Skip to main content

आजी !

लेखक अ-मोल यांनी मंगळवार, 26/05/2009 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजी म्हणजे पापणीमधल्या आसवाचा बिंदू असतो डोळयामध्ये साठवलेला मायेचा सिंधू असतो आजी म्हणजे बोबड बोली सापडलेलं नाव असतं अंगाईच्या थापटण्यात दाटलेला भाव असतं आजी म्हणजे देव्हारयातल्या श्रदृधेचं फुल असतं सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं आजी म्हणजे कौतुकाचा खजिना एक खुला असतो आठवणींच्या फांदीवर हिंदोळणारा झुला असतो आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 7510
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आजी म्हणजे देव्हारयातल्या श्रदृधेचं फुल असतं सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो! खास! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो! सॉल्लिड!! खूप सुंदर!! कवितेचा शेवट इतका अप्रतिम झाला आहे .. क्या कहेने?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

डोळ्यांत पाणी आले ! आजी म्हणजे "आजीवन" मायेची ऊब असते प्रेमाने नातवंडांना जिंकण्याची कला.....खूब असते ! क्या बात है दोस्त अ-मोल !