आजी म्हणजे पापणीमधल्या
आसवाचा बिंदू असतो
डोळयामध्ये साठवलेला
मायेचा सिंधू असतो
आजी म्हणजे बोबड बोली
सापडलेलं नाव असतं
अंगाईच्या थापटण्यात
दाटलेला भाव असतं
आजी म्हणजे देव्हारयातल्या
श्रदृधेचं फुल असतं
सुरकुत्यांच्या जाळीआडचं
हवंहवंसं मूल असतं
आजी म्हणजे कौतुकाचा
खजिना एक खुला असतो
आठवणींच्या फांदीवर
हिंदोळणारा झुला असतो
आजी म्हणजे प्रौढत्वीही
मूल बनायला वाव असतो...
...क्षितिजापार गेल्यावरती
ठसठसणारा घाव असतो!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7478
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा.सुंदर
शहारा आला
खूप खूप आवडली.
आजी म्हणजे
सहज आणि
भवनाविवश !
छान कविता
जियो!
-खूप अ-मोल
उत्कृष्ट.....
खूपच हळवी
वा हृद्य काव्य!