(पहिल्या लेखाला आलेल्या भरभरून प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय :))
....
उन्हाचि शेवटची तिरिप आता गढी च्या पुढील दरवाज्यापाशी होती. मंदा शिरीषच्या निर्जीव कलेवरावर डोक टेकवून धाय मोकलून रडत होती. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. अजिंक्य कसबसा पायतले त्राण गोळा करून इतर सर्वांना म्हणाला "आजची रात्र आपल्याला इथेच काढण्याशिवाय पर्याय नाही. उद्या सकाळपर्यंत आपण तग धरून ठेवला तरच शिरीष चे आपण योग्य ते अंतिम संस्कार करू शकू"
... पुढे
अजिंक्य आणि राधानी पुढचा दरवाजा सुरक्षित करून पहारा द्यायचे ठरवले. पंकज आणि मधुमिता मागच्या बुरुजावरून जंगलावर लक्ष ठेवणार होते. शार्दूल आणि अमित ने तळघराची तपासणी करायचे ठरवले. म्हाद्या तर पार सटपटला होता. पण पूर्ण रात्र इथे काढायची म्हणल्यावर अंगात ताकद असणे आवश्यक होते. अजिंक्य ने त्याला काहीतरी खायची व्यवस्था करायला सांगितली. म्हाद्या "जी धाकल धनी" म्हणून स्वयंपाक घराकडे पळाला. त्याला तिकडे फारशी कुरकुर न करता जाण्याचे अजुन एक कारण म्हणजे स्वयंपाक घराच्या समोरच देवघर होते. देवघर कसले म्हणा..देवघराचे अवशेष म्हणणे जास्त योग्य ठरेल...बुडत्याला काडीचा आधार!!
आबांचे म्हणणे न ऐकल्याबद्दल आता सर्वांना पश्चाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. वाडीच्या वाटेवर जर का त्या संन्याशानि तो पवित्र अंगारा जबरदस्ती घ्यायला लावला नसता तर काय झाले असते या कल्पनेनेच राधाचा थरकाप उडत होता. अजिंक्य आणि राधानी मिळून थोडा अंगारा पुढच्या दरवाज्यासमोर शिंपडला. निदान यामुळे तरी 'ते' पुढच्या दरवज्यातुन यायला अटकाव होणार होता. तरीदेखील अजिंक्यनी बंद दरवाज्यावर आतून लाकडी फळ्या आडव्या ठोकून तो घट्ट बंद करायचे ठरवले. राधानी पुन्हा एकदा पर्स मधून मोबाइल काढला. पण पुन्हा पुन्हा चेक करत राहिल्यानी रेंज येईल ही भाबडी आशा परत एकदा फोलच ठरली.
पंकज आणि मधुमिता मागील बुरुजावर पोहोचले. पंकजने बंद खिडकिच्या तावदानातून मागील जंगलावर नजर टाकली. मधुमिता भिन्तिवर रेलून शून्यात बघत होती. एकाएकी तिचा बांध फुटला आणि ती ओक्साबोक्षी रडायला लागली. पंकज क्षणभर बावचळला. काय करावे हे त्याला सुचेना. तो तिच्याजवळ गेला आणि काहीतरी धीराचे शब्द आठवू लागला. मधुने तो आल्याचे जाणवून मान वर करून त्याच्या डोळ्यात बघितले. त्याचा तो कसानुसा झालेला चेहरा, तिच्याबदद्ल वाटणारी काळजी पुरेपूर दाखवून देत होता. मधुने त्याला अचानक घट्ट मिठी मारली. तिच्या या अशा जवळकीनी पंकज संकोचला...आणि सुखवला पण. काय बोलायचे ते काहीच न सूचून तो तिला खांद्यावर थापटत राहिला. पाच एक मिनिटांतर मधु भानावर आली आणि त्याही परिस्थिती लाजून बाजूला झाली. पंकज अचानक घडाघडा बोलू लागला..
"मधु, तू मला दोनदा नकार दिलास...पण मला नेहमी तुझ्या जिभेवर एक आणि डोळ्यात वेगळच दिसायच. मला माहीत नाही की यानन्तर मी तुला परत प्रपोज़ करू शकीन की नाही. पण माझे तुझ्यावर अजूनही जिवापाड प्रेम आहे आणि सदैव राहील."
इतके बोलून तो मागील दरवाजा सुरक्षित करायला गोलाकार जिन्यावरून खाली निघाला. मधुने चपळाईने पुढे जाउन त्याचा हात पकडला, स्वत: कडे खेचून घेत ती म्हणाली "आय लव यू टू", आणि त्याच्या मिठीत जाउन विसावली. पंकज चा तर क्षणभर कानावर विश्वासच बसेना. त्याने मधु कडे बघितल तर ती खालचा ओठ दाबून तिची नेहमीची खट्याळ स्माइल देत होती. हीच ती स्माइल ज्यानी त्याला पुरता पागल केल होत. क्षणभर दोघे जण सारे काही विसरले. ती गढी..ते जंगल...शिरीष...आणि .. आणि 'ते'. अचानक मधुमितला बुरूजाच्या खिडकीतून मागील दरवाज्यापाशी काहीतरी दिसले आणि ती एकदूम दूर झाली. पंकज तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला.
"पंकज..मी आता काहीतरी दरवाज्यापाशी बघितले."
कसाबसा आवन्ढा गिळून मधु म्हणाली.
दोघांनाही एका भेसूर भयाने ग्रासून टाकले. जिन्यावरून उड्या टाकत ते खाली दरवाज्यापाशी पोहोचले. दरवाजा थोडा उघडा होता हे पाहून मधुची पाचावर धारण बसली.
"अग, घाबरू नकोस..राहिला असेल दरवाजा चुकून उघडा".
उसने अवसान आणत तो म्हणाला. तो बाहेर गेला आणि अन्गार्यची पुडी उघडायला लागला...मात्र त्याच क्षणी जंगलातून भेसूरवाण्या कींकाळ्या ऐकू येऊ लागल्या. पूर्ण परिसर त्या कींकाळ्यान्नी भरून गेला.
एवढ्यात तळघरातून "वाचवा..." अशी काळजाला चीर पाडणारी आर्त हाक ऐकू आली...
(क्रमश:)
प्रतिक्रिया
10 Jun 2009 - 3:36 pm | हर्षद आनंदी
संदर्भच लागत नाही
10 Jun 2009 - 10:15 pm | गोगोल
...
10 Jun 2009 - 3:46 pm | सुर
पहिला भाग शोधुन दमले. #:S
सुर तेच छेडीता......
:) Waiting For Good Luck To Come In My Life :)
10 Jun 2009 - 3:58 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो पहिला भाग कुठे आहे? इथे पण शोधलं... http://www.misalpav.com/newtracker/2967
का 'पहिला भाग शोधा' हीच मिस्टरी आहे? ;)
बिपिन कार्यकर्ते
10 Jun 2009 - 10:10 pm | गोगोल
हा/ही भाग/कथा सर्व घासून गुळगुळीत झालेले क्लीषे शब्द (जसे की 'कुबट', 'दुर्गंधी', 'आत्मा', 'गुढ', 'साधना','भगवा', 'स्वामी' , 'मंत्र', 'पिशाच्च', 'अनुभुति' etc etc) आणि कल्पना वापरणार्या सर्व भय/चमत्कार/बाबा/बुवा/बाई कथांना अर्पण!!
sigh...प्रियाली ताई तुम कहा हो???
10 Jun 2009 - 4:02 pm | आरती
आधीच्या भागाचा दुवा टाका बुवा.
10 Jun 2009 - 10:15 pm | अनिल हटेला
पू भा प्र....................:)
(भुताटकीचा सीजन आहे वाटतं)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
10 Jun 2009 - 10:18 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे बाबा... पू भा प्र नाही प भा प्र. ;)
बिपिन कार्यकर्ते
10 Jun 2009 - 10:20 pm | गोगोल
म्हणजे काय?
10 Jun 2009 - 10:25 pm | बिपिन कार्यकर्ते
पहिल्या भागाच्या प्रतिक्षेत!!!
बिपिन कार्यकर्ते
10 Jun 2009 - 10:40 pm | गोगोल
बिपीन आणि अनिल....आभारी आहे.
वाट पहा पुढच्या मागच्या भागांची :)
10 Jun 2009 - 11:14 pm | मस्त कलंदर
बिका होम्स!!! ;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
10 Jun 2009 - 10:31 pm | दिपाली पाटिल
मला वाटलं , मला च दिसत नाही आहे की काय पहिला भाग...
दिपाली :)
10 Jun 2009 - 11:17 pm | गोगोल
या कथेला ना पहिला भाग आहे ना यानंतर कुठला भाग.
हा भाग मी का लिहिला ते बिपीन कार्यकर्ते यांना दिलेल्या प्रतिसादात स्पष्ट केला आहे :)
दीपाली, आरती, सूर, हर्षद आनंदी, अनिल आणि बिपीन .. पहिला भाग शोधायला लावल्याबद्दल क्षमस्व
11 Jun 2009 - 12:17 pm | ऍडीजोशी (not verified)
ही काय फालतुगिरी आहे?
11 Jun 2009 - 1:00 pm | हर्षद आनंदी
मिसळपाव वर लेख, कथा टाकणारे आणि ते वाचून त्यांना प्रतिसाद देणारे मुर्ख आहेत, असे गोगोल यांना सुचवायचे आहे असे वाटते.
मिसळपाव किंवा तत्सम मराठी वेबसाईटवर देशी - विदेशी असणारे आपले बांधव एकत्र येतात, ४ घटका निव्वळ मनोरंजन होते, विचारांची - अनुभवांची देवाण घेवाण होते असे असताना असे लेख टाकुन मजा घेणे म्हणजे कुत्सित, हीन मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे.
नंतर माफी मागणे हा आधी लाथ मारतो मग माफी मागतो यातला प्रकार झाला.
संपादकांनी यात कृपया लक्ष घालावे.
11 Jun 2009 - 1:07 pm | गोगोल
मला अस काहीही सुचवायचे नाहीये. थोडी विनोदबुद्धी असु द्यात की.
आणि ऍडी भाऊ, लोकांना मामा बनवायचा धंदा फक्त तुम्हीच करायचा का?
आणि आम्ही केला की लगेच फालतुगिरी?
11 Jun 2009 - 1:35 pm | ऍडीजोशी (not verified)
मी स्वत: च्या आनंदासाठी लोकांचा वेळ कधिही वाया घालवला नाहिये.
जर तुम्हाला तसल्या लेखांचं विडंबन / चेष्टा करायची होती तर लेखाचं नाव () मधे टाकलं असतं तर आम्ही त्या दॄष्टीने लेख वाचला असता.
भाग १ शोधण्यासाठी किती वेळ वाया घालवला लोकांनी. हेच अपेक्षीत होतं का? अख्खं वाचून झाल्यावर कळलं की हा फालतू प्रकार तुम्हाला त्या प्रकारच्या कथा वाचून कंटाळा आल्याने केला आहे. लोकांचा वेळ असा वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधिकार नाही.
लेखन स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करणे अतीशय चुकिचे आहे.
11 Jun 2009 - 2:14 pm | हर्षद आनंदी
हा प्रकार काय आहे, याची अंमळ माहीती घ्या जाणकारां कडुन ....
दुसर्या व्यक्तिला त्रास होताना पाहुन तुम्हाला हसु येत असेल तर तुम्हाला मानसोपचाराची नितांत गरज आहे असे वाटते.
11 Jun 2009 - 2:32 pm | ऍडीजोशी (not verified)
मला अस काहीही सुचवायचे नाहीये. थोडी विनोदबुद्धी असु द्यात की.
असं काही सुचवायचं नसेल तर मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय हे वाक्य काय गोवर्या छापायला लिहिलंत? लोकांना उल्लू बनवण्याचाच हा प्रकार आहे.
11 Jun 2009 - 1:17 pm | बट्ट्याबोळ
एक नंबर !!
गोगोल , गड्या, एक नंबर.
मस्त खेचलीस लोकांची. पण एकदा खेचल्यावर माफी कशाला मागायची? चालू द्यायच. लोकांना चिडून द्यायचं !
लेख मात्र मी वाचला नाही ... बोरिंग वाटतोय पहाताक्शणी. :)
11 Jun 2009 - 1:28 pm | गोगोल
काल रात्री खूप बोअर झालो होतो...आणि त्याच त्याच भय आणि चमत्कार कथा वाचून कन्टाळा आला होता...म्हणून झोपायच्या आधी जे काही टिपिकल भय कथा शब्द मिळतील ते घेउन एका तासात हे खरडून काढल.
11 Jun 2009 - 2:27 pm | हर्षद आनंदी
अगदी नावाला साजेशी प्रतिक्रीया
"लिहिता - वाचता आले म्हणजे सुशिक्षित" हे किती चुकिचे आहे हे तुम्ही सप्रमाण सिध्द केलेत.
मिपावर कुणी काय लिहावे व कुणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी हळदी-कुंकु घेऊन आमंत्रण दिलेले नाही की आमचे लेख, कथा वाचा म्हणुन!
तुम्हाला कंटाळा म्हणुन दुसर्याला त्रास देणारे उद्योग करणार्याचे समर्थन करीत आहात, हा शुध्द असंस्कृतपणा आहे.
संपादक, झोपला नसाल अशी माफक अपेक्षा ..... बघा जमले तर लक्ष घाला आणि हालचाल करा....
11 Jun 2009 - 9:38 pm | गोगोल
ओके मी एक प्रॅंक खेळला .. आणि मेबी तो थोड्या फार प्रमाणात यशस्वी किंवा अयशस्वी झाला. आता यात इतके काय वाईट वाटून घ्यायचे?
@ऍडीजोशी:
> जर तुम्हाला तसल्या लेखांचं विडंबन / चेष्टा करायची होती तर लेखाचं नाव () मधे टाकलं असतं तर
> आम्ही त्या दॄष्टीने लेख वाचला असता.
मी वर म्हणल्याप्रमाणे हा प्रॅंक असल्याने मी मुद्दाम तसे लिहिले नाही...मग अर्थ काय उरला असता?
> भाग १ शोधण्यासाठी किती वेळ वाया घालवला लोकांनी. हेच अपेक्षीत होतं का? अख्खं वाचून झाल्यावर > कळलं की हा फालतू प्रकार तुम्हाला त्या प्रकारच्या कथा वाचून कंटाळा आल्याने केला आहे. लोकांचा > वेळ असा वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधिकार नाही.
- लेख उघडणे (मनात विचार करत .. च्यायला हे कोणी काय लिहिलाय..ह्याला तर बाबा कधी काही लिहिताना पहिला नव्हता): 5 सेकंद.
- लेख उघडल्यावर (आयला भाग 2 दिसतोय...आजकाल भाग मिपावर यायला जमत नाही...आता भाग 1 शोधणे आले): 2 सेकंद.
- भाग 1 शोधला (पहिले वाटचाल मधून आणि मग तिथे नाही मिळाल्यावर चीड चीड करत भाग 2 वाचणे) : 40-50 सेकंद.
- (आयला फालतू दिसतो .. बरा बकरा मिळाला... आता घेतो याची कॉमेंट्स मध्ये...पण नको...आधी भाग एक वाचू) भाग एक टाकण्या बद्दल कॉमेंट लिहीणे: 10 सेकंद.
टोटल ~ 1 मिनिट
आता एक मिनिट पण नसेल तर काय बोलणार .. मिपावर येताय हेच खूप..
> हे वाक्य काय गोवर्या छापायला लिहिलंत? लोकांना उल्लू बनवण्याचाच हा प्रकार आहे.
हो.
>मी स्वत: च्या आनंदासाठी लोकांचा वेळ कधिही वाया घालवला नाहिये.
साहेब मला माहिती आहे की आपल्या प्रत्येक लेखाला गेलाबाजार दहा कॉमेंट्स तरी असतात. पण आपल्या ही काही लेखांना शून्य किंवा पाचहून कमी कॉमेंट्स आलेल्या आहेतच की. असे लेख जे आहेत ते वाचून लोकांचा वेळ वाया नाही गेला काय? रियली ऍडीजोशी.. रियली?
@हर्षद आनंदी:
> दुसर्या व्यक्तिला त्रास होताना पाहुन तुम्हाला हसु येत असेल तर तुम्हाला मानसोपचाराची नितांत गरज आहे असे वाटते.
आमच्या लहानपणी त्रासच्या व्याख्या काही वेगळ्या होत्या. मला तर वाटत की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीनी टची फील करणार्या लोकांना खरी मानसोपचाराची गरज आहे
> मिपावर कुणी काय लिहावे व कुणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी हळदी-कुंकु > घेऊन आमंत्रण दिलेले नाही की आमचे लेख, कथा वाचा म्हणुन!
मी काय बोलू...हे तुम्ही माझ्या समर्थनार्थ लिहलय का नाही ते ना कळून मी कन्फ्यूज़ झालोय :)
12 Jun 2009 - 4:03 am | Nile
तरी बरं आम्ही पहीले प्रतिक्रीया वाचतो आणि मग ठरवतो लेख वाचायचा का नाही! ;)