|
साहित्यः
१कप भिजलेले छोले, १ बटाटा, १ कांदा, १ टॉमेटो, १/२ वाटी तेल, मीठ, पाणी, आले लसुण पेस्ट, १ हिरवी मिरची, तमालपत्र, १चमचा लाल मिरचिपूड, १/२ चमचा धणे पुड,
१/२ चमचा हळद, १/२ चमचा गरम मसाला पावडर, कोथिंबीर
पाककृती:
कुकर मधे छोले आणि बटाटा थोडे मीठ टाकुन शिजवुन घ्या. बटाटयाच्या चौकोनी फोडी करुन घ्या. अर्धी वाटी तेलावर प्रथम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व तमालपत्र नीट परता.
कांदा सोनेरी झाला की आलेलसुण पेस्ट व टॉमेटो घालून परता. सर्व मसाले अर्धी वाटी पाणी एका भांड्यात एकत्र करुन घ्या. ही मसाल्याची पेस्ट आता फोडणीत ओता. (मसाले पाण्यामधुन घातले की ते करपत नाहीत.) मिश्रणाला तेल सुटे पर्यंत परतत रहा. तेल सुटु लागले की छोले आणि बटाटा घाला. चवीनुसार मीठ घाला. छोले शिजताना जे पाणी सुटले असेल ते घाला.
नसेल तर साधे पाणी आवश्यकते नुसार घाला. झाकण ठेऊन छान शिजवुन घ्या. शेवटी कोथिंबीर घालुन एक वाफ आणा.गरमा गरम छोले तयार...
|
प्रतिक्रिया
मन प्रसन्न
वा! मस्त !!
खमंग
खुपच छान
छान फोटो.
पुरी