वास्तविकता आणि भ्रम

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
11 Jun 2009 - 8:43 am

" त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला जर नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"

सुमतीची परिस्थिती बघून मला कवी सुरेश भट्ट यांची आठवण आली.त्यांच्या पायाला पोलिओ झाला होता.सुरेश भट्टाना त्याबद्दल खूप खंत व्हायची. अगदी लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांना उस्फुर्त विषय देऊन बोलायला सांगितलं होतं. विषय होता,
"देवाने मला परत जन्म दिला तर!"
भट्टानी पहिलच वाक्य सांगितलं,
"मी देवाला सांगेन,देवा मला असा अपंग करू नकोस"
आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते.
भटांचे वडिल डॉक्टर होत आणि आई एक प्रसिद्ध समाजकार्यकरती होती.

भटांच्या कविता वाचल्या तर बरेच वेळा त्यांच्या मनातलं उदासिनतेचं प्रतिबिंब दिसून यायचं.
असंच उदाहरण एका प्रसिद्ध मराठी संगित दिग्दर्शकाचं आहे.
सर्व काही मनासारखं असून केवळ अपंगत्वामुळे त्यांना नेहमी मायुसी येत राहते.
पण म्हणून ह्या दोन्ही व्यक्ति खंत करित राहिल्या नाहीत.एकाने कवितेची आणि साहित्याची भरपूर सेवा केली.आणि मनाला भावतील अश्या कविता लिहिल्या. तर दुसर्‍यानी अतिशय मोहक चाली देऊन गाणी ऐकण्याजोगी केली.
त्या दिवशी मी जेव्हा सुमतीला खूप दिवसानी भेटलो तेव्हा ह्या सर्व आठवणी फ्लॅशबॅक कशा माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.
मी सुमतीला ह्या दोन व्यक्तिंची जी मला माहिती होती ती देत गेलो.ती निमूट सर्व ऐकत होती.नंतर मला म्हणाली,

"मला लहानपणीच पोलिओ झाला होता.मी त्यावेळी सहा वर्षाची असेन.मला अजून आठवतं की माझ्या पहिल्या इयत्तेतल्या त्या शाळकरी मैत्रीणी कडून दिले गेलेले आणि लक्षात ठेवण्याजोगे कटाक्ष आणि ते पहात असताना माझ्या चालताना येणार्‍या टोचर्‍या वेदना मला मसमुसून रडूं आणायच्या.माझ्या लक्षात आलं होतं की कुणालाही स्वतःमधे निमग्न असलेली रडकुंडी बेबी आवडत नसावी.

परंतु, तसं असलं तरी मला असं कधीच अनुचीत वाटलं नाही की माझ्या इतर शाळकरी मैत्रीणीना औषध घ्यावं लागत नाही, शारिरीक उपचार करावे लागत नाहीत,रक्त तपासावं लागत नाही,आणि कधी कधी इंजक्षन पण घ्यावं लागत नाही.मला ते जीवंत रहाण्यासाठी करावं लागत होतं,आणि त्या बालवयात मी ताडलं की ही वास्तविकता मला खाली ओढत नव्हती तर उलट उंचीवर नेत होती.

मला असं वाटतं की वास्तविकता ही भ्रमापेक्षा जास्त पसंत करण्याजोगी बाब आहे. सत्य मला जेव्हडं लवकर कळेल तेव्हडं लवकर त्याच्याशी मी अनुरूप होईन.वास्तविकता निवडल्याने मी कधी कटु बनले नाही किंवा दोषदर्षी बनले नाही. उलटपक्षी माझ्या लक्षात आलंय की वास्तविकतेचा अगदी पराकोटीचा घृणा येईल असा अनुभव घेतल्यावरही खर्‍या सुंदरतेला मी समजू लागले आहे.

मला आठवतं ज्यावेळी मला वाकून काही करता येत नव्हतं तेव्हा माझी आई मला मदत करायची.पण हळू हळू माझ्या लक्षात आलं की माझी आई मला जन्माला पुरवलेली नाही.म्हणून माझी मीच प्रयत्न करायचे.अनेकवेळा सकाळच्या वेळी माझे मला कपडे चढवायला कष्ट व्हायचे.माझ्या मीच मला म्हणायचे,
"हे काय खरं नाही."
दमून दमून कोंडमारा झाल्यावर शेवटी हे काम संपायचं.
माझ्या आयुष्यात आलेला एक उत्तम धडा मी शिकले.सत्य लपवणं काही बरं नाही-ह्या माझ्या कधीही बर्‍या न होणार्‍या व्याधी बाबत-जे दुःख माझ्या भाग्यात आलं आहे त्यापासून फक्त जेव्हडं मला जमेल तेव्हडं मी करावं.

नक्कीच,माझी टिंगल-मस्करी झाल्यावर मला वाईट वाटायचं.माझ्या काही मैत्रीणी माझी चालण्याची नक्कल करीत असताना मी त्यांना पाहिलं आहे. माझ्या पहिल्याच जॉबच्यावेळी माझ्या मागे माझा बॉस कुणाला सांगताना माझा "लंगडी" असा संदर्भ द्यायचा,ते माझ्या मनाला लागायचं. मला वाटत नाही की मला त्याने कमी सुरक्षित वाटायचं.किंवा मला कमी निश्चिंत वाटायचं. फक्त मला नवल वाटायचं की लोक किती संवेदनाश्यून्य असावेत.मला हळू हळू लक्षात यायला लागलं होतं की,स्वतःमधे निमग्न असणं ही अगदी सामान्य बाब आहे. आणि वर मी मनात म्हणायचे ते जर सामान्य नसलं तरी मला त्याचं काही देणं घेणं नाही.

मी सोळा वर्षाची असताना एका पावाच्या बेकरीत पुढल्या भागात विकण्यासाठी रचून ठेवलेल्या पाव-केक-बिस्किटाच्या दुकानात काम करायचे.एक बाई आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी केक विकत घ्यायला आली असताना रडत होती.ते लहान मुल एका उंच जागी चढून खाली पडलं होतं आणि गंभिर स्थितीत हॉस्पिटलात होतं.आपल्याच मुलांची ह्या लोकाना काळजी कशी घेता येत नाही? आणि मग त्या दुर्घटनेच्या दुःखाने ह्याना वेदना कश्या सहन होतात? असा मला
प्रश्न पडला होता. आणि रडूं ही आलं होतं.

आज मी मलाच विचारते,
"त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"
ह्यातूनच माझा दुसरा महत्वाचा धडा मी शिकले तो म्हणजे एक, त्या वेदना होणं,दुसरं,त्याला मिळणारा माझाच प्रतिसाद, आणि शेवटी इतराना होणारी वेदना पाहून मला रडूं येई त्याबद्दल मनात बसलेली माझी पक्की समज,अश्या ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यावर मी माणूस म्हणून मला दैविकतेचा, पावित्र्याचा, आणि त्या शाश्वततेचा आभास होत राहिला,आणि मी त्यातून एक परिभाषा शिकले."
मी सुमतीला विचारलं,
"ह्या अलंकारिक शब्दांचा मी अर्थ तरी काय काढावा?"
ती म्हणाली,
"सोप्यात सोपं म्हणजे दैविक संकेत मनात बाळगावा की माझ्यासाठी मी जेव्हडं करते तेव्हडंच दुसर्‍याबद्दल मी परवा ठेऊन करावं.
दोन दिवसापूर्वी माझे पती सहा महिन्याच्या टूरवर दक्षिणेत नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गेले आहेत.ते पोलिसात आहेत.माझ्या मनातली पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझ्यासाठी मी दुःखी झाले.दुसरी प्रतिक्रिया म्हणजे मी माझ्याशीच प्रातार्णा करू लागले की सर्व काही ठीक होणार आहे.ते नक्कीच सुरक्षीत घरी येणार आहेत.पण मला सत्य परिस्थितीशी सामना करण्याविना गत्यंतर नाही.एकतर मी विधवा होईन किंवा,देवावर विश्वास ठेवून माझ्या मनात तरी स्फोट होऊ देणार नाही.
त्यामुळे आता मी एकटीच घरी असल्याने माझे शेजारी,माझे सहकारी आणि माझे मित्रगण मला बरं वाटावं म्हणून झटत आहेत.
मग मला निराशजनक होऊन कसं चालेल?"

"आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन वास्तविकता नजरे आड न करता उगाचच भ्रमात राहून जीवन कसं जगू नये हे तुझ्या कडून ऐकून आणि कवी सुरेश भटांचं उदाहरण पाहून मला तरी वाटायला लागलं आहे की तुम्ही सर्व ग्रेट आहात."
असं म्हणून मी सुमतीची पाठ थोपटली.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

आनंद घारे's picture

11 Jun 2009 - 9:05 am | आनंद घारे

परिस्थितीकडे पाठ फिरवल्याने ती बदलत नाही, तिचा निर्धारपूर्वक सामना करणेच इष्ट असते हे चांगले पटवून दिले आहे.
सुमती आणि पावाची बेकरी हे किंचित विचित्र वाटले.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/