अवगुंठन

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
29 May 2009 - 2:09 pm

उगाचंच बिचारी वाटते माझी मी मलाच...
तुझ्याशिवाय....
सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं
सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं
कसा घेणार रे मी मोकळा श्वास...
कसली होतेय तडफड... कळतंय का तुला काही
तुला कधी ते समजणारच नाही
तुला भेटायची ओढ
आणि तू जायचास तेव्हा दाटून येणारे कढ...
तुझी बेफ़िकीरी मात्र तश्शीच !
राग राग येतो अगदी...
चिडलेली छान दिसतेस म्हणे ......
....
बोलतानाही तेच
सगळं मीच डोळ्यातून वाचून काढायचं
माझेही शब्द माझेच आणि तुझेही
तू फक्त डोळ्यांनी बोलणार
बडबड फ़क्त माझीच
.....
आता मी सुद्धा बोलणार नाहीये
ठरवलंच आहे मी तसं........
......
...
अरे पण हे काय ...
तू रडतो आहेस....
मी बोलावं म्हणून .... ?
जे जे तू बोलावंस असं वाटायचं
ते आता बोलतो आहेस......
.....
..
उशीर केलास रे जानू.......
.....
आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस
तुला माहितीये ना....
मला मोगरा आवडतो ते...
कधी सुधारणार आहेस रे राजा...

जयश्री अंबासकर

प्रेमकाव्यविचार

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

29 May 2009 - 10:38 pm | क्रान्ति

आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस
तुला माहितीये ना....
मला मोगरा आवडतो ते...
कधी सुधारणार आहेस रे राजा...

शेवट सुन्न करून गेला!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

प्राजु's picture

30 May 2009 - 2:54 am | प्राजु

काळीजात खोल रूतणारी कविता.
मनापासून आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:27 am | विसोबा खेचर

.....
आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस
तुला माहितीये ना....
मला मोगरा आवडतो ते...
कधी सुधारणार आहेस रे राजा...

ह्या शेवटच्या धकादायक वळणाने अंमळ सुन्नच झालो..!

आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या

अवलिया's picture

30 May 2009 - 7:02 am | अवलिया

शेवट सुन्न करुन गेला ......... !!!!!

--अवलिया

मुक्तसुनीत's picture

30 May 2009 - 7:28 am | मुक्तसुनीत

कविता विलक्षण वाटली. जगून झाल्यावरही काहीतरी महत्त्वाचे उत्कट बोलायचे राहून जाणार ही भावना अधोरेखित करणारी.

चतुरंग's picture

30 May 2009 - 8:20 am | चतुरंग

प्रेमसंवेदनेचं वर्तुळ असं पूर्ण करण्याची धडपड चटका लावून जाते!

चतुरंग

शरदिनी's picture

30 May 2009 - 9:21 am | शरदिनी

तेच तेच तेच तेच असं वाटता वाटता शेवट असा झाला आणि कविता जोरदार आवडली...

सुबक ठेंगणी's picture

30 May 2009 - 9:49 am | सुबक ठेंगणी

किती छान लिहिलंयस गं...
तरीही धक्कादायक शेवटापेक्षा मला आवडलं ते
राग राग येतो अगदी...
चिडलेली छान दिसतेस म्हणे ......

दशानन's picture

30 May 2009 - 10:50 am | दशानन

एवन क्लास !

सुंदर !

अप्रतिम !

थोडेसं नवीन !

जागु's picture

30 May 2009 - 11:01 am | जागु

एकदम छान आहे कविता.

जागु's picture

30 May 2009 - 11:01 am | जागु

एकदम छान आहे कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2009 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस
तुला माहितीये ना....
मला मोगरा आवडतो ते...
कधी सुधारणार आहेस रे राजा...

क्लास.........

-दिलीप बिरुटे