छान!!! उत्सुकता वाढत चालली आहे. तुम्ही खूप वेगळ्या अंगाने हा विषय नेऊ पहात आहात हे जाणवले. पण भाग खूप लहान होत आहेत. जरा मोठे भाग लिहिता आले तर बघा. इतका गहन विषय लहान लहान भागात लिहिलात तर गॅप पडल्यामुळे सातत्य जाईल.
शून्याच्या शोधाच्या श्रेयाबद्दल भारतिय आणि दक्षिण अमेरिकन संस्कृतींमधे वाद आहेत हे माहित नव्हते. याबद्दल अजून काही संदर्भ वाचायला मिळतील का?
बिपिन कार्यकर्ते
होय, अगदी सहमत.
भाग लहान आहेत. लवकर लवकर टाका की राव. मान्य, काय पोरखेळ नाहीय हा, तरीपण.
मजा येतेय वाचायला. उत्सुकताही आहे.
बाकी ते गणिताऐवजी इतिहासाच्या अंगानं जायचं ठरवलंत ते बेस्ट केलंत एकदम. :)
शिर्षकात टॉलेमी वाचले आणि 'ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' डोळ्यांसमोर आले. :)
तुम्ही शुल्बसुत्रांचा (?) उल्लेख केलात म्हणुन सांगतो, (मि पुर्वि वेद्कालीन गणित याविषयावर असलेल्या एका निबंधावर काम केले आहे) यात रोमांचक गोष्ट अशी कि आपण आज ज्याला पायथॅगोरसचे प्रमेय म्हणतो त्याचा वापर तेव्हा झालेला आहे. तसेच एकाच क्षेत्रफळाचि पण वेगवेगळ्या आकाराची यज्ञकुंडे बनवतांना Pi (π) आणि √2 (वर्गमुळ) या दोन constants चा शोध तसेच किंमत ५-६ घातांका पर्यंत बरोबर काढ्ण्यात आली आहे.
ता.क.: माझ्या माहीतिप्रमाणे शुल्बसुत्रे. :)
मॉडेल्च्या केंद्र्स्थानी होते पृथ्वी!!! ...
बरीच शतकं हेच मॉडेल जग वापरत होती.. ते मॉडेल बदलायला १५ व्या शतकात एक तरून पोलंड मधे जन्माला येणार होता .. निक्लास कोपर्निग उर्फ निकोलास कोपर्निकस!!!
- नाही. नाही. भारतात किमान २५० वर्षे अगोदरच पृथ्वी हे विश्वाचे स्थिर केंद्र नसल्याचे माहित होते.
ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) म्हणतात - 'जैसे न चालता सूर्याचे चालणे' (ज्ञानेश्वरी ४-९९)
आणखीही उदाहरण आहे.
नव्-नवीन माहिती पुरवून ही लेख माला 'उपयुक्त' करावयास नक्की मदत करा.
असे म्हटलेत म्हणून तोंड उचकटले. जाणकार मी नाही. पुढे वाचत आहे.
मी जर तोंड उचकटले तर वेदकालात रमणारा अवलिया म्हणुन हेटाळणी केली जाईल...
फक्त ज्ञानेश्वरांचा उल्लेख फारच पुढचा आहे ... अजुन मागे नेता येईल येवढेच सांगतो.
ज्याने वेदकाळात संकल्पना मांडली त्याने स्वतःचे नाव पण कधी त्या ज्ञानात गुंफले नाही...
पण कोपर्निकस तर कोपर्निकस.... असो.
शेवटी महत्व ज्ञानाला आहे !
कुणी आणि कधी नक्की शोध लावला हे आत्ता तरी दुय्यम आहे कारण हा लेखमालेचा हेतु आणि उद्दीष्ट नाही !
बाकी वाचत आहे, भाग थोडे मोठे येवु द्या !!
--अवलिया
संत ज्ञानेश्वरांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे. पण 'जैसे न चालता सूर्याचे चालणे' या ओळीचा अर्थ पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा कसा काय होतो हे मला समजत नाही. अशा प्रकारचे अवाच्या सव्वा दावे करून आपण स्वतःला हास्यास्पद बनवून घेत आहोत असे मला वाटते.
सूर्याच्या वेगवेगळ्या प्रकाराने 'चालण्या'बद्दल मी खाली दिलेल्या दुव्यावर माहिती दिली आहे.
http://anandghan.blogspot.com/2008/05/blog-post_11.html सूर्याचे न चालता चालणे
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
दुसरा भागही आवडला, पुढचे वाचायची उत्सुकता आहे.
शून्याच्या शोधाच्या श्रेयाबद्दल आपल्या आणि लॅटिन अमेरिकन संस्कृतींमधे वाद आहेत हे माहित नव्हते किंबहुना शून्य आमचेच हाच ठाम समज आजवर होता..
स्वाती
वा.. हा भाग सुद्धा चांगला.. पुढे वाचण्यास उत्सुक. यावरील चर्चा सुद्धा माहितीत भर पाडणारी.
E = mC^2 या नावाचा इंग्रजी चित्रपट पाहण्याजोगा आहे. या सूत्राचा उगम होण्याआधी विज्ञानाची प्रगती कशी झाली याचा सुंदर आढावा असलेला चित्रपट आहे. जरुर पहावा.
-- लिखाळ.
छान. अत्यंत आतुरतेने लेखमालेची वाट पहात असतो. भाग मोठा असावा असे वाटते.
शुन्याबाबतही इतर प्रतिसादकांशी सहमत.
प्रतिसादांमधे विसुनानांचे आणी अवलियाचे विषेश धन्यवाद.
>>की इतर देशांमधे हा धुमाकूळ चालू असताना, भारत कोणत्या पर्वातून चालला होता ह्याची सुद्धा मला सांगड घालायची आहे.. एका देशात 'गुरुत्वाकर्षण' जन्माला येत असताना त्याच वेळी दुसर्या देशात, " हे राज्य व्हावे ही तो श्रीं ची ईच्छा' असे एक अवलिया आपल्या सवंगड्याना सांगत होता.. हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते..
सामरिक स्थितीमुळे भारतिय मागे राहिले असे म्हणायचे आहे का ?
अवांतरः
थोडा चित्रांचा वापर केला तर लेखमाला अजुन छान होइल. जसे खालचे चित्र आपल्याला इथे टॉलेमीचे मॉडेल म्हणुन सहज डकवता आले असते.
फावला वेळ कमी मिळत असल्यामुळे मोठा लेख लिहिणे जमत नाही. कोणास लेख आधी लिहून कुठे सेव वगरे करून ठेवण्याची सोय माहीत असेल तर कृपया सांगा.
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
येथे कंपोझ करून तो मजकूर नोटपॅडमध्ये कॉपी करून ठेवता येत नाही का? नोटपॅडमध्ये फाईल सेव्ह करताना खाली युनिकोड एक्स्टेन्शन स्वीकारायचे. अर्थात, विंडोज, लिनक्स, उबंटू वगैरे पहा बुवा काय ते. एऱवी एक्स्पी वापरणारे थेट नोटपॅडमध्येही (इंडस्क्रिप्ट कीबोर्ड ठाऊक असल्यास) कंपोज करू शकतात. ते इन्स्टॉल फाईल्स फॉर कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट करून घेतलं की काम भागतं.
लेख मालिका छान आहे.फक्त मोठे भाग येउ द्या.
कोणास लेख आधी लिहून कुठे सेव वगरे करून ठेवण्याची सोय माहीत असेल तर कृपया सांगा.
लेख जर पीसी/लॅपटॉप वर लिहित असाल तर बराहा वापरून तुम्ही
वर्डपॅड मध्ये डायरेक्ट लिहून ते रिच टेक्स्ट फॉरमॅट मधे सेव्ह करू शकता.
लिहिण्याकरीता मिपाच वापरत असाल तर धनंजय ह्यांनी सुचवलेला मार्गहि उत्तम आहे.
अथवा इथे लिहून झालेले लिखाण हि तुम्हाला कॉपी करून वर्डपॅड मधे चिकटवता येइल.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
http://en.wikipedia.org/wiki/0_(number)
http://www.bookrags.com/research/the-origins-of-the-zero-scit-01123/
मायन गणित (मेक्सिको)
http://localhs.com/hs/maya_mathematics.asp
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
>>की इतर देशांमधे हा धुमाकूळ चालू असताना, भारत कोणत्या पर्वातून चालला होता ह्याची सुद्धा मला सांगड घालायची आहे.. एका देशात 'गुरुत्वाकर्षण' जन्माला येत असताना त्याच वेळी दुसर्या देशात, " हे राज्य व्हावे ही तो श्रीं ची ईच्छा' असे एक अवलिया आपल्या सवंगड्याना सांगत होता.. हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे असे मला वाटते..
सामरिक स्थितीमुळे भारतिय मागे राहिले असे म्हणायचे आहे का ?
-------------------------------------------------------------
माझे मत 'होय' आहे. सामजिक स्थैर्य असल्याशिवाय ज्ञान विज्ञान संगीत कला यांचा विकास होणं कठीण वाटतं..
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
टायबेरीयसराव,
आपल्या लेखमालेच्या पहिल्या दोन भागांमुळे पुढे काय अशी उत्कंठा जरूर वाढली आहे.पुढील भागांची वाट बघत आहे.
>>शल्व म्हणजे 'धागा किंवा दोरा'
मला भौतिकशास्त्रात विशेष गती नाही.पण ’स्ट्रींग थिअरी’ म्हणून एक तत्व असते असे ऐकले आहे. अर्थात त्याविषयी त्याचे नाव सोडून काहीच माहिती मला नाही.पण जेव्हा तुम्ही म्हणता ’शल्व म्हणजे 'धागा किंवा दोरा' ’ तेव्हा शल्वसूत्रे ही भौतिकशास्त्रातील ’स्ट्रींग थिअरी’ का हा प्रश्न पडतो. तेव्हा शल्व सूत्रे आणि स्ट्रींग थिअरी हे एकच आहेत का वेगळे?
---विल्यम जेफरसन क्लिंटन
थोडक्यात सांगयचे तर विश्वाचे नियम लहानातल्या लहान अणु रेणु ना लागू पडत नाहीत. लहान अणु रेणु ना 'क्वांटम' किंवा 'कंपु' नियम लागू पडतात. ग्रह तारे आकशगंगा ना गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू पडतात. जर हे विश्व कसे चालते आहे हे कोणाला सांगायचे असेल तर सगळ्याना एकाच प्रकारचे ( भौतिक्शास्त्राप्रमाणे म्हणतोय) नियम लागू पडायला हवेत. 'क्वांटम थेअरी ऑफ ग्रॅविटी' असे एकाच प्रकारचे नियम बनवण्यासाठी शास्त्रज्ञानी अणु ना 'दोर्यात' बांधायचा प्रयत्न केला आहे..
हे मॉडेल बरोबर असेल किंवा चूकही पण सध्या तरी शास्त्रज्ञाना ही थेअरी वापरून पुढले संशोधन करणे सोपे जात आहे!
बरे झाले विचारलेत - 'स्ट्रिंग थेअरी ' ला प्रतिशब्द मिळाला 'शल्व्-सिद्धांत' .. कसे वाट्टे?? :)
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
प्रतिक्रिया
छान!!!
+१
होय, अगदी
छान
शिर्षकात
स्टॉप प्रेस
मी जर तोंड
बाकी
संत ज्ञानेश्वर
छान
छान..
शून्य
वा.. हा भाग
लिंक
चित्रपटाच
ढॅण्यवाडस!!
छान
वाचते आहे
लेख लिहून वाचवून ठेवता येतात का कुठे?
मी स्वतःला व्यनितून पाठवतो
एक मार्ग
लेख मालिका
quillpad मध्ये
शून्याचा शोध . लिन्क्स
रोचक
पुढील
छान!!!
उत्तम लेख.
आनंदयात्री यांचा प्रश्न
टायबेरिअस बुवा, लई येळ लावताय बुवा!
स्ट्रींग थिअरी
शल्व्सूत्र आणि स्ट्रिंग थेअरी वेगळे आहेत
कंपू
क्वांटम