इस्रोचे अभिनंदन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Sep 2009 - 8:42 am

इस्रोचे अभिनंदन

काल ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविलल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) अभिनंदन.
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण झाले. ओशनसॅट-२ उपग्रहाबरोबरच जर्मनीचे चार छोटे उपग्रह, तुर्कीचा एक व स्वित्र्झलडचा एक असे एकूण सहा उपग्रह अवकाशात एकाचवेळी सोडले गेले. एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाचवेळी दहा उपग्रह एकाचवेळी सोडून एक जागतिक विक्रम केलेला आहे.

इस्रोचे पुन्हा एकादा अभिनंदन!

(सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. )

तंत्रभूगोलविज्ञानशुभेच्छाअभिनंदनबातमी

प्रतिक्रिया

प्राजु's picture

24 Sep 2009 - 8:47 am | प्राजु

छान बातमी!!
इस्त्रो चे अभिनंदन!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

24 Sep 2009 - 11:13 am | अवलिया

असेच म्हणतो.. !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज's picture

24 Sep 2009 - 8:49 am | सहज

>सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे.

पटेश!

विशाल कुलकर्णी's picture

24 Sep 2009 - 9:15 am | विशाल कुलकर्णी

+१, असेच म्हणतो !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन's picture

24 Sep 2009 - 8:50 am | दशानन


अजून एक खास बातमी !

चंद्रावर पाणी आहे ह्याचा पुरावा आजच चंद्रयान-१ च्या उपकरणांनी दिला !

इस्रोचे अभिनंदन

***
राज दरबार.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2009 - 1:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा त्या बातमीचा दुवा. ते उपकरण 'नासा'चं होतं आणि चांद्रयान फक्त वाहक होतं. त्यामुळे यात इस्रोचं भलंमोठं यश आहे असं मलातरी वाटत नाही. (मला चंद्रात अजिबात रस नाही, काही चॉईस आहे का नाही मलाही!)

इस्रो आणि सर्व टीमचे अभिनंदन. भारताने आता सॅटलाईट लाँचिंग हा व्यवसाय सुरू केला आहे, याचा अभिमान वाटतो.

अदिती

अमृतांजन's picture

24 Sep 2009 - 1:38 pm | अमृतांजन

अभिनंदन

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Sep 2009 - 5:39 pm | डॉ.प्रसाद दाढे

निषेध!!
इस्त्रोने आपले आधीचे निरूद्योगी उपग्रह परत बोलवायचे सोडून आणखी सात उप(द्रवी) ग्रह सोडून 'अंतराळीय कचरा वाढविल्याबद्दल कडकडीत निषेध!!