आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - २ - थोर परंपरा - शल्वसूत्रे ते टॉलेमी!

टायबेरीअस's picture
टायबेरीअस in काथ्याकूट
30 Apr 2009 - 9:43 am
गाभा: 

लेख १ - http://misalpav.com/node/7496

लेखाआधी :
सर्वप्रथम 'विचित्र' प्रस्तावनेबद्दल क्षमस्व! काही वाचकाना लेखाच्या सुरुवातीपासून 'सापेक्षतावादात डुंबायचे होते' आणि मी ते समजू शकतो. मलाही तेच करायचे होते. पण माझ्या नशीबाने दोन छान पुस्तकं माझ्या हाती पडली आणि एक एक पायरी चढीत मी सापेक्षतावाद चाखत गेलो. थोडा इतिहास समजला तर सापेक्षतावादाचे मूळ कुठून आलेय ते समजेल आणि मूख्य म्हणजे 'भावेल' या हेतू नेच मी वेदांच्या ऋचानी सुरुवात केली आहे. दुसरे असे, की इतर देशांमधे हा धुमाकूळ चालू असताना, भारत कोणत्या पर्वातून चालला होता ह्याची सुद्धा मला सांगड घालायची आहे.. एका देशात 'गुरुत्वाकर्षण' जन्माला येत असताना त्याच वेळी दुसर्‍या देशात, " हे राज्य व्हावे ही तो श्रीं ची ईच्छा' असे एक अवलिया आपल्या सवंगड्याना सांगत होता.. हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते..

मूळ सापेक्षतावाद सिद्धांत अगदी सरळ आहे .. दोन वाक्यांत सांगता येइल पण समजणे आणि समजावून सांगणे हा 'टोटली डिफरंट बॉलगेम' आहे असे मला जाणवले.. म्हणूनच थोड्या वेगळ्या पद्धतीने मी हा विषय मांडायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हा सगळ्याचा सहभाग अपेक्षित आहे!

लेखमालिकेच्या शेवटी मी वादग्रस्त 'सापेक्षतावाद आणि ईश्वर' असा प्रयत्न ही करणार आहे. पण जाणकारानी मला सांभाळून घ्या आणि नव्-नवीन माहिती पुरवून ही लेख माला 'उपयुक्त' करावयास नक्की मदत करा. मला गणिताचा फारसा आधार घ्यायचा नाही कारण माझ्या दृष्टी ने हा 'रसास्वाद' आहे , समीक्षा किंवा प्रूफ नाही...म्हणूनच इतिहासाची काठी हाती धरली आहे..असो..बॅक टू बिजनेस!!!

अरे हो, पुस्तकांची नावे... . सगळ्याना माहीत आहेतच - 'ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम '- स्टीफन हॉकींग्ज.. 'किमयागार' - अच्युत गोडबोले - दोघांचे घडीभर उपकार आहेत!!!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग २ -

आईन्स्टाईन ने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला काय आणि रातोरात तो रॉकस्टार झाला!, चित्रपट काय, टी-शर्टस काय, सगळी कडे आपले E = mC^2 झळकायला लागले.. पण हे सगळे व्हायच्या आधी.. म्हणजे खूप खूप आधी बर्‍याच महत्वाच्या घटना घडायच्या होत्या ज्या घडल्या नसत्या तर कदाचित हा सिद्धांत पुढे आलाच नसता!!!

भारतात (जंबुद्वीप म्हणू हवे तर, त्यावेळी भारत होता कुठे?) सुमारे इ.स. पूर्व १५०० मधे 'शल्व सूत्र लिहिली गेली .. शल्व म्हणजे 'धागा किंवा दोरा'.. पूर्वी यज्ञाची मोजमापे निश्चित करायला या 'शल्वा' चा उपयोग होत असे.. अत्यंत काटेकोर पणे आणि अचुकतेने ही मोजमापे केली जात. त्यामुळे ती लिहायला , मोजायला, आणि मोठ्या प्रमाणार यज्ञ करण्यासाठी 'बेरजा- गुणाकार' मांडायला त्यावेळच्या लोकांनी सुरुवात केली. 'शून्या' चा जन्म झाला .. (इथे असे सांगावेसे वाटते की आपल्या संस्कृती मधे आणि लॅटीन अमेरिकन संस्कृती मधे 'शून्य' जन्माला आले हा वाद चालू आहे पण दोघांच्या पद्धती वेगळ्या होत्या...)

युरोपात आणि आशियात नवनवीन संस्कृती वेगवेगळ्या नद्यांच्या काठी जन्म घेत होत्या.. सिंधू म्हणा, सुमेर म्हणा, ताय्ग्रिस म्हणा.. नाईल , ऍमेझॉन सगळी कडे नवजीवन उमलायला लागले होते. माणसं आकाशाकडे पहात होती.. दररोज त्याच दिशेने उगवणारा सूर्य, चंद्र, तारे यांच्या नोंदी घ्यायची सुरुवात झाली होती.. !! दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा अवधी मोजण्यासाठी वेगवेगळी मापं उदयाला येत होती.. भविष्य वर्तवले जात होते.. ते पडताळून पाहिले जायला लागले आणि लोकांचा 'भविष्य' वेत्त्यांवर विश्वास बसायला लागला!!! बर्‍याच वेळेस हे भविष्य्वेत्ते 'वैज्ञानिक्'च असत.. एखाद्या यज्ञासमोर बसलेला ऋषी किंवा मंदीरामधला पुजारी, शिक्षक हे काम करीत. आपापल्या बुद्धीनुसार विचार मांडीत.
या सगळ्यामधला पहिला 'विचारवंत' म्हणजे 'थेल्स' .. .'हे जग कशाचे बनलय?' हा प्रश्न त्याने पहिल्यांदा विचारला.. पृथ्वी पाण्यावर तरंगतेय असा त्याचा विचार होता.. ई.स. पूर्वी साधारण ६०० मधे त्याने हे विचार मांडले.. त्याच्या आसपासच भारतामधे पण 'कणादाने' प्रत्येक गोष्ट ही खूप लहान कणानी बनलेली असते असा सिद्धांत मांडला होता. कणादानंतर वराहमिहिर (ई.स. ५०० साधरण), आर्यभट्ट (ई.स्. ६००) आणि भास्कराचार्य (१२००) हे प्रसिद्ध 'विचारवंत' होवून गेले.
तिथे ग्रीक संस्कृती मधे ऍरिस्टॉटल ने एक परंपराच सुरू करून दिली. (ई.स. पूर्व ३८० साधरण). त्यावेळी माहीत असलेल्या सगळ्या विषयांवर त्यानी जवळ जवळ १५० प्रबंध लिहिले. त्याचा शिष्य 'आलेक़क्झांडर' ने ग्रीक तलवार आणि संस्कृती पुढे नेली. आणि ई.स. १५० मधे 'टोलेमी' ने आपल्या सूर्यमालेचे पहिले -वहिले 'मॉडेल' बनवले.. ! मॉडेल्च्या केंद्र्स्थानी होते पृथ्वी!!! ...
बरीच शतकं हेच मॉडेल जग वापरत होती.. ते मॉडेल बदलायला १५ व्या शतकात एक तरून पोलंड मधे जन्माला येणार होता .. निक्लास कोपर्निग उर्फ निकोलास कोपर्निकस!!!

क्रमशः

-टायबेरीअस

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2009 - 9:52 am | बिपिन कार्यकर्ते

छान!!! उत्सुकता वाढत चालली आहे. तुम्ही खूप वेगळ्या अंगाने हा विषय नेऊ पहात आहात हे जाणवले. पण भाग खूप लहान होत आहेत. जरा मोठे भाग लिहिता आले तर बघा. इतका गहन विषय लहान लहान भागात लिहिलात तर गॅप पडल्यामुळे सातत्य जाईल.

शून्याच्या शोधाच्या श्रेयाबद्दल भारतिय आणि दक्षिण अमेरिकन संस्कृतींमधे वाद आहेत हे माहित नव्हते. याबद्दल अजून काही संदर्भ वाचायला मिळतील का?

बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

30 Apr 2009 - 5:21 pm | राघव

असेच म्हणतो.
मलाही शून्य आपलाच असे वाटत होते.
क्रमशः टाकायचे तर नियम पाळायला हवा ब्वॉ.. दिवसाला कमीत कमी एक भाग टाकला पायजे! :)

राघव

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2009 - 10:02 pm | मेघना भुस्कुटे

होय, अगदी सहमत.
भाग लहान आहेत. लवकर लवकर टाका की राव. मान्य, काय पोरखेळ नाहीय हा, तरीपण.
मजा येतेय वाचायला. उत्सुकताही आहे.
बाकी ते गणिताऐवजी इतिहासाच्या अंगानं जायचं ठरवलंत ते बेस्ट केलंत एकदम. :)

सहज's picture

30 Apr 2009 - 9:54 am | सहज

वाचतो आहे. पुढला भाग लवकर येउ देत.

Nile's picture

30 Apr 2009 - 10:06 am | Nile

शिर्षकात टॉलेमी वाचले आणि 'ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' डोळ्यांसमोर आले. :)

तुम्ही शुल्बसुत्रांचा (?) उल्लेख केलात म्हणुन सांगतो, (मि पुर्वि वेद्कालीन गणित याविषयावर असलेल्या एका निबंधावर काम केले आहे) यात रोमांचक गोष्ट अशी कि आपण आज ज्याला पायथॅगोरसचे प्रमेय म्हणतो त्याचा वापर तेव्हा झालेला आहे. तसेच एकाच क्षेत्रफळाचि पण वेगवेगळ्या आकाराची यज्ञकुंडे बनवतांना Pi (π) आणि √2 (वर्गमुळ) या दोन constants चा शोध तसेच किंमत ५-६ घातांका पर्यंत बरोबर काढ्ण्यात आली आहे.

ता.क.: माझ्या माहीतिप्रमाणे शुल्बसुत्रे. :)

विसुनाना's picture

30 Apr 2009 - 11:37 am | विसुनाना

मॉडेल्च्या केंद्र्स्थानी होते पृथ्वी!!! ...
बरीच शतकं हेच मॉडेल जग वापरत होती.. ते मॉडेल बदलायला १५ व्या शतकात एक तरून पोलंड मधे जन्माला येणार होता .. निक्लास कोपर्निग उर्फ निकोलास कोपर्निकस!!!

- नाही. नाही. भारतात किमान २५० वर्षे अगोदरच पृथ्वी हे विश्वाचे स्थिर केंद्र नसल्याचे माहित होते.
ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) म्हणतात - 'जैसे न चालता सूर्याचे चालणे' (ज्ञानेश्वरी ४-९९)
आणखीही उदाहरण आहे.

नव्-नवीन माहिती पुरवून ही लेख माला 'उपयुक्त' करावयास नक्की मदत करा.

असे म्हटलेत म्हणून तोंड उचकटले. जाणकार मी नाही. पुढे वाचत आहे.

अवलिया's picture

30 Apr 2009 - 1:35 pm | अवलिया

मी जर तोंड उचकटले तर वेदकालात रमणारा अवलिया म्हणुन हेटाळणी केली जाईल...
फक्त ज्ञानेश्वरांचा उल्लेख फारच पुढचा आहे ... अजुन मागे नेता येईल येवढेच सांगतो.
ज्याने वेदकाळात संकल्पना मांडली त्याने स्वतःचे नाव पण कधी त्या ज्ञानात गुंफले नाही...
पण कोपर्निकस तर कोपर्निकस.... असो.
शेवटी महत्व ज्ञानाला आहे !
कुणी आणि कधी नक्की शोध लावला हे आत्ता तरी दुय्यम आहे कारण हा लेखमालेचा हेतु आणि उद्दीष्ट नाही !

बाकी वाचत आहे, भाग थोडे मोठे येवु द्या !!

--अवलिया

मराठमोळा's picture

30 Apr 2009 - 1:42 pm | मराठमोळा

बाकी वाचत आहे, भाग थोडे मोठे येवु द्या !!

हेच म्हणतो..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

आनंद घारे's picture

8 May 2009 - 8:34 am | आनंद घारे

संत ज्ञानेश्वरांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे. पण 'जैसे न चालता सूर्याचे चालणे' या ओळीचा अर्थ पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा कसा काय होतो हे मला समजत नाही. अशा प्रकारचे अवाच्या सव्वा दावे करून आपण स्वतःला हास्यास्पद बनवून घेत आहोत असे मला वाटते.
सूर्याच्या वेगवेगळ्या प्रकाराने 'चालण्या'बद्दल मी खाली दिलेल्या दुव्यावर माहिती दिली आहे.
http://anandghan.blogspot.com/2008/05/blog-post_11.html सूर्याचे न चालता चालणे

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

30 Apr 2009 - 12:05 pm | नितिन थत्ते

लेख छान झाला आहे.
बिपिनशी सहमत (लेखाच्या लांबीबाबत आणि दोन लेखांतील गॅपबाबत)

खराटा
(रंग माझा वेगळा)

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2009 - 12:05 pm | स्वाती दिनेश

दुसरा भागही आवडला, पुढचे वाचायची उत्सुकता आहे.
शून्याच्या शोधाच्या श्रेयाबद्दल आपल्या आणि लॅटिन अमेरिकन संस्कृतींमधे वाद आहेत हे माहित नव्हते किंबहुना शून्य आमचेच हाच ठाम समज आजवर होता..
स्वाती

सुमीत भातखंडे's picture

30 Apr 2009 - 2:41 pm | सुमीत भातखंडे

चांगला जमलाय हाही भाग.

शून्य आमचेच हाच ठाम समज आजवर होता..

हो ना. मी पण हेच समजत होतो. ही नविनच माहिती मिळाली.
पुढचा भाग लवकर येऊद्यात.

लिखाळ's picture

30 Apr 2009 - 5:23 pm | लिखाळ

वा.. हा भाग सुद्धा चांगला.. पुढे वाचण्यास उत्सुक. यावरील चर्चा सुद्धा माहितीत भर पाडणारी.
E = mC^2 या नावाचा इंग्रजी चित्रपट पाहण्याजोगा आहे. या सूत्राचा उगम होण्याआधी विज्ञानाची प्रगती कशी झाली याचा सुंदर आढावा असलेला चित्रपट आहे. जरुर पहावा.
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2009 - 6:00 pm | बिपिन कार्यकर्ते

लिखाळा, चित्रपटाची लिंक दे बॉ...

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

30 Apr 2009 - 6:07 pm | लिखाळ

चित्रपटाचा गुगल चित्रपटातला दुवा . पावणेदोन तासाचा लहानसा माहितीपूर्ण पट आहे.
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2009 - 6:39 pm | बिपिन कार्यकर्ते

ढॅण्यवाडस!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

30 Apr 2009 - 5:39 pm | आनंदयात्री

छान. अत्यंत आतुरतेने लेखमालेची वाट पहात असतो. भाग मोठा असावा असे वाटते.
शुन्याबाबतही इतर प्रतिसादकांशी सहमत.
प्रतिसादांमधे विसुनानांचे आणी अवलियाचे विषेश धन्यवाद.

>>की इतर देशांमधे हा धुमाकूळ चालू असताना, भारत कोणत्या पर्वातून चालला होता ह्याची सुद्धा मला सांगड घालायची आहे.. एका देशात 'गुरुत्वाकर्षण' जन्माला येत असताना त्याच वेळी दुसर्‍या देशात, " हे राज्य व्हावे ही तो श्रीं ची ईच्छा' असे एक अवलिया आपल्या सवंगड्याना सांगत होता.. हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते..

सामरिक स्थितीमुळे भारतिय मागे राहिले असे म्हणायचे आहे का ?

अवांतरः
थोडा चित्रांचा वापर केला तर लेखमाला अजुन छान होइल. जसे खालचे चित्र आपल्याला इथे टॉलेमीचे मॉडेल म्हणुन सहज डकवता आले असते.

शितल's picture

30 Apr 2009 - 6:14 pm | शितल

वाचते आहे पुढचा भाग ही लवकर येऊ दे. :)

फावला वेळ कमी मिळत असल्यामुळे मोठा लेख लिहिणे जमत नाही. कोणास लेख आधी लिहून कुठे सेव वगरे करून ठेवण्याची सोय माहीत असेल तर कृपया सांगा.

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

लांब लेखाचे भाग मी स्वतःला "पोष्टकार्डातून" पाठवतो. मग ते आयत्या वेळी लेख लिहिताना कॉपी-पेस्ट करता येतात.

श्रावण मोडक's picture

1 May 2009 - 9:44 pm | श्रावण मोडक

येथे कंपोझ करून तो मजकूर नोटपॅडमध्ये कॉपी करून ठेवता येत नाही का? नोटपॅडमध्ये फाईल सेव्ह करताना खाली युनिकोड एक्स्टेन्शन स्वीकारायचे. अर्थात, विंडोज, लिनक्स, उबंटू वगैरे पहा बुवा काय ते. एऱवी एक्स्पी वापरणारे थेट नोटपॅडमध्येही (इंडस्क्रिप्ट कीबोर्ड ठाऊक असल्यास) कंपोज करू शकतात. ते इन्स्टॉल फाईल्स फॉर कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट करून घेतलं की काम भागतं.

अभिज्ञ's picture

2 May 2009 - 3:20 am | अभिज्ञ

लेख मालिका छान आहे.फक्त मोठे भाग येउ द्या.

कोणास लेख आधी लिहून कुठे सेव वगरे करून ठेवण्याची सोय माहीत असेल तर कृपया सांगा.

लेख जर पीसी/लॅपटॉप वर लिहित असाल तर बराहा वापरून तुम्ही
वर्डपॅड मध्ये डायरेक्ट लिहून ते रिच टेक्स्ट फॉरमॅट मधे सेव्ह करू शकता.
लिहिण्याकरीता मिपाच वापरत असाल तर धनंजय ह्यांनी सुचवलेला मार्गहि उत्तम आहे.
अथवा इथे लिहून झालेले लिखाण हि तुम्हाला कॉपी करून वर्डपॅड मधे चिकटवता येइल.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

Nile's picture

2 May 2009 - 4:21 am | Nile

quillpad मध्ये save करण्याची सोय आहे.

टायबेरीअस's picture

30 Apr 2009 - 9:17 pm | टायबेरीअस

http://en.wikipedia.org/wiki/0_(number)

http://www.bookrags.com/research/the-origins-of-the-zero-scit-01123/

मायन गणित (मेक्सिको)
http://localhs.com/hs/maya_mathematics.asp

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

क्रान्ति's picture

30 Apr 2009 - 10:27 pm | क्रान्ति

रोचक आणि रंजक लेख. पुढील लेखाची उत्सुकता आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

30 Apr 2009 - 10:34 pm | प्राजु

पुढील भागाच्या प्रतिक्षेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

30 Apr 2009 - 10:53 pm | ऋषिकेश

छान!!!
(थोडे मोठे भाग) लिहित रहा. आम्हि वाचत आहोत :)

ऋषिकेश

दीपक साळुंके's picture

1 May 2009 - 8:05 pm | दीपक साळुंके

उत्तम लेख. पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

टायबेरीअस's picture

1 May 2009 - 9:32 pm | टायबेरीअस

>>की इतर देशांमधे हा धुमाकूळ चालू असताना, भारत कोणत्या पर्वातून चालला होता ह्याची सुद्धा मला सांगड घालायची आहे.. एका देशात 'गुरुत्वाकर्षण' जन्माला येत असताना त्याच वेळी दुसर्‍या देशात, " हे राज्य व्हावे ही तो श्रीं ची ईच्छा' असे एक अवलिया आपल्या सवंगड्याना सांगत होता.. हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते..

सामरिक स्थितीमुळे भारतिय मागे राहिले असे म्हणायचे आहे का ?

-------------------------------------------------------------

माझे मत 'होय' आहे. सामजिक स्थैर्य असल्याशिवाय ज्ञान विज्ञान संगीत कला यांचा विकास होणं कठीण वाटतं..

-टायबेरीअस

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

जरा बिगिबिगि येउंद्यात तवाच मजा येतिय! ;)

चतुरंग

क्लिंटन's picture

1 May 2009 - 10:28 pm | क्लिंटन

टायबेरीयसराव,

आपल्या लेखमालेच्या पहिल्या दोन भागांमुळे पुढे काय अशी उत्कंठा जरूर वाढली आहे.पुढील भागांची वाट बघत आहे.

>>शल्व म्हणजे 'धागा किंवा दोरा'

मला भौतिकशास्त्रात विशेष गती नाही.पण ’स्ट्रींग थिअरी’ म्हणून एक तत्व असते असे ऐकले आहे. अर्थात त्याविषयी त्याचे नाव सोडून काहीच माहिती मला नाही.पण जेव्हा तुम्ही म्हणता ’शल्व म्हणजे 'धागा किंवा दोरा' ’ तेव्हा शल्वसूत्रे ही भौतिकशास्त्रातील ’स्ट्रींग थिअरी’ का हा प्रश्न पडतो. तेव्हा शल्व सूत्रे आणि स्ट्रींग थिअरी हे एकच आहेत का वेगळे?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

थोडक्यात सांगयचे तर विश्वाचे नियम लहानातल्या लहान अणु रेणु ना लागू पडत नाहीत. लहान अणु रेणु ना 'क्वांटम' किंवा 'कंपु' नियम लागू पडतात. ग्रह तारे आकशगंगा ना गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू पडतात. जर हे विश्व कसे चालते आहे हे कोणाला सांगायचे असेल तर सगळ्याना एकाच प्रकारचे ( भौतिक्शास्त्राप्रमाणे म्हणतोय) नियम लागू पडायला हवेत. 'क्वांटम थेअरी ऑफ ग्रॅविटी' असे एकाच प्रकारचे नियम बनवण्यासाठी शास्त्रज्ञानी अणु ना 'दोर्‍यात' बांधायचा प्रयत्न केला आहे..
हे मॉडेल बरोबर असेल किंवा चूकही पण सध्या तरी शास्त्रज्ञाना ही थेअरी वापरून पुढले संशोधन करणे सोपे जात आहे!

बरे झाले विचारलेत - 'स्ट्रिंग थेअरी ' ला प्रतिशब्द मिळाला 'शल्व्-सिद्धांत' .. कसे वाट्टे?? :)

-टायबेरीअस

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

श्रावण मोडक's picture

2 May 2009 - 8:16 am | श्रावण मोडक

कंपू म्हणजेच पुंज म्हणायचे आहे का?

रम्या's picture

6 May 2009 - 3:25 pm | रम्या

क्वांटम थेअरीला मराठी पुंजवाद म्हणता असे वाचले आहे.

आम्ही येथे पडीक असतो!