शोकांतिका

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जे न देखे रवी...
24 Apr 2009 - 6:43 am

का वाढत आहे ही दरी
कुठे गेली माझी पावसाची परी
पैंजणी नादावर
नाजुक कमरेवर
झुलणार्‍या नागीणींचा
झालो होतो मी दास
गडगडासकट वाढणार्‍या मेदाच्या मिठीत
आज अडकतो आहे श्वास
का वाढत आहे दरी
कुठे गेली माझी पावसाची परी
मादक कटाक्ष तुझे
ओढ लावी उरी
जड पावलांना
का वाटत नाही आज
यावेसे घरी
खळखणार्‍या हास्याची
मिठी छुरी
का झाली कापणारी रामपुरी
का वाढत आहे दरी
कुठे गेली माझी पावसाची दरी

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

24 Apr 2009 - 6:49 am | विनायक प्रभू

ती हरवली.

विसोबा खेचर's picture

25 Apr 2009 - 7:16 am | विसोबा खेचर

वा छान!

एक वेगळीच कविता..!

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2009 - 8:10 am | llपुण्याचे पेशवेll

छान कविता आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2009 - 9:31 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, आता कविता पण? चांगली लिहिली आहे. आवडली.

बिपिन कार्यकर्ते