Skip to main content

शोकांतिका

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 24/04/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
का वाढत आहे ही दरी कुठे गेली माझी पावसाची परी पैंजणी नादावर नाजुक कमरेवर झुलणार्‍या नागीणींचा झालो होतो मी दास गडगडासकट वाढणार्‍या मेदाच्या मिठीत आज अडकतो आहे श्वास का वाढत आहे दरी कुठे गेली माझी पावसाची परी मादक कटाक्ष तुझे ओढ लावी उरी जड पावलांना का वाटत नाही आज यावेसे घरी खळखणार्‍या हास्याची मिठी छुरी का झाली कापणारी रामपुरी का वाढत आहे दरी कुठे गेली माझी पावसाची दरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1703
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ती हरवली.

वा छान! एक वेगळीच कविता..! तात्या.

छान कविता आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मास्तर, आता कविता पण? चांगली लिहिली आहे. आवडली. बिपिन कार्यकर्ते