शुक्रवार....... अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता वार्.....विकांताची सुरवात करणारा असा हा दिवस....
तर अशा या शुक्रवारची कहाणी काय आहे महितिय??? .......वाचा खाली....
एक आटपाट नगर होतं.......(हो हो...एकदम डान्रावांच्या सजावटी सरखं..........)
तिथं खूप कंपन्या होत्या बहुतेक सगळ्या आय टी वाल्या....त्यात सगळे नगरवासी काम करायचे....
अशाच एका कंपनीत एक 'क्ष' कामाला होता...हा क्ष एकदम हरहुन्नरी . कायम कमात मग्न असायचा....दर २ महिन्यांनी एक तरी बक्षीस पक्कं असायचं.. क्ष कायम वेळेवर याचचा आणी जायचा...
असच हळू हळू त्याला कंपनीच्या खर्चाने 'मिपा-मिपा' खेळायची सवय लागली...खेळून झाल्यावर काम करावे लागत असल्याने त्याला उशिरापर्यन्त थांबावे लागू लागले...
असच एका शुक्रवारी तो रात्रीचे १० पर्यन्त कंपनीतच होता.....आणी रात्री उशिरापर्यन्त थांबायचा त्याचा विचर होता..... त्याच्या ह्या विचराने (आणी आधीच्या वागण्याने) त्याच्यावर राक्षसिणीचा कोप झाला....
राक्षसिणीने त्याला दर्शन दिले...आणी स्वतः सोबत घेउन गेली.................................एका मधुशालेत....होय तेच ते...ज्याला सध्या क्लब, पब, डिस्को, बार वगैरे वगैरे म्हणतात...
तिथेच त्याचे सगळे मित्र होते...तिथे त्यानी सगळ्यांनी मिळून मजा केलि......त्याला समजले कि इत्के दिवस तो काय 'मिस' करत होता ते...
राक्षसिणीने त्याला सांगितले कि...दर वीकन्ताला काही टाईमपास नाही केला तर तिचा कोप होइल......
तर तेन्व्हा पासुन हा शुक्रवारचा कार्यक्रम चालू झाला....
अशी ही साठा उत्तरांची (खरं तर उतारे) कहाणी पाचा उत्तरे सुफळ सम्पूर्ण....(आरती नन्तर देइन....)
प्रतिक्रिया
21 Aug 2009 - 3:01 pm | प्रकाश घाटपांडे
कार्यक्रमानंतर
हे प्रभो मी काय करतोय हे माझे मलाच कळत नाही.
नंतर प्रभो म्हंतात
मला तरी कुठ कळतय? ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Aug 2009 - 3:28 pm | विशाल कुलकर्णी
नानांना सांगा की राव ! त्यांना तर शुक्कीरवारची वाट बगायची गरज लागत नाय. कारणच शोदीत अस्त्यात त्ये. आज काय तर श्रावण संपला, उद्या काय तर भाद्रपद सुरु झाला.
आन मग दोन दोन ओळींचे धागे देत्यात टाकुन मिपावर. त्येस्नी ह्यो उतारा द्याकी देवा. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Aug 2009 - 3:40 pm | प्रभो
विकांत फक्त नावापुरता..........नानांना (आणी आम्हालापण) कधीही चालतं....
21 Aug 2009 - 4:22 pm | अवलिया
हा हा हा
मस्त रे प्रभो.. चालु दे अगदी निवांत :)
विशाल भौ... :?
--अवलिया
21 Aug 2009 - 5:40 pm | विशाल कुलकर्णी
नानानु दाढी काय खाजवुन राहीला भौ?
श्रावणशांतीला आम्हाला आमंत्रण दिले नाहीत ना त्याचा असा वचपा काढलाय आम्ही. ह. घ्या. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Aug 2009 - 4:36 pm | सागर
प्रभो भाऊ
साष्टांग दंडवत आपल्याला .. =))
खूप छान...
आरतीची वाट पहात आहे... येऊ द्या अजून
(शुक्रवारची कहाणी अनुभवणारा) सागर
21 Aug 2009 - 4:38 pm | दशानन
लै भारी... कधी कधी पार्टी करावी यार.... !
दर दिवशी नवी पार्टी करणारा राजे ;)
21 Aug 2009 - 7:48 pm | बाकरवडी
अशी बरीच लोकं इथे आहेत.
ईथले कट्टा वृत्तांत वाचुन काय मंदीरात जाणार काय ?
:B :B :B बाकरवडी :B :B :B