मर्मबंधातली ठेव ही...

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
18 Aug 2009 - 7:29 pm

संगीतातील प्रत्येक रागाला एक नादप्रकृती असते. त्यातून भावनिर्मिती होते. मानवी भावनेला घट्ट कवटाळण्याचे विलक्षण सामर्थ्य यात असते. जसा यमनकल्याण आर्जवी, गोरख कल्याणमध्ये प्रासादिक तर भैरवीमध्ये समर्पण भाव आहे. या रागांतील प्रत्येक स्वर आणि त्याचा नाद माणसाच्या अंतरंगात त्या त्या भावनांचे तरंग उमटवितो.
असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही.
मर्मबंधातली ठेव ही... हे नाट्यगीत पटदीपच्या स्वभावाची प्रचिती देणारे आहे.
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय
""ठेवी जपुनि सुखाने दुखवी जीव...''
यातील "प्रेममय'मधील कोमल गंधार मध्यमावरून ओघळून रिषभाच्या आधाराने षड्‌जावर झेपावतो. अहाहा किती हळुवार हो ही जपणूक!
पुढे सुखाने दुखवि जीव... या गाऱ्हाण्यात मध्यम आणि पंचमावरून निषादावर आदळणारा स्वर षड्‌जावर येतो. आणि धैवताला कवटाळून पंचमावर विसावतो. त्यावेळी त्यातील वेदना ऐकणाराला टोचली नाही, तरच नवल!

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

18 Aug 2009 - 10:07 pm | क्रान्ति

असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही.

इथेही तीच प्रचिती.

आणि इथे देखिल.क्रान्ति

दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

बहुगुणी's picture

19 Aug 2009 - 5:54 am | बहुगुणी

चांगल्या गाण्यांची आठवण करून दिलीत, उभयतांना धन्यवाद!

"मर्मबंधातली ठेव ही" इथे ऐकता येईल.

घोडीवाले वैद्य's picture

20 Aug 2009 - 8:34 pm | घोडीवाले वैद्य

हे गाणे बऱ्याचदा ऐकले आहे. पण केवळ पहिली ओळच गुनगुनत असे.
अन्वयचे विश्‍लेषण वाचल्यानंतर पुन्हा गाणे ऐकले. वेगळाच आनंद मिळाला.
गाणे खुपच सुरेख वाटले.
धन्यवाद!
आणखी अशीच माहिती येवू देत.

विसोबा खेचर's picture

22 Aug 2009 - 2:12 am | विसोबा खेचर

बहोत अच्छे...

आपला,
(पटदीप प्रेमी) तात्या.

घाटावरचे भट's picture

22 Aug 2009 - 7:54 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

अन्वय's picture

22 Aug 2009 - 6:51 pm | अन्वय

प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद
सवड मिळेल तसे अन्य गाण्यांचे
यथाबुद्धी रसग्रहण देण्याचा प्रयत्न जरूर करीन

JAGOMOHANPYARE's picture

23 Aug 2009 - 11:56 am | JAGOMOHANPYARE

ग_ म प नि सां.......

मर्मबन्धातली ठेव ही.......गुणगुणताना त्यातूनच 'पाखी पाखी परदेसी'... ही ' ऐ अजनबी तू भी कभी' या गाण्यातील ओळ गुणगुणाविशी वाटते....