एका लग्न समारंभाची सफर (भाग ३)

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
29 May 2009 - 12:06 pm

एका लग्न समारंभाची सफर (भाग १) http://www.misalpav.com/node/7933
एका लग्न समारंभाची सफर (भाग २) http://www.misalpav.com/node/7950

दहा मिनीटांच्या प्रवासानंतर आम्हाला रस्त्याचे दोन फाटे दिसले. ज्या ठिकाणी जायचे होते त्या गावचे नाव पाश्चापुर होते. आता कुठल्या रस्त्याला वळायच ते आम्हाला कळत नव्हत. आम्ही गाडी जरा थांबवली. त्या दोन रस्त्यांपैकी एक माणूस एका रस्त्यावर येत होता. त्याला पत्ता विचारला तेंव्हा त्याने सांगितले की मी तिथूनच आलो. लग्न लागल. ह्या रस्त्याने सरळ जा. थोड पुढे गेल्यावर तुम्हाले परत दोन रस्ते दिसतील. त्यातला जो रस्ता कच्चा असेल त्यावरुन जा. आम्ही पुढे गेल्यावर तो रस्ता आम्हाला लागला. हा रस्ता नुसता कच्चा नसुन चांगलाच खडबडीत होता. डोंगराळ भागावर होता. रस्त्याच्या दोनही बाजुंना घनदाट झाडी होती. मधे मधे सापाची वारूळ रस्त्याच्या कडेला दिसत होती. रस्त्यावर आमची गाडी सोडून एकही गाडी किंवा माणूस दिसत नव्हता. रस्ताही खुप अरुंद होता.

जसजशी गाडी पुढे जाऊ लागली तसे आम्ही एकमेकांचे हात पकडले. मध्येच खड्यांमुळे गाडी आदळत होती. उंच गेले की अपुर्‍या रस्त्यामुळे गाडी खाली पडते की काय अशी भिती वाटू लागली. जीव मुठीत धरून आणि जिभेला धार चढवून आम्ही मुलासकट त्याच्या घरातल्यांच्या निर्णयावर निंदेच्या तलवारी फिरवत होतो. आम्ही पाश्चापुरला चाललो आहे की पश्चाताप पुरला चाललो आहे असे आम्हाला वाटू लागले.

अखेर आम्ही २ वाजता विवाहस्थळी पोहोचलो. ह्या २० मिनीटांत आमची हाडे खिळखीळी झाली. आम्ही गेल्यावर काही माणसांनी कुत्सीक स्वरात हटकल. "आत्ताच अर्ध्यातासापुर्वी लग्न लागल. आम्ही देवळाच्या बाहेरूनच हार घेतले तुम्हाला उशिर होईल म्हणून. तुम्ही पण देवळात गेला होतात वाटत, नाहीतर लग्न मिळाल असत."

आम्ही कसे आलो, प्रवास कसा झाला, एवढावेळ गाडीची वाट पाहून कंटाळा आला असेल हे न विचारता आम्हाला असे उदगार काढल्यावर आमचा तोल सुटणार होता. आम्हाला कोणी पाणीही विचारल नाही. पण पाहूण्यांसमोर तमाशा नको म्हणून "गाडी उशिरा मिळाल्यामुळे उशिर झाला" एवढे तोंडावर मारुन गप्प बसलो.

मंडपात एकीकडे विधी चालू होते आणि एकीकडे जेवणाच्या पंगती चालू होत्या. आम्हच्यातील बरीचशी मंडळी जाऊन पंगतीत बसली. आम्ही ३-४ जणी जागा नसल्याने मंडपात विधी पाहत उभ्या होतो. ती परिस्थीती पाहून सगळेच आपआपसात कुजबुजत होते. घर अगदी साध होत. मुलगीही साधीच. मुलाच्या योग्यतेच्या दृष्टीने खुपच साधी. बाहेर पंख्यांची व्यवस्था नव्हती. फक्त मंडप होता. त्यात आम्ही अगदी शिजून निघत होतो.

आम्हीही आता एकमेकींमध्ये कुजबुजायला लागलो होतो. कारण मुलाची घरची परीस्थीती चांगली होती. सगळेच कमवते होते. तो एका कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला आहे. मुलीकडच्या माणसांच बिर्‍हाडही मुंबईत असत. तिथे त्यांचा फ्लॅट आहे. मुलगीही सर्व्हीसला आहे. बर ह्या गावात तशी जास्त वस्ती नाही २० एक घरातच माणस राहतात. दुकान नाही, डॉक्टर नाही. एक छोटी टपरी आहे. तरूण तडफदार मंडळी तिथे कोल्ड्रींग घ्यायला गेली तेंव्हा त्यांना सगळ्या बाटल्यांमध्ये एकच कोल्ड्रिंक मिळाल. फक्त बाटल्या वेगवेगळ्या नावाच्या होत्या.

केवळ पैसे वाचवण्यासाठी गावी लग्न धरल गेल होत ह्याची कुणकुण आम्हाला आधी लागलीच होती. पण बाकीच्या माणसांचे किती हाल होतील ह्या मुद्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हव होत. बर नवरा पण शहरात राहणारा होता निदान आपली हस होऊ नये ह्यासाठी तरी त्यांनी लग्न दुसरीकडे घ्यायला हव होत. पण दोन्ही पक्षांनी केवळ पैसे वाचवण्यासाठी एवढा प्रयास केला होता.

आता आम्ही उन्हाने आणि भुकेने पेटलो होतो. आमच्या बरोबरचे जेवल्यावर जागा रिकामी होताच आम्ही ४-५ जणी जेवायला गेलो. जेवण अंगणात सारवलेल्या जागी वाढत होते. ते सारवणही जुनेच असेल कदाचीत त्यामूळे वार्‍याने सगळी धुळ ताटात येत होती. आधी जेवलेल्या काही व्यक्तिंपैकी दिखाऊ व्यक्तिंनी ताटे जेवणासाठी मांडीवर घेतली होती.

आम्हाला जेवण वाढत होते. जेवण साधच होत. (इथे अन्नाला किंवा परीस्थीतीला हसत नाही फक्त माणसांच्या वृत्तीचे हसू आहे) तेवढ्यात दुसर्‍या लग्नाचं वर्‍हाड आल आणि जेण वढणारी माणस ओरडायला लागली. "बंद करा जेवण, बंद करा. दुसर्‍या वर्‍हाडाकडे बघा." आता आमचा तोल जाऊन आम्ही तिथे तोंड सोडल. "काय भयानक माणस आहेत, आम्हि जेऊ पण नको का ? मग कशाला वाढलत आम्हाला ? तेंव्हा त्यांच्या पैकी एकजण म्हणाला अहो तस नाही हो तुम्ही जेवा आता ह्या पुढच बंद करतो. तेंव्हा आम्ही विचारल आणि आम्हाला अजुन काही लागल तर ? आमच कोणी जेवायच बाकी असेल तर ? तेंव्हा ते म्हणाले की आम्ही दोन मुल इथे ठेवतो. तेंव्हा आम्हाला कुपन घेउन जेवायला बसलो अस वाटू लागल.

उन्हाच्या तडाख्यामुळे सगळेच अस्वस्थ झाले होते. तिथे थांबणच असह्य झाल होत. आमच्या बरोबरची मंडळी आमचे जेवण उरकण्याची वाट पाहत होती निघण्यासाठी. .....

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 May 2009 - 12:29 pm | घाशीराम कोतवाल १.२

"बंद करा जेवण, बंद करा. दुसर्‍या वर्‍हाडाकडे बघा
काय भयानक माणस असतात एक एक
जागु खरच तुम्हाला खुप बेक्कार अनुभव आला हो

केवळ पैसे वाचवण्यासाठी गावी लग्न धरल गेल होत
मग सरळ रजिष्ट्र्र लग्न करायच ना नाहि तर पाहुण्याना बोलवायच नाहि लग्नाला म्हणजे जास्त खर्च व्हायला नको
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

जागु's picture

29 May 2009 - 12:35 pm | जागु

आमच्याही त्याच प्रतिक्रिया होत्या.
अजुन एक भाग टाकायचा आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

29 May 2009 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

पश्चाताप नगरीतील अनुभव एक से बढकर एक परिक्षा बघणारे ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

काजुकतली's picture

30 May 2009 - 1:21 pm | काजुकतली

धडपणे आदरातिथ्य करता येत नाही तर मग बोलवायचंच कशाला??

लिहिलेस मात्र छान... तुझा मनस्ताप पुर्णपणे उतरलाय लिखाणात.

साधना

जागु's picture

30 May 2009 - 1:23 pm | जागु

अग चौथा भाग पण टाकला आहे. तो वाच.