 09:08) . पाकक्रिया >>>
=)) =))
हसायला ईथुनच सुरुवात झाली..नशीब भेळ नाय बनविलीस...
ढुस्क्लेमर्स : .......त्रास टाळू शकता>>>
=)) =)) =)) =)) =)) =))
तु त्याची काळजी करु नकोस रे ,हल्ली लोक्स जमालगोटा , शतघौतघृत व अमृताजंन घेऊन बसतात असे वाचण्यात आले आहे...
बाकी संपुर्ण लेखाबद्दल ...
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सुचना : अनेक लोक्स आता धोतराशिवाय फिरतील याबाबत शंका नाही..
बाकी ..
एका पाचवी ब ईयेत्तेतल्या एका बाळबोध निबंधाचे ईतके परिपक्व विडंबन आवडले नाही. कारण...
१) प्रस्तुत लेखात जात / धर्म/पंथ/वर्ण यांचा उल्लेख नाही..
२) वांझोटी राजकीय चर्चा नाही (रिडालोस म्हणजे राजकारण नव्हे.)
३) राशीभविष्य/ नाडीपरीक्षा ह्या विषयांवर काही ही लिहीलेले नाही.
४ ) हा निबंध ईतिहास संशोधनाविषयक चर्चेला पुरक नाही .
५ ) भारतीय अमेरिकन/ अमेरिकन भारतीय /निवासी भारतीय अमेरिकन/ अनिवासी भारतीय अमेरिकन/निवासी अमेरिकन भारतीय /अनिवासी अमेरिकन भारतीय / अदिवासी (नको बास झाल)ह्या वादात हा लेख गुरफटला जाउ शकत नाही.
६ ) अमेरिकेत " ओबामा " कुठला टिश्श्यु पेपर वापरतात आणी पाकिस्तानात कुठला ? ह्याचा देखील उल्लेख नाही
आणी सर्वात शेवटी..
७) एकही परभाषीय आंतरजालीय वांझोटी लिंक न देता हा लेख कसा प्रसिध्द केला गेला..
धष्टपुष्टवेक्ता..
सू हा स...
30 Sep 2009 - 9:01 am | दशानन
>>>नानाचा की लिमयांचा हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून
१००% नानाचा रे....
लिमये नानाला नाय झेपायचा... ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
30 Sep 2009 - 9:18 am | अवलिया
लिमये आपल्याला नाय झेपणार.. !! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Sep 2009 - 2:52 am | टिउ
क ह र!!!
टार्याचे लेख/प्रतिसाद म्हणजे पैसा वसुल असतात याचा पुन्हा एकदा अनुभव आला...चौफेर फटकेबाजी!
अवांतरः आगामी आकर्षणात गिरीजा श्रीवर्धन यांचं नाव नसल्यामुळे आपणास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येत आहे...नाहीतर पयला लंबर पक्का होता!
30 Sep 2009 - 3:45 am | पाषाणभेद
(जमल्यास क्रमशः) ???
कशाला?.... कशाला?....
जमवाच बुवा एकदाच.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
30 Sep 2009 - 5:16 am | मिसळभोक्ता
पैल्या पाचात रे !!
(त्या टिउची सूचना मनावर घे !)
आणि सर्वात बेष्ट, म्हन्जे कविता टाकायला लाग ! तुझ्यात मला एक स्पार्क दिसतो आहे:
अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली
घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली
घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी
समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
30 Sep 2009 - 7:27 am | चित्रा
हसून मरायची वेळ आली. कहर आहे.
1 Oct 2009 - 4:50 am | सुबक ठेंगणी
सॉल्लिड धोबीपछाड! :D =))
अत:करण उद्वाहक म्हणून हा लेख नेहमी कामास येईल. वाचनखूण साठवली आहे. ;)
2 Oct 2009 - 2:31 am | धनंजय
खूपच मजेदार. क्रमशः जमवाच राव.
21 Oct 2009 - 6:48 pm | रेवती
असेच म्हणते.
फार वेगळं काही म्हणायला जागा नाही ठेवली टार्यानं!
रेवती
30 Sep 2009 - 7:33 am | क्रान्ति
असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
=)) =)) =)) =)) =))
कोब्या : वा वा शारदा दिदि वा !! काय सुचतंय तुला , बाबा संध्याकाळी आलात की हिच्या कवितेचं रसग्रहण करा हो , आणि हो , बँकेत जाऊन माझा निबंध नक्की वाचा , मी तुम्हाला लिंक दिलेली आहे , माझा धागा खाली गेला असेल त्याला कृपया वर आणा
सदानंद : असा चिंतित नको होऊस , तु निश्चिंत मनाने जा महाविद्यालयाय , मी तुझ्या लेखणार्थ एक पुर्ण वैचारिक प्रोत्साहनात्मक प्रतिसाद तुला लिहीलंच , उपहासात्मक प्रतिसादांचं मनावर घेऊ नकोस
जॉकि : बाबा ,तुम्ही फक्त त्याच्या त्या रटाळ निबंधांना प्रतिसाद देतात , मी लिहीलेल्या " भारताचा विकास : जातिय आरक्षण " ह्यावर तुम्ही अजुन प्रतिसाद देताहात! तो धागा आता बारा पानं मागे गेला !
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
टारू, महान आहेस!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
30 Sep 2009 - 7:42 am | सहज
इष्टमनकलर मणोरंजन!
मागली अमोश्या चांगलीच लाभली तुला, लेखन ग्रह चमकू लागले आहेत. :-)
30 Sep 2009 - 7:46 am | विसोबा खेचर
हुच्च उत्तेजना आणणारा लेख.. :)
तात्या लिमये.
30 Sep 2009 - 8:07 am | विनायक प्रभू
आणखीन एक पुस्तक वाचतो.
'वेळेचे महत्व' ह्या विषयावर.
'व्ही' नायक शंभु
30 Sep 2009 - 8:11 am | लवंगी
मिभो भाऊ बरोबर बोलून राहिले.. तुझ्यात स्पार्कच स्पार्क दिसताहेत..
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती.. साष्टांग दंडवत !!
=)) =)) =))
30 Sep 2009 - 8:23 am | दशानन
कोब्या मध्ये कोणी तरी राहून राहून दिसत आहे.... ;)
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
तु कविता करायला लाग बाबा... लै भारी करशील ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
30 Sep 2009 - 3:53 pm | मृगनयनी
अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली
घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली
घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी
समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी
ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$ठ्ठो$$$$$
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
टार्या.... तू के व ळ अ ष क्य आहेस्स!!!!!!!!!
अवांतर : त्या शुद्ध तुपातल्या लिमये' ला अक्शी बाटवलास्स !!! :-?
जय भीम आणि जय परशुराम एका ताटातुन ऐक्मैकान्ना भरवत.... सौरी सौरी... 'चारत' असल्याचा अम्मळ भास झाला...
;)
___/\___
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
30 Sep 2009 - 8:57 am | शाहरुख
=))
कवितांचा नाद खुळा !!
30 Sep 2009 - 9:17 am | प्राजु
कहर आहेस तू!
सह्ही चालू आहे.. चालूद्या!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Sep 2009 - 9:20 am | अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
छप्परफाड रे !! पुढचे भाग येवु दे पटापट.. !!!
प्रतिसादार्थ आम्ही आहोतच.... पहिले बक्षीस घेवुन.. ! :)
नाना खवट उर्फ अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Sep 2009 - 9:28 am | दिपाली पाटिल
तुझं नाव अशक्य टार्या ठेवलं पाहीजे आता... :D
=))
दिपाली :)
30 Sep 2009 - 9:30 am | पिवळा डांबिस
झकास लिवलंय...
घोषणा मोठ्या करती,
नेहमी तोंडावर पडती,
तरी न अक्कल सुचती,
भारत माता की जय
जॉकि काही नं ऐकल्या सारखं करत निघून गेला.
जॉकी निघून गेला पण ते नाना येतंय बघ आता तुझ्यामागं दांडका घेऊन!!!!
:)
30 Sep 2009 - 9:53 am | फ्रॅक्चर बंड्या
लय भारी
30 Sep 2009 - 10:09 am | गोगोल
वर सर्वांनी लिहील्याप्रमाणे गदगदून हसायला लावणारा सुरेख लेख जमलाय. पण मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे सादरीकरण...वेगवेगळे रंग वापरून. कोब्या एकदम आवडला रे (म्हणजे या लेखापुरता हं)
30 Sep 2009 - 10:15 am | निखिल देशपांडे
अबे टार्या भयंकर लिहिले आहेस बे!!!
हसुन हसुन वाट लागली आहे!!!!
पुढचा भाग टाका लवकर
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
30 Sep 2009 - 10:18 am | वेताळ
आता थाबांयचं नाही टारु शेठ....एका वर एक येवु द्यात ह्याचे भाग.मस्त ,चटकदार ,खुशखुशीत लेख..हसारयचे म्हणजे किती? लई भारी.... =)) =)) =)) =)) =))
वेताळ
30 Sep 2009 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे
फुडचा लेख येउंद्या उपासात्मक जेवणाच्या उत्तिष्ठनार्थ. म्हंजी फुल्ल 'वसुलि' व्हईन.
गंगाबाईला जर ब्लाउज मदी विलॅष्टिक घालायची आयडिया दिली तर कंच्या बी साईजला फिट बसन.कापाडच विल्याष्टिकशिटी हा गुनदर्म असल्याल असन तर पेटंट -हाउं द्याव म्हंतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
30 Sep 2009 - 10:44 am | हर्षद आनंदी
टार्याभाऊ,
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
म्हणीचा सर्स्वी प्रत्यय आला
कार्यालयात मजबुत धिंगाणा झाला...
या पामराला, आपल्या पंख्यांच्या यादीत थोडी जागा द्याल का?
30 Sep 2009 - 11:19 am | llपुण्याचे पेशवेll
खल्लास. टार्या के व ळ अ प्र ति म हे शब्द देखील कमी पडत आहेत. :)
(टार्या भयंकरचा ण फिरणारा फॅण)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
30 Sep 2009 - 11:19 am | धमाल मुलगा
अबे काय लेख लिहिलाय का मजाक करुन र्हायला बे?
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
च्यायला! टार्या ऑन फायर....
क आणी ड आणि क !
साल्या त्या कवितांचं आउटसोर्सिंग कुणिकडं केलं होतं बे? एकदम वरिजनल हैत!! अस्सल पैल्या धारेच्या :)
चालुद्या!
तुम्ही लिव्हा...आणि आम्ही गडाबडा लोळत हसुन वाचतो :D
30 Sep 2009 - 11:39 am | श्रावण मोडक
...
30 Sep 2009 - 11:40 am | ऋषिकेश
=))
तुझ्या लेखनाचा उपक्रम आवडला ;) :)
ऋषिकेश
------------------
सकाळचे ११ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "बनवाबनवी.. अशी ही बनवाबनवी...."
30 Sep 2009 - 11:49 am | sneharani
=)) =)) =)) =))
हसुन हसुन वाट लागली आहे!!!!
30 Sep 2009 - 11:50 am | दिपक
कविता वाचुन हसुन हसुन मरायची पाळी आली. जबराट.
30 Sep 2009 - 11:55 am | ऍडीजोशी (not verified)
टार्या चा लेख टार्या सारखाच महा ही &ही आहे :) :) :) :) :)
30 Sep 2009 - 11:58 am | विमुक्त
भन्नाट!!!!!!!!!!!
लयं भारी....
हसुन हसुन वेडा झालो...
30 Sep 2009 - 12:04 pm | शक्तिमान
प्रतिसाद पाहून येडा झालो....
आरामात वाचून प्रतिक्रिया देतो...
30 Sep 2009 - 12:21 pm | बिपिन कार्यकर्ते
जंगलकुमार, लेख अगदी रोचक आहे. पण आपण हे लेखन करताना काही विदा गोळा केला होता का? आणि कोणत्या निरीक्षणपध्दतीनुसार केले हे विदासंकलनाचे काम? इथे लिहिताना कोणत्याही प्रकारचा नियमभंग अथवा औचित्यभंग होऊ नये हीच इच्छा. एक नम्र सूचना. लेखनात इतका उपमा उत्प्रेक्षा (हुश्श!!! जमलं बुवा एकदाचं लिहायला) इत्यादी अलंकारांचा उपयोग बहुधा लेखनाच्या मूळ गर्भित अशा आशयास मारक ठरतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. त्यामुळे आपण पुढचा भाग लिहिताना या सूचनांचा जरूर विचार करावा.
आणि हो, आपण बहुतेक ठिकाणी न ऐवजी ण असे लिहिता. या मागे काही व्याकरणीय नियम आहे काय? असल्यास कोणता? नसल्यास, आपल्याला काही शरीरशास्त्रीय दुविधा आहे काय? उदाहराणार्थ, बोटाचे हाड वगैरे वाढणे इत्यादी... जरूर लिहावे. समजून घेण्यास उत्सुक आहोत.
*** हा झाला लिहायचा प्रतिसाद, आता खरा मनातला प्रतिसाद ***
हाण्ण तिच्यायला!!! टार्या, लेका... एकही धोतर शिल्लक ठेवलं नाहीस रे फाडायचं. च्यायला, पार मुरगळून पिरगळून टाकल्यास की रे मुंड्या. कविता तर जबरीच. मला तर आता संशय येतोय की तो आयडी तुझाच डुप्लिकेट आहे की काय? इतकी वर्जिनल आहे कविता. थोडक्यात काय तर लेख अगदी...
क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क आणि ड आणि क
बिपिन कार्यकर्ते
30 Sep 2009 - 5:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फाडा का फेडा?
असो. या ही & ही निबंधाची लांबी अंमळ आपल्या बोटाच्या हाडाप्रमाणे जास्त झालेली आहे. पुढच्या वेळेस अंमळ लहान निबंध लिहीलात तर आमच्या ब्लॉगवर आपल्या नावासकट नाट्यछटा म्हणून प्रकाशित करण्यात येईल.
अदिती
1 Oct 2009 - 2:27 pm | टारझन
अदितीजी ,
आपल्या प्रतिक्रयेबद्दल आभार , नजरचुकीने प्रतिक्रिया वाचायची राहून गेलेली क्षमस्व !
चालायचंच , काहिंना मोठा आवडतो .. काहींना छोटा .. सगळ्यांच्या आवडीनिवडी नाही संभाळता येत :)
-(कधी मोठा , कधी छोटा) टारझन
30 Sep 2009 - 12:57 pm | ब्रिटिश टिंग्या
आपल्या लेखनार्थ हा आमचा उत्तेजनार्थ प्रतिसाद!
- टिंग्या
30 Sep 2009 - 2:53 pm | प्रभो
छाण.......स्वारी छान म्हणायचे ना रे आता , टार्या ??? :)
१ णंबर........
असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
टिपिकल टारोबा......
कोब्या : बाबा , मला ह्याच्या भाषेवरून संशय येतोय , ह्यानेच माझ्या एका लेखाची निबंध म्हणून वाट लावलेली तिकडे !
अगगगगगग.........कार्टं तरीपण त्वाँड उघडतयच की रं!!!!!
(जमल्यास क्रमशः)
रोज स़काळ संध्याकाळ होऊन जाउदे.......एक उत्तेजना+ रथ :) =))
30 Sep 2009 - 3:16 pm | विजुभाऊ
अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली
घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली
घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी
समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी
टार्या कविता ऑटसोर्स केल्या नसतील तर तुझे नाव पैल्या तीनात. पैला लंबर टार्दिनी चाच.
बाकी लेखाबद्दल काय बोलायची सोय नाय. बेष्टच.
जीऑ टार्या जीओ.
मुळमुळीत गुळमुळीत मिळमिळीत पुळकावणी
ठरतात टार्याच्या पुढे ठाकता उभ्या सार्या झणी.
30 Sep 2009 - 3:55 pm | चतुरंग
कविता वाचून गदगदलो रे! त्या मुळातच 'तशा' असल्याने विडंबनार्थ कहीही न मिळाल्याने खट्टू झालो. प्रतिसादार्थ काहीही लिहू नये असे मनात येत असतानाच चारचौघात प्रतिमेला उणेपणा येऊनये म्हणून बुद्ध्याच प्रतिसाद द्यायचे ठरवले. असो. डोक्याची जास्ती मंडई करत नाही!
<०=8=<
()चतुरंग
30 Sep 2009 - 4:57 pm | गणपा
रंगाशेठ ना कच्चामाल न पुरवल्या बद्दल टारुला कोजागीरीच्या शुभेच्छा..
आवांतर : रंगाशेठ, बसुन बसुन कुले अंमळ सुजल्यासारखे दिसतायत. ;)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
30 Sep 2009 - 5:11 pm | धमाल मुलगा
गणप्या......
=)) =)) =)) =))
_/\_
30 Sep 2009 - 5:15 pm | प्रभो
आईईईईईईईईईईईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!
गणप्या लेका , _/\_
30 Sep 2009 - 8:44 pm | चतुरंग
बसून बसून आत्ता तेवढंच झालंय! :D
ह्या पुढचं वर्जन कसं असेल हे काही आठवड्यांपूर्वी बिकांच्या खवमध्ये लावलेलं होतं. थोडे खोदकाम केलेत तर सापडेल ;) :B
(अंमळ थोराड)चतुरंग
30 Sep 2009 - 4:10 pm | समंजस
टारोबा, झक्कास जमलंय!!
मात्र या वेळेस लेखका पेक्षा, कवि ने बाजी मारली :)
30 Sep 2009 - 5:19 pm | स्वाती२
हसून हसून आता मला उचक्या लागल्यात. अशक्य लिहिलयं!
30 Sep 2009 - 6:54 pm | पर्नल नेने मराठे
चुचु
30 Sep 2009 - 7:01 pm | टारझन
बरं झालं मोठ्या पोराचा फोटो नाही लावलास चुचे !!
सर्व प्रतिसादार्थींचे धन्यवाद !! पण्णास प्रतिक्रिया झाल्याशिवाय प्रतिक्रिया टाकायची नाही असा हट्ट मी स्वतःशीच केलेला :) हट्ट कसे करावेत ? हे मी लतादिदिंकडून शिकलो :)
ज्यांना लेख आवडला त्यांचे आभार , ज्यांना नाही आवडला , त्यांचे हार्दिक आभार ,
आणि जे आले पण प्रतिक्रिया न टाकता गेले, त्यांनी किमान डोकावण्याचे उपकार केल्याबद्दल त्यांचा मी आजन्म ॠणी आहे !!
धन्यवाद मित्रांनो
- टारझन
21 Oct 2009 - 2:58 pm | घाशीराम कोतवाल १.२
पण टार्या पुढचा भाग कधी टंकणार आहेस रे आता पन्नासच्या वर प्रतिक्रिया झाल्या आता येउ दे पुढचा भाग लवकर लवकर बर
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
30 Sep 2009 - 8:07 pm | बाकरवडी
रंगीबेरंगी वाचवत नाही.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
30 Sep 2009 - 10:19 pm | निमीत्त मात्र
वावावा! टारझनराव चांगलेच हसवलेत. पुढच्या भागांमधे जाकार्ताचे काका पण येतायत का बघा :)
1 Oct 2009 - 5:35 pm | उपास
अतिशय मार्मिक मारलेयस टार्या.. तुस्सी ग्रेट हो! तुझ्या निरीक्षणशक्तीला, गद्य पद्य लिखाणाला आणि सादरीकरणाला (घाऊक) सलाम.. जय हो! :)
2 Oct 2009 - 1:42 am | संदीप चित्रे
>> असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
क्या बात है ! सगळा लेखच दंगामस्ती आहे !
क्रमशः नक्की पूर्ण कर .
22 Apr 2010 - 2:19 pm | मितभाषी
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
23 Apr 2010 - 7:29 pm | चित्रगुप्त
बेफाम...अचाट....झकास...
पुढील भागाचा बेसब्रीसे इंतजार तर आहेच, पण या सदानंद लिमयेच्या बालपणापासूनची सर्व हकीगत वाचायला पण अतिशय आवडेल....
7 Dec 2010 - 1:39 pm | नगरीनिरंजन
दसनंबरी व्रात्यछटा!
पुणरागमणाच्या णिमित्तार्थ णिबंधाचा पुढचा भाग आयोजित (मेष)पात्रांसकट आल्यास आणंद वाटेल.