भक्तिभाव आणि काही प्रश्न

शुभान्कर's picture
शुभान्कर in जनातलं, मनातलं
31 Aug 2009 - 7:35 pm

सध्या गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण जोशात चालू आहे.

आपण दररोज पेपरात आणि टीव्हीवर लालबागच्या राजाच्या विक्रमी गर्दीच्या बातम्या वाचतो. लोकं २०-२२-२४ तास रांगा लावून मुलाबाळांना घेऊन दर्शनासाठी ताटकळत उभे राह्तात. त्यातुन निर्माण होणार्‍या समस्यांचा (सामाजिक आणि वैयक्तिक) लोकं विचार करतात का? एवढा वेळ गर्दीत उभे राहील्याने मुलाबाळांचे जे हाल होतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे ती बरी व्हावित म्हणुन पुन्हा एक नवस. आणि मग हे चक्र संपत नाही. शिवाय सुरक्षा यंत्रणेवर जो ताण पडतो. तो वेगळाच.

भक्तिभाव मलाही मान्य आहे. पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का? आजकाल लालबागच्या राजाचे दर्शन मिळणं म्हणजे prestige issue झाला आहे.

तुम्हाला काय वाटते?

क्रुपया लक्षात घ्या मी परमेश्वराच्या ( व पर्यायाने राजाच्या) विरोधात नाही. फक्त ही अतिरेकी श्रध्दा मला अनाकलनीय आहे. ह्यात कुणाच्याही भावना दुखावायचा हेतु नाही.

समाजसमीक्षा

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

31 Aug 2009 - 11:03 pm | मिसळभोक्ता

ज्या भावाचा प्रेस्टिज इशु किंवा अतिरेक होऊ शकतो, तो भक्तिभाव आहे का, ह्यावर चर्चा होण्यास प्रत्यवाय नसावा.

-- मिसळभोक्ता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2009 - 11:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लालबागचा असो की अन्य कोणता गणपती असो, ज्यांना अशी कृती-वृत्ती ही भक्तीभावाचा अतिरेक आहे असे वाटते त्यांनी दर्शन टाळावे.

सामाजिक समस्या निर्माण होत असतील, पण मानसिक समाधान कोणत्या मापाने मोजणार ?

चर्चेसाठी शुभेच्छा.......!

-दिलीप बिरुटे
(धार्मिक)

अनामिक's picture

1 Sep 2009 - 1:16 am | अनामिक

सामाजिक समस्या निर्माण होत असतील, पण मानसिक समाधान कोणत्या मापाने मोजणार ?

अगदी अगदी...

ज्यांना अशा ठिकाणी जायचंय ते भक्तीभावाने जातात, येणार्‍या संकटांना/आजारपणाला ते तोंड द्यायला तयार असतात... आपण उगाच चर्चा करून आपला वेळ वाया घालवतो. मी स्वतः येवढ्या गर्दीत दर्शन घ्यायचं टाळेन, पण जे जाताहेत त्यांना अडवणार नाही.

-अनामिक

वरील चर्चाकाराच्या मनात हा प्रश्न जरी "श्रद्धेचा अतिरेक" असा असला तरी तो एकमेव कंगोरा नाही.

(त्या प्रश्नासाठी - "तुला त्रास वाटतो तर जाऊ नको ना भाऊ!" हे उत्तर योग्यच आहे.) बिरुटेसरांचे वरील उत्तर थोडेसे बाजारशास्त्रातले आहे. लांब रांगेची गैरसोय हा तोटा आणि मानसिक समाधान हा फायदा यांची बजाबाकी प्रत्येकाने खुद्द करायची आहे, आणि ज्याला बाकी दिसते, त्याने गैरसोयीतही दर्शनाला जायचे आहे. या विचाराशी मी बराचसा सहमत आहे.

परंतु अशा ठिकाणी सार्वजनिक सुविधा पुरवण्याच्या बाबतीत हा प्रश्न आपल्या सर्वांचाच आहे. (जे स्वतःहून तिथे जाणार नाही, अशा लोकांनीही विचार करण्यासारखा प्रश्न आहे.)

मागे मांढरदेव येथे काळूबाईच्या जत्रेत चेंगराचेंगरीत शेकडो लोक मेले. अशा परिस्थितीत "त्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध होत्या का?" असा प्रश्न आपणा सर्वांच्या मनात येऊ शकतो. हा खर्च कोणी करावा - ग्रामपंचायतीने, जिल्हा प्रशासनाने, राज्य सरकारने, की केंद्र सरकारने - असा प्रश्न सुद्धा विचारण्यालायक आहे. जत्रेच्या ठिकाणी सर्व सुविधा सरकारने मोफत पुरवून जत्रेच्या ठिकाणच्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर घाला आणावा काय?

आता मी स्वतः मांढरदेव येथे कधी गेलो नाही, म्हणून हा प्रश्न माझ्यासाठी नि:संदर्भ मात्र नाही. सार्वजनिक सुविधांचा योग्य पुरवठा करायच्या अंगाने वेगवेगळ्या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी किती लोक येतील, त्याचा खर्च ग्रामपंचायतीला किंवा महानगरपालिकेला परवडावा म्हणून काय तरतूद करावी हा विचार आपणा सर्वांनीच करण्यालायक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2009 - 7:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्वजनिक सुविधांच्या मुद्याबद्दल मी सहमत आहे. आता बाजारशास्त्राच्या उत्तराच्या पुढे जरा डोकावून पाहू... :)

ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका अशा वेळी तात्पूरत्या सोयी करुन देत असावेत. जसे वीज,पाणी, साफसफाई इत्यादी. पण खरी जवाबदारी असते त्या-त्या मंदिराच्या विश्वस्तांची. सार्वजनिक सुविधांचे भान त्यांना गरजेचेच आहे. अडचण केव्हा होते माहित्ये का, जेव्हा त्यांच्या अंदाजापेक्षा अधिक गर्दी होते आणि तात्पूरती व्यवस्था कोलमडून जाते. आणि मग चेंगराचेंगरी वगैरे प्रकार घडतात हे मान्यच आहे. स्त्री-पुरुषांची रांग शिस्तीत पुढे सरकली पाहिजे. नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र जागा. स्वच्छतागृह. रांग हळू सरकत असेल तेव्हा मूर्तीच्या चरणाच्या दर्शनाऐवजी, मुख दर्शन आणि कळस दर्शन करणार्‍यांसाठी मोकळी जागा ठेवली पाहिजे जे ने करुन गर्दी होऊ नये.

शिर्डीला चांगली (मॉडेल म्हणावे) अशी व्यवस्था आहे, असे माझे मत आहे. दर्शनार्थ्यांची रांग कितीही मोठी असली तरी तिथे कंटाळा येत नाही. रांग सरकली नाही तर तिथे बसण्याची व्यवस्था आहे. गर्दी असली तरी घामाघुम माणूस होत नाही. मोठे पंखे लावलेले असल्यामुळे गार वारा घेत आनंदाने दर्शन होते. अतिमहत्वाच्या व्यक्तींना वेगळ्या दरवाज्यातून प्रवेश, त्याचबरोबर दर्शन करुन बाहेर पडण्यासाठीचा मार्ग अतिशय उत्तम आहे.

अशी व्यवस्था सर्वच ठिकाणी करता येत का ? तर करता येत नाही असे वाटते. कारण सर्वच प्रश्न पैशाशी संबंधीत आहेत. आणि प्राधान्य कशाला द्यायचे म्हणजे सार्वजनिक सुविधा द्यायच्या की मंदिर सजवायचे हा प्रश्न जेव्हा विश्वस्तांना पडत असेल तेव्हा ते मंदिर सजावटीकडे लक्ष देतात इतर सुविधांना ते दुय्यम स्थान देत असावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

हर्षद आनंदी's picture

1 Sep 2009 - 7:39 am | हर्षद आनंदी

का टेन्शन घेतोस? जे ऊभे रहात आहेत ते बघतील, रांग बघितली कि बाहेरुन नमस्कार करायचा आणि छु ह्वायचे... कसे?

अनामिकांशी संपुर्ण सहमत

कसली आलीय भक्ती आणि भाव, हा फक्त शो. मी जाउन आलो राजाला, काय गर्दी होती म्हणुन सांगत, आपली लाल करायची बास!! खरा भाविक गणेश चतुर्थीची वाट नाही बघत बसत. गतजीवनात केलेल्या कर्मांची उपरती होते म्हणुन रांगा लागतात.

गणपतीच्या ११ दीवसात दगडुशेट, मंडई, सारसबाग (गणपती) ;) , अष्टविनायक इथे चुकुनही न फिरकणारा आनंदी

वि_जय's picture

1 Sep 2009 - 11:58 am | वि_जय

का टेन्शन घेतोस? जे ऊभे रहात आहेत ते बघतील, रांग बघितली कि बाहेरुन नमस्कार करायचा आणि छु ह्वायचे... कसे?

खरा हा तुझा म्हणना... दुसरे करतत तेंका करुदेत ना.. जेचो तेचो प्रश्न आनी जेची तेची श्रद्दा...

खरा भाविक गणेश चतुर्थीची वाट नाही बघत बसत

ह्या बाकी माका आवाडला..

JAGOMOHANPYARE's picture

1 Sep 2009 - 11:37 am | JAGOMOHANPYARE

गणपतीच्या ११ दीवसात दगडुशेट, मंडई, सारसबाग (गणपती) , अष्टविनायक इथे चुकुनही न फिरकणारा आनंदी............

:) चला, माझ्यासारखा कुणी तरी आहे इथे........

चिरोटा's picture

1 Sep 2009 - 11:59 am | चिरोटा

सामाजिक समस्या निर्माण होत असतील, पण मानसिक समाधान कोणत्या मापाने मोजणार ?

सहमत. प्रत्येक समाजाची संस्क्रुती असते. गेल्या काही वर्षात बर्‍याचश्या धार्मिक सणाना दिखाऊ स्वरुप आले आहे.विशेष करुन उत्तर/पश्चिम भारतात ह्या दिखाऊ/घोळका संस्क्रुतीचे दर्शन जास्त घडते.अर्थात ह्यात चूक /बरोबर असे काही नाही.

पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का?

भक्तिभाव मोजायचा कसा? सरकारी यंत्रणा ताण सहन करण्यास तयार असतील्,लोक कानठळ्या बसणारे संगीत ऐकण्यास तयार असतील तर आक्षेप घेण्याचे कारण नसावे. :)
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

योगी९००'s picture

1 Sep 2009 - 12:36 pm | योगी९००

ज्यांना जायचे आहे त्यांना हे कष्ट घ्यावेच लागतील. पुर्वी ॠषीमूनी १२ वर्ष तप करायचे तेव्हा कोठे बाप्पा त्यांना दर्शन द्यायचा. मग आपण १२ तास हे कष्ट नाही सहन करू शकत? पण असे कष्ट घेऊन झालेल्या दर्शनाने एक वेगळेच समाधान लाभते.

बाकी काही म्हणा पण मी सुद्धा अशा काळात देवदर्शन टाळतो. तिरूपती, साईबाबा यांना एकदाच गेलो आहे. तेथे असलेला पैशाचा खेळ पाहिला की मात्र उबग येतो. तिरूपतीला तुम्ही जर १०-२० रू देवापुढच्या सुरक्षारक्षकाला दिले की तो तुम्हाला आणखी १-२ मि. थांबवतो. नाहीतर तुम्ही देवासमोर जाऊन नमस्काराला खाली केलेले डोके वर केल्यावर तुम्हाला लक्षात येते की तुम्ही ५-१० फूट मागे ढकलला गेलात ते.

लालबागच्या राजाचे कधी प्रत्यक्ष दर्शन नाही घेतले पण तेथे ही हाच प्रकार आहे का? पण लालबाग वाले मिळालेल्या पैशातून काही समाजसेवा करतात असे त्यांच्या वेबसाईट वरून कळले आहे. बाकीचे ही कदाचित करत असतील

कसली आलीय भक्ती आणि भाव, हा फक्त शो. मी जाउन आलो राजाला, काय गर्दी होती म्हणुन सांगत, आपली लाल करायची बास!! खरा भाविक गणेश चतुर्थीची वाट नाही बघत बसत.
हे मात्र पटलं..

खादाडमाऊ

अगोचर's picture

1 Sep 2009 - 10:49 pm | अगोचर

वरील धागा वाचुन धामणभास्करांची पुढील कविता आठवली -

हस्तांतर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या....

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....

- धामणस्कर
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

हरकाम्या's picture

2 Sep 2009 - 1:40 am | हरकाम्या

" झकास "

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Sep 2009 - 12:53 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सही...

अमोल केळकर's picture

2 Sep 2009 - 12:58 pm | अमोल केळकर

वा ! मस्त प्रतिसाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा