माझ्या "मिसळ-पाव"वरील, त्यातही अमेरिकास्थित, मित्र-मैत्रिणींनो,
कृपया खालील लिंक उघडून माझा ई-सकाळच्या वेब एडिशनवर कालच प्रसिद्ध झालेला ले़ख वाचावा व माझ्या मतांशी सहमती असल्यास 'व्हाईट हाऊस', १६०० पेनसिल्वेनिया अॅव्हेन्यू, वॉशिंग्टन डी. सी. या पत्त्यावर निषेध-पत्रांचा पाऊस पाडावा ही विनंती.
http://beta.esakal.com/2009/07/27113020/pailteer-ajun-kahi-obama.html
आपला,
सुधीर काळे, जकार्ता
====================================================================
नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, अगदी "प्रायमरीज"पासून आजपर्यंत, मी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा निस्सीम चाहाता आणि प्रशंसक आहे व मी त्यांचा प्रशंसक राहूही इच्छितो. त्यांच्या "Change we can believe in" या घोषवाक्याबरहुकूम त्यांची वाटचालही चालू आहे असे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांवरून व त्यांच्या कांहीं विधानांवरून वाटत होते. उदा. "पाकिस्तान ही या जगातली सर्वात जास्त धोकादायक जागा आहे", "यापुढे पाकिस्तानला दिल्या जाणार्या मदतीच विनियोग ज्यासाठी ती दिली गेली आहे त्यासाठीच होत आहे याची कसून तपासणी (audit) केल्यावरच पुढच्या मदतीचे वितरण केले जाईल" अशी विधाने, त्याच्या शपथविधीच्यावेळी मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून त्यांनी दिलेले दोन संदेश "यापुढे अमेरिका मुस्लिम राष्ट्रांशी परस्पर आदर व परस्पर हितसंबंध यावर आधारित संबंध जोडू इच्छिते" व "जर तुम्ही अमेरिकेविरुद्ध उगारण्यासाठी वळलेली मूठ उघडून आपला हात मैत्रीसाठी पुढे केलात, तर तुम्हाला अमेरिकेचा मैत्रीच्या उद्देशाने पुढे केलेला हात दिसेल" किंवा इजिप्तच्या कैरो या राजधानीतून मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून केलेले भाषण यासारख्या त्यांनी घेतलेल्या पावलांमुळे माझे त्यांच्याबद्दलचे कौतुक वाढतच गेले.
पण त्यांचे रशिया-अमेरिका संबंध या विषयावरील त्यांच्या भाषणाच्या वृत्तांतातील "In the short period since the end of the Cold War, we've already seen India, Pakistan and North Korea conduct nuclear tests.” हे विधान वाचल्यावर मात्र ते आता वाट चुकू लागले आहेत कीं काय अशी शंका येऊ लागली आहे.
राष्ट्रपती या नात्याने त्यांना अलीकडचा अण्वस्त्रप्रसार व त्यातील अमेरिकेच्या घोडचुका व त्यानंतरचे त्यांच्या "पित्त्या" राष्ट्राचे (पाकिस्तानचे) विविध "प्रताप" याबद्दलची संपूर्ण व संकीर्ण माहिती नक्कीच दिली गेली असणार, तरीही त्यांनी असे विधान करावे याचे खूपच वैषम्य वाटते. पहिली गोष्ट म्हणजे भारताने अणुविषयक व अण्वस्त्रउत्पादना विषयीची विद्या स्वबळावर मिळविली आहे. ही विद्या भारताला कुणी फुकटची दिलेली नाहीं. याउलट "अमेरिकेचा अफगाणिस्तानच्या युद्धामधला व्युहात्मक साथीदार" म्हणून पाकिस्तानला अमेरिकन कॉग्रेसपुढे असत्य माहिती ठेवून, असत्य विधाने करून व तिची मुद्दाम दिशाभूल करून गुप्तपणे अमेरिकेनेच त्याला १९८५ ते १९९० च्या दरम्यान अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनविले. एवढेच नाहीं तर F-16 जातीची ६० विमाने ती अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतील असे फेरबदल (modifications) करून पाकिस्तानला विकली व असे आम्ही केलेलेच नाहीं अशी पूर्णपणे असत्य विधाने प्रतिनिधीगृहापुढे केली हे काय ओबामांना माहीत नसेल? केवळ अशक्य! मग तरीही ते अशी विधाने कां करत आहेत?
मग वाटू लागले कीं ओबामा खरेच "बदल" करू इच्छित आहेत कीं तो एक "गोंडस" मुखवटा आहे? त्यांच्या अशा बेजबाबदार विधानांवरून तरी वाट चुकताहेत की काय असे वाटू लागले आहे. त्यांनी रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याची चूक अजिबात करू नये.
पाकिस्तानला अमेरिकेने कसे अण्वस्त्रसज्ज केले याची माहिती फारच उदबोधक आहे. (http://www.dawn.com/2007/05/04/top4.htm व http://us.rediff.com/news/report/2009/jun/16/paknuke-us-allowed-pak-to-… या लिंक्स् उघडा)
भारताने (किंवा इस्रायलने) ही अणुविद्या चोरून-छुपून अमेरिकेचेच कट्टर वैरी लिबिया, इराण व उत्तर कोरिया या राष्ट्रांना विकली नाहीं. ते ’सत्कृत्य’ पाकिस्ताननेच त्यांच्या ’बदनाम’ अणुतज्ञ अब्दुल कादिर खानतर्फे केले. मग आज ओबामा भारताला "खाया नहीं, पिया नहीं, खाली ग्लास तोडा, बारा आना" या न्यायाने या नीतीशून्य राष्ट्राच्या पंक्तीला कां बसवताहेत? वर आशियातले पहिले अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असलेल्या इस्रायलचे नांव त्यांनी कां वगळले? ज्यू मतदारांच्या ’मतपेटी’ लक्ष ठेवून? म्हणजे अगदी आपल्या देशातील "सर्वधर्मसमभाव"चा जप करणार्या व "भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर अल्पसंख्यांकांना पहिला अग्रक्रम (priority) आहे" असे खोटे-खोटे नारे देणर्या कॉंग्रेस पक्षाच्या व लालू, मुलायम, रामविलाससारखे इतर पक्षांतील नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून. मग ओबामा "वेगळे" कसे?
रेगन, बुश-४१ व त्यांच्या चांडाळ चौकडीने पाकिस्तानला १९९० आधीच अण्वस्त्रसज्ज केले, तर भारताने आपले ५ अण्वस्त्र चांचणी-स्फोट १९९८ मध्ये केले होते. हे याय ओबामांना माहीत नाहीं?
ओबामांनी हे विधान करून भारताच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखीच निर्माण केली आहे. कीं हे विधान त्यांनी केवळ अनवधानाने केले आहे?
मी इथले दैनिक "जकार्ता पोस्ट" व भारतातले गोव्याहून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक "Navhind Times" या दोन वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली व ओबामांचे कौतुक करणारी बरीच पत्रे ओबामांना त्यांच्या व्हाईट हाऊस"च्या (१६०० पेन्सिल्वेनिया ऍव्हेन्यू, वॉशिंग्टन डी.सी.) या पत्त्यावर पाठविली होती, त्यामुळे असेल, पण आज माझे नाव व ई-मेल आय्.डी. ओबामांच्या "शासकीय" यादीत घातले गेलेले आहे. त्यामुळे त्यांची माहितीपर प्रकाशने मला वेळोवेळी येत असतात. त्यातल्याच एका निरोपाचे "reply" बटन दाबून मी माझे निषेधपर पत्र त्यांना व त्यांचा प्रमुख सल्लागार डेव्हिड एक्सलरॉडला (David Axlerod) यांना लिहिलेला आहे. ओबामांना ते वाचायला वेळ कुठला? पण एक्सलरॉड तरी वाचातील व ओबामांना योग्यसा सल्ला देतील अशी आशा करू या.
जास्तीत जास्त भारतीयांनी, त्यातल्या त्यात अमेरिकास्थित भारतीयांनी ओबामांवर अशा तर्हेच्या निषेधपत्रांचा "पाऊस" पाडला पाहिजे!
ओबामा कांहींही बोलोत किंवा करोत, भारत अभिमानाने आपली प्रगती करतच राहील व अमेरिकेच्या दुटप्पी धोरणात नक्कीच सहभागी होणार नाही. अमेरिकेने दोस्ती केली तर "सह" व नाहीं केली तर "शिवाय" हेच आपले धोरण राहील व त्या नात्याने भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज नाहीं. अमेरिकेला मात्र चीनचा काटा काढायला भारताची गरज आहे व ती वाढतच जाणार आहे. अशा वेळी पाकिस्तानचा जसा दुरुपयोग अफगाणिस्तानच्या युद्धासाठी करून घेतला गेला तसा भारताचा दुरुपयोग चीनशी परस्पर लढविण्यात अमेरिकेला करून घेऊ देऊ नये याबद्दल भारताने सतर्क रहावे हेच भारताच्या हिताचे आहे.
- सुधीर काळे, जकार्ता
वाचने
14277
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओबामांच्या विधानांबाबत एक नवा विचार
काळे
तात्यासाहेबांना विनंती
In reply to काळे by विसोबा खेचर
हो, न॑क्की..
In reply to तात्यासाहेबांना विनंती by सुधीर काळे
तात्यासाह
काळे साहेब
In reply to तात्यासाह by सुधीर काळे
लिहित राहा....!
In reply to तात्यासाह by सुधीर काळे
चक्क
In reply to तात्यासाह by सुधीर काळे
<<<ओबामाने
प्रआटाका
खरे खलनायक होते चेनी, वुल्फोवित्झ, लिबी व रम्सफील्ड
प्रतिसाद दिला नाही
तसे नाहीं.
पाकिस्तान
अरे बापरे
अरे बापरे
CIA व Pentagon या "हिंस्त्र श्वापदां"ना टप्पू?
याचा अर्थ काय ?
In reply to CIA व Pentagon या "हिंस्त्र श्वापदां"ना टप्पू? by सुधीर काळे
+१
In reply to याचा अर्थ काय ? by मिसळभोक्ता
http://tinyurl.com/nkb4cf
शंका
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर
In reply to शंका by नंदन
अतिशय
In reply to सुंदर by घाटावरचे भट
संकेतस्थळ
In reply to अतिशय by विसोबा खेचर
(अल्पसंख्य
In reply to शंका by नंदन
असेच
In reply to (अल्पसंख्य by विसोबा खेचर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उगाच?
कांहीं भाग
- शीतयुद्ध संपायच्या आधीच (१९९० च्याही आधी) पाकिस्तानला अमेरेकेनेच अण्वस्त्रसज्ज केले असताना त्यांनी शीतयुद्ध संपल्यापासून ज्यांनी स्फोट केले त्यात पाकिस्तानचे नांव कां घातले? ते अण्वस्त्रसज्ज आधीच झाले होते! मग ही मखलाशी स्वतःच्या (अमेरिकेच्या) पापांवर पांघरूण घालण्यासाठी?
- दुसरी चूक म्हणजे ते रशियात अण्वस्त्रप्रसारावर कसा आळा घातला पाहिजे या विषयावर बोलत होते, मग त्यात अगदी सक्रीयतेने भाग घेऊन लिबिया, इराण व उत्तर कोरियाला ही विद्या "विकणार्या" पाकिस्तानला आपल्या पंक्तीत कां बसवले?
पण मला अजूनही वाटते कीं ही चपराक त्यांनी डिक चेनींना मारली असावी जे रेगनच्याकाळी Secretary of Defense होते व या दुष्कृत्यात त्यांनी सक्रीयपणे भाग घेतला होता व आता ते ओबामांवर तोंडसुखही घेत आहेत. कांहींही असो, पण आपली 'मोट' त्यांनी पाकिस्तानबरोबर बांधायला नको होती. आपल्याबरोबर जो अण्वस्त्रकरार अमेरिकेने केला त्यात त्यांचा स्वार्थ जास्त होता, कारण त्यांना चीनबरोबर भिडवायला कुणीतरी भोळासांब "बकरा" हवा आहे व आपण तो बकरा होण्याची शक्यता आहे! म्हणूनच सावधान. पं नेहरूंनी नासेर व मार्शल टीटो यांच्याबरोबर अलिप्ततावादाचा शुभारंभ केला! त्याबाबतचा युक्तिवाद होता कीं असे केल्याने आपल्याला दोन्ही बाजूने मदत/दुजोरा मिळेल, पण झाले काय? पाकिस्तानने दोन्ही गोटात प्रवेश करून आज तो दोन्ही हातांनी मदत ओरपत आहे. असो, हे विषयांतर झाले. मतभेद आहेत म्हणून अभिप्राय देणे थांबवू नका. कारण अशा विचारांच्या देवाण-घेवाणीने माझ्या विचारशक्तीत प्रगल्भता येते. सुधीर काळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.किंचित चूक
In reply to कांहीं भाग by सुधीर काळे
अण्वस्त्रे
In reply to कांहीं भाग by सुधीर काळे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
माझी प्रतिक्रीया
- हे आपले विधान अर्धसत्य आहे. सर्वप्रथम भारताची प्रथम अणूचाचणी ही ७४ साली इंदिरा गांधींच्या काळात झाली होती. त्याकाळात आपण रशियाच्या जवळ होतो आणि शितयुद्ध चालू होते. अणुचाचणी आणि अण्वस्त्रे तयार करताना लागणार्या प्राथमिक सामुग्रीसाठी तसेच मुलभूत तंत्रज्ञान (जंपस्टार्टसाठी) आपल्याला ज्यांच्याकडे अणुशक्ती विकसीत झाली आहे अशांची गरज होती आणि तशी ती रशियाने दिली असे म्हणायला नक्की जागा आहे. तसेच अमेरिकेने पण आपल्याला काही रीअॅक्टर्स बांधायला मदत केली होती. असे म्हणताना आपल्या संशोधंकांचे योगदान अजिबात कमी होत नाही. फक्त आपल्या वरील विधानासंदर्भातील अर्धसत्यता जाणवते इतकेच म्हणायचे आहे.
- दुसरा भाग पाकीस्तानला अथवा इतर कुणालाही कोणी काही "चकटफू" देत नसते. आंतर्राष्ट्रीय राजकारणातील देवाणघेवाण ही राष्ट्राराष्ट्रांमधील चलनांच्या आणि क्रेडीटच्या द्वारे होण्यापेक्षा तडजोड आणि शिरजोरीवर होत असते. उ.दा.: पाकीस्तानला आपल्या म्हणण्याप्रमाणे जशी अमेरिकेने मदत केली तशीच चीनने देखील केली आणि त्या बदल्यात काश्मीरचा एक लचका तोडला. अमेरिकेने काय त्याला पुर्ण अंकीत राष्ट्रच केले आहे.
आता इस्रायल संदर्भातः वर नंतर आलेले आहेच पण इस्त्रायलने कधीच जाहीर अणूचाचणी केलेली नाही त्यामुळे ते (पहीले पाच सोडल्यास) भारत, पाकीस्तान आणि उ. कोरीया प्रमाणे अणुचाचणी केलेल्या देशांच्या पंगतीत बसत नाहीत. जसे इस्त्रायलचे आहे तसेच इराणचे पण आहे. मला त्या वाक्यात आपल्याला वाटले तसे गैर वाटले का? अजिबात नाही. एकतर त्यात नुसती शितयुद्धानंतर अणुचाचणी केलेल्या राष्ट्रांची नावे आहेत. त्यांनी त्यांना (आणि मुख्य म्हणजे त्यात भारताला गोवून) Axis of Evil म्हणलेले नाही. त्यांचा मुद्दा वरकरणी कशा संदर्भात होता: तर, 'अणुशक्ती म्हणून (आणि एकंदरीतच) जागतिक स्तरावरील बलाढ्य (दादागिरी करणारी) जी राष्ट्रे आहेत त्यांना एक आणि इतरांना एक अशी वागणूक मिळण्याचे दिवस गेलेत त्यामुळे आपल्याला पण (म्हणजे अमेरिका-रशियास) अण्वस्त्रेकपात वाढवायची गरज आहे' वगैरे... त्यातील गर्भित हेतू हा रशियाचे बळ नियंत्रीत ठेवण्याचा प्रयत्न करणे हा देखील होता. पण तो अमेरिका-रशिया संदर्भातील मुद्दा आहे. रशिया निषेध पत्र अथवा फाट्यावर मारतो वगैरे म्हणण्यात वेळ घालवत नाही. त्यांना जे काही करायचे असते ते, ते करतात. इंग्रजीत अशा वागण्यासंदर्भात एक छान मजेशीर वाक्य आहे. रशिया आणि इतर अनेक असेच वागतात: I think you are confusing me with someone who gave you a damn! चीन पण तेच करत आहे. याचा अर्थ मला असे वाटते का की ओबामा निषेध करण्यासारखे काहीच बोललेले नाहीत? त्यासंदर्भात काळेसाहेबांना लिहायचेच असेल तर त्यांनी वास्तवीक "Say no to Bangalore, yes to Buffalo: Obama" ह्या त्यांच्या आउटसोअर्सिंग विरोधी आणि जास्त कर लादण्याच्या प्रस्तावाविरुद्ध लिहायला हवे. कारण ते नुसतेच भारतविरोधी नाही आहे तर ते मुक्तअर्थव्यवस्थेच्या विरोधातपण आहे ज्याची (मुक्तअर्थव्यवस्थेची) अपेक्षा अमेरिका इतर राष्ट्रांकडून करत असते. थोडक्यात दुटप्पीपणा...चीनने याला शांतपणे आत्ताच सौरउर्जा उद्योगांच्या बाबतीत उत्तर दिले - तसाच protectionism आणून, अमेरिकेसच नाही तर तसेच वागणार्या पण अमेरिकेमुळे तितकेसे प्रकाशात न येणार्या युरोपला पण... सारांश: हा लेख हा भावनाविवशतेने लिहीलेला वाटला ज्यात अनाठायी टिका केलेली आहे. बाकी इंग्रजीत एक चांगले वाक्य आहे, त्याचे मराठीकरणः "आंतर्राष्ट्रीय राजकारणात कोणी मित्र नसते आणि कोणी शत्रू नसते, असतात ते फक्त राजनैतिक संबंध". हे लक्षात ठेवून जेंव्हा/जितके आपण (राष्ट्र म्हणून) वागू तितके आपण "विश्वात शोभुनी" राहो या इच्छेच्या जवळ जाऊ. - कुणाचा द्वेष्टा नसलेला (अर्थात द्वेष न करणारा) विकास :-)बराक गोर्बाश्चेव्ह
In reply to माझी प्रतिक्रीया by विकास
शक्य आहे...
In reply to बराक गोर्बाश्चेव्ह by एकलव्य
२००८च्या
का?
In reply to २००८च्या by सुधीर काळे
"A ton of bricks"
पाकीस्तान आणि अणूचाचणी
In reply to "A ton of bricks" by सुधीर काळे
आधी प्रतिसाद दिला नाही कारण
माझी दोन जुनी (पूर्वप्रकाशित) पत्रें
श्री. नंदनसाहेबांनी उपस्थित केलेले मुद्दे
श्री. विकाससाहेबांनी उपस्थित केलेले मुद्दे
श्री. विकाससाहेब व श्री सुनीलसाहेबांचा एक तगडा मुद्दा
काळॅ