चार चारोळ्या

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in जे न देखे रवी...
29 May 2009 - 6:37 pm

तुझ्या आठवणींना कधीच
माझ्या वेदनांची नसते
गालावरच्या आसवांना मात्र
तुझ्या आठवणींची सय असते.

******

तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय

******

सुंदर गुलाबांना तुडवत
माणसं नाकासमोर चालतात
पण घरात शोभेसाठी
तीच माणसं 'कॅक्टस' लावतात.

******

निळंशार आकाश
चमचमत्या चांदण्या
आकाशात चंद्रसुद्धा
तुझ्यासाठी थांबलेला

अवांतर:- ही चारोळी नाही
आता चार दिवस सुट्टी
घरी चाललोय!!!!!!!!!!!!!!

चारोळ्या

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

29 May 2009 - 6:46 pm | मराठमोळा

अहो स्व्प्नयोगी राजे,
तुझ्या आठवणींना कधीच
माझ्या वेदनांची नसते
यात वेदनांची काय नसते? प्रकाशित करण्याआधी एकदा तपासुन पहा ना.
दुसरी आणी चौथी चारोळी तर अजिबात समजत नाहिये.. :T

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मीनल's picture

29 May 2009 - 7:35 pm | मीनल

क्लास आहेत. आवडल्या चारोळ्या.

मीनल.