Skip to main content

अवगुंठन

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 29/05/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उगाचंच बिचारी वाटते माझी मी मलाच... तुझ्याशिवाय.... सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं कसा घेणार रे मी मोकळा श्वास... कसली होतेय तडफड... कळतंय का तुला काही तुला कधी ते समजणारच नाही तुला भेटायची ओढ आणि तू जायचास तेव्हा दाटून येणारे कढ... तुझी बेफ़िकीरी मात्र तश्शीच ! राग राग येतो अगदी... चिडलेली छान दिसतेस म्हणे ...... .... बोलतानाही तेच सगळं मीच डोळ्यातून वाचून काढायचं माझेही शब्द माझेच आणि तुझेही तू फक्त डोळ्यांनी बोलणार बडबड फ़क्त माझीच ..... आता मी सुद्धा बोलणार नाहीये ठरवलंच आहे मी तसं........ ...... ... अरे पण हे काय ... तू रडतो आहेस.... मी बोलावं म्हणून .... ? जे जे तू बोलावंस असं वाटायचं ते आता बोलतो आहेस...... ..... .. उशीर केलास रे जानू....... ..... आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2421
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... शेवट सुन्न करून गेला! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

..... आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... ह्या शेवटच्या धकादायक वळणाने अंमळ सुन्नच झालो..! आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या

कविता विलक्षण वाटली. जगून झाल्यावरही काहीतरी महत्त्वाचे उत्कट बोलायचे राहून जाणार ही भावना अधोरेखित करणारी.

तेच तेच तेच तेच असं वाटता वाटता शेवट असा झाला आणि कविता जोरदार आवडली...

किती छान लिहिलंयस गं... तरीही धक्कादायक शेवटापेक्षा मला आवडलं ते राग राग येतो अगदी... चिडलेली छान दिसतेस म्हणे ......

आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस तुला माहितीये ना.... मला मोगरा आवडतो ते... कधी सुधारणार आहेस रे राजा... क्लास......... -दिलीप बिरुटे