आजही मला ते सर्व आठवतय

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जे न देखे रवी...
5 Feb 2008 - 1:19 pm

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............

-------------------------------------------------------------
ऋणनिर्देश :
कवी- अनामिक (निदान माझ्यासाठीतरी)
मला आलेल्या एका विरोपातून.

- ध मा ल.

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Feb 2008 - 8:08 am | विसोबा खेचर

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............

हम्म! कविता ठीक वाटली...

आपला,
(कॉलेजकुमार) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2008 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............

या ओळी आवडल्या.......आमचा बी एक अभ्यासु गृप होता कॉलेजात !!!
( मित्र अभ्यास करायचे आणि आम्ही कँटीनला चला चा आग्रह करायचो )
निरोपाच्या वेळेस लै रडलो, च्यायला त्या वेडेपणाबद्दल आता हसायला येतं :)

कॉलेज आन विद्यापीठातला मित्र/मैत्रींनींच्या गृपचा लिडर
दिल्या...sss

नाना चेंगट's picture

27 Jul 2012 - 3:57 pm | नाना चेंगट

अमचा धम्या कुथे अहे?

स्पंदना's picture

30 Jul 2012 - 9:09 am | स्पंदना

जग पुढे गेल नाना. तुम्ही हिमालयातुन जाउन येइतो येथे बरीच उलथापालथ झाली.
ता.क. (ता.मा. लिहिल पाहिजे.) धमु घरी डोक्टर डोक्टर खेळतोय.

प्रीत-मोहर's picture

25 Nov 2013 - 11:06 am | प्रीत-मोहर

धम्मुची एक अप्रतिम कविता अनायासे दिसली तर तिला वर काढत आहे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Nov 2013 - 5:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्तच कविता...

अवांतरः धमाल रावांनी केलेली काव्य विभागातील लुडबुड बिलकुल पसंत पडलेली नाही. असे करुन त्यांनी आम्हा गरीबांच्या पोटावर पाय देऊ नये इतके बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो. ;)

विजुभाऊ's picture

25 Nov 2013 - 6:06 pm | विजुभाऊ

धमाल मुलालाला शिकार पूर्ण करणार कधी हे विचारावेसे वाटते?

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Nov 2013 - 7:53 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

स्पंदना's picture

26 Nov 2013 - 5:40 am | स्पंदना

धम्स!!
अमेरिकेत जाऊन हरवलेला मुलगा! :(