Skip to main content

छोले

लेखक मितालि यांनी शनिवार, 30/05/2009 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १कप भिजलेले छोले, १ बटाटा, १ कांदा, १ टॉमेटो, १/२ वाटी तेल, मीठ, पाणी, आले लसुण पेस्ट, १ हिरवी मिरची, तमालपत्र, १चमचा लाल मिरचिपूड, १/२ चमचा धणे पुड, १/२ चमचा हळद, १/२ चमचा गरम मसाला पावडर, कोथिंबीर पाककृती: कुकर मधे छोले आणि बटाटा थोडे मीठ टाकुन शिजवुन घ्या. बटाटयाच्या चौकोनी फोडी करुन घ्या. अर्धी वाटी तेलावर प्रथम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व तमालपत्र नीट परता. कांदा सोनेरी झाला की आलेलसुण पेस्ट व टॉमेटो घालून परता. सर्व मसाले अर्धी वाटी पाणी एका भांड्यात एकत्र करुन घ्या. ही मसाल्याची पेस्ट आता फोडणीत ओता. (मसाले पाण्यामधुन घातले की ते करपत नाहीत.) मिश्रणाला तेल सुटे पर्यंत परतत रहा. तेल सुटु लागले की छोले आणि बटाटा घाला. चवीनुसार मीठ घाला. छोले शिजताना जे पाणी सुटले असेल ते घाला. नसेल तर साधे पाणी आवश्यकते नुसार घाला. झाकण ठेऊन छान शिजवुन घ्या. शेवटी कोथिंबीर घालुन एक वाफ आणा.गरमा गरम छोले तयार...

वाचने 6734
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मन प्रसन्न करणारा फोटू..! :) मितालिमॅडन जियो..! तात्या.

छोले आवडले. फोटो खासच. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

खुपच छान फोटो समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मीनल. आमच्या घरी छोल्याबरोबर पोळी पेक्षा पुरी आवडते. फोटो छान. थोडासा चिंचेचा कोळ घातला तर रंग काळपट येतो. पण टेस्ट छान लागते.पण टोमॅटो हवाच. मीनल