का वाढत आहे ही दरी
कुठे गेली माझी पावसाची परी
पैंजणी नादावर
नाजुक कमरेवर
झुलणार्या नागीणींचा
झालो होतो मी दास
गडगडासकट वाढणार्या मेदाच्या मिठीत
आज अडकतो आहे श्वास
का वाढत आहे दरी
कुठे गेली माझी पावसाची परी
मादक कटाक्ष तुझे
ओढ लावी उरी
जड पावलांना
का वाटत नाही आज
यावेसे घरी
खळखणार्या हास्याची
मिठी छुरी
का झाली कापणारी रामपुरी
का वाढत आहे दरी
कुठे गेली माझी पावसाची दरी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1703
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरवली
वा छान! एक
छान कविता
मिडलाइफ क्रायसिस?