दलाल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
9 Jun 2009 - 10:41 am

"काय मास्तर काय चाललय"? सकाळीच रामदासांचा फोन आला.
"का, बाबा आम्हा गरीबांची आठवण काढली" मी
"पैसे कमवायची असलेली अक्कल न वापरता गरीब राहायची हौस असलेल्यांना काय करायचे" रामदास
" काय कळले नाय बॉ" मी
त्याना काल एक कुठल्याशा शिक्षण संस्थेचे एक पत्र आले होते. १२ वी नंतर मेडिकल, इंजीनयरींग, फार्मसी मधे अ‍ॅडमिशन मिळवुन देण्यात मदत करतो अशा संदर्भाचे. तसेच त्यानी एक डॉक्टर युगुल मेडीकल अ‍ॅडमिशन बद्दल मार्गदर्शन करते ह्या बाबत एका वर्तमान पत्रात लेख वाचला होता. त्यांचे म्हणणे असे होते की मला सर्व माहीती असुन मी ह्या क्षेत्रात का कार्यरत होत नाही.
जुन महीना आला रे आला की असे मार्गदर्शन करणार्‍या संस्थांच्या जाहीराती पेपरात दिसायला लागतात. बहुदा सर्वजण खाजगी मेडीकल कॉलेज व इंजीनयरींग कॉलेज चे दलाल असतात. मी पालक म्हणुन हे सर्व फार जवळुन अनुभवले आहे. अगदी चीरंजीव मेरीट मधे आले असुन सुद्धा. निव्वळ माहीती करता. अर्थात ह्या बाबतीत सर्व जणाना थोडीफार ऐकीव माहीती असतेच. पुर्ण नसते. ह्या लेखातील माहीती वाचकांनी आपल्या निकटवर्तियांना देउन जागृत करावे ही इच्छा.
मेडीकलः महाराष्ट्रात सुमारे २ हजार जागा शासकीय रुग्णालयात एम्.बी. बी.एस. करता भरल्या जातात. सी.ई.टी चा कट ऑफ पॉइंट १८०/२००. कधी कधी एखाद दुसरा मार्क मागे पुढे. इथे फक्त मार्कांची मेरीट. जे काही आरक्षण आहे ते सुद्धा मेरीट च्या क्रमाने.
डेंटीस्ट च्या जागा अशाच भरल्या जातात. साधारण कटऑफ वरील प्रमाणे.
नंतर येते ते प्रायवेट मेडीकल कॉलेज. ह्यांची पण स्वःत ची सी.ई.टी असते. वर्षाची फी दोन ते चार लाख. त्यांच्या ग्रेड प्रमाणे. ही ग्रेड कशी मॅनिप्युलेट केली जाते हा विषय इथे नाही. ह्या सर्व कॉलेजना एक ठरावीक सीट्स डोनेशन घेउन विकायचा सरकारी परवाना असतो.
मॅनेजमेंट कोटा. एन्.आर्.आय कोटा वगैरे वगैरे. ह्या कोट्याच्याच्या सोट्याची किंमत एम.बी. बी.एस्.ला सुमारे ३० लाख. डेंटीस्ट ला सुमारे २५ लाख. फिजिओथेरपी ला ५ लाख. परत ग्रेड प्रमाणे २ ते ५ लाख अधीक उणे. ह्या सर्व कॉलेजचा एक जनक शिक्षण सम्राट असतो. तो किंवा त्याचे चिरंजीव १ जुन नंतर ऑफिस मधुन हलत नाहीत. वर उल्लेख केलेल्या दलालानी पाठवलेल्या पालकांबरोबर चर्चा आणि निर्णय अतीम फी चा हा एकच उद्योग असतो. जर पालकांना आपल्या मुलाची गुणवत्ता न बघता अ‍ॅडमिशन हवी असते त्यांनी सरळ ह्यांना भेटण्याची व्यवस्था असते. कुठल्याही दलालाची गरज नाही. बाहेर बसलेल्या रांगेने गडबडुन जायचे नाही ही मानसिकता हवी. ही किती खरी किती खोटी हे कळायला फारशी अक्कल लागत नाही. ह्या रांगेत 'पेड ब्रेन वॉशर्स' असतात. तुमची असुरक्षितता जेवढी जास्त तेवढे पैसे जास्त. मी केवळ माहीती करता सुरवातीचे इलेक्ट्रॉनिक्सचे २.५ लाख चे कोटेशन बारगेनींग करुन १ लाख पर्यंत आणले होते. हे सगळ्यांना शक्य होत नाही.
आणि ह्या असुरक्षिततेचा दलाल फायदा घेतात. कॉलेजला दलाल काय कमावतात ह्याच्याशी काहीही देणे घेणे नसते. त्यांचे टारगेट पुर्ण करणे ह्या व्यतिरिक्त त्यांना इतर कशातही रस नसतो. तुम्हाला भेटणारा हा 'माइंड गेम' एक्स्पर्ट असतो.
इंजीनियरिंगः महाराष्ट्रात सुमारे ५०००० हजार असताना सुद्धा पालक इंजीनीयारींग ला सुद्धा डोनेशन भरतात. अमुक एक कॉलेज अमुक एक शाखा मार्क मिळाले नसले तरी हवी ह्या हट्टाने हे पैसे मोजावे लागतात. कॉलेजच्या ग्रेड प्रमाणे हा सोटा सुमारे एक लाख ते १२ लाखाचा असतो. काही मंडळी कारण नसताना कॅप प्रोसेस ला घाबरुन हे पैसे मोजतात. सुमारे ५५% मार्क मीळाले तरी महाराष्ट्रात कुठे ना कुठे तरी अ‍ॅडमिशन मिळतेच. जरा धीर धरावा लागतो. मागच्या वर्षीचे प्रत्येक कॉलेज चे कट ऑफ dte.org.in वर मिळतात. आपले मार्क बघुन फॉर्म भरायला ह्या साईटचा उपयोग होतो. आता ५५ % मार्क मिळालेल्या मुलाला इंजीनीयरींग जमेल का नाही हा प्रश्न विचारायचा नाही. हा ज्याच्या त्याच्या हौसेचा आणि इच्छेचा प्रश्न. डीग्री विकत घ्यायची ताकद आहे ना? बास.
एक फार मोठ्या शिक्षण सम्राटांच्या शाळेत माझा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमानंतर सम्राटांनी मी न विचारता एक माहीती दिली.
"सर , फार चांगले कार्य करत आहात. ह्याचे काय मानधन आहे ते सांगा. मी देतो. पण ह्या कार्यक्रमाच्या जोरावर कुणा विद्यार्थ्याला डोनेशन कमी करा अशी विनंती घेउन येउ नका. ते मी करणार नाही".
जाता जाता: अहो, रामदास, पेपरमधे जाहीरात येते. "सुमारे १५० मेल ,फीमेल हवी आहेत. मजा पण पैसा पण." करु का अ‍ॅप्लाय?. फीट आहे.
जास्त पैसा मिळेल.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

9 Jun 2009 - 10:48 am | आनंदयात्री

छान !! पालकांना दिलासा देणारे लेखन आहे काकांचे. अभिनंदन.

अवांतरः शेवटच्या दोन ओळींचे प्रयोजन काय ?

विनायक प्रभू's picture

9 Jun 2009 - 11:21 am | विनायक प्रभू

कळाले नाही?

टारझन's picture

9 Jun 2009 - 11:48 pm | टारझन

पेपरमधे जाहीरात येते. "सुमारे १५० मेल ,फीमेल हवी आहेत. मजा पण पैसा पण." करु का अ‍ॅप्लाय?. फीट आहे.

यात्रीजी ह्या संदर्भात तर म्हणत नसावेत ? ;)

बाकी चालू द्या !!

-(नजरकैद) टा.रू.सावरकर

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 12:45 am | बिपिन कार्यकर्ते

हो, यात्रीजी त्याच संदर्भात म्हणत आहेत. पण त्याचा संदर्भ आहेच. ते वाक्य म्हणजे मास्तराचे रामदासना उत्तर आहे.

लेखाच्या सुरूवातीला रामदासनी मास्तराला पैसे कमावण्याच्या संदर्भात जे ऐकवले त्याचे ते उत्तर आहे. मास्तराला असे म्हणायचे आहे की पैसाच कमवायचा तर मग असा पण कमवता येईल की. मास्तराला असे सांगायचे आहे की "पैसा पैसा काय करता? तो तर ती ** पण कमावते."

काय मास्तर? सच्ची का झूट?

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

10 Jun 2009 - 8:23 am | विनायक प्रभू

सच्ची बात बिपिन भौ.

सहज's picture

9 Jun 2009 - 10:56 am | सहज

अशी माहीती दरवर्षीच्या ताज्या आकड्याने सर्व शिक्षण शाखांबद्दल मिळणारी जागा आहे का कुठे?

खूप चांगली माहीती.

बाकी तुम्हाला पैशाचा मोह नसणे, तुम्ही कित्येक लोकांना स्वस्तात काम करुन देणे इ इ बद्दल कृतज्ञता दाखवुन, धन्यु, अभिनंदन म्हणणे टाळतो व "अनकम्फर्टेबल फील" करण्यापासुन वाचवतो ;-)

वेताळ's picture

9 Jun 2009 - 10:56 am | वेताळ

मस्तच विप्र... मस्तच लिहला आहे.एक अन एक शब्द खरा आहे.अहो साध मेडीकलला फी भरण्याची वेळ चुकावी ह्या करिता प्रयत्न करणारी कॉलेजस पण आहेत. म्हणजे ज्यादा डोनेशन भरुन सीट विकायला रिकामे झालेत. सगळे खर आहे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अनंता's picture

9 Jun 2009 - 11:25 am | अनंता

मास्तरांचा या विषयात हातखंडा आहे यात संशयच नाही.
जाता जाता चिमटा काढण्याची संधी मात्र मास्तर सोडत नाहीत ;)
एकूणात लेख मस्तच आणि उपयुक्तही !!

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

चिरोटा's picture

9 Jun 2009 - 12:00 pm | चिरोटा

शिक्षणाचा अगदीच धंदा झालाय. ह्यापेक्षा ते तसले दलाल परवडले. सरळ सरळ व्यवहार असतो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Jun 2009 - 2:35 pm | श्रीयुत संतोष जोशी

खूप छान माहिती आणि तीही योग्य वेळी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Jun 2009 - 2:35 pm | श्रीयुत संतोष जोशी

खूप छान माहिती आणि तीही योग्य वेळी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2009 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी अतिशय माहितीपुर्ण आणी संग्रही ठेवावा असा लेख.
तुम्ही ज्या निरपेक्ष वृत्तीने काम करता त्याबद्दल आदर वाटतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठमोळा's picture

9 Jun 2009 - 2:47 pm | मराठमोळा

विप्र काकांचा लेख माहितीपुर्ण आहे.. :)

बरेचशे अ‍ॅड्मिशन करुन देणारे दलाल हे बिहारी/युपी चे पाहिले आहेत मी. इथे सुद्धा आणी कर्नाटकात सुद्धा. यात फसवेगिरी करणारे सुद्धा आहेत, म्हणजे पैसे घेऊन पळुन जाणारे.

"मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" चित्रपटात सुद्धा शिक्षणाच्या धंद्याचा हा प्रकार चांगल्या प्रकारे दाखवला आहेच.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

चिरोटा's picture

9 Jun 2009 - 3:23 pm | चिरोटा

..कर्नाटकात सुद्धा

उच्च शिक्षणाच्या धंद्याची सुरवात ८०च्या दशकात कर्नाटकातूनच झाली.उत्तरेत तेव्हा फक्त सरकारी विद्यालये होती.तिकडे अ‍ॅडमिशन न मिळालेल्याना ईकडे डोनेशन देवून प्रवेश मिळू लागला.‍राजकिय नेत्यानी चालु केलेली मेडिकल विद्यालये चांगला धंदा करु लागल्यावर महाराष्ट्रातही पतंगराव्/मेघे/वसंतदादा तयार झाले.सध्या बेंगळुरुच्या एका मेडिकल महाविद्यालयात ३० लाख रुपये देणगी देवून शिकणारे लोक आहेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अवलिया's picture

9 Jun 2009 - 2:51 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

रेवती's picture

9 Jun 2009 - 6:27 pm | रेवती

वसुमारे ५५% मार्क मीळाले तरी महाराष्ट्रात कुठे ना कुठे तरी अ‍ॅडमिशन मिळतेच.
असं कसं म्हणता सर? नंतर अ‍ॅडमिशन मिळेल हो पण आम्हाला लवकरात लवकर मोकळं व्हायचं असतं ना? ;)
आणि गेली कित्येक वर्षे आम्ही पालक हळूहळू जो पैसा साठवतोय ह्या सम्राटांना देण्यासाठी तोही लवकरात लवकर देउन मोकळे झाल्यावर कसं बरं वाटतं. ;) आता समजलं ही राजकारणी मंडळी लोकसंख्या कमी करा म्हणून ओरडत का नाहीत ते. लोकसंख्या कमी झाली तर त्यांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची कॉलेजेस कशी चालणार? पालक तर आजकाल पैसे साठवतातच पण एखाद्या मुलाला सरकारी कॉलेजला अ‍ॅडमीशन मिळाली तर ते ठोकून काढतात. प्रश्न पडतो की आता ह्या साठवलेल्या पैशांचं करायचं काय? (हलके घ्या.)

आपले लेख आवडतात. मार्गदर्शक असतात ह्यात शंका नाही.

रेवती

संदीप चित्रे's picture

9 Jun 2009 - 9:14 pm | संदीप चित्रे

दचकायलाच होतं ...
सर... तुमचे असे लेख म्हणहे हिमनगाचा १/८ भाग असतील... माझी खात्री आहे तुमच्या गाठोड्यात एकापेक्षा एक अनुभव असतील.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

रेवती's picture

9 Jun 2009 - 9:44 pm | रेवती

संदीपशी सहमत.
खरंतर मागच्याच अठवड्यात राजकारणी व्हावसं वाटत होतं आता कॉलेज का काढू नये? असा विचार चाललाय.
एखाद्याचे पैसे राजीखुषीनं एकगठ्ठा कसे काढून घ्यावेत त्याचंही तंत्र असतं, ते जमायला हवं. ;)
मीही प्रायव्हेट कॉलेजलाच गेलीये आणि पैश्यांच्या ट्रंका घेऊन मिनीबसेस जायच्या हे आठवलं. अर्थात आताचे आकडे तेंव्हा नव्हते.
तरी ती रक्कम खूप वाटायची. आता लाख ऐकायची सवय करून घ्यायला हवी. ;)
सर, आपल्या लेखनामुळे आजकालचे शिक्षणाचे 'रेट' समजतात.
('रेट' हा शब्द वापरायला थोडे अवघड वाटले पण परिस्थितीही तशीच आहे.)

रेवती

क्रान्ति's picture

9 Jun 2009 - 10:50 pm | क्रान्ति

महत्वाची माहिती आणि तीही योग्य वेळी दिलीत सर.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

अवलिया's picture

10 Jun 2009 - 9:26 am | अवलिया

मास्तर ! अभिनंदन !!!

तुमच्या मनातील खळबळीला आणि या लेखातील विचाराला, दैनिक पुढारी सारख्या गाजलेल्या वृत्तपत्राच्या प्रथम पानावर विशेष वृत्त म्हणुन दखल घेणे भाग पडलेच आहे.

http://epaper.pudhari.com यावर मुंबई आवृत्ती मधे अधिक माहिती वाचा.
किंवा http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=29880&boxid=232354718&pgno=1 इथे क्लिक करा

मास्तर, येवु द्या अजुन असेच पोतडीतुन बाहेर :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

अवलिया's picture

10 Jun 2009 - 9:22 am | अवलिया

प्रकाटाआ

अवलिया's picture

10 Jun 2009 - 9:24 am | अवलिया

प्रकाटाआ

अवलिया's picture

10 Jun 2009 - 9:23 am | अवलिया

प्रकाटाआ

अवलिया's picture

10 Jun 2009 - 9:21 am | अवलिया

प्रकाटाआ