आमचंबी कॉकटेल!!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
21 Apr 2009 - 6:25 am

गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर श्री. नाटक्या हे इथे विविध कॉकटेल्सची (अगदी मनमोहक फोटोंसकट!!) माहिती देत आहेत....

आणि थोड्याच दिवसांपूर्वी एक नाटक्या बेसनलाडूनी (गरज वाटल्यास स्वल्पविराम घालावेत!:)) उत्तर कॅलिफोर्नियात केलेल्या कॉकटेल पार्टीचा सविस्तर वृत्तांतही आपण वाचला.....

तो वृत्तांत वाचून डांबिसकाका अस्वस्थ झाले आणि त्यांनी गर्जना केली,
"अरे सदर्न कॅलिफोर्नियावाल्यांनो! बघा ती उत्तरेची भय्या (म्हणजे भाऊ हो!) मंडळी किती धमाल करून र्‍हायली!! काय वाटतं की नाय तुम्हाला?"

डांबिसकाकांच्या पिकल्या केसांची जाण ठेवून त्यांच्या निष्ठावंत मिपाकर मित्रांनी त्यांच्या हाकेला भरघोस ओ दिली...

आणि जमायचं ठरलं....

डांबिसकाकांनी लगेच उत्साहाने आपण यावेळेस समुद्रकिनारी बीचवर जमूया किंवा एखाद्या पार्कमध्ये जमूया असे पर्याय दिले. परंतू त्यांची मित्रमंडळी ही काकांपेक्षाही जास्त 'पोहोचलेली' असल्याने त्यांनी त्या दोन्ही पर्यायांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केलं आणि शेवटी डांबिसकाकांच्याच घरी जमायचं असं ठरवून टाकलं......
:)
मार्टिनी आणि मोहितो करायची जबाबदारी डांबिसकाकांनी घेतली तर मार्गरिटा करायचं शिवधनुष्य नंदनरावांनी उचलायचं ठरवलं. मात्र यावेळेस उगाच पाश्चात्य वारूणीचा भारतीय भोजनाबरोवर आंतरराष्ट्रीय विवाह नको म्हणून बार्बेक्यू करायचं ठरवलं. घाटावरच्या भटांनी या कार्याला आपल्या उपस्थितीने शुभाशीर्वाद देण्याचं अगदी आनंदानं मान्य केलं. भाग्यश्री सुरवातीला आपल्या पतिराजांकडून असल्या 'दारूकामा'ला येण्याची परवानगी मिळेल की नाही याबद्दल साशंक होती पण डांबिसकाकांना आत्तापर्यंत तिच्या पतिदेवांच्या मनमोकळ्या स्वभावाची चांगली ओळख झालेली असल्याने त्यांनी हे दोघं येणार हे गृहित धरूनच तयारीला सुरुवात केली!!!!

मग यथाकाळी शनिवार दिनांक १८ एप्रिल २००९ रोजी नंदनभावजी सान डियागोहून डांबिसकाकांच्या घरी येते झाले. येतांना बरोबर घाटावर थांबून भटांचं बोचकं आणि मुख्य म्हणजे मार्गारिटाचं सामान आणण्यास ते विसरले नाहीत. डांबिसकाकांनी प्रथम मार्गारिटाचं सगळं सामान व्यवस्थित आल्याची खात्री करून घेतली आणि मग या दोघांचंही बाहू पसरून स्वागत केलं! श्री व सौ. भाग्यश्रीही जेमतेम दहा मैलांचं अंतर प्रचंड वेगाने दीड तासात कापत घटनास्थळी येऊन उपस्थित झाले. खूप ट्राफिक असल्याचं कारण त्यांनी दिलं पण बहुदा ते रस्ता चुकले असल्याचा दाट संशय आहे....
;)
अशा रितीने सर्व मंडळी जमल्यावर कॉकटेल्स बनवायला सुरुवात झाली. प्रथम समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या मिपाकरांच्या सोईसाठी (किंवा घाटावरल्या भटांच्या शब्दांत "मिपाकरांचं प्रज्वलन सुरू करण्यासाठी!!") सर्व स्टॉक एकत्र ठेवून त्याचे फोटो काढण्यात आले.

DSC_0082

त्यानंतर डांबिसकाकानी मोहिटो/ मार्टिनी आणि नंदनने मार्गारिटा बनवण्यास सुरवात केली. भाग्यश्री आणि निनादने लिंबांचा रस काढण्याची कामगिरी स्वीकारली. आणि घाटावरच्या भटांनी उगीचच सर्वांचे विविध पोझेसमधील फोटो घेण्यास सुरुवात केली. सेंन्सॉरभयास्तव सर्वच फोटो इथे देऊ शकत नाही पण कल्पना करण्यास चाणाक्ष मिपाकर समर्थ आहेतच!!

Mipa_Katta_Apr18_2009_019[1]

श्री मठाधिपती कॉकटेल-विद्या दान करीत आहेत

Mipa_Katta_Apr18_2009_020[1]

आणि शिष्यादिच्छेत पराजयम!!:)

अशा तर्‍हेने सर्व कॉकटेल्स मूर्त स्वरूपात आल्या....

IMG_4246[1]

इतका सुंदर देखावा बघून मग आपल्या मंडळींना एरियल फोटोग्राफी करण्याचा मोह आवरेना.....

IMG_4271[1]

आणि

IMG_4270[2]

सर्व कॉकटेल्स पुरेश्या बनवून झाल्यावर डांबिसकाकांनी दोन थेंब पूर्व दिशेला उडवले आणि आवाहन केलं, "हं! चला, आता करा सुरुवात!!"

DSC_0098

आणि सर्वांनी त्या कॉकटेल्सचा आस्वाद घ्यायला सुरवात केली.

DSC_0101

सोबतीला चखणा म्हणून चिप्सबरोबर स्वतः काकांनी बनवलेलं टोमॅटो साल्सा आणि ग्वाकामोले होतं. लालभडक स्ट्रॉबेरीजही होत्या.

IMG_4262[1]

भाग्यश्रीही तिचा आजवरचा *** पणा (अहो, सोवळेपणा म्हणायचंय हो मला! तुम्ही मिपाकर म्हणजे बघा अगदी!!!) सोडून मोकळ्या मनाने हा नवीन कॉकटेलानुभव घेण्यास सिद्ध झाली. कॅलिफोर्निया मठाधिपतींना सुद्धा आपली शिष्यसंख्या अजून एकाने वाढल्याचा अतीव आनंद झाला!!!! ;)

मंडळी बसून कॉकटेल्सचा आस्वाद घेतायत तोवर डांबिसकाकांनी बार्बेक्यूची तयारी सुरू केली. बार्बेक्यूसाठी मक्याची कणसं, हिरव्या-पिवळ्या-लाल सिमला मिरच्या, झुकिनी (स्क्वॉश), लाल कांदे इत्यादि सामग्री होती.

Mipa_Katta_Apr18_2009_008[1]

अर्थात डांबिसकाकांच्या घरचा बार्बेक्यू सर्वथा शाकाहारी असण्याची सुतराम शक्यता नव्हतीच! तेंव्हा काकूने आधीच आलं-लसूण्-मिरचीचा मसाला लावून नंतर दह्यात रात्रभर मुरवून ठेवलेलं चिकनही तयार ठेवलं होतं!!! बाल्सामिक व्हिनेग्रेट् घातलेलं सॅलडही रेडी होतं...

मंडळींच्या गप्पा चालूच होत्या. विमानांनी अंमळ टेक ऑफ घेतल्याने त्या खूपच रंगल्या होत्या. डांबिसकाकाही बार्बेक्यू भाजताभाजता त्या गप्पांत आपली भर टाकत होते....

Mipa_Katta_Apr18_2009_058[1]

भाग्यश्रीने एव्हांना आपली कॉकटेल रिचवून आता निनादच्या ग्लासावरही आपला हक्क प्रस्थापित केला होता. [सदर फोटो आमच्याकडे आहे. पण तो इथे टाकणार नाही. जिज्ञासूंनी ११ डॉलर्सची (अक्षरी अकरा फक्त!!) रक्कम डांबिसकाकांकडे पाठवून आपापली प्रत मिळवावी!! लाऽऽट है, सेऽऽल है भाय; लाऽऽट है, सेऽऽल है!!!!]...... ;)

सर्व पदार्थ खरपूस भाजून झाल्यावर आता शांतपणे दोन कॉकटेल्स माराव्यात म्हणून डांबिसकाका जरा टेकतायत न टेकयायत तोवर 'जेवायला चला!!!" ही काकूची हाक कानी पडली आणि सर्व फितूर मित्रमंडळी काकांची साथ सोडून जेवणापाशी जमली. मिपाचे जावईबापू श्री. निनाद यांना अर्थातच अग्रहक्क देण्यात आला. आता मात्र सगळ्या गप्पा बंद झाल्या होत्या. मंडळींची जेवणावर तुटून पडण्याची एकाग्रता वाखाणण्याजोगी होती!!!! काका आणि काकू तृप्त मनाने या तरूण मुलांकडे पहात होते....

Mipa_Katta_Apr18_2009_059[1]

जेवण झाल्यावर गप्पा पुन्हा दुप्पट जोमाने सुरू झाल्या. घाटावरच्या भटांनी चारही वेद मुखोद्गत केल्याबद्दल (मास्टर्सची डिग्री नुकतीच मिळवल्याबद्दल) त्यांना डांबिसकाकांनी शाबासकी दिली.

DSC_0103

त्याच्याबदल्यात मग त्यांच्याकडून सक्तीने गायनाची मैफिल घडवण्यात आली. मस्त गातो हो, हा पोरगा!!!! तेजोनिधी लोहगोल आणि स्वरगंगेच्या काठावरती अगदी मस्त म्हटलंन!! पण त्यानंतर मग नंदनला दुर्बुद्धी आठवली आणि त्याने रागदारीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरे देत भटोबांनी यमन, यमनकल्याण, शुद्धयमन, मसणायमन, दगडायमन इत्यादीमधील फरक स्पष्ट केले आणि गाऊनही दाखवले. डांबिसकाकाना शास्त्रीय संगीतामधलं काहीही ओ की ठो कळत नसल्याने ते केवळ हसरा चेहरा करून बसले होते. त्यांच्या डोक्यात या निरनिराळ्या यमनांचा साधा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर मसाला, रवाडोसा इत्यादींशी तुलनात्मक अभ्यास चालला होता....

तितक्यात काकूने डेझर्टसाठी हाक मारली. काकूने सरप्राईझ म्हणून फॉन्ड्यू सजवला होता.

DSC_0113

फॉन्ड्यू म्हणजे विस्तवावर ठेवलेलं भांडं. त्यात चॉकलेट वितळवलं होतं (कधीकधी चीजही वापरतात). सोबतीला स्ट्रॉबेरीज, मार्शमेलोज, पीचचा केक आणि आईस्क्रीम होतं. केक, मार्शमेलो किंवा स्ट्रॉबेरी त्या वितळलेल्या चॉकलेटमध्ये बुडवायची आणि सरळ तोंडात टाकायची.

मंडळींना हा प्रकार खूप आवडला. फक्त हे सरप्राईझ म्हणून न देता जर आधी कल्पना दिली असती तर "जरा कमी जेवलो असतो!!!" अशी कुरकुर सर्वांनी केली....

भाग्यश्रीची तर आधी केक मग त्यावर आईस्क्रीम आणि त्यावर वितळलेल्या चॉकलेटची धार पाहून "अवघेची झाले, देहब्रम्ह" अशीच अवस्था झाली.....

पोटात बिलकूल जागा नाही असं म्हणत म्हणत मंडळींनी यथेच्छ फॉन्ड्यू हादडला. नंतर मग पुन्हा गप्पांचा तिसरा अध्याय सुरु झाला. या परिसंवादाचा विषय होता, "तुम्हाला मिपावर कुणाचं लेखन आवडतं?" पण सर्व उपस्थित मिपाकर आपल्याला स्वतःचंच लेखन आवडतं असा आग्रह धरून बसल्याने शेवटी नॉन-मिपाकर असलेल्या निनाद आणि काकूला परीक्षक केलं गेलं. त्या दोघांचाही मिपाचा व्यासंग पाहुन मिपाकर सदस्य थक्कच झाले. काकू आणि निनाद हेच अनुक्रमे काका आणि भाग्यश्रीच्या खात्यातून लिहितात की काय असा संशय भटोबांनी बोलूनही दाखवला पण नंदन हा संपादक तिथे हजर असल्याचं पाहून डांबिसकाकांनी लगेच भटोबाच्या मुसक्या आवळल्या....

गप्पांत किती वेळ गेला कोण जाणे. शेवटी कुणाला तरी घड्याळ बघायची बुद्धी झाली तर मध्यरात्र उलटून एक वाजला होता. मग भाग्यश्री आणि निनाद त्यांच्या घरी परत निघाले. नक्की खात्री नाही, पण बहुदा स्वतःच्याच घरी पोचले असावेत.....

मग नंदन, भटोबा आणि डांबिसकाका या 'ओन्ली मिपाकरांनी' पुन्हा गप्पा सुरू केल्या. हा सेशन होता "जनातलं, मनातलं!!!". ;) त्यामध्ये मिपावरच्या लेख, कविता, खरडवह्या, खफ इत्यादी स्फुट आणि अस्फुट लिखाणाचा संदर्भासाठी विपुल वापर करण्यात आला. मनसोक्त गप्पा मारून झाल्यावर, आणि चांदण्या विझू विझू आल्यावर, शेवटी पहाटे तीन वाजता ही आमची मैफिल समाप्त झाली....

(ता. क.: कळविण्यास अत्यंत आनंद होतो की दुसर्‍या दिवशी कुणालाही हँगओव्हर आला नाही!!!!!)

देशांतरआस्वाद

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

21 Apr 2009 - 6:36 am | विनायक प्रभू

आपले उडवलेले दोन थेंब पोचले.

अवलिया's picture

21 Apr 2009 - 10:35 am | अवलिया

हेच म्हणतो पिडाआजोबा !! :)

--अवलिया

यशोधरा's picture

21 Apr 2009 - 6:37 am | यशोधरा

वा! वा! वा! मस्त एकदम! :)

भाग्यश्री's picture

21 Apr 2009 - 6:52 am | भाग्यश्री

काका, वृत्तांत लै भारी!!! :)
चित्रं पाहून परत कट्टा करावा असं वाटतंय!
यावेळेसचा कट्टा म्हणजे सबकुछ काका होता! अर्थात फॉन्ड्यु सोडून... पण आख्खा कट्टा अविस्मरणीय झाला! तुम्ही नंतर ३ पर्यंत गॉसिपिंग केलंत ?? श्या आम्हाला सोडून काय.. पुढच्यावेळेस आम्हीही येणार!
आणि 'त्या' फोटोला ११ डॉलर्स फक्त? १०१ मागा! (म्हणजे कोणी जाणार नाही त्या फोटोच्या वाटेला! )
बाकी माझ्याबद्दल इतक्या बातम्या पुरवल्याबद्दल धन्यवाद! :) पण असा कट्टा होणार असेल तर अशा बातम्या लीक झालेल्या चालतील मला! :)

www.bhagyashree.co.cc

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2009 - 7:11 am | बिपिन कार्यकर्ते

वा!!! पिडां, एकदम मस्त कट्टा. इतक्या प्रकारची ग्लासं एकसाथ बघून अंमळ त्रास होणं अपरिहार्यच... लैच एंजॉय केलेलं दिसतंय. =D>

एक शंका: क्यालिफोर्नियात मद्य सेवनासाठी कमीत कमी वय काय आहे? नाही म्हणजे, भटाला पाजलीत तुम्ही म्हणून विचारतोय. ;) (भटोबा, एकदम बेअरली लीगल वाटतो आहे. ह. घ्या.)

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

21 Apr 2009 - 7:17 am | छोटा डॉन

समग्र कट्ट्याचा अगदी सहस्त्रश्लोकावर्तनाचा वॄत्तांत ...
जबरदस्त कट्टा आणि त्याचा वॄत्तांत, जियो ...

खुसखुषीत शैलीमुळे मज्जा आल्याने प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरता आल नाही ...
असो, असेच अजुन येऊद्यात ...

------
छोटा डॉन
...आमच्याकडे कॉकटेल म्हणजे "स्कॉचमध्ये बर्फ घालावा की बर्फावर स्कॉच ?" हा एवढाच यक्षप्रश्न असतो ;)

आनंदयात्री's picture

21 Apr 2009 - 7:50 am | आनंदयात्री

समृद्ध कट्ट्याचे वर्णन आवडले !!

बाकी टार्‍या म्हणतो तसा मयंक दर फोटोत वेगळा दिसतो ...

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 7:21 am | भडकमकर मास्तर

अहाहा... काय वृत्तांत...
तो कॉकटेल्सच एरियल फोटो आणि डेझर्टाचा फोटो म्हणजे =P~
...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन's picture

21 Apr 2009 - 7:51 am | दशानन

लैभारी,

पिडाआ !

मजा आहे राव तुमची & पार्टीची ;)

थोडेसं नवीन !

रामदास's picture

21 Apr 2009 - 7:53 am | रामदास

री-डेकोरेट केलेले दिसतेय.
अभिनंदन.
मोहीतोचा प्याला बघून जीव जळला.
फाँड्यू तर सुरेखच.
रपट छान लिहीला आहे.पोस्ट कंझंप्शन मेमरी रीटेंशन फारच चांगलं आहे बॉ.

बेसनलाडू's picture

21 Apr 2009 - 10:12 am | बेसनलाडू

झ क्का स!!
सगळी कॉक् टेल्स् भारी आवडली (बघायला!) आणि बार्बेक्यू म्हणजे तर तोंडाला पाणीच सुटले!!!
नाटक्याशेठ, धन्याशेठ, बबलुशेठ, येत्या शनिवारचा कट्टा पिडाकाकांइतकाच दणदणीत व्हायला हवा!!!
(कट्टेकरी)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे's picture

21 Apr 2009 - 10:46 am | प्रकाश घाटपांडे

सर्व कॉकटेल्स पुरेश्या बनवून झाल्यावर डांबिसकाकांनी दोन थेंब पूर्व दिशेला उडवले आणि आवाहन केलं, "हं! चला, आता करा सुरुवात!!"

वा! वा! म्हजी तुमी बी शास्त्र पाळ्ळ म्हना ना! आस केल की मंग असंतुष्ट काय बी करु शकत नाई. सर्वदेव नमस्कारा केशवं प्रतिगच्छति|

श्री व सौ. भाग्यश्रीही जेमतेम दहा मैलांचं अंतर प्रचंड वेगाने दीड तासात कापत घटनास्थळी येऊन उपस्थित झाले. खूप ट्राफिक असल्याचं कारण त्यांनी दिलं पण बहुदा ते रस्ता चुकले असल्याचा दाट संशय आहे..

आमाला त वायलाच सौंशय येतो ब्वॉ!

सेंन्सॉरभयास्तव सर्वच फोटो इथे देऊ शकत नाही पण कल्पना करण्यास चाणाक्ष मिपाकर समर्थ आहेतच!!

अग बाबौ ! पोटात जायाच्या आदुगरच!

घाटावरच्या भटांनी चारही वेद मुखोद्गत केल्याबद्दल (मास्टर्सची डिग्री नुकतीच मिळवल्याबद्दल) त्यांना डांबिसकाकांनी शाबासकी दिली.

ज्ञानेश्वरानी रेड्यामुखी वेद वदवुनी घेतले व्हते आस म्हंतात ब्वॉ! आळ्याला (आम्च्या गावजवळच गांव) या रेड्याची समादिबी हाय बर्का! यात्रत आमी गंटिळा लाउन यायचो.

मस्त गातो हो, हा पोरगा!!!! तेजोनिधी लोहगोल आणि स्वरगंगेच्या काठावरती अगदी मस्त म्हटलंन!!

अवधुतदादाला म्हनाव 'नी 'दे. एवढ चांगल गायल्यावर काय बिशाद आहे अवधुतदादाची 'नी' न द्यायची.
असो!
वर्ननानी आनी चित्रानी आमच्या त्वंडाला पानी सुटल पघा. काही केल्या आवरानी. पुढच्या टायमाला आमचे आत्मे तित घुटमाळतीन.नंदनच्या माग आमची धुसर आत्मा फोटुत येईन! नंदन ,पिडांनु सावद र्‍हावा!
(आता उरलो शास्त्रापुरता)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2009 - 10:56 am | बिपिन कार्यकर्ते

=))

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

21 Apr 2009 - 12:29 pm | आनंदयात्री

=))

आंबोळी's picture

21 Apr 2009 - 11:09 am | आंबोळी

पिडाकाकांचा धिक्कार.....
इतके सुन्दर सुन्दर कॉकटेलचे , चखण्याचे, डेझर्टचे फोटो आणि तेव्ह्ढेच सुंदर वर्णन करून सकाळ सकाळ आम्हाला इथे ऑफिसमधे जळवायचा त्यांचा प्रयत्न खुपच यशस्वी झालेला आहे.
मास्तर म्हणतात त्याप्रमाणे =P~ =P~ =P~ =P~ =P~

आंबोळी

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2009 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार

मस्त रंगलेला कट्टा :)
फोटु तर एकदम झाकच !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

21 Apr 2009 - 12:03 pm | स्वाती दिनेश

लय भारी रिपोर्ट आणि फोटो... मस्त!
स्वाती

ठकू's picture

21 Apr 2009 - 12:29 pm | ठकू

अहाहाहा, काय ते फोटो! गहिवरून आलं मित्रा. ;;)

डांबिसकाका...फोटोमधून सुद्धा त्यांच्या चेहे-यावरचे भाव स्पष्ट दिसतायंत... जळलो बरं आम्ही! ..कोळसा झालो! >:P

पुढच्या वेळेस पूर्वदिशेला पाहून कॉकटेलचे दोन-चार थेंब जरा जास्तच उडवा. =P~

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

दिपक's picture

21 Apr 2009 - 12:37 pm | दिपक

एकदम खल्लास ! :)

आम्ही जळून खाक!

मनिष's picture

21 Apr 2009 - 12:47 pm | मनिष

आमचा जळून, जळून कोळसा झाला! ~X( ~X-( :frustrated:
ही असली वर्णने, पार्ट्या आणि नाटक्याची कॉकटेल मालिका आमच्यासारख्या न पिणार्‍यांनाही सुरू करायला लावेल लवकरच भाग्यश्रीसारखे! =P~

हे बार्बेक्यू आणि फॉन्ड्यू मशिन मिळेल का भारतात कुठे? फारच अस्वस्थ झालोय आता...नाहितर सरळ देशोधडीला लागून सदर्न कॅलिफोर्नियात पोहचावे म्हणतो पिडाकाकांच्या घरी! पाहिजे म्हणजे पाहिजे.........ह्याआआआआआआआआआआआ :crying:

काजुकतली's picture

21 Apr 2009 - 2:02 pm | काजुकतली

मला फोटो का बरे दिसत नाहीत????

चतुरंग's picture

21 Apr 2009 - 4:03 pm | चतुरंग

एवढी सगळी कॉ़कटेल्स रिचवलेली बघितल्यानंतर पिडांनी आधी वर्णन लिहून ठेवले असावे अशी दाट शंका येते आहे! ;)
घाटावरचा भट म्हणजे अगदी 'नन्हा, मुन्ना राही हूं, पिडा का सिपाई हू, बोलो मेरे संग कॉकटेल! कॉकटेल, कॉकटेल, कॉकटेल!!' असं गायला असेल आणि बाकीच्यांना 'तेजोनिधी' ऐकू आलं असणार ह्याची मला खात्री आहे!! (हघ्या.) :D
नंदन सायबाची 'बनवतानाची छबी' एखादा शास्त्रीय प्रयोग चालू असताना असावी अशी एकाग्रता दाखवते आहे! B)
आपण पिडांच्याघरुन निघालो आहोत असं निनाद आणि भाग्यश्रीला बराच वेळ फक्त वाटत होतं असं ऐकिवात आलंय, खरं खोटं ते मठाधिपती जाणोत! ;)
कट्टा बार्बेक्यूचे आणि गोडाचे हवन करून संपन्न झालेला दिसतोय ह्यातच एवढी जळवा जळवी झाल्यामुळे जेवणाचे फोटू देऊन आमचे आणखीन भस्म करण्यात अर्थ नाही असे वाटले असल्यास नवल नाही!! :)

चतुरंग

मलाही दिसत नाहित फोटो कधीच flicker वरचे

शितल's picture

21 Apr 2009 - 5:30 pm | शितल

पिडा काका,
कट्टा वृत्तांत मस्तच.
फोटो पाहुन तर असे भरभरून येत आहे. :)
अवांतर- (काका मागच्या कट्याला पाहिले त्या पेक्षा जरा बारिक झाले का, का फोटो काकांनी दम देऊन माझे जवळुन फोटो काढु नको सांगितले असेल.. ;) )

मदनबाण's picture

21 Apr 2009 - 5:53 pm | मदनबाण

काका मागच्या कट्याला पाहिले त्या पेक्षा जरा बारिक झाले का,
ह्म्म तायडे हाच विचार माझ्या मनात देखील आला होता !!! पण विचार केला की रंगीत उत्तेजक द्रव्याचा फोटु पाहुनच मलाच बहुधा भास होत असावा !!!,
हे सर्व चषक पाहुन ह्या द्रव्यांस आमचा स्पर्श अजुन का नाही झाला? हा विचार टाळक्यातुन अजुन गेलेला नाही !!!

(सोमरसात नक्की कसला रस असतो याचा आज अंदाज आला) :)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

यशोधरा's picture

21 Apr 2009 - 5:47 pm | यशोधरा

>>घाटावरचा भट म्हणजे अगदी 'नन्हा, मुन्ना राही हूं, पिडा का सिपाई हू, बोलो मेरे संग कॉकटेल! कॉकटेल, कॉकटेल, कॉकटेल!!

=))

रेवती's picture

21 Apr 2009 - 6:00 pm | रेवती

जरा जास्तच रंगलेला कट्टा दिसतोय.
म्हणजे फोटू अंमळ रंगीत रंगीत आलेत म्हणून म्हणतीये.;)

रेवती

सूहास's picture

21 Apr 2009 - 6:29 pm | सूहास (not verified)

करा आमचा कोळसा करा !!!!!!

सुहास
सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2009 - 7:00 pm | परिकथेतील राजकुमार

सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.

आपल्या लेखात ते आम्हाला पदोपदी दिसतात. ते तुम्हीच तर नाही ?

शंकासुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्मिता श्रीपाद's picture

21 Apr 2009 - 6:46 pm | स्मिता श्रीपाद

सगळे फोटो आणि कट्टा वॄत्तांत अगदी म्हणजे अगदीच भारी....

-स्मिता

धनंजय's picture

21 Apr 2009 - 7:09 pm | धनंजय

काय पण झकास फोटो! मजा करता बा तुम्ही डाव्या किनार्‍यावरची लोकं.

(येत्या शनिवारी मी खुद्द नाटक्याबुवांचे हस्ततीर्थ प्राशन करणार आहे. आता लागलेली मत्सराची आग शमण्याची शक्यता आहे. किंवा अल्कोहलमध्ये पेटून भस्म होण्याची शक्यता आहे.)

लवंगी's picture

21 Apr 2009 - 7:33 pm | लवंगी

पिडा आम्हाला असे फोटो दाखवून.. आता वेस्टकोर्सला प्रस्थान केलेच पाहिजे..

त्यांच्या डोक्यात या निरनिराळ्या यमनांचा साधा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर मसाला, रवाडोसा इत्यादींशी तुलनात्मक अभ्यास चालला होता....

हहपुवा.. हे वाचुन तुमचा विचारमग्न मजेशीर चेहरा डोळ्यासमोर उभा राहीला.

टिउ's picture

21 Apr 2009 - 8:01 pm | टिउ

दोन्हीही झकास!!!

सूर्य's picture

21 Apr 2009 - 8:07 pm | सूर्य

ग्लास, बार्बेक्यु आणि डेझर्ट बघुन फुल जळफळाट होतोय. ;) (पुढच्या वेळेस साउथ कॅलिफोर्नियातच प्रोजेक्ट बघतो. ;) )

- सूर्य.

मुक्तसुनीत's picture

22 Apr 2009 - 12:50 am | मुक्तसुनीत

हेवा
असूया
मत्सर
जळफळाट
मिरच्या झोंबल्या.
वशाडी येवो मेल्यांस.
चिरा पडोत.
आणि जे काय जरीमरी , दुरगाईमरगाई कोप होऊन करतात ते होवो.
(एकदा आम्हाला बोलावून पाजल्यावर हे सर्व होवो) =))

नाटक्या's picture

21 Apr 2009 - 8:45 pm | नाटक्या

वा पिडाकाका,

कट्ट्याचा वृत्तांत एकदम झकास, फोटो पण सुंदर. येत्या शनिवारी आम्ही (बे एरियावासी) कट्टा करतो आहोत. धनंजयराव पण पुर्वेकडून येणार आहेत. तुम्ही दक्षीणेहून (दक्षीणेसाठी नाही!!) आलात तर उत्तम. या वेळेस जमणार नसेल तर एक समस्त कॅलिफोर्नियाचा ग्रँड कट्टा करू या उन्हाळ्यात (मे महिन्याच्या मध्यावर). नंदन, भाग्यश्री, निनाद, घाटावरचे भट यांना सुध्दा आग्रहाचे आमंत्रण..

स्वगत : आता रात्री एक कॉकटेल केल्या शिवाय झोप येणार नाही...

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

21 Apr 2009 - 10:11 pm | विसोबा खेचर

ख ल्ला स...! :)

पिंडा, अरे का जळवतोस साल्या? मी तुझं काय घोडं मारलं होतं? :)

तात्या.

संदीप चित्रे's picture

21 Apr 2009 - 10:37 pm | संदीप चित्रे

पिडाकाका,
खल्लास फोटो आणि बेष्ट वृत्तांत ....
एकंदर धम्माल केलेली दिसतीय.
पण तंदूरी चिकन आणि फाँड्यू उत्साहाने देणार्‍या आमच्या काकूंचा फोटू का नसावा बरं ? :?
---------
अवांतर -- आता इष्ट कोस्टवाल्या मिपाकरांनाही येत्या उन्हाळ्याचा फायदा घेऊन बार्बेक्यू आणि बीअरचा घाट घालावा लागेल :)
(माहितेय हो काका तुमच्याकडे बारा महिने उन्हाळा असतो :) )

चित्रा's picture

22 Apr 2009 - 1:49 am | चित्रा

मस्त रेलचेल असलेला कट्टा आणि वर्णन! यावेळी फारच जळले.

काय इस्टकोस्टवाले, येत्या जूनमध्ये कोण यायला तयार आहे बॉस्टनला? बाकी जबाबदारी माझी.

काजुकतली's picture

22 Apr 2009 - 11:09 am | काजुकतली

फोटो मस्तच... लै भारी मज्जा केलीत राव तुम्ही...

ऋषिकेश's picture

22 Apr 2009 - 11:36 am | ऋषिकेश

भ न्ना ट!!!!!
मी पिणार्‍यातला नसूनहि प्रचंड जळलो..

अहाहा! .. काय ते एकेका ग्लासातील द्रव्यांचे रंग.. पुन्हा पुन्हा बघतोय त्या फोटुंकडे खुळचटासारखा

(जळका) ऋषिकेश

मनिष's picture

22 Apr 2009 - 11:49 am | मनिष

भ न्ना ट!!!!!
मी पिणार्‍यातला नसूनहि प्रचंड जळलो..

अहाहा! .. काय ते एकेका ग्लासातील द्रव्यांचे रंग.. पुन्हा पुन्हा बघतोय त्या फोटुंकडे खुळचटासारखा

अरे कोणीतरी सांगा रे कुठे मिळेल ते बर्बेक्यू मशिन...

अबोल's picture

22 Apr 2009 - 7:11 pm | अबोल

तुम्ही आम्हाला न बोलवता मजा मारा आणी आमचा जिव जळवा.
आता मलापण बाकीच्या सगळ्या॑ना बोलावून कॉकटेल पार्टी करायची आहे तेव्हाकॉकटेल बनवायची रेशीपी पाठवून द्या.

नंदन's picture

24 Apr 2009 - 12:35 am | नंदन

(किंचित धागेमारीबद्दल क्षमस्व)

वृत्तांत धमाल लिहिलाय, काका. कट्ट्याला जाम मजा आली. गेल्या खेपेपेक्षा जास्त वेळ गप्पा मारल्या, तरी पटकन संपल्यासारखा वाटला कट्टा.

थोडं रविवारच्या विस्तारित कट्ट्याविषयी. मिपा, मिपाकर, नवीन-जुने लेख-कविता या विषयांवर पोटभर गप्पा मारून रात्री तीननंतर झोपलो. सकाळी वाफाळत्या इडली-सांबाराची न्याहारी झाल्यावर काकांनी गाडीत घालून त्यांच्या टुमदार गावाची आणि कंपनीची सफर घडवून आणली. कंपनीच्या आसपास लावलेली फुलझाडं, खास करून कोबीएवढ्या आकाराचे गुलाब पाहून, त्यांचे फोटू काढून आणि जरा भटकून परत आलो, आणि दार उघडल्यावर मासळी भाजताना येणार्‍या त्या स्वर्गीय गंधाने आमचे स्वागत केले. अगदी 'आमोद सुनासि आले' म्हणतात तसं.

भाजलेल्या पापलेटाच्या सुबक फोडी! जेवताना मग 'बार्बेक्यू-बिर्बेक्यूत काही तथ्य नाही हो तुमच्या' हे तोंडी आलेलं वाक्य (काका पुन्हा कट्ट्याचं आमंत्रण देणार नाहीत या भीतीने) कोलमीभाताच्या घासाबरोबर गिळून टाकलं :). मस्त सोलकढी ओरपून मग जरा वेळाने भरल्या मनाने (आणि पोटाने) कट्ट्याची सांगता झाली!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

24 Apr 2009 - 12:44 am | बेसनलाडू

आणि दार उघडल्यावर मासळी भाजताना येणार्‍या त्या स्वर्गीय गंधाने आमचे स्वागत केले. अगदी 'आमोद सुनासि आले' म्हणतात तसं.
भाजलेल्या पापलेटाच्या सुबक फोडी! जेवताना मग 'बार्बेक्यू-बिर्बेक्यूत काही तथ्य नाही हो तुमच्या' हे तोंडी आलेलं वाक्य (काका पुन्हा कट्ट्याचं आमंत्रण देणार नाहीत या भीतीने) कोलमीभाताच्या घासाबरोबर गिळून टाकलं . मस्त सोलकढी ओरपून

च्यायला एकदा डांबिसकाकूंना 'एक्स्क्लुजिव् ली' बे एरियात धाडा एखाद्या कट्ट्याला. काका नाही आले तरी चालतील (सॉरी काका, ह. घ्या. :)); सोलकढी, कोलंबीभात, मासळी हवी!
(मासळीभक्त)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

24 Apr 2009 - 12:57 am | भाग्यश्री

अरेच्या!! :O अशी धमाल केली होय नंतर..
आम्हीही सॅन डिएगोला राहायला जातो मग !! #o
www.bhagyashree.co.cc

यशोधरा's picture

24 Apr 2009 - 7:05 am | यशोधरा

शेवटी काकीच जिंकली तर आमची! :)

घाटावरचे भट's picture

24 Apr 2009 - 9:48 am | घाटावरचे भट

आता नंदनरावांनी सांगितलंच आहे म्हणून ठीक आहे. नाहीतर मी आपला उगाच मिपावर वणवे पेटतील आणि क्यालिफोर्नियापीठाधीशांचा निरोपकप्पा आणि खव निषेधाच्या खलित्यांनी भरून जाईल म्हणून गप बसलो होतो. बाकी नंदनरावांनी एवढं लिहिलंच आहे, अजून काही ल्याहायची गरजच नाही म्हणून केवळ '+१ सहमत' एवढेच म्हणतो.

धमाल मुलगा's picture

24 Apr 2009 - 4:51 pm | धमाल मुलगा

क्काय तिच्यायला ते कॉकटेल्सचे फोटो...काय फाँड्यूचे फोटो...काय दंगामस्ती करताय...
च्यायला, हितं बसल्याबसल्या जळून करपून काळाठिक्कर पडलो. (अजुन?)

हा असला ढिंच्यॅक कट्टा करुन त्याचा वृत्तांत हा असा दिल्याबद्दल णिशेढ...णिशेढ...णिशेढ...!!!!

काय तो नंदन कॉकटेल बनवतोय की डांबिसकाकांनी हापिसातून घरी आणलेल्या कामात मदत करतोय? काही रसायनं वगैरे मिसळणं? ;)

भाग्यश्री आणि निनादही मस्त रंगलेले दिसताहेत :)

ओ काका, त्या भटानं परत श्रीखंड मागितलं का हो? ;)

अवांतरः आमचे काका बिचारे हडकले हो! अंमळ तब्येत उतरल्यासारखी वाटत्ये. काका, जरा आराम करा हो. :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::