मग ओबामा निराळे कसे?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
28 Jul 2009 - 2:26 pm

माझ्या "मिसळ-पाव"वरील, त्यातही अमेरिकास्थित, मित्र-मैत्रिणींनो,

कृपया खालील लिंक उघडून माझा ई-सकाळच्या वेब एडिशनवर कालच प्रसिद्ध झालेला ले़ख वाचावा व माझ्या मतांशी सहमती असल्यास 'व्हाईट हाऊस', १६०० पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यू, वॉशिंग्टन डी. सी. या पत्त्यावर निषेध-पत्रांचा पाऊस पाडावा ही विनंती.

http://beta.esakal.com/2009/07/27113020/pailteer-ajun-kahi-obama.html

आपला,
सुधीर काळे, जकार्ता

====================================================================
नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, अगदी "प्रायमरीज"पासून आजपर्यंत, मी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा निस्सीम चाहाता आणि प्रशंसक आहे व मी त्यांचा प्रशंसक राहूही इच्छितो. त्यांच्या "Change we can believe in" या घोषवाक्याबरहुकूम त्यांची वाटचालही चालू आहे असे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांवरून व त्यांच्या कांहीं विधानांवरून वाटत होते. उदा. "पाकिस्तान ही या जगातली सर्वात जास्त धोकादायक जागा आहे", "यापुढे पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या मदतीच विनियोग ज्यासाठी ती दिली गेली आहे त्यासाठीच होत आहे याची कसून तपासणी (audit) केल्यावरच पुढच्या मदतीचे वितरण केले जाईल" अशी विधाने, त्याच्या शपथविधीच्यावेळी मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून त्यांनी दिलेले दोन संदेश "यापुढे अमेरिका मुस्लिम राष्ट्रांशी परस्पर आदर व परस्पर हितसंबंध यावर आधारित संबंध जोडू इच्छिते" व "जर तुम्ही अमेरिकेविरुद्ध उगारण्यासाठी वळलेली मूठ उघडून आपला हात मैत्रीसाठी पुढे केलात, तर तुम्हाला अमेरिकेचा मैत्रीच्या उद्देशाने पुढे केलेला हात दिसेल" किंवा इजिप्तच्या कैरो या राजधानीतून मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून केलेले भाषण यासारख्या त्यांनी घेतलेल्या पावलांमुळे माझे त्यांच्याबद्दलचे कौतुक वाढतच गेले.

पण त्यांचे रशिया-अमेरिका संबंध या विषयावरील त्यांच्या भाषणाच्या वृत्तांतातील "In the short period since the end of the Cold War, we've already seen India, Pakistan and North Korea conduct nuclear tests.” हे विधान वाचल्यावर मात्र ते आता वाट चुकू लागले आहेत कीं काय अशी शंका येऊ लागली आहे.

राष्ट्रपती या नात्याने त्यांना अलीकडचा अण्वस्त्रप्रसार व त्यातील अमेरिकेच्या घोडचुका व त्यानंतरचे त्यांच्या "पित्त्या" राष्ट्राचे (पाकिस्तानचे) विविध "प्रताप" याबद्दलची संपूर्ण व संकीर्ण माहिती नक्कीच दिली गेली असणार, तरीही त्यांनी असे विधान करावे याचे खूपच वैषम्य वाटते. पहिली गोष्ट म्हणजे भारताने अणुविषयक व अण्वस्त्रउत्पादना विषयीची विद्या स्वबळावर मिळविली आहे. ही विद्या भारताला कुणी फुकटची दिलेली नाहीं. याउलट "अमेरिकेचा अफगाणिस्तानच्या युद्धामधला व्युहात्मक साथीदार" म्हणून पाकिस्तानला अमेरिकन कॉग्रेसपुढे असत्य माहिती ठेवून, असत्य विधाने करून व तिची मुद्दाम दिशाभूल करून गुप्तपणे अमेरिकेनेच त्याला १९८५ ते १९९० च्या दरम्यान अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनविले. एवढेच नाहीं तर F-16 जातीची ६० विमाने ती अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतील असे फेरबदल (modifications) करून पाकिस्तानला विकली व असे आम्ही केलेलेच नाहीं अशी पूर्णपणे असत्य विधाने प्रतिनिधीगृहापुढे केली हे काय ओबामांना माहीत नसेल? केवळ अशक्य! मग तरीही ते अशी विधाने कां करत आहेत?

मग वाटू लागले कीं ओबामा खरेच "बदल" करू इच्छित आहेत कीं तो एक "गोंडस" मुखवटा आहे? त्यांच्या अशा बेजबाबदार विधानांवरून तरी वाट चुकताहेत की काय असे वाटू लागले आहे. त्यांनी रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याची चूक अजिबात करू नये.

पाकिस्तानला अमेरिकेने कसे अण्वस्त्रसज्ज केले याची माहिती फारच उदबोधक आहे. (http://www.dawn.com/2007/05/04/top4.htmhttp://us.rediff.com/news/report/2009/jun/16/paknuke-us-allowed-pak-to-g... या लिंक्स् उघडा)

भारताने (किंवा इस्रायलने) ही अणुविद्या चोरून-छुपून अमेरिकेचेच कट्टर वैरी लिबिया, इराण व उत्तर कोरिया या राष्ट्रांना विकली नाहीं. ते ’सत्कृत्य’ पाकिस्ताननेच त्यांच्या ’बदनाम’ अणुतज्ञ अब्दुल कादिर खानतर्फे केले. मग आज ओबामा भारताला "खाया नहीं, पिया नहीं, खाली ग्लास तोडा, बारा आना" या न्यायाने या नीतीशून्य राष्ट्राच्या पंक्तीला कां बसवताहेत? वर आशियातले पहिले अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असलेल्या इस्रायलचे नांव त्यांनी कां वगळले? ज्यू मतदारांच्या ’मतपेटी’ लक्ष ठेवून? म्हणजे अगदी आपल्या देशातील "सर्वधर्मसमभाव"चा जप करणार्‍या व "भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर अल्पसंख्यांकांना पहिला अग्रक्रम (priority) आहे" असे खोटे-खोटे नारे देणर्‍या कॉंग्रेस पक्षाच्या व लालू, मुलायम, रामविलाससारखे इतर पक्षांतील नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून. मग ओबामा "वेगळे" कसे?

रेगन, बुश-४१ व त्यांच्या चांडाळ चौकडीने पाकिस्तानला १९९० आधीच अण्वस्त्रसज्ज केले, तर भारताने आपले ५ अण्वस्त्र चांचणी-स्फोट १९९८ मध्ये केले होते. हे याय ओबामांना माहीत नाहीं?

ओबामांनी हे विधान करून भारताच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखीच निर्माण केली आहे. कीं हे विधान त्यांनी केवळ अनवधानाने केले आहे?

मी इथले दैनिक "जकार्ता पोस्ट" व भारतातले गोव्याहून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक "Navhind Times" या दोन वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली व ओबामांचे कौतुक करणारी बरीच पत्रे ओबामांना त्यांच्या व्हाईट हाऊस"च्या (१६०० पेन्सिल्वेनिया ऍव्हेन्यू, वॉशिंग्टन डी.सी.) या पत्त्यावर पाठविली होती, त्यामुळे असेल, पण आज माझे नाव व ई-मेल आय्.डी. ओबामांच्या "शासकीय" यादीत घातले गेलेले आहे. त्यामुळे त्यांची माहितीपर प्रकाशने मला वेळोवेळी येत असतात. त्यातल्याच एका निरोपाचे "reply" बटन दाबून मी माझे निषेधपर पत्र त्यांना व त्यांचा प्रमुख सल्लागार डेव्हिड एक्सलरॉडला (David Axlerod) यांना लिहिलेला आहे. ओबामांना ते वाचायला वेळ कुठला? पण एक्सलरॉड तरी वाचातील व ओबामांना योग्यसा सल्ला देतील अशी आशा करू या.

जास्तीत जास्त भारतीयांनी, त्यातल्या त्यात अमेरिकास्थित भारतीयांनी ओबामांवर अशा तर्‍हेच्या निषेधपत्रांचा "पाऊस" पाडला पाहिजे!

ओबामा कांहींही बोलोत किंवा करोत, भारत अभिमानाने आपली प्रगती करतच राहील व अमेरिकेच्या दुटप्पी धोरणात नक्कीच सहभागी होणार नाही. अमेरिकेने दोस्ती केली तर "सह" व नाहीं केली तर "शिवाय" हेच आपले धोरण राहील व त्या नात्याने भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज नाहीं. अमेरिकेला मात्र चीनचा काटा काढायला भारताची गरज आहे व ती वाढतच जाणार आहे. अशा वेळी पाकिस्तानचा जसा दुरुपयोग अफगाणिस्तानच्या युद्धासाठी करून घेतला गेला तसा भारताचा दुरुपयोग चीनशी परस्पर लढविण्यात अमेरिकेला करून घेऊ देऊ नये याबद्दल भारताने सतर्क रहावे हेच भारताच्या हिताचे आहे.

- सुधीर काळे, जकार्ता

धोरणलेख

प्रतिक्रिया

माझ्या दुसर्‍या एका फोरमवरील मित्राच्या शेर्‍यावरून मला या विषयावरील एक नवा पैलू लक्षात आला तो इथे लिहीत आहे. ते म्हणाले कीं इस्त्रायलने अद्याप एकदाही अधिकृतपणे अण्वस्त्राची चांचणी केलेली नाहीं. मग ते अण्वस्त्रसज्ज राष्ट्र का मानले जाते? बरे, यावर इस्त्रायल कधीच ते अण्वस्त्रसज्ज राष्ट्र आहे कीं नाहीं याबद्दल "अळिमिळी गुप चिळी" च्या न्यायाने गप्पच असते.
मग केलेल्या "उत्खनना"त कांहीं नवीन गोष्टी बाहेर आल्या. श्रीमती इरा चेर्नस या लेखिकेचा लेख माझ्या वाचनात आला. त्यातही इस्त्रायलच्या अण्वस्त्रसज्जतेबद्दल रा़खण्यात आलेल्या गुप्ततेचा उल्लेख आहे, पण स्पष्टीकरण तितके स्पष्ट नाहीं. वाचा http://www.commondreams.org/views03/0421-08.htm
मग मला वाटू लागले कीं एक तर इस्रायलने आपली अण्वस्त्रे अमेरिकेला गुपचुप पाठविली व तिथे ज्यांची चांचणी नेहमीच व्हायची अशा अमेरिकी अण्वस्त्रांबरोबर इस्रायलच्या अण्वस्त्रांचीही चांचणी झाली. दुसरी शक्यता अशी कीं ही अण्वस्त्रे अमेरिकेचीच असून ती मध्य-पूर्वेत एक व्युहात्मक कारणासाठी ठेवलेली असून इस्रायल फक्त त्यांचा रा़खणदार आहे.
कदाचित यामुळेच इस्त्रायल स्वतःला कधीच अण्वस्त्रसज्ज राष्ट्र मानत नाहीं पण ते अण्वस्त्रसज्ज राष्ट्र नाहीं असेही म्हणत नाहीं. अगदी "नरो वा कुंजरो वा"चाच थाट!
ओबामांची विधाने मग मी जरा नीट तपासून पाहिली. ते म्हणाले होते कीं, "अण्वस्त्रप्रसार रोखण्याबाबत २१व्या शतकातले जे आव्हान आहे ते अण्वस्त्रे असण्यात प्रतिष्ठा आहे असे मानणे किंवा एकाद्या निवडक "पित्त्या" राष्ट्राला ती उपलब्ध करून देण्यात आपल्याला सुरक्षितता लाभते असे मानणे या असत्य विश्वासावर (illusion वर) आधारलेली आहे. शीतयुद्ध संपल्यानतरच्या अतीशय छोट्या कालावधीत भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या राष्ट्रांनी अण्वस्त्रांची चांचणी केली. म्हणून एक मूलभूत बदल याबद्दलच्या विचारांत आणल्याशिवाय येत्या दोन दशकांत आणखी कुठल्याच राष्ट्रांत नव्याने अणव्स्त्रांचा प्रदुर्भाव होणार नाहीं यावर विश्वास बसेल काय?"
या वाक्यात ओबामा स्वतः अमेरिकेने पाकिस्तानला "कम्यूनिझमविरुद्धच्या युद्धातला आपला व्यूहात्मक साथीदार" या नात्याने "निवडून" त्याला अण्वस्त्रे उपलब्ध करून दिली ही चूक तर कबूल करीत नाहींयेत? करतही असतील!
आज इस्रायल अमेरिकेचा मध्य-पूर्वेतला गुदामरक्षक आहे असे मानले तरी आजची अमेरिकेबरोबरची गट्टी उद्या शत्रुत्वात बदलली आणि इस्रायलने ही अण्वस्त्रे अमेरिकेवर रोखली तर काय होईल? आज एकेकाळचा परममित्र साथीदार 'अल कायदा' आज अमेरिकेला हीच धमकी नाहीं का देत आहे? 'अल कायदा'च काय, पण ओसामा बिन लादेन व सद्दाम हुसेन एकेकाळी अमेरिकेचे मित्र म्हणून मिरवत नव्हते कां?
मग वाटले कीं वाटला होता तेवढे ओबामा "उथळ" नसतीलही कदाचित!
पण काहींही झाले तरी उद्या चीनला शह देण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज लागणारच. पण भारताने पाकिस्तानचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून अमेरिकेने पाकिस्तानचा "गरज सरो, वैद्य मरो" तत्वावर जसा 'कचरा' केला तसा आपला केला जाणार नाहीं याकडे लक्ष दिले पाहिजे.
म्हणूनच अजूनही ओबामांच्या तारतम्य विचारशक्तीवर विश्वास ठेवायला हरकत नाहीं असे वाटते. पण जिभेवरचा तोल सोडून भारताबद्दल चुकीची विधाने केल्याबद्दल त्यांना जाब जरूर विचारलाच पाहिजे. अशी निषेधपत्रे संख्येने खूप झाली तर अ‍ॅक्सलरॉड हा त्यांचा सल्लागार याकडे त्यांचे लक्ष वेधेल, पण आपण गप्प बसलो तर ते आणखी शेफारतील. म्हणून आपण सर्वांनी, विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी, त्यांच्यावर निषेधपत्रांचा पाऊस पाडला पाहिजे. त्यांचा पत्ता आहे "व्हाईट हाऊस, १६०० पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यू, वॉशिंग्टन डी.सी."
पत्रात खालील मजकूर असावा असे मला वाटते:
१. भारताने अण्वस्त्रविद्या स्वतःच्या शक्तीवर संपादन केलेली आहे, ती कुणी त्याला "चकटफू" दिलेली नाहीय.
२. भारताने ही अण्वस्त्रे कुणावरही उगारलेलीही नाहींयेत, मग वापरणे तर दूरच राहिले.
३. भारताने बेजबाबदारपणे ही विद्या कुठल्या तिसर्‍या राष्ट्राला विकली नाहींय, मग ते मित्र राष्ट्र असो वा नसो.
४. म्हण्जेच भारताला व पाकिस्तानला एका पंक्तीला बसवणे चूक आहे व हे ओबामांनी नीट लक्षात ठेवावे.
माझे विचार असे प्रगल्भ करण्यात माझ्या मित्राचा शेराच कारणीभूत आहे व त्यासाठी या मित्राचे मी आभार मानतो.
सुधीर काळे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विसोबा खेचर's picture

29 Jul 2009 - 9:51 am | विसोबा खेचर

काळे साहेब, उत्तम लेख. आपला अभिमान वाटला..

ओबामा कांहींही बोलोत किंवा करोत, भारत अभिमानाने आपली प्रगती करतच राहील व अमेरिकेच्या दुटप्पी धोरणात नक्कीच सहभागी होणार नाही. अमेरिकेने दोस्ती केली तर "सह" व नाहीं केली तर "शिवाय" हेच आपले धोरण राहील व त्या नात्याने भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज नाहीं

आम्ही अमेरीकेला फाट्यावर मारून पुढे जाऊ...!

आपला,
(अमेरीका द्वेष्टा) तात्या.

सुधीर काळे's picture

5 Aug 2009 - 8:12 pm | सुधीर काळे

तात्यासाहेब,
तुमच्या "कलादालन"मध्ये तुम्ही खूप विकल्प दिले आहेत त्यांत अजून एक "व्यंगचित्रे" वाढवाल का?
धन्यवाद
- सुधीर काळे

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 12:45 am | विसोबा खेचर

हो, न॑क्की..

सुधीर काळे's picture

29 Jul 2009 - 8:17 pm | सुधीर काळे

तात्यासाहेब,
मला वाटायला लागलं होतं कीं "मिसळ-पाव"वरील मित्रांनी माझ्यावर बहिष्कार तर नाहीं ना घातला! चक्क साडेतीनशे लोकांनी माझा लेख वाचला पण एकही शेरा (comment) नाही याचे सखेद आश्चर्यच वाटत होते. माझं लिखाण डोक्यावरून गेलं कीं काय अशीही शंका येऊ लागली. पण तुमचा शेरा वाचला व जीव भांड्यात पडला.
जे झाले आहे ते फारच गंभीर आहे. अमेरिकेने मूर्खपणाने पाकिस्तानसारख्या गुणी "बाळाला" खेळायला म्हणून बंदूक दिली! त्या कारट्याला काहीं अक्कल आहे का? लागलं खरी-खरी काडतुसं वापरून पोलीस-शिपाई खेळायला. मग शेवट काय होणार हे सांगायला नकोचयापण चूक रेगन व बुश-४१ या आई-बाबांची, त्या कारट्याची नाहीं.
या विषयावर विस्तृत चर्चा करणारा ३३०० शब्दांचा माझा लेख "उत्तम कथा" या मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध व्हायचं घाटलं आहे. तरी हा अंक मिळवून माझा लेख जरूर वाचावा. आपलं मूल आपल्याला नेहमीच गोड वाटतं हे जरी खरं असलं, तरी आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की हा ले़ख खरंच मस्त झाला आहे व सर्वांनी जरूर वाचावा ही विनंती.
करमणूक आणि सद्यपरिस्थिती या दोन्ही कारणांस्तव हा लेख जरूर वाचावा.
सुधीर काळे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2009 - 8:25 pm | llपुण्याचे पेशवेll

काळे साहेब असे वाटणे साहजिक आहे. मला तरी वैयक्तीक 'ओबामा' आणि त्यांची धोरणे या विषयात इतका रस नसल्याने मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही.
आत्ताच असे ऐकिवात आले आहे की ओबामाने अमेरीकेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अमेरीकन मुलाना भारतीय व चिनी मुलांशी स्पर्धा करण्यायोग्य बनवण्यासाठी अमेरीकन शिक्षणप्रणालीत काही बदल सुचवले आहेत आणि त्यासाठी काही निधी मंजूर केला आहे. बघूया काय सुधारणा करतात ते?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2009 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळे साहेब, अमेरिकेच्या धोरणावर, ओबामा वर काय लिहावे, ते न कळल्यामुळे मी तरी काही प्रतिसाद लिहिला नाही. मात्र काही प्रसंगी आपण थेट ओबामांना न पटणा-या धोरणाच्या निमित्ताने निषेधाचे निरोप टाकता, त्याबद्दल आम्हा भारतियांना आपला अभिमान आहेच.

अवांतर : ब-याच अमेरिकेतील भारतीय मित्रमंडळींचा वेळ भारतीय लोकांना नावे ठेवण्यात जातो,(आपल्याला उद्देशून तर नसेल अशी शंका कोणी घेऊ नये) त्यांनी प्रसंगी भारताच्या विरोधातील जी काही धोरणं असतील तर, किमान तेव्हा तरी निषेधांची पत्रे ओबामा सरकारला टाकली पाहिजेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(भारतीय)

विसोबा खेचर's picture

30 Jul 2009 - 11:39 am | विसोबा खेचर

चक्क साडेतीनशे लोकांनी माझा लेख वाचला पण एकही शेरा (comment) नाही याचे सखेद आश्चर्यच वाटत होते.

अहो काळेसाहेब, त्याचं काय आहे की आज बर्‍याचश्या अमेरीकास्थित मिपाकरांना अमेरीकेत राहूनच दोन टायमाची भाकरी मिळते. त्यामुळे अमेरीकेच्या पायाशी त्यांच्या श्रद्धा वाहिलेल्या असणं साहजिक आहे. मग ते बापडे अमेरीकेच्या विरोधात कसं लिहिणार?

(दोन वेळच्या भाकरीकरता अमेरीकेचा मिंधा नसलेला) तात्या.

--

जे काही मिळवायचं ते इथे भारतातच मिळवेन, वेळप्रसंगी उपाशी मरेन परंतु दोन वेळच्या भाकरीकरता, गाडी, बंगला, पैसा, समृद्धीकरता अमेरीकेच्या पायाशी लोळण घेणार नाही!

सूहास's picture

29 Jul 2009 - 8:35 pm | सूहास (not verified)

<<<ओबामाने अमेरीकेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अमेरीकन मुलाना भारतीय व चिनी मुलांशी स्पर्धा करण्यायोग्य बनवण्यासाठी अमेरीकन शिक्षणप्रणालीत काही बदल सुचवले आहेत आणि त्यासाठी काही निधी मंजूर केला आहे.>>>

आपल्या ईथे राज्यकर्ते निधी काढुन घेतील...

बाकी लेख एकदम ऊत्तम..

<<<रेगन व बुश-४१ या आई-बाबांची, त्या कारट्याची नाहीं.>>
काळे साहेब, ईथे एक नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते ते म्हणजे कॅन्डेला राईसचे...कधी आपल्याला वेळ मिळाला तर अमेरिकन गेल्या २० वर्षातल्या परराष्ट्र मत्रा॑लयाचा आणी पेन्टॉगॉनचा आढावा आपण अवश्य लिहावा हि विन॑ती...

(सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...)

सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...

सूहास's picture

29 Jul 2009 - 8:47 pm | सूहास (not verified)

प्रआटाका

सध्या मी बुश घरण्याचा विलय व त्यात अतिउत्साही neoconservatives नी केलेला सत्यानाश या विषयावरचे पुस्तक वाचतोय. त्यानंतर अमेरिकेने, पाकिस्तानने व CIA सारख्या संघटनांनी भारताचीच नव्हे तर स्वतःचीच कशी फसवणूक केली याचा उहापोह करणार्‍या "Deception" या पुस्तकाचा नंबर आहे. पण काँडी राईस ही तशी फार प्रभाव असलेली व्यक्ती नसावी. तिने प्हक्त इमाने-इतबारे बुश-४३साहेबाची सेवा केली. एकदा तर तिने बुश-४३चा उल्लेख "माझे पती" असा केला (mostly by slip of tongue). पण त्या बाईंनी फारसे कांहीं स्वतःचे असे कार्य केले नसावे असे वाटते.
BTW, प्रआटाका म्हणजे काय?
खरे खलनायक होते चेनी, वुल्फोवित्झ, लिबी व सगळ्यात मोठा खलनायक होता रम्सफील्ड.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

एकलव्य's picture

30 Jul 2009 - 7:58 am | एकलव्य

सहमती नसल्याने प्रतिसाद दिला नाही.

एकतर निव्वळ सहमत असणार्‍यांना आमंत्रण आहे असे वाटले आणि त्यापेक्षाही अलिकडे मिसळपाववर फारसे फिरकणे होत नाही. क्वचित काहीतरी लिहायचे आणि त्यातही कोठेतरी असहमती व्यक्त करायची म्हणजे योग्य वाटत नाही.

(सहमतीपुरता उरलेला) एकलव्य

सुधीर काळे's picture

30 Jul 2009 - 10:54 am | सुधीर काळे

तसे नाहीं. असहमती असेल तर तीही लिहा. माझ्या आतापर्यंतच्या सर्व लेखांना दोन्ही बाजूंनी प्रतिसाद आले होते व मी त्यांना उत्तरेही दिली होती. म्हणून फक्त चांगले असल्यास लिहायचे अन्यथा नाहीं असे नको.
खरे तर जर प्रतिसाद आला नाहीं तर एक तर लिखाण अनाकलनीय झाले असावे किंवा रद्दड/बोअरिंग झाले असावे असे वाटते, पण त्यातले काय हे कळत नाहीं.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चिरोटा's picture

30 Jul 2009 - 12:07 pm | चिरोटा

अमेरिकेने मूर्खपणाने पाकिस्तानसारख्या गुणी "बाळाला" खेळायला म्हणून बंदूक दिली

अमेरिका मुर्ख अजिबात नाही. शीत युद्धाच्या काळात military industrial complex हे संज्ञा वरचेवर वापरली जायची.युद्ध उपकरणे बनवणार्‍या अमेरिकन कंपन्या आणि त्यांचा पेंटॅगॉनवर्/अमेरिकेच्या सत्ताधार्‍यांवर असणारा प्रभाव ह्या संदर्भात त्याचा उल्लेख असे.
१९९९ वर्षात अमेरिकेच्या १५ संऱक्षण कंत्राटदारांची यादी/turnover बघितलीत तर त्यांचा प्रभाव लक्षात येइल.
Lokheed Martin ला $१२३४१०००००० चे कंत्राट आहे.(http://www.cdi.org/issues/usmi/complex/top15.html)(अवांतर-फलक कुठल्याही भाषेत असले तरी आपल्या भारतिय विमानतळावर असणारे मोठे रडार्स बर्‍याच वेळा Lokheed Martin किंवा Raytheonचे असतात :) ).
अमेरिकन अध्यक्ष गोरा/काळा/गव्हाळ/सावळा कसाही असला तरी ह्या कंपन्यांचा पेंटॅगॉनवर /सताधार्‍यांवर प्रभाव कायम असतो(भविष्यातही असेल).
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अर्चिस's picture

30 Jul 2009 - 11:45 am | अर्चिस

कशा कशाचा निषेध करायचा?
पण छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत ह्या वर १००% सहमत.

आर्चिस

अर्चिस's picture

30 Jul 2009 - 11:48 am | अर्चिस

कशा कशाचा निषेध करायचा?
पण लेख मात्र एकदम भारदस्त.
पण छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत ह्या वर १००% सहमत.

आर्चिस

आपण म्हणता त्यात सत्याचा भाग जरूर आहे. म्हणतात कीं वाघावर बसता येते, पण उतरता येत नाहीं!
पण असे आपल्या कंत्राटदाराच्या इतके आहारी जाणे चूकच आहे. After all, who is the boss then?
पण या "हिंस्त्र श्वापदां"वर (CIA व Pentagon) अंमल करणे सोपे नाहीं. प्रेसिडेंट जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येमधील एक कारण "बे ऑफ पिग्ज"च्या लढाईत ते CIA व Pentagon यांच्याशी असहमत होते हे. म्हणून त्यांनी "क्यूबा मुक्तिवाहिनी"ला मदत केली नाहीं. (वाचा "On the trail of an assassin" by Jim Garrison)
पण ओबामांच्या चमडीचा रंग कसा का असेना, ते समतोल विचार करणारे आहेत असे मला अजूनही वाटते. ते तथाकथित neoconservatives मंडळीच्या आहारी गेलेले दिसत नाहींत. त्यांनी भारताला व पाकिस्तानला एका पंक्तीला बसवले हे खरे व ते त्यांचे नक्कीच चुकले, पण त्यांचे पूर्ण भाषण वाचल्यावर मला त्यांना त्या भाषणाद्वारे त्यांच्याच CIA व Pentagon मंडळींना 'टप्पू' मारायचा होता असे वाटले. (पहा: माझा पूरक लेख)
असो. भविष्याच्या पोटात काय दडले आहे कुणास ठाऊक.
सुधीर काळे

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 2:24 am | मिसळभोक्ता

काळेसाहेब,

आपल्या प्रतिसादातील,

पण ओबामांच्या चमडीचा रंग कसा का असेना, ते समतोल विचार करणारे आहेत असे मला अजूनही वाटते.

ह्या वाक्याचा अर्थ काय, हे स्पष्ट कराल का ? मुख्य म्हणजे, चमडीचा रंग आणि विचार पद्धती ह्याचे विश्लेषण व्हावे.

मग आम्ही कुणाशी बोलतो आहोत, हे कळेल.

-- मिसळभोक्ता

विकास's picture

6 Aug 2009 - 2:50 am | विकास

मुख्य म्हणजे, चमडीचा रंग आणि विचार पद्धती ह्याचे विश्लेषण व्हावे.

खरे आहे. कुठे तरी असे वाटते ( हे विधान काळे साहेबांच्या संदर्भात नाही पण इतरत्र केलेले निरीक्षण) बरेच जण ओबामांकडे बघताना अजूनही नुसतेच राष्ट्राध्यक्ष, राजकारणपटू (सिद्ध झाले आहे) म्हणून बघण्याच्या ऐवजी, कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, राजकारणपटू म्हणून बघतात.

सुधीर काळे's picture

30 Jul 2009 - 12:15 pm | सुधीर काळे

कृपया
http://tinyurl.com/nkb4cf
किंवा
http://www.thejakartapost.com/news/2009/07/30/letters-does-obama-stand-c... ही लिंक उघडा व वाचा माझे "जकार्ता पोस्ट"मध्ये आज प्रकाशित झालेले ओबामांचा निषेध करणारे आंग्लभाषेतले पत्र.
सुधीर काळे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

नंदन's picture

30 Jul 2009 - 12:58 pm | नंदन

तुम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांबाबत शंका आहेत, त्या आधी मांडतो.

१. "शीतयुद्ध संपल्यानतरच्या अतीशय छोट्या कालावधीत भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या राष्ट्रांनी अण्वस्त्रांची चांचणी केली."
-- आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते ते करावं आणि त्यासाठी कुठल्याही दबावाची किंवा सीटीबीटी सारख्या अन्याय्य कराराची पत्रास ठेवू नये हे योग्यच. त्याप्रमाणे आपण १९९८ मध्ये अणुचाचण्या केल्या. त्या पाठोपाठ पाकिस्तानने आणि अलीकडे उ. कोरियानेही केल्या. तेव्हा हे विधान सत्य आहे. एकाच वाक्यात भारत, पाकिस्तान आणि उ. कोरिया यांचा उल्लेख आला म्हणून आपल्याला एकाच पंगतीत बसवलं जात आहे; हा निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे? शिवाय तुम्ही जे तीन मुद्दे मांडले आहेत (भारताने स्वबळावर चाचण्या करणे, अण्वस्त्रे न वापरणे, तिसर्‍या राष्ट्राला न विकणे) ते जमेस धरूनच जसा भारत-अमेरिकेत २००५ मध्ये अणुकरार झाला; तसाच आपल्याबरोबरही व्हावा ही पाकिस्तानची मागणी फेटाळली गेली ना? (अणुकरार करून काही उपकार केले नाहीत हा भाग वेगळा. पण पंक्तिप्रपंचाचा मुद्दा सांगण्यासाठी हे उदाहरण दिले आहे)

शिवाय निव्वळ एका विधानामुळे - "ओबामांनी हे विधान करून भारताच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखीच निर्माण केली आहे." - हे कोडे काही उलगडले नाही?

२. प्रत्येक राष्ट्रप्रमुख हा आपल्या देशाचं हित प्रथम पाहतो. 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमेची आस लागलेले काही अपवाद वगळता. त्यामुळे मग अमेरिकेची धोरणं किंवा रशियाची धोरणं ही त्यांच्या फायद्यापुरतीच असणार. ती तशी नसता न्याय/अन्यायावर आधारित असावीत ही अपेक्षा चुकीची नसली तरी अव्यवहार्य वाटते. त्यामुळे त्या दृष्टीने ओबामा निराळे नसून त्याच माळेतले मणी असावेत.


अशा वेळी पाकिस्तानचा जसा दुरुपयोग अफगाणिस्तानच्या युद्धासाठी करून घेतला गेला तसा भारताचा दुरुपयोग चीनशी परस्पर लढविण्यात अमेरिकेला करून घेऊ देऊ नये याबद्दल भारताने सतर्क रहावे हेच भारताच्या हिताचे आहे.

- हे अर्थात आपल्या परराष्ट्रधोरणाचे सूत्र राहिलेले आहेच.

३. पण जिभेवरचा तोल सोडून भारताबद्दल चुकीची विधाने केल्याबद्दल त्यांना जाब जरूर विचारलाच पाहिजे. अशी निषेधपत्रे संख्येने खूप झाली तर अ‍ॅक्सलरॉड हा त्यांचा सल्लागार याकडे त्यांचे लक्ष वेधेल, पण आपण गप्प बसलो तर ते आणखी शेफारतील.

- आपण अमेरिकेला फाट्यावर मारून एवीतेवी पुढे जाणारच आहोत, मग याची गरज तरी काय? :). विनोदाचा भाग सोडला, तर भारतीयांची वॉशिंग्टनमधली लॉबी हे काम वेळोवेळी करत असावीच. पण जसं चीनचे नेतृत्व अमेरिकेच्या थेट किंवा आडून केलेल्या विधानांना आक्षेप घेतं, तसं आपल्या परराष्ट्रखात्याकडून झालं तर ते सर्वात परिणामकारक ठरावं.

३. मी यापूर्वी प्रतिक्रिया का दिली नाही ते सांगतो. तुम्ही मूळ लेखात मांडलेले काही मुद्दे पटले नाहीत ज्याबद्दल मी वर लिहिलं आहेच. तुमच्या आत्ताच्या प्रतिसादातही तुम्हांला ओबामांचा रोख दुसरीकडे होता असं वाटतं आहे, असं म्हटलं आहे. पण तसं मी काल लिहिलं असतं तर ही चर्चा अनिवासी भारतीयांचा माज, हिरव्या नोटांची गुर्मी इ. बाबींकडे वळण्याची दाट शक्यता होती हे एक कारण (अल्पसंख्याक समाजाला जसं वेळोवेळी आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करावी लागते; तशी पाळी निदान मराठी संकेतस्थळांवर लिहिताना तरी आलेली दिसते आहे.) आणि खंडन करायचं तर काही संदर्भ शोधून लिहायचा असलेला आळस हे दुसरं. आता एवीतेवी चिखलफेक झालीच आहे तर मला जे खटकलं त्या बद्दल लिहितो. अवांतर वाटल्यास हा भाग खुशाल वगळावा.

अ. "ब-याच अमेरिकेतील भारतीय मित्रमंडळींचा वेळ भारतीय लोकांना नावे ठेवण्यात जातो,(आपल्याला उद्देशून तर नसेल अशी शंका कोणी घेऊ नये)" - प्रा. डॉ. दिलीप बिरूटे

- हे वैयक्तिकदृष्ट्या सरांना म्हणायचे नसावे हे कंसात लिहिलेल्या विधानावरून धरून चालतो, पण पहिला निष्कर्ष त्यांनी कसा काढला ते समजत नाही. काही लोक अर्थात असे आहेत. पण एखाद्याच्या वैयक्तिक ओळखीतले बहुसंख्य लोक समजा जरी असे असले तरी यावरून सरसकट निष्कर्ष कसा काढता येईल? माझा एक चांगला मित्र बर्‍याचदा गंमतीत 'तुम्हा पुण्या-मुंबईच्या लोकांना इकडचं काही ठाऊक नसतं' (आणि तत्सम) असं म्हणतो. त्यावरून जर मी "औरंगाबादच्या बर्‍याच लोकांचा वेळ पुण्या-मुंबईच्या लोकांना नावं ठेवण्यात जातो", असं विधान केलं तर ते कितपत योग्य ठरेल?

ब. "मग ते बापडे अमेरीकेच्या विरोधात कसं लिहिणार?"
- भारतात आणि अमेरिकेत - दोन्हीकडे लोकशाही असल्यामुळे भारतात राहणार्‍या भारतीयांनी भारत सरकारच्या धोरणांच्या विरोधात लिहिणं, अमेरिकनांनी आपल्या सरकारच्या धोरणांशी असहमती दर्शवणं, आणि अमेरिकेतल्या भारतीयांनी अमेरिकन सरकारच्या धोरणांविरूद्ध येणं याला काही बंदी नाही. नव्हे, फरीद झकेरियांसारखे लोक वृत्तपत्रीय स्तंभांतून आणि भाषणांद्वारे विरोध करून त्यांची दोन वेळची भाजीभाकरी कमवत असतात. तेव्हा हा बादरायण संबंध झाला. (चीनने आक्रमण केलं तेव्हा लाल क्रांतीच्या लाटेचे स्वागत करणारे सुशिक्षित कम्युनिस्ट भारतीय आणि भारतात राहणारेच होते की.)

असो, वरील प्रतिसाद 'अमेरिकेला नावं ठेवल्यामुळे अनिवासी भारतीयांच्या **ला झोंबलेल्या मिरच्या' या सदरात मोडतो किंवा कसे इत्यादी काळेसाहेबांनी मांडलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्तची चर्चा दुसर्‍या धाग्यात झाल्यास अधिक श्रेयस्कर असं माझं नम्र मत. निदान माझ्या बाजूने तरी (काळेसाहेबांनी मांडलेल्या मुद्द्यांशिवाय इतर बाबींना) प्रतिसाद येणार नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

30 Jul 2009 - 2:01 pm | घाटावरचे भट

अत्यंत सुंदर प्रतिसाद.

अवांतर -

(अल्पसंख्याक समाजाला जसं वेळोवेळी आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करावी लागते; तशी पाळी निदान मराठी संकेतस्थळांवर लिहिताना तरी आलेली दिसते आहे.)

अतिशय सहमत. बाकीच्या संकेतस्थळांचं माहित नाही, पण मिसळपाववर हे नक्कीच झालेलं आहे.

असो, अवांतराबद्दल क्षमस्व.

विसोबा खेचर's picture

30 Jul 2009 - 2:17 pm | विसोबा खेचर

अतिशय सहमत. बाकीच्या संकेतस्थळांचं माहित नाही, पण मिसळपाववर हे नक्कीच झालेलं आहे.

जी काही आहेत ती माझी वैयक्तिक मते आहेत. उगाच मिसळपावचे नाव मध्ये आणू नये...

तात्या.

घाटावरचे भट's picture

30 Jul 2009 - 2:21 pm | घाटावरचे भट

संकेतस्थळात फक्त मालक नव्हेत तर संकेतस्थळाचे इतर सन्माननीय सदस्यही येतात. कृपया प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये.

विसोबा खेचर's picture

30 Jul 2009 - 2:24 pm | विसोबा खेचर

(अल्पसंख्याक समाजाला जसं वेळोवेळी आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करावी लागते; तशी पाळी निदान मराठी संकेतस्थळांवर लिहिताना तरी आलेली दिसते आहे.)

नंदनशेठ, मुळात राष्ट्रनिष्ठा असेल तर ती सिद्ध करायची गरजच काय? आणि काय रे, अमेरीकेला नावं ठेवली तर तुमच्या नाकाला इतक्या मिरच्या का झोंबतात रे?

तात्या.

नंदन's picture

30 Jul 2009 - 4:44 pm | नंदन

>>> मुळात राष्ट्रनिष्ठा असेल तर ती सिद्ध करायची गरजच काय?
-- मीही असंच म्हणतो, तात्या. ऊठसूठ कोणी शंका घ्यायची गरज नाही आणि सिद्ध करायचीही नाही.

बाकी तू मागेही हाच प्रतिसाद दिला होतास (मिरच्या झोंबणे). तो येणार हे गृहीत धरूनच मी वर म्हटलं की, ऑलरेडी यावर चर्चा झाल्या आहेत, मध्यममार्ग निघाले आहेत, पुन्हा चर्चा झाल्या आहेत. तेव्हा यासाठी वाटल्यास वेगळ्या धाग्यावर चर्चा करू किंवा एखादा कट्टा जमवून उखाळ्या-पाखाळ्या काढू :). इथे काळेसाहेबांनी मांडलेल्या मुद्द्यांशिवाय तिसर्‍याच विषयावर चर्चा जाऊ नये असं वाटतं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

30 Jul 2009 - 2:45 pm | ऋषिकेश

मला काहि गोष्टी कळया नाहित त्या स्पष्ट कराल का?

१. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने भारतविरोधी वक्तव्य केल्यावर (हे सुद्धा समजा ते भारतविरोधी आहे) आपण निषेध खलिते पाठवल्याने त्यांना कशी काय अद्दल घडेल?

२. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या वक्तव्याला भरतासारख्या सार्वभौम देशाच्या नागरीकांनी इतकं महत्त्व का द्यावं?

३. समजा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असे बोलले असतील तर त्याने काय फरक पडतो / पडू शकतो? मला एक कळत नाही एका 'क्ष' देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या 'अबक' या वक्तव्याने सत्यामधे आणि देशाच्या प्रगतीमधे काय फरक पडणार आहे? जर फरक पडणार नसेल तर त्यांच्या वक्तव्याने भारतातल्या नागरीकांनी का लक्ष द्यावे? (आम्हाला काय कामं नाहित का ओबामांच्या प्रत्येक वाक्यावाक्यावर निषेध खलिते पाठवायला.. देश त्यांचा.. त्यांच्या देशांत त्यांनी काय बोलावं त्यांचं ते बघतील.. आणि तसंही कोणीही काहिही बोललं तरी भारत प्रगती करणारच आहे)

तेव्हा मला हा निषेध व्यक्त करण्यासाठी एक सबळ कारण दिल्यास ते कष्ट घेण्याचा विचार केला जाईल

('विश्व'स्थ भारतीय)ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून ४३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

सुधीर काळे's picture

30 Jul 2009 - 3:43 pm | सुधीर काळे

कांहीं भाग मी इथं लिहिलेला नाहीं कारण या विषयावरील एक (बर्‍यापैकी) सर्वंकष लेख (३३०० शब्दांचा, हा लेख ७०० शब्दांचा आहे) मी "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला आहे तो नंतर जरूर वाचावा.
तो भाग म्हणजे १९९८ साली जेंव्हा भारताने मे महिन्यात चांचणी स्फोट केले त्यानंतर जवळ-जवळ सहा महिन्यांनी पाकिस्तानने केले व असं मिस्कीलपणे म्हटलं जायचं कीं मँडॅरिन भाषेत लिहिलेल्या User Manual चे इंग्रजीत भाषांतर करायला पाकिस्तानला सहा महिने लागले. पण मी कुठे तरी हेही वाचले आहे कीं चीनने पाकिस्तानच्या "वतीने" त्या आधीच चांचणी स्फोट केला/केले होता/होते. (म्हणजे दक्षिणा देऊन गुरुजी आपल्यासाठी एकादष्ण्या करतात तसे?)
मुख्य मुद्दा हा कीं पाकिस्तानला स्वतःच अण्वस्त्रे देऊन वर उलटा पांचजन्य ओबामांनी का केला? सिनेटर म्हणून आधी माहीत नसेल पण राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या "ब्रीफिंग"मध्ये त्याना जरूर सांगितले गेले असणार कीं पाकिस्तानला अमेरिकेनेच अण्वस्त्रसज्ज केले आहे व याच पाकिस्तानने उत्तर कोरियाला व इतर rogue राष्ट्रांना हे ज्ञान दिले. असे असताना त्यांनी खालील दोन चुका कां केल्या?

  1. शीतयुद्ध संपायच्या आधीच (१९९० च्याही आधी) पाकिस्तानला अमेरेकेनेच अण्वस्त्रसज्ज केले असताना त्यांनी शीतयुद्ध संपल्यापासून ज्यांनी स्फोट केले त्यात पाकिस्तानचे नांव कां घातले? ते अण्वस्त्रसज्ज आधीच झाले होते! मग ही मखलाशी स्वतःच्या (अमेरिकेच्या) पापांवर पांघरूण घालण्यासाठी?
  2. दुसरी चूक म्हणजे ते रशियात अण्वस्त्रप्रसारावर कसा आळा घातला पाहिजे या विषयावर बोलत होते, मग त्यात अगदी सक्रीयतेने भाग घेऊन लिबिया, इराण व उत्तर कोरियाला ही विद्या "विकणार्‍या" पाकिस्तानला आपल्या पंक्तीत कां बसवले?

पण मला अजूनही वाटते कीं ही चपराक त्यांनी डिक चेनींना मारली असावी जे रेगनच्याकाळी Secretary of Defense होते व या दुष्कृत्यात त्यांनी सक्रीयपणे भाग घेतला होता व आता ते ओबामांवर तोंडसुखही घेत आहेत.
कांहींही असो, पण आपली 'मोट' त्यांनी पाकिस्तानबरोबर बांधायला नको होती.
आपल्याबरोबर जो अण्वस्त्रकरार अमेरिकेने केला त्यात त्यांचा स्वार्थ जास्त होता, कारण त्यांना चीनबरोबर भिडवायला कुणीतरी भोळासांब "बकरा" हवा आहे व आपण तो बकरा होण्याची शक्यता आहे! म्हणूनच सावधान.
पं नेहरूंनी नासेर व मार्शल टीटो यांच्याबरोबर अलिप्ततावादाचा शुभारंभ केला! त्याबाबतचा युक्तिवाद होता कीं असे केल्याने आपल्याला दोन्ही बाजूने मदत/दुजोरा मिळेल, पण झाले काय? पाकिस्तानने दोन्ही गोटात प्रवेश करून आज तो दोन्ही हातांनी मदत ओरपत आहे.
असो, हे विषयांतर झाले.
मतभेद आहेत म्हणून अभिप्राय देणे थांबवू नका. कारण अशा विचारांच्या देवाण-घेवाणीने माझ्या विचारशक्तीत प्रगल्भता येते.
सुधीर काळे

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुनील's picture

30 Jul 2009 - 4:04 pm | सुनील

पुरेशा अभ्यासाअभावी प्रतिक्रिया पूर्वीही दिली नव्हती आताही देत नाही. फक्त एक तपशिलातील चूक आढळली ती दाखवतो आहे.

१९९८ साली जेंव्हा भारताने मे महिन्यात चांचणी स्फोट केले त्यानंतर जवळ-जवळ सहा महिन्यांनी पाकिस्तानने केले
हे बरोबर नाही. भारताने स्फोट केल्यानंतर दोन आठवड्याच्या आत पाकिस्ताननेही स्फोट केले. सहा महिन्यांनतर नव्हे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन's picture

30 Jul 2009 - 4:36 pm | नंदन

'उत्तम कथा'मधला लेख वाचेनच :). मला अण्वस्त्रनिर्मितीबद्दल काडीचीही माहिती नाही; परंतु जालावर थोडी शोधाशोध केल्यावर ती गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया असावी असे दिसते. शिवाय अण्वस्त्रे ही एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्रात पाठवून (अमेरिकेतून इस्त्रायल किंवा पाकिस्तान आणि तिथून चीन) त्या देशाला अण्वस्त्रसज्ज करणे हे तितके सोपे नसावे.

अण्वस्त्रांची चाचणी करण्याचा उद्देश हा वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचा परिणाम कसा होतो, त्यांचे काम कसे चालते हा आहे. द. आफ्रिका, इस्त्रायल आणि कदाचित इराण यांच्याकडे हे ज्ञान असले तरी त्यांनी त्याची चाचणी केलेली नाही. त्यामुळे 'कॉम्प्रिहेन्सिव टेस्ट बॅन ट्रीटी'चे उल्लंघन त्यांनी केलेले नाही; हे उघड आहे. पाकिस्तानला आणि भारताला एकाच तराजूत न तोलण्याबद्दल मी वर लिहिले आहेच. अगदी डॉनसारख्या पाकिस्तानी वृत्तपत्रातही अनेक स्तंभलेखकांनी पाकिस्तानला अण्वस्त्रचाचणीबाबत भारतासारखी वागणूक मिळणे शक्य नाही, हेही स्पष्ट केले आहे. असं असताना 'भारत, पाकिस्तान आणि उ. कोरियाने सीटीबीटीला न जुमानता अणुचाचण्या केल्या' ह्या विधानाबद्दल इतका गदारोळ का? वर ऋषिकेशने उपस्थित केलेल्या प्रश्नांचं काय? विकीपीडियातही या दुव्यावर साधारण याच आशयाचे वाक्य आहे. त्याचं काय करायचं?

कारण त्यांना चीनबरोबर भिडवायला कुणीतरी भोळासांब "बकरा" हवा आहे व आपण तो बकरा होण्याची शक्यता आहे! म्हणूनच सावधान
- यामागची भावना समजू शकतो; पण हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अतिसुलभीकरण होते आहे असं नाही का वाटत? स्ट्रोब टॅल्बट यांचं 'एंगेजिंग इंडिया' हे पुस्तक या संदर्भात वाचनीय आहे. वाजपेयी-जसविंतसिंह या जोडीने वाटाघाटी आणि बोलण्यांच्या मार्फत क्लिंटन प्रशासनाचे दडपण कसे झुगारले हे मुळातून वाचण्यासारखे आहे. चीनबरोबर 'भाई भाई'चे धोरण फसल्यानंतर आपले परराष्ट्रधोरण भोळासांब अवस्थेतून बाहेर आले असावे, असा दाट संशय निदान मला तरी ते पुस्तक वाचून आला.

बाकी ओबामाला झोडपणे => अमेरिकेला झोडपणे => अनिवासी भारतीयांना झोडपणे हा बाजारात तुरी... छापाचा प्रकार झाला. पण ते एक असो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

30 Jul 2009 - 7:33 pm | विकास

गेले ४-५ दिवस काही व्यक्तिगत अतिमहत्वाच्या कामामुळे मिपाच काय माझ्या इमेल्स पण मी धड पाहू शकत नव्हतो. ही चर्चा मी पाहीली खरी पण मूळ लेख वाचायला आणि त्यावर कुठल्याच बाजूने उत्तर लिहायला वेळ नसल्यामुळे मी लिहायचे टाळले होते. असो.

सर्वप्रथम ह्या लेखातील मुद्दा : "ओबामांचा निषेध" आणि त्याचे तात्कालीक कारण त्यांचे एक वाक्य, "In the short period since the end of the Cold War, we've already seen India, Pakistan and North Korea conduct nuclear tests.” हा प्रकार म्हणजे एका बिंदूवरून रेषा कशी असेल हे ठरवण्याचा भाग झाला. (One point extrapolation अथवा taking one line from the whole speech, out of context). हीच आपल्या लेखाची मोठी मर्यादा वाटते आणि त्यामुळेच त्याच्याशी असहमत आहे.

वर नंदननी बर्‍याच मुद्यांचा मुद्देसुद उहापोह केलेला आहे. ऋषिकेशने पण बरेच प्रश्न विचारलेत तसेच तेच परत लिहीत नाही. पण खाली अजून काही भर. ती वाचताना एकच लक्षात ठेवा, की माझा प्रतिसादा हा ह्या लेखासंदर्भात आहे, अमेरिका चांगली की वाईट, ओबामा बरोबर की चूक ह्या संदर्भात नाही. त्या संदर्भात माझे कायमचे उत्तर आहे: प्रत्येक राष्ट्र स्वतःचा स्वार्थ बघत असते. आपण ते जेंव्हा शिकू अथव तसे वागू तेंव्हा त्याचे फायदे होतील. (एकाच सरकारची दोन उदाहरणे: एनडीए ने सिटीबिटी करार ऐरणीवर येण्याआधी अणुस्फोट केले. टिका झाली की भारताला आता आर्थिक फटका बसेल. वास्तविक प्रगत राष्ट्रे अधिकच जवळ आली. त्याच सरकारने कंदहार प्रकरणात कच्स खाल्ली. त्यात अडकलेल्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे तसेच (कदाचीत) "शांतीप्रिय" विचारवंतांचे तात्पुरते कौतुक मिळवले पण आजही आपण चुकीचा मेसेज दिल्याने दहशतवाद भोगत आहोत. आणि हो, ज्याला त्यात सोडले त्याने ९/११ ला मदत केली तो भाग वेगळाच).

ह्या सर्वांवर (माझ्या आणि इतरांच्या असहमती दर्शवणार्‍या मुद्द्यांवर) आपली प्रतिक्रीया आणि विचार वाचायला आवडतील.

"भारताने अण्वस्त्रविद्या स्वतःच्या शक्तीवर संपादन केलेली आहे, ती कुणी त्याला "चकटफू" दिलेली नाहीय."

  1. हे आपले विधान अर्धसत्य आहे. सर्वप्रथम भारताची प्रथम अणूचाचणी ही ७४ साली इंदिरा गांधींच्या काळात झाली होती. त्याकाळात आपण रशियाच्या जवळ होतो आणि शितयुद्ध चालू होते. अणुचाचणी आणि अण्वस्त्रे तयार करताना लागणार्‍या प्राथमिक सामुग्रीसाठी तसेच मुलभूत तंत्रज्ञान (जंपस्टार्टसाठी) आपल्याला ज्यांच्याकडे अणुशक्ती विकसीत झाली आहे अशांची गरज होती आणि तशी ती रशियाने दिली असे म्हणायला नक्की जागा आहे. तसेच अमेरिकेने पण आपल्याला काही रीअ‍ॅक्टर्स बांधायला मदत केली होती. असे म्हणताना आपल्या संशोधंकांचे योगदान अजिबात कमी होत नाही. फक्त आपल्या वरील विधानासंदर्भातील अर्धसत्यता जाणवते इतकेच म्हणायचे आहे.
  2. दुसरा भाग पाकीस्तानला अथवा इतर कुणालाही कोणी काही "चकटफू" देत नसते. आंतर्राष्ट्रीय राजकारणातील देवाणघेवाण ही राष्ट्राराष्ट्रांमधील चलनांच्या आणि क्रेडीटच्या द्वारे होण्यापेक्षा तडजोड आणि शिरजोरीवर होत असते. उ.दा.: पाकीस्तानला आपल्या म्हणण्याप्रमाणे जशी अमेरिकेने मदत केली तशीच चीनने देखील केली आणि त्या बदल्यात काश्मीरचा एक लचका तोडला. अमेरिकेने काय त्याला पुर्ण अंकीत राष्ट्रच केले आहे.

आता इस्रायल संदर्भातः वर नंतर आलेले आहेच पण इस्त्रायलने कधीच जाहीर अणूचाचणी केलेली नाही त्यामुळे ते (पहीले पाच सोडल्यास) भारत, पाकीस्तान आणि उ. कोरीया प्रमाणे अणुचाचणी केलेल्या देशांच्या पंगतीत बसत नाहीत. जसे इस्त्रायलचे आहे तसेच इराणचे पण आहे.

मला त्या वाक्यात आपल्याला वाटले तसे गैर वाटले का?
अजिबात नाही. एकतर त्यात नुसती शितयुद्धानंतर अणुचाचणी केलेल्या राष्ट्रांची नावे आहेत. त्यांनी त्यांना (आणि मुख्य म्हणजे त्यात भारताला गोवून) Axis of Evil म्हणलेले नाही. त्यांचा मुद्दा वरकरणी कशा संदर्भात होता: तर, 'अणुशक्ती म्हणून (आणि एकंदरीतच) जागतिक स्तरावरील बलाढ्य (दादागिरी करणारी) जी राष्ट्रे आहेत त्यांना एक आणि इतरांना एक अशी वागणूक मिळण्याचे दिवस गेलेत त्यामुळे आपल्याला पण (म्हणजे अमेरिका-रशियास) अण्वस्त्रेकपात वाढवायची गरज आहे' वगैरे... त्यातील गर्भित हेतू हा रशियाचे बळ नियंत्रीत ठेवण्याचा प्रयत्न करणे हा देखील होता. पण तो अमेरिका-रशिया संदर्भातील मुद्दा आहे. रशिया निषेध पत्र अथवा फाट्यावर मारतो वगैरे म्हणण्यात वेळ घालवत नाही. त्यांना जे काही करायचे असते ते, ते करतात. इंग्रजीत अशा वागण्यासंदर्भात एक छान मजेशीर वाक्य आहे. रशिया आणि इतर अनेक असेच वागतात: I think you are confusing me with someone who gave you a damn! चीन पण तेच करत आहे.

याचा अर्थ मला असे वाटते का की ओबामा निषेध करण्यासारखे काहीच बोललेले नाहीत?

त्यासंदर्भात काळेसाहेबांना लिहायचेच असेल तर त्यांनी वास्तवीक "Say no to Bangalore, yes to Buffalo: Obama" ह्या त्यांच्या आउटसोअर्सिंग विरोधी आणि जास्त कर लादण्याच्या प्रस्तावाविरुद्ध लिहायला हवे. कारण ते नुसतेच भारतविरोधी नाही आहे तर ते मुक्तअर्थव्यवस्थेच्या विरोधातपण आहे ज्याची (मुक्तअर्थव्यवस्थेची) अपेक्षा अमेरिका इतर राष्ट्रांकडून करत असते. थोडक्यात दुटप्पीपणा...चीनने याला शांतपणे आत्ताच सौरउर्जा उद्योगांच्या बाबतीत उत्तर दिले - तसाच protectionism आणून, अमेरिकेसच नाही तर तसेच वागणार्‍या पण अमेरिकेमुळे तितकेसे प्रकाशात न येणार्‍या युरोपला पण...

सारांश: हा लेख हा भावनाविवशतेने लिहीलेला वाटला ज्यात अनाठायी टिका केलेली आहे.

बाकी इंग्रजीत एक चांगले वाक्य आहे, त्याचे मराठीकरणः "आंतर्राष्ट्रीय राजकारणात कोणी मित्र नसते आणि कोणी शत्रू नसते, असतात ते फक्त राजनैतिक संबंध". हे लक्षात ठेवून जेंव्हा/जितके आपण (राष्ट्र म्हणून) वागू तितके आपण "विश्वात शोभुनी" राहो या इच्छेच्या जवळ जाऊ.

- कुणाचा द्वेष्टा नसलेला (अर्थात द्वेष न करणारा) विकास :-)

एकलव्य's picture

30 Jul 2009 - 7:38 pm | एकलव्य

विकास - आपली मांडणी आवडली.

"Say no to Bangalore, yes to Buffalo: Obama" ह्या त्यांच्या आउटसोअर्सिंग विरोधी आणि जास्त कर लादण्याच्या प्रस्तावाविरुद्ध लिहायला हवे. कारण ते नुसतेच भारतविरोधी नाही आहे तर ते मुक्तअर्थव्यवस्थेच्या विरोधातपण आहे ज्याची (मुक्तअर्थव्यवस्थेची) अपेक्षा अमेरिका इतर राष्ट्रांकडून करत असते.

ओबामा हा अमेरिकेचा गोर्बाश्चेव्ह होण्याची शक्यता आहे का हा खरा प्रश्न आहे ;)

विकास's picture

30 Jul 2009 - 9:14 pm | विकास

ओबामा हा अमेरिकेचा गोर्बाश्चेव्ह होण्याची शक्यता आहे का हा खरा प्रश्न आहे

ह्या प्रश्नाला एका पेक्षा अधिक छटा आहेत. एकीकडे गोर्बाचेव्ह यांनी "शांत्यस्त्र अर्थात पीस वेपन" वापरत रेगनना आणि नंतर बुश ४१ला अण्वस्त्रकपातीसाठी उद्युक्त केले असे म्हणतात. त्यामुळेच आणि शितयुद्ध थांबवल्यामुळेच त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

दुसरीकडे अमेरिका या संदर्भात रशियाला ताळ्यावर आणले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेते. कारण शितयुद्धच चालू ठेवत अशी परीस्थिती निर्माण केली की रशियाचा साम्यवादी पत्त्यांचा बंगला कोसळण्याशिवाय पर्याय राहीला नाही. तत्कालीन रशियन तज्ञ काँडोलिजा राईस यांचे या संदर्भात मोठे योगदान आहे असे मानले जाते.

गोर्बाचेव्हना रशियात तिरस्कार मिळाला कारण साम्राज्य धुळीस मिळाले आणि सामान्यांचे अधिकच हाल होवू लागले.

यातील कुठल्या गोर्बाचेव्हची आणि ओबामाची आपण तुलना करू इच्छिता? :-)

माझ्या लेखी आत्तापर्यंत केवळ भारत आणि मध्यपुर्वेतच अवतार आणि प्रेषित झालेत. ज्या पद्धतीने ओबामांबद्दल बोलले/वागले जाते (आणि तेही अजूनपर्यंत कुठलाच तोल ढळून न देता वागतात) त्यामुळे आता अमेरिकेतील पुढच्या पिढीस "मेड इन अमेरिका" प्रेषित मिळाला असे वाटते. ;)

बाकी या संदर्भात मला दोन गोष्टी केवळ योगायोग म्हणून आठवतातः

  1. एक म्हणजे अ‍ॅसिमोव्हचे "फाउंडेशन" ज्यात empire हे मोडकळीस येऊन त्यामुळे barbarism येणार असतो आणि विश्वाला योग्य दिशा कोणची ठरेल या विषयीचा शोध. त्यात केलेले मोडकळीस आलेल्या साम्राज्याच्या वैभवाचे वर्णन...
  2. दुसरा एक (आता हयात नसलेला) एक भारतीय विचारवंत ज्यांनी ९० च्या दशकात अमेरिकेचा कुठल्याही प्रकारे द्वेष न करता, ही अर्थपद्धत जर बदलली नाही तर २०१० पर्यंत कशी कोलमडू शकेल हे सांगितले होते. (अर्थात त्यावेळी, त्यांचे बोलणे हे संशोधनाधारीत नसल्याने खरे कसे मानावे, हा मला प्रश्न पडला होता...)
सुधीर काळे's picture

30 Jul 2009 - 9:32 pm | सुधीर काळे

२००८च्या निवडणुकीच्या आधी ओबामा हे "कार्टर-२" निघतील असे सांगून मतदारांना फितविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. कार्टर जसे "राष्ट्राध्यक्ष"पेक्षा "माजी राष्ट्राध्यक्ष" म्हणून जास्त सन्मान मिळविते झाले तसे ओबामांचे अती सज्जनपणामुळे होऊ शकते. म्हणूनच छोट्या-छोट्या चुका वेळीच त्यांच्या ध्यानात आणून द्यायला हव्यात जेणेकरून त्यांचा कार्टर होणार नाहीं.
सुधीर काळे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ऋषिकेश's picture

30 Jul 2009 - 9:45 pm | ऋषिकेश

म्हणूनच छोट्या-छोट्या चुका वेळीच त्यांच्या ध्यानात आणून द्यायला हव्यात

त्या अमेरिकन ओबामानी केलेल्या चुका सांगायला एका भारतीयाने का वेळ घालवावा? तोच वेळ जर स्वतःच्या देशातील एखाद्या प्रश्नासाठी वेचला तर अधिक फायद्याचे नाहि का?

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

सुधीर काळे's picture

30 Jul 2009 - 9:48 pm | सुधीर काळे

एकाच वेळी सर्वश्री प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, नंदन, ऋषिकेश, सुनील, एकलव्य, विकास यांच्याकडून अतीशय मुद्देसूद व खूप उच्च प्रतीचे शेरे आल्यामुळे "A ton of bricks" म्हणजे काय हे नीट कळले.
या सर्वांना उत्तर देण्याची तयारी सुरू आहे. जरी वेळ लागला तरी मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पण एक quick check केल्यावर श्री सुनील यांनी दिलेली सहा महिन्याची माहिती बरोबर आहे असे वाटते. याबद्दल माझ्या डोक्यात कसा घोळ झाला तेही पाहिले पाहिजे कारण मँडॅरिनच्या भाषांतराबद्दलचा विनोद त्यावेळी बराच लोकप्रिय झाला होता.
याखेरीज आडवाणीसारख्या नेत्यांनी "आता भारत proactive धोरणे आखील" असे उद्गार काढले होते त्यातली हवा इतक्या फटकन गेली होती असे आठवणीवरून वाटत नाहीं. मी पुन्हा एकदा check करीत आहे.
सुधीर काळे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

30 Jul 2009 - 11:39 pm | विकास

पण एक quick check केल्यावर श्री सुनील यांनी दिलेली सहा महिन्याची माहिती बरोबर आहे असे वाटते.

भारताने १० मे १९९८ ला अणूचाचणी केली तर पाकीस्तानने २८ मे १९९८. खालील चित्र विकीपिडीयावरून साभार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2009 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखाचा मूळ गाभा खूपच बाळबोध विचारांचा वाटला. नंदन, ऋषीकेश आणि विकासने प्रतिसादात मांडलेले मुद्दे पुन्हा लिहीण्यात काहीच अर्थ नाही. पण लेख वाचताना राहून राहून वाटत होतं, ओबामांना किंवा इतर कोणत्याही काळ्या-गोर्‍या अमेरीकन (वंशाच्या) अमेरिकन लोकांना काय फरक पडतो भारत काय, पाकिस्तान काय आणि उत्तर कोरीया काय, सगळेच आशियातले विकसित नसलेले देश! त्यांना त्यांचाच देश प्रिय असणार ना? उलटा विचार करता, मंगोल चेहेरे असणार्‍या लोकांना नाही आपण सरसकट चिनी म्हणतो (किंवा जपानी)?

शिवाय एवढा सखोल (?) वैचारीक लेख लिहीताना, त्याच्या प्रतिसादात केलेली माहीतीमधली घोडचूक (पाकिस्तानने अणूचाचणी आपण केली त्याच महिन्यात केली) ही, शिवाय इंदीरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालात केलेल्या अणूचाचणीकडे साफ दुर्लक्ष हे फारच खटकलं.

अदिती

CTBT या विषयावरील माझी दोन जुनी पत्रे:
अर्थातच या पत्रांचा माझ्या नव्या लेखावरील शेर्‍यांशी संबंध नाहीं. त्यांना मी वेगळे उत्तर तयार करत आहेच.
मी इथे जकार्ताला रहात असलो तरी भारताला व भारताच्या हितसंबंधांना केंद्रस्थानी ठेवूनच लिहितो व बाहेरून भारताला किंवा भारतियांना/त्यांच्या संवयींना झोंबेल अशी टीका परदेशी वृत्तपत्रांत/नियतकालिकांत कधीच करत नाही.
सुधीर काळे, जकार्ता

CTBT: A case of arm-twisting?
If the objective of the com¬prehensive test ban treaty (CTBT) over nuclear weapons is to free the world of the nuclear menace, I would remain grateful to know why the governments of all the five members of the nuclear “haves” club {i.e. the countries having a confirmed arsenal) do not agree to India's sugges¬tion (or demand) that all of them declare their timetable to get rid of their own nuclear arsenal instead of trying to twist India's arm to pressurize her into signing the CTBT.
Or is the real objective to separate the “haves” from the “have-nots”? It would be worthwhile to remember that India has stuck to her declared policy of garnering/harnessing nuclear technology for peaceful purposes by refraining from-testing any further nuclear devices since her first success¬ful test in the 1970s. On the oth¬er hand, Red China (I mean the
People's Republic of China) conducted its recent tests with total disregard for world opin¬ion and protests.
The Chinese, at least, con¬ducted their tests on their own soil. The French went one step further and did all their dirty work in Asia. The New Zealanders and Australians protested, but the French showed remarkable immunity to all the protests and criticism!
And why did Australia try to bring (futile) pressure to bear on India in UN's General Assembly, instead of taking the members of the “haves” club to task for their refusal to accept and stick to some schedule of destroying their nuclear stockpiles? With such a volte-face, all their previ¬ous vociferous protests against China and France seem preten¬tious, dishonest and hypocriti¬cal. Were they just “playing to the gallery” by doing such an
“in” thing so that they are labeled as a “liberal” country. It would be interesting to read comments from the representa¬tives of the governments of the nuclear “haves” club and Australia about the above in The Jakarta Post columns.
.K.B. KALE, Jakarta (30 Sept 1996)

2) India should call their bluff easily
THIS has reference to the flak (hat India has been receiving for her recent nuclear tests.
India has always refused, and rightly so, to sign the comprehensive test ban treaty (CTBT) about nuclear weapons until the governments of the five-member 'nuclear club' agree to India's demand for announcing their time-table for get¬ting rid of their own nuclear arse¬nal.
It will be worthwhile to remember that, till yesterday, India had stuck to her avowed policy of harnessing nuclear technology for peaceful purposes only by refrain¬ing from testing any further nuclear devices since her first successful test in 1974. On the other hand, China and France conducted their tests in 1996 with total disregard to world opinion and protests. The New Zealanders and Australians protested as usual, but the Chinese and the French showed remarkable immunity to all the protests and criticism!
Australia had played the 'Her Master's Voice' role of trying to iso¬late India by tabling the resolution about CTBT in the United Nations general assembly instead of iso¬lating these 'nuclear club' mem¬bers. Thus, if she has decided to re-call her ambassador from India for consultations and play 'Her Master's Voice' all over again, what's new in it?
What moral right the 'nuclear club1 members have to tell the rest of the world to stop testing when they have built a nuclear arsenal that can destroy the whole world many times over? It is like a rich feudal lord exhorting his poor and hungry people to go on a diet while he himself is suffering from a bad case of indigestion!
When she has a neighbour who has a proven nuclear capability, who is flexing her arms from her latest successful n-tests, who is exporting her nuclear know-how to a not-so-friendly neighbour, and who has a far from benevolent rep-utation, India has no option but to conduct her own tests and devel¬op her own computer simulation models. After all, most of the mem¬bers of the 'nuclear club' do not need to test their nuclear warheads any more, because they have fine-tuned their own computer simulation models.
The powerful countries have always imposed sanctions against small bullies but given MFN status and a permanent seat on :the security council to the big ones, even when they are nuclear!
India is becoming too big a market for these G-7 countries to take any action like economic sanctions, What is going on is just letting off of some steam! India can and should call their bluff easily. If the western democracies were so serious, they would not have established such high volume trade with China while bickering about her record in human rights.
Their message seems to be, 'Go ahead and be a bully, but never a small one'.
Bravo, Prime Minister! The whole country is with you.
K B KALE, Purandare Road, Pune (Date not available)
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

नंदन-जी,
आपण मांडलेले मुद्दे महत्वाचे होते व त्याबद्दल आभारी आहे.
माझ्या लिखाणात कांहीं मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली असेल त्याबद्दल आधीच माफी मागतो. तसेच उत्तर जरा जास्तच लांब झाले आहे याबद्दलही क्षमस्व.
सुधीर काळे
आपण चार मुद्दे उपस्थित केले होते:
(१) एकाच वाक्यात भारत, पाकिस्तान आणि उ. कोरिया यांचा उल्लेख आला म्हणून आपल्याला एकाच पंगतीत बसवलं जात आहे; हा निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे? व "ओबामांनी हे विधान करून भारताच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखीच निर्माण केली आहे." - हे कोडे काही उलगडले नाही
(२) आपल्याबरोबरही अणुकरार व्हावा ही पाकिस्तानची मागणी फेटाळली गेली
(३) प्रत्येक राष्ट्रप्रमुख हा आपल्या देशाचं हित प्रथम पाहतो.
(४) पण जसं चीनचे नेतृत्व अमेरिकेच्या थेट किंवा आडून केलेल्या विधानांना आक्षेप घेतं, तसं आपल्या परराष्ट्रखात्याकडून झालं तर ते सर्वात परिणामकारक ठरावं.

माझं स्पष्टीकरण:
(१) पहिली गोष्ट अशी कीं मी ओबामांच्या एका वाक्यावरून हा लेख लिहिला नसून त्यांचं जे घोषवाक्य होतं (Change We Can Believe In) व त्याबरहुकूम त्यांच्या पहिल्या कृती होत होत्या त्या पार्श्वभूमीवर हे वाक्य वेगळाच सूर लावून गेले म्हणून व ते जर त्यांचे "one-off/not-too-serious" वाक्य नसेल या भीतीपोटी मी हा लेख लिहिला.
केवळ शब्दविच्छेदन केल्यास (technically) व शब्द-न्-शब्द एकेकटा पाहिल्यास त्यात चुकीचे कांहींच नाहीं, पण आशय पाहिल्यास खूप मोठी चूक आहे. जो माणूस हे भाषण अण्वस्त्रप्रसारबंदीसाठी देतोय् त्याने असे म्हणणे म्हणजे मूळ उद्देशाशीच प्रतारणा नाहीं का? भारताने (किंवा इस्रायलने) ही अणुविद्या कशीही (स्वकष्टाने किंवा फुकट) मिळविली असो, पण इतर राष्ट्रांना विकली नाहीं. एक अण्वस्त्रसजा राष्ट्र म्हणून भारताची वागणूक अगदी जबाबदार व नाव न ठेवण्यासारखी (impeccable) आहे. याउलट पाकिस्तानने अमेरिकेकडूनच मिळालेली विद्या अमेरिकेच्याच कट्टर वैर्‍यांना (लिबिया, इराण व उत्तर कोरिया) विकली. तरीही ओबामांनी भारताला या नीतीशून्य राष्ट्राच्या पंक्तीला बसवले. अशा मोठ्या चुकीच्या विधानाला फक्त "डोकेदुखी" हे विशेषण मी वापरले. ते खरं तर फारच "उदार" आहे. याहून कडक शब्द वापरता आले असते.
(२) ही आपल्या जबाबदार व impeccable record साठी मिळालेली पावतीच आहे व म्हणूनच कदाचित उशीरा आलेल्या अकलेनुसार अमेरिकेने पकिस्तानला या करारातून बाहेर ठेवले असेलही. पण दुसरी शक्यता आपल्याला चीनबरोबर होणार्‍या अमेरिकेच्या भावी युद्धात भिडवायसाठी असेल. आपण वहावत न जाता या सापळ्यात न पडणे आपल्या हिताचे आहे. या दृष्टीने माझे १० मार्च २००६ साली लिहिलेले "जकार्ता पोस्ट्" या स्थानिक दैनिकातले पत्र वाचल्यास माझे म्हणणे लक्षात येईल.

Signing of various deals in New Delhi during the visit of President Bush to India was an important event. Here were two democracies, one strongest and the other biggest, shaking hands in friendship.
This friendship has come out of mutual respect. It was neither because of India’s nuisance value in the geopolitical equation nor was it based on issues like ‘support against global war on terrorism’ - genuine or phoney. It was in recognition of India’s economic performance and its intrinsic ability to achieve so much while it remained a genuine, if occasionally somewhat chaotic, democracy.
I feel India should stop lobbying for a permanent seat in Security Council and concentrate on getting stronger and stronger till the UN Security Council feels that it is better off with India inside it than outside and requests India to join as a permanent member. And then India should gracefully ‘accept the request’, but only if it comes with a veto power.
From a hungry nation of 50’s and 60’s wherein it waited for the arrival of PL-480 wheat from USA to a nation which gratefully rejects the post-Tsunami-post-earthquake aid, India has come a long way.
At the end of the visit, it was clear that India ate the cake and kept it too. It kept what it wanted to be kept out and got what it wanted. Its civilian nuclear installations will get the fuel and will be open to inspection by IAEA while its military installations will be on their own.
US Secretary of State stated more than once that US now could take the name of India without taking the name of our honourable neighbour. Both have their own places in US foreign policy, she said.
India has miles to go before it is accepted as a ‘developed’ nation by the present group of developed nations and is admitted to G-8 (or G-10 or G-11) group. But come President Kalam’s magic year 2020 and India will be up there and continuing to march ahead!
Accepting the deal signed in New Delhi is in the interest of both the countries and so it is hoped that the American congress would ratify it without delay.
Viva Indo-US friendship!

भारतीय लोक-मग ते स्वदेशी रहात असोत वा परदेशी-आपल्या मातीशी कसे इमान राखतात याचीही थोडीशी कल्पना येईल.
(३) मी अगदी ठामपणे मानतो कीं प्रत्येक राष्ट्राच्या नेत्याने आपल्या देशाच्या हिताचे जे असेल तेच करावे. उदा: निक्सन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी बंगलादेश विमुक्तीच्या वेळी अमेरिकेचे सातवे आरमार बंगालच्या उपसागरात धाडले. हा निर्णय भारताच्या हितांच्याविरुद्ध होता म्हणून सगळ्यांच्या बरोबर मलाही त्यांचा राग आला. पण त्यांच्या एकूण कारकीर्दीकडे पहाता मी निक्सनना अमेरिकेचा सर्वात द्रष्टा राष्ट्राध्यक्ष मानतो कारण त्यांनी व किसिंजर या त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यानी त्यावेळी जे निर्णय घेतले ते खूप दूरगामी ठरले व या निर्णयामुळेच सोवियेत यूनियन "खालसा" झाली. याचे श्रेय चुकीने रेगन यांना दिले जाते. रेगन फक्त "योग्य वेळी योग्य जागी" होते इतकेच. (हे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ’मंगल-कलश’ आणण्याचे श्रेय यशवंतरावांना चुकीने दिल्यासारखेच आहे. असे केल्याने संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आचार्य अत्रे, एसेम, शाहीर साबळे वगैरेसारख्या अनेक नेत्यांच्यावर अन्यायच होतो!)
पण एकादा माणूस जे करतोय् ते त्या देशाच्या हिताचे नाहीं असे दिसल्यास बोलायला हरकत असू नये. म्हणजे जर ओबामांचे हे उद्गार अमेरिकेच्या हिसंबंधाना पोषक असतील तर माझी तक्रार का असेल? ते तसे वाटत नाहींत म्हणून मी त्याबद्दल लिहिले.
शेवटी माझा पत्र/लेख लिहिण्यामागचा मुद्दा काय आहे?
ही अण्वस्त्रप्रसार करायची चूक ओबामाच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानसारख्या सदसद्विवेकबुद्धी नसलेल्या राष्ट्राला ही विद्या देऊन केली (रेगन् व बुश-४१). मग भारताचे नांव ओबामांनी त्यांच्याबरोबर केवळ चांचणी केली म्हणून घेणे बरोबर म्हणता येईल कां? माझ्या मते नाहीं.
सार्‍या जगाचे लक्ष सद्दाम, कुवेत अशा विषयांवर मुद्दाम केंद्रित करून पाकिस्तान जे करत होता ते गुप्त ठेवण्याचे यशस्वी कारस्थान त्यांनी केले. आपण बुद्दू होतो हे तर खरेच, पण अमेरिकेच्या व पाकिस्तानच्या अदूरदर्शी नेत्यांनी आज पाकिस्तानची स्थिती "धरले तर चावते व सोडले तर पळते (व दुसर्‍याला चावते)" अशी करून ठेवली आहे व त्यामुळे पाकिस्तानला आजही लष्करी व आर्थिक मदत अमेरिकेला जबरदस्तीने करावी लागत आहे हे खरे कीं नाहीं? आज जर ही अण्वस्त्रें पाकिस्तानी तालीबान व अल कायदाच्या हाती पडली तर ती अमेरिकेवर डागली जातील असा उघड-उघड इशारा "अल कायदा"चा तीन नंबरचा नेता मुस्ताफा अबुल याजीद याने "अल जज़ीरा"ला २२ जूनला दिलेल्या मुलाखतीत दिलेला आहे. मग अमेरिकेच्या या दोन राष्ट्रपतींचे निर्णय त्यांच्या राष्ट्राच्या हिताचे होते कीं नाहीं याचा काय परामर्ष भावी इतिहास घेईल?
मे महिन्यात असीफ अली ज़रदारी जेंव्हा अमेरिकेला गेले होते तेंव्हा "स्वात" खोरे स्वाहा करून तालीबानी जिहादी सेना इस्लामाबादपासून केवळ १०० किमीवरील बुनेर या शहराजवळ आली होती. तिथपासून डेरा बाबा खान हे शहर (जिथे पाकिस्तानची अण्वस्त्रे ठेवली आहेत असे मानले जाते) अगदी जवळ आहे, त्यामुळे अमेरिकेच्या तंबूत "घबराहट"चा महौल होता व त्याबद्दल हिलरीबाईंनी एक अमेरिकेला वाटणारी काळजी सांगणारे विधानही केले होते. थोडक्यात काय कीं ओबामा जे करत आहेत ते अमेरिकेच्या हिताचे आहे कीं नाहीं हे त्यांनी तपासून पाहिले पाहिजे व ते तसे त्यांना आपल्यासारख्यांनी सांगितले तर त्यात कांहींच चूक नाहीं.
(४) जर ओबामांनी चुकीचे विधान केले तर त्यांची चूक भारताने व भारतीयांनी त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे. मग हे "ध्यानाकर्षण" आपल्या वॉशिंग्टन येथील राजदूतातर्फे असो किंवा आपल्या परराष्ट्रखात्यातर्फे असो किंवा सर्व भारतीयांनी व भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांनी आपलं वैयक्तिक कर्तव्य म्हणून व्यक्तिगत पातळीवरील निषेधपत्रांतून दिलेले असो! माझ्या मते असे "ध्यानाकर्षण" सर्व पातळ्यावर करायला काय हरकत आहे? आपला बुलंद आवाज दुसर्‍याला ऐकू गेला पाहिजे.
फलनिष्पत्तीकडे पहाता आपले परराष्ट्रखाते किंवा राजदूतावास (embassy) फारशी प्रभावी काम करते आहे असे वाटत नाहीं.
असो. वरील सर्व मते माझी वैयक्तिक मते आहेत, थोड्या-फार अभ्यासावर आधारित आहेत. ती सगळ्यांना पटतीलच असे नाहीं व माझा तसा आग्रहही नाहीं. पण हा लेख मी भावनाविवश न होता शक्य तो प्रामाणिकपणे लिहिला आहे एवढेच नमूद करतो.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास-जी,
आपल्या प्रतिसादातील मुद्दे आवडले. त्यापैकी बर्‍याच मुद्द्यांना मी नंदनजींच्या प्रतिसादाला दिलेल्या स्पष्टीकरणात cover केले आहे. एक वेगळा मुद्दा आपल्या प्रतिसादात होता त्याचे स्पष्टीकरण इथे देणाचा प्रयत्न.

भारताने अण्वस्त्रविद्या स्वतःच्या शक्तीवर संपादन केलेली आहे
माझ्या माहितीप्रमाणे भारताने "मुलकी गरजेसाठी (वीज उत्पादन) अणुशक्ती"बद्दल (bombबद्दल नव्हे) रशियाशी व अमेरिकेशी हातमिळवणी केली होती. पण अणूबॉम्ब आपण स्वत:च्या प्रयत्नाने बनवला आहे.
या विषयावर जर कुणी वाचन केले तर त्याच्या असे लक्षात येईल कीं अमेरिकेने पाकिस्तानला अण्वस्त्रे बनवायची विद्याही दिली व अण्वस्त्रांसाठींचा कच्चा मालही चोरून पुरवला जे कुणीही आपल्याला दिलं नाहीं. अशी कित्येक उदाहरणे माझ्या वाचनात आली आहेत कीं वर-वर अगदी निष्पाप प्रोजेक्टच्या नावाने माल आयात करायचा, पण त्या मालाचं ’स्पेसीफिकेशन’ इतकं ’हायटेक’ की तो कुठे वापरला जाणार आहे हे सहज कळावे. यामुळेच रिच बार्लोने हा माल सापळा रचून पकडवला. अशी "सक्रीय" मदत आपल्याला कुणीच केली नाहीं.

केवळ त्या तूलनेत मी म्हणतो कीं कीं आपण आपला bomb आपल्या ताकतीवर बनवला. पाकिस्ताननेही स्वत:चे प्रयत्न केले असतीलही, पण मी आभ्यासलेल्या एका लेखात असे स्पष्ट वाक्य आहे कीं जर रेगन यांच्या ’चांडाळ-चौकडी’ने पाकिस्तानला जी मदत दिली ती जर दिली नसती तर आज पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज राष्ट्र झाले नसते व इराणला व उ.कोरियालाही हे ज्ञान मिळाले नसते.

हे वाक्य Guardian मध्ये "The Man Who Knew Too Much" या २००७ च्या लेखात मी स्वत: वाचलेले आहे. (If he (Barlow) had been listened to, many believe Pakistan might never have got its nuclear bomb; south Asia might not have been pitched into three near-nuclear conflagrations; and the nuclear weapons programmes of Iran, Libya and North Korea - which British and American intelligence now acknowledge were all secretly enabled by Pakistan - would never have got off the ground. "None of this need have happened," Robert Gallucci, special adviser on WMD to both Clinton and George W Bush)

खरे कीं खोटे हा निर्णय आपापल्या विचारशक्तीनुसार घ्यायचा आहे.
असो. वरील सर्व मते माझी वैयक्तिक मते आहेत, थोड्या-फार अभ्यासावर आधारित आहेत. ती सगळ्यांना पटतीलच असे नाहीं व माझा तसा आग्रहही नाहीं.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकासजींचे "हा प्रकार म्हणजे एका बिंदूवरून रेषा कशी असेल हे ठरवण्याचा भाग झाला" हे वाक्य मला खूप आवडले व मी ते यापुढे कधीकधी माझ्या इतर लेखांत वापरणार आहे. परवानगी असावी. आपले मनःपूर्वक आभार.
तसेच सुनीलजींनी माझी एक मोठी चूक (अदितीच्या मते "घोडचूक" and I agree. It was a mega-mistake) माझ्या निदर्शनास आणून दिली याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

पान्डू हवालदार's picture

6 Aug 2009 - 5:17 am | पान्डू हवालदार

काळॅ साहेब
"माझं लिखाण डोक्यावरून गेलं कीं काय अशीही शंका येऊ लागल"
--
डोक्यावरून गेलं :-)

तात्या साहेब
"अहो काळेसाहेब, त्याचं काय आहे की आज बर्‍याचश्या अमेरीकास्थित मिपाकरांना अमेरीकेत राहूनच दोन टायमाची भाकरी मिळते. त्यामुळे अमेरीकेच्या पायाशी त्यांच्या श्रद्धा वाहिलेल्या असणं साहजिक आहे. मग ते बापडे अमेरीकेच्या विरोधात कसं लिहिणार?

(दोन वेळच्या भाकरीकरता अमेरीकेचा मिंधा नसलेला) तात्या."

खरे अमेरीकेचा मिंधा नसलेला असाल तर मी पा चा सेर्वेर कलिफोर्निआ ला का ? :-)