(पहिल्या लेखाला आलेल्या भरभरून प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय :))
....
उन्हाचि शेवटची तिरिप आता गढी च्या पुढील दरवाज्यापाशी होती. मंदा शिरीषच्या निर्जीव कलेवरावर डोक टेकवून धाय मोकलून रडत होती. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. अजिंक्य कसबसा पायतले त्राण गोळा करून इतर सर्वांना म्हणाला "आजची रात्र आपल्याला इथेच काढण्याशिवाय पर्याय नाही. उद्या सकाळपर्यंत आपण तग धरून ठेवला तरच शिरीष चे आपण योग्य ते अंतिम संस्कार करू शकू"
... पुढे
अजिंक्य आणि राधानी पुढचा दरवाजा सुरक्षित करून पहारा द्यायचे ठरवले. पंकज आणि मधुमिता मागच्या बुरुजावरून जंगलावर लक्ष ठेवणार होते. शार्दूल आणि अमित ने तळघराची तपासणी करायचे ठरवले. म्हाद्या तर पार सटपटला होता. पण पूर्ण रात्र इथे काढायची म्हणल्यावर अंगात ताकद असणे आवश्यक होते. अजिंक्य ने त्याला काहीतरी खायची व्यवस्था करायला सांगितली. म्हाद्या "जी धाकल धनी" म्हणून स्वयंपाक घराकडे पळाला. त्याला तिकडे फारशी कुरकुर न करता जाण्याचे अजुन एक कारण म्हणजे स्वयंपाक घराच्या समोरच देवघर होते. देवघर कसले म्हणा..देवघराचे अवशेष म्हणणे जास्त योग्य ठरेल...बुडत्याला काडीचा आधार!!
आबांचे म्हणणे न ऐकल्याबद्दल आता सर्वांना पश्चाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. वाडीच्या वाटेवर जर का त्या संन्याशानि तो पवित्र अंगारा जबरदस्ती घ्यायला लावला नसता तर काय झाले असते या कल्पनेनेच राधाचा थरकाप उडत होता. अजिंक्य आणि राधानी मिळून थोडा अंगारा पुढच्या दरवाज्यासमोर शिंपडला. निदान यामुळे तरी 'ते' पुढच्या दरवज्यातुन यायला अटकाव होणार होता. तरीदेखील अजिंक्यनी बंद दरवाज्यावर आतून लाकडी फळ्या आडव्या ठोकून तो घट्ट बंद करायचे ठरवले. राधानी पुन्हा एकदा पर्स मधून मोबाइल काढला. पण पुन्हा पुन्हा चेक करत राहिल्यानी रेंज येईल ही भाबडी आशा परत एकदा फोलच ठरली.
पंकज आणि मधुमिता मागील बुरुजावर पोहोचले. पंकजने बंद खिडकिच्या तावदानातून मागील जंगलावर नजर टाकली. मधुमिता भिन्तिवर रेलून शून्यात बघत होती. एकाएकी तिचा बांध फुटला आणि ती ओक्साबोक्षी रडायला लागली. पंकज क्षणभर बावचळला. काय करावे हे त्याला सुचेना. तो तिच्याजवळ गेला आणि काहीतरी धीराचे शब्द आठवू लागला. मधुने तो आल्याचे जाणवून मान वर करून त्याच्या डोळ्यात बघितले. त्याचा तो कसानुसा झालेला चेहरा, तिच्याबदद्ल वाटणारी काळजी पुरेपूर दाखवून देत होता. मधुने त्याला अचानक घट्ट मिठी मारली. तिच्या या अशा जवळकीनी पंकज संकोचला...आणि सुखवला पण. काय बोलायचे ते काहीच न सूचून तो तिला खांद्यावर थापटत राहिला. पाच एक मिनिटांतर मधु भानावर आली आणि त्याही परिस्थिती लाजून बाजूला झाली. पंकज अचानक घडाघडा बोलू लागला..
"मधु, तू मला दोनदा नकार दिलास...पण मला नेहमी तुझ्या जिभेवर एक आणि डोळ्यात वेगळच दिसायच. मला माहीत नाही की यानन्तर मी तुला परत प्रपोज़ करू शकीन की नाही. पण माझे तुझ्यावर अजूनही जिवापाड प्रेम आहे आणि सदैव राहील."
इतके बोलून तो मागील दरवाजा सुरक्षित करायला गोलाकार जिन्यावरून खाली निघाला. मधुने चपळाईने पुढे जाउन त्याचा हात पकडला, स्वत: कडे खेचून घेत ती म्हणाली "आय लव यू टू", आणि त्याच्या मिठीत जाउन विसावली. पंकज चा तर क्षणभर कानावर विश्वासच बसेना. त्याने मधु कडे बघितल तर ती खालचा ओठ दाबून तिची नेहमीची खट्याळ स्माइल देत होती. हीच ती स्माइल ज्यानी त्याला पुरता पागल केल होत. क्षणभर दोघे जण सारे काही विसरले. ती गढी..ते जंगल...शिरीष...आणि .. आणि 'ते'. अचानक मधुमितला बुरूजाच्या खिडकीतून मागील दरवाज्यापाशी काहीतरी दिसले आणि ती एकदूम दूर झाली. पंकज तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला.
"पंकज..मी आता काहीतरी दरवाज्यापाशी बघितले."
कसाबसा आवन्ढा गिळून मधु म्हणाली.
दोघांनाही एका भेसूर भयाने ग्रासून टाकले. जिन्यावरून उड्या टाकत ते खाली दरवाज्यापाशी पोहोचले. दरवाजा थोडा उघडा होता हे पाहून मधुची पाचावर धारण बसली.
"अग, घाबरू नकोस..राहिला असेल दरवाजा चुकून उघडा".
उसने अवसान आणत तो म्हणाला. तो बाहेर गेला आणि अन्गार्यची पुडी उघडायला लागला...मात्र त्याच क्षणी जंगलातून भेसूरवाण्या कींकाळ्या ऐकू येऊ लागल्या. पूर्ण परिसर त्या कींकाळ्यान्नी भरून गेला.
एवढ्यात तळघरातून "वाचवा..." अशी काळजाला चीर पाडणारी आर्त हाक ऐकू आली...
(क्रमश:)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7171
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिल्या भागाची लिंक टाका राव!!
..
In reply to पहिल्या भागाची लिंक टाका राव!! by हर्षद आनंदी
सहमत
अहो...
हाहाहा
In reply to अहो... by बिपिन कार्यकर्ते
हेच म्हणते
-*-
प भा प्र
In reply to -*- by अनिल हटेला
पू भा प्र / प भा प्र?
In reply to प भा प्र by बिपिन कार्यकर्ते
एलेमेन्टरी, डिअर वॉटसन!!!
In reply to पू भा प्र / प भा प्र? by गोगोल
आह आय सी :)
In reply to एलेमेन्टरी, डिअर वॉटसन!!! by बिपिन कार्यकर्ते
वाह!!
In reply to एलेमेन्टरी, डिअर वॉटसन!!! by बिपिन कार्यकर्ते
मला वाटलं...
ओके मंडळी ..
.
सहमत
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
ओ जरा हळू घ्या की
In reply to सहमत by हर्षद आनंदी
कॄपया संपादकांनी ह्यात लक्ष घालावे.
In reply to ओ जरा हळू घ्या की by गोगोल
विनोदबुद्धी
In reply to ओ जरा हळू घ्या की by गोगोल
.
In reply to ओ जरा हळू घ्या की by गोगोल
एक नंबर !!
बोरिंग वाटणारच..
In reply to एक नंबर !! by बट्ट्याबोळ
अभिनंदन! अभिनंदन!! त्रिवार अभिनंदन !!!
In reply to एक नंबर !! by बट्ट्याबोळ
ह्म्म्म्म्म्म्म्म...
तरी बरं