(तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
18 Aug 2009 - 7:54 am

प्रेरणा शाहरुख ह्यांची 'तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!'

कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय
आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय
आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी
लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

परत्येक अवांतर परतिसादाव येक चांदनी मोजत्यात
आनी मार्केटातल्या दलालावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसला काय बी हिसाब आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

निवाशींच्या पायात असत्यात कोल्लापुरी साक्षी
अनिवाशी पाय मागतो बूट अन फ्लोटर्सची नक्षी
गोंडेदार चपला आमी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

हाय काय आनी नाय काय चालंल तितकं चालवनार
आनी तिच्यायला आमीबी येक इडंबन करनार !!

-- (नकवी)चतुरंग

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Aug 2009 - 8:18 am | मदनबाण

लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी
लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

लयं भारी...
:D

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

दशानन's picture

18 Aug 2009 - 8:24 am | दशानन

=))
=))
=))
=))
=))

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

शाहरुख's picture

18 Aug 2009 - 8:31 am | शाहरुख

=)) =)) =))

खरंच कमाल आहे आपली !!

(आपल्या कवितेचे विडंबन झाल्याने खुश झालेला) शाहरुख

विंजिनेर's picture

18 Aug 2009 - 8:34 am | विंजिनेर

अफलातून... (नेहेमीचेच यशस्वी कलाकार असल्यामुळे अजून वेगळी अपेक्षा नव्हती म्हणा :))

प्राजु's picture

18 Aug 2009 - 9:07 am | प्राजु

=)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

18 Aug 2009 - 9:09 am | टारझन

बाब्बो बाब्बो !! खवाट टाकलाय साहेब !!

(विडंबणप्रेमी) टारंबण

यशोधरा's picture

18 Aug 2009 - 9:11 am | यशोधरा

निवाशींच्या पायात असत्यात कोल्लापुरी साक्षी
अनिवाशी पाय मागतो बूट अन फ्लोटर्सची नक्षी
गोंडेदार चपला आमी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

=))

झकास!!

बाकरवडी's picture

18 Aug 2009 - 10:23 am | बाकरवडी

नाही आवडले :(

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2009 - 10:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

करून हसले.

लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी
लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

=)) =)) =)) =))

रंगाशेट, तुम्ही अलिकडेच जालिंदर बाबांचं दर्शन घेऊन आल्यामुळेच एवढं महान विडंबन तुम्हाला लिहीता आलं याची मला खात्री आहे.

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2009 - 11:42 am | बिपिन कार्यकर्ते

पूर्णपणे सहमत. आधीच इब्लिस, आणि बाबाम्चा अनुग्रह झाल्यापासून तर काय विचारायलाच नको. :D

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

18 Aug 2009 - 11:35 am | अवलिया

मस्त :)

--अवलिया

मस्त कलंदर's picture

18 Aug 2009 - 11:41 am | मस्त कलंदर

मजा आली वाचायला....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2009 - 11:46 am | मिसळभोक्ता

ह्या च्रार ओळी लय आवडल्या रंगाशेट. चपला तयार हायत न्हवं ?

-- मिसळभोक्ता

नंदन's picture

18 Aug 2009 - 12:31 pm | नंदन

खल्लास इडंबन, साष्टांग प्रणिपात. कौलं, फ्लोटर्स आणि गोंडेदार चपला लै भारी. उगाचच अंतू बर्व्याचे 'गोठ्यात निजणार्‍यान् बैलाच्या....तर शिमला म्हणाले नसते आमच्या गावाला' आठवले ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

18 Aug 2009 - 2:56 pm | Nile

क्या बात है! पुनरागमन लै भारी! :)

श्रावण मोडक's picture

18 Aug 2009 - 1:20 pm | श्रावण मोडक

जोरदार. कौल, अवांतर, चांदन्या, मार्केटातले दलाल, निवासी-अनिवासी, चपलांचे प्रकार... जोरदारच.

क्रान्ति's picture

18 Aug 2009 - 2:52 pm | क्रान्ति

भन्नाट कवितेचं भन्नाट विडंबन!
=)) =D>
=)) =D>
=)) =D>
=)) =D>
=)) =D>
[प्रत्येक कडव्याला हशा आणि टाळ्या!!!]

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

शाल्मली's picture

18 Aug 2009 - 5:39 pm | शाल्मली

हाहाहा!!
लै भारी :)
=))

--शाल्मली.

अनामिक's picture

18 Aug 2009 - 5:42 pm | अनामिक

रंगाशेट लै भारी विडंबन!

-अनामिक

ऋषिकेश's picture

18 Aug 2009 - 5:52 pm | ऋषिकेश

शेट ओऽ रंगाशेट.... असं लिहाल तर आमच्या मॉनिटरचा रंग लवकरच कॉफीच्या रंगाचा हून जायील

लय ब्येस!!!!!
=))

चांदण्या, कौलं, एका ओळीचे धागे, चपला सारंच आवडलं

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ५ वाजून ४९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गाणं"वेड लागलं माला.. वेड लागलं माला.. वेड लागलंऽऽ..."

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 6:00 pm | स्वाती२

मस्त!

लवंगी's picture

18 Aug 2009 - 6:07 pm | लवंगी

:))

लिखाळ's picture

18 Aug 2009 - 6:51 pm | लिखाळ

हाय काय आनी नाय काय चालंल तितकं चालवनार

जोरदार विडंबन.. एकदम मजा आली :)

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अजय भागवत's picture

18 Aug 2009 - 6:57 pm | अजय भागवत

मस्त! आवडले विडंबन.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2009 - 7:40 pm | प्रकाश घाटपांडे

परत्येक अवांतर परतिसादाव येक चांदनी मोजत्यात

हॅहॅहॅ भारी चांदनी. याच्याव अंताक्षरी व्हईन

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चतुरंग