छोले

मितालि's picture
मितालि in पाककृती
30 May 2009 - 6:53 am

साहित्यः
१कप भिजलेले छोले, १ बटाटा, १ कांदा, १ टॉमेटो, १/२ वाटी तेल, मीठ, पाणी, आले लसुण पेस्ट, १ हिरवी मिरची, तमालपत्र, १चमचा लाल मिरचिपूड, १/२ चमचा धणे पुड,
१/२ चमचा हळद, १/२ चमचा गरम मसाला पावडर, कोथिंबीर
पाककृती:
कुकर मधे छोले आणि बटाटा थोडे मीठ टाकुन शिजवुन घ्या. बटाटयाच्या चौकोनी फोडी करुन घ्या. अर्धी वाटी तेलावर प्रथम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व तमालपत्र नीट परता.
कांदा सोनेरी झाला की आलेलसुण पेस्ट व टॉमेटो घालून परता. सर्व मसाले अर्धी वाटी पाणी एका भांड्यात एकत्र करुन घ्या. ही मसाल्याची पेस्ट आता फोडणीत ओता. (मसाले पाण्यामधुन घातले की ते करपत नाहीत.) मिश्रणाला तेल सुटे पर्यंत परतत रहा. तेल सुटु लागले की छोले आणि बटाटा घाला. चवीनुसार मीठ घाला. छोले शिजताना जे पाणी सुटले असेल ते घाला.
नसेल तर साधे पाणी आवश्यकते नुसार घाला. झाकण ठेऊन छान शिजवुन घ्या. शेवटी कोथिंबीर घालुन एक वाफ आणा.गरमा गरम छोले तयार...

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 7:47 am | विसोबा खेचर

मन प्रसन्न करणारा फोटू..! :)

मितालिमॅडन जियो..!

तात्या.

अवलिया's picture

30 May 2009 - 7:59 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

क्रान्ति's picture

30 May 2009 - 9:20 am | क्रान्ति

छोले आवडले. फोटो खासच.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

समिधा's picture

30 May 2009 - 11:13 am | समिधा

खुपच छान फोटो

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

चकली's picture

30 May 2009 - 7:16 pm | चकली

छान फोटो. बटाटा मी घातला नव्हता कधी. पुढच्यावेळी घालून बघेन.

चकली
http://chakali.blogspot.com

मीनल's picture

30 May 2009 - 7:35 pm | मीनल

मीनल. आमच्या घरी छोल्याबरोबर पोळी पेक्षा पुरी आवडते.
फोटो छान.
थोडासा चिंचेचा कोळ घातला तर रंग काळपट येतो. पण टेस्ट छान लागते.पण टोमॅटो हवाच.
मीनल