काका, वृत्तांत लै भारी!!! :)
चित्रं पाहून परत कट्टा करावा असं वाटतंय!
यावेळेसचा कट्टा म्हणजे सबकुछ काका होता! अर्थात फॉन्ड्यु सोडून... पण आख्खा कट्टा अविस्मरणीय झाला! तुम्ही नंतर ३ पर्यंत गॉसिपिंग केलंत ?? श्या आम्हाला सोडून काय.. पुढच्यावेळेस आम्हीही येणार!
आणि 'त्या' फोटोला ११ डॉलर्स फक्त? १०१ मागा! (म्हणजे कोणी जाणार नाही त्या फोटोच्या वाटेला! )
बाकी माझ्याबद्दल इतक्या बातम्या पुरवल्याबद्दल धन्यवाद! :) पण असा कट्टा होणार असेल तर अशा बातम्या लीक झालेल्या चालतील मला! :)
www.bhagyashree.co.cc
वा!!! पिडां, एकदम मस्त कट्टा. इतक्या प्रकारची ग्लासं एकसाथ बघून अंमळ त्रास होणं अपरिहार्यच... लैच एंजॉय केलेलं दिसतंय. =D>
एक शंका: क्यालिफोर्नियात मद्य सेवनासाठी कमीत कमी वय काय आहे? नाही म्हणजे, भटाला पाजलीत तुम्ही म्हणून विचारतोय. ;) (भटोबा, एकदम बेअरली लीगल वाटतो आहे. ह. घ्या.)
बिपिन कार्यकर्ते
समग्र कट्ट्याचा अगदी सहस्त्रश्लोकावर्तनाचा वॄत्तांत ...
जबरदस्त कट्टा आणि त्याचा वॄत्तांत, जियो ...
खुसखुषीत शैलीमुळे मज्जा आल्याने प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरता आल नाही ...
असो, असेच अजुन येऊद्यात ...
------
छोटा डॉन
...आमच्याकडे कॉकटेल म्हणजे "स्कॉचमध्ये बर्फ घालावा की बर्फावर स्कॉच ?" हा एवढाच यक्षप्रश्न असतो ;)
अहाहा... काय वृत्तांत...
तो कॉकटेल्सच एरियल फोटो आणि डेझर्टाचा फोटो म्हणजे =P~
...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
री-डेकोरेट केलेले दिसतेय.
अभिनंदन.
मोहीतोचा प्याला बघून जीव जळला.
फाँड्यू तर सुरेखच.
रपट छान लिहीला आहे.पोस्ट कंझंप्शन मेमरी रीटेंशन फारच चांगलं आहे बॉ.
सर्व कॉकटेल्स पुरेश्या बनवून झाल्यावर डांबिसकाकांनी दोन थेंब पूर्व दिशेला उडवले आणि आवाहन केलं, "हं! चला, आता करा सुरुवात!!"
वा! वा! म्हजी तुमी बी शास्त्र पाळ्ळ म्हना ना! आस केल की मंग असंतुष्ट काय बी करु शकत नाई. सर्वदेव नमस्कारा केशवं प्रतिगच्छति|
श्री व सौ. भाग्यश्रीही जेमतेम दहा मैलांचं अंतर प्रचंड वेगाने दीड तासात कापत घटनास्थळी येऊन उपस्थित झाले. खूप ट्राफिक असल्याचं कारण त्यांनी दिलं पण बहुदा ते रस्ता चुकले असल्याचा दाट संशय आहे..
आमाला त वायलाच सौंशय येतो ब्वॉ!
सेंन्सॉरभयास्तव सर्वच फोटो इथे देऊ शकत नाही पण कल्पना करण्यास चाणाक्ष मिपाकर समर्थ आहेतच!!
अग बाबौ ! पोटात जायाच्या आदुगरच!
घाटावरच्या भटांनी चारही वेद मुखोद्गत केल्याबद्दल (मास्टर्सची डिग्री नुकतीच मिळवल्याबद्दल) त्यांना डांबिसकाकांनी शाबासकी दिली.
पिडाकाकांचा धिक्कार.....
इतके सुन्दर सुन्दर कॉकटेलचे , चखण्याचे, डेझर्टचे फोटो आणि तेव्ह्ढेच सुंदर वर्णन करून सकाळ सकाळ आम्हाला इथे ऑफिसमधे जळवायचा त्यांचा प्रयत्न खुपच यशस्वी झालेला आहे.
मास्तर म्हणतात त्याप्रमाणे =P~ =P~ =P~ =P~ =P~
आंबोळी
अहाहाहा, काय ते फोटो! गहिवरून आलं मित्रा. ;;)
डांबिसकाका...फोटोमधून सुद्धा त्यांच्या चेहे-यावरचे भाव स्पष्ट दिसतायंत... जळलो बरं आम्ही! ..कोळसा झालो! >:P
पुढच्या वेळेस पूर्वदिशेला पाहून कॉकटेलचे दोन-चार थेंब जरा जास्तच उडवा. =P~
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
आमचा जळून, जळून कोळसा झाला! ~X( ~X-( :frustrated:
ही असली वर्णने, पार्ट्या आणि नाटक्याची कॉकटेल मालिका आमच्यासारख्या न पिणार्यांनाही सुरू करायला लावेल लवकरच भाग्यश्रीसारखे! =P~
हे बार्बेक्यू आणि फॉन्ड्यू मशिन मिळेल का भारतात कुठे? फारच अस्वस्थ झालोय आता...नाहितर सरळ देशोधडीला लागून सदर्न कॅलिफोर्नियात पोहचावे म्हणतो पिडाकाकांच्या घरी! पाहिजे म्हणजे पाहिजे.........ह्याआआआआआआआआआआआ :crying:
एवढी सगळी कॉ़कटेल्स रिचवलेली बघितल्यानंतर पिडांनी आधी वर्णन लिहून ठेवले असावे अशी दाट शंका येते आहे! ;)
घाटावरचा भट म्हणजे अगदी 'नन्हा, मुन्ना राही हूं, पिडा का सिपाई हू, बोलो मेरे संग कॉकटेल! कॉकटेल, कॉकटेल, कॉकटेल!!' असं गायला असेल आणि बाकीच्यांना 'तेजोनिधी' ऐकू आलं असणार ह्याची मला खात्री आहे!! (हघ्या.) :D
नंदन सायबाची 'बनवतानाची छबी' एखादा शास्त्रीय प्रयोग चालू असताना असावी अशी एकाग्रता दाखवते आहे! B)
आपण पिडांच्याघरुन निघालो आहोत असं निनाद आणि भाग्यश्रीला बराच वेळ फक्त वाटत होतं असं ऐकिवात आलंय, खरं खोटं ते मठाधिपती जाणोत! ;)
कट्टा बार्बेक्यूचे आणि गोडाचे हवन करून संपन्न झालेला दिसतोय ह्यातच एवढी जळवा जळवी झाल्यामुळे जेवणाचे फोटू देऊन आमचे आणखीन भस्म करण्यात अर्थ नाही असे वाटले असल्यास नवल नाही!! :)
चतुरंग
पिडा काका,
कट्टा वृत्तांत मस्तच.
फोटो पाहुन तर असे भरभरून येत आहे. :)
अवांतर- (काका मागच्या कट्याला पाहिले त्या पेक्षा जरा बारिक झाले का, का फोटो काकांनी दम देऊन माझे जवळुन फोटो काढु नको सांगितले असेल.. ;) )
काका मागच्या कट्याला पाहिले त्या पेक्षा जरा बारिक झाले का,
ह्म्म तायडे हाच विचार माझ्या मनात देखील आला होता !!! पण विचार केला की रंगीत उत्तेजक द्रव्याचा फोटु पाहुनच मलाच बहुधा भास होत असावा !!!,
हे सर्व चषक पाहुन ह्या द्रव्यांस आमचा स्पर्श अजुन का नाही झाला? हा विचार टाळक्यातुन अजुन गेलेला नाही !!!
(सोमरसात नक्की कसला रस असतो याचा आज अंदाज आला) :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
काय पण झकास फोटो! मजा करता बा तुम्ही डाव्या किनार्यावरची लोकं.
(येत्या शनिवारी मी खुद्द नाटक्याबुवांचे हस्ततीर्थ प्राशन करणार आहे. आता लागलेली मत्सराची आग शमण्याची शक्यता आहे. किंवा अल्कोहलमध्ये पेटून भस्म होण्याची शक्यता आहे.)
हेवा
असूया
मत्सर
जळफळाट
मिरच्या झोंबल्या.
वशाडी येवो मेल्यांस.
चिरा पडोत.
आणि जे काय जरीमरी , दुरगाईमरगाई कोप होऊन करतात ते होवो.
(एकदा आम्हाला बोलावून पाजल्यावर हे सर्व होवो) =))
वा पिडाकाका,
कट्ट्याचा वृत्तांत एकदम झकास, फोटो पण सुंदर. येत्या शनिवारी आम्ही (बे एरियावासी) कट्टा करतो आहोत. धनंजयराव पण पुर्वेकडून येणार आहेत. तुम्ही दक्षीणेहून (दक्षीणेसाठी नाही!!) आलात तर उत्तम. या वेळेस जमणार नसेल तर एक समस्त कॅलिफोर्नियाचा ग्रँड कट्टा करू या उन्हाळ्यात (मे महिन्याच्या मध्यावर). नंदन, भाग्यश्री, निनाद, घाटावरचे भट यांना सुध्दा आग्रहाचे आमंत्रण..
स्वगत : आता रात्री एक कॉकटेल केल्या शिवाय झोप येणार नाही...
- नाटक्या
पिडाकाका,
खल्लास फोटो आणि बेष्ट वृत्तांत ....
एकंदर धम्माल केलेली दिसतीय.
पण तंदूरी चिकन आणि फाँड्यू उत्साहाने देणार्या आमच्या काकूंचा फोटू का नसावा बरं ? :?
---------
अवांतर -- आता इष्ट कोस्टवाल्या मिपाकरांनाही येत्या उन्हाळ्याचा फायदा घेऊन बार्बेक्यू आणि बीअरचा घाट घालावा लागेल :)
(माहितेय हो काका तुमच्याकडे बारा महिने उन्हाळा असतो :) )
भ न्ना ट!!!!!
मी पिणार्यातला नसूनहि प्रचंड जळलो..
अहाहा! .. काय ते एकेका ग्लासातील द्रव्यांचे रंग.. पुन्हा पुन्हा बघतोय त्या फोटुंकडे खुळचटासारखा
(जळका) ऋषिकेश
तुम्ही आम्हाला न बोलवता मजा मारा आणी आमचा जिव जळवा.
आता मलापण बाकीच्या सगळ्या॑ना बोलावून कॉकटेल पार्टी करायची आहे तेव्हाकॉकटेल बनवायची रेशीपी पाठवून द्या.
(किंचित धागेमारीबद्दल क्षमस्व)
वृत्तांत धमाल लिहिलाय, काका. कट्ट्याला जाम मजा आली. गेल्या खेपेपेक्षा जास्त वेळ गप्पा मारल्या, तरी पटकन संपल्यासारखा वाटला कट्टा.
थोडं रविवारच्या विस्तारित कट्ट्याविषयी. मिपा, मिपाकर, नवीन-जुने लेख-कविता या विषयांवर पोटभर गप्पा मारून रात्री तीननंतर झोपलो. सकाळी वाफाळत्या इडली-सांबाराची न्याहारी झाल्यावर काकांनी गाडीत घालून त्यांच्या टुमदार गावाची आणि कंपनीची सफर घडवून आणली. कंपनीच्या आसपास लावलेली फुलझाडं, खास करून कोबीएवढ्या आकाराचे गुलाब पाहून, त्यांचे फोटू काढून आणि जरा भटकून परत आलो, आणि दार उघडल्यावर मासळी भाजताना येणार्या त्या स्वर्गीय गंधाने आमचे स्वागत केले. अगदी 'आमोद सुनासि आले' म्हणतात तसं.
भाजलेल्या पापलेटाच्या सुबक फोडी! जेवताना मग 'बार्बेक्यू-बिर्बेक्यूत काही तथ्य नाही हो तुमच्या' हे तोंडी आलेलं वाक्य (काका पुन्हा कट्ट्याचं आमंत्रण देणार नाहीत या भीतीने) कोलमीभाताच्या घासाबरोबर गिळून टाकलं :). मस्त सोलकढी ओरपून मग जरा वेळाने भरल्या मनाने (आणि पोटाने) कट्ट्याची सांगता झाली!
आणि दार उघडल्यावर मासळी भाजताना येणार्या त्या स्वर्गीय गंधाने आमचे स्वागत केले. अगदी 'आमोद सुनासि आले' म्हणतात तसं.
भाजलेल्या पापलेटाच्या सुबक फोडी! जेवताना मग 'बार्बेक्यू-बिर्बेक्यूत काही तथ्य नाही हो तुमच्या' हे तोंडी आलेलं वाक्य (काका पुन्हा कट्ट्याचं आमंत्रण देणार नाहीत या भीतीने) कोलमीभाताच्या घासाबरोबर गिळून टाकलं . मस्त सोलकढी ओरपून
च्यायला एकदा डांबिसकाकूंना 'एक्स्क्लुजिव् ली' बे एरियात धाडा एखाद्या कट्ट्याला. काका नाही आले तरी चालतील (सॉरी काका, ह. घ्या. :)); सोलकढी, कोलंबीभात, मासळी हवी!
(मासळीभक्त)बेसनलाडू
आता नंदनरावांनी सांगितलंच आहे म्हणून ठीक आहे. नाहीतर मी आपला उगाच मिपावर वणवे पेटतील आणि क्यालिफोर्नियापीठाधीशांचा निरोपकप्पा आणि खव निषेधाच्या खलित्यांनी भरून जाईल म्हणून गप बसलो होतो. बाकी नंदनरावांनी एवढं लिहिलंच आहे, अजून काही ल्याहायची गरजच नाही म्हणून केवळ '+१ सहमत' एवढेच म्हणतो.
क्काय तिच्यायला ते कॉकटेल्सचे फोटो...काय फाँड्यूचे फोटो...काय दंगामस्ती करताय...
च्यायला, हितं बसल्याबसल्या जळून करपून काळाठिक्कर पडलो. (अजुन?)
हा असला ढिंच्यॅक कट्टा करुन त्याचा वृत्तांत हा असा दिल्याबद्दल णिशेढ...णिशेढ...णिशेढ...!!!!
काय तो नंदन कॉकटेल बनवतोय की डांबिसकाकांनी हापिसातून घरी आणलेल्या कामात मदत करतोय? काही रसायनं वगैरे मिसळणं? ;)
भाग्यश्री आणि निनादही मस्त रंगलेले दिसताहेत :)
ओ काका, त्या भटानं परत श्रीखंड मागितलं का हो? ;)
अवांतरः आमचे काका बिचारे हडकले हो! अंमळ तब्येत उतरल्यासारखी वाटत्ये. काका, जरा आराम करा हो. :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्रतिक्रिया
पिडां
+१
वा! वा! वा!
काका,
बहोत अच्छे!!!
खणखणीत ऽऽऽऽ
असेच म्हणतो
अहाहा... काय
लैभारी, पिड
घर
वावावावावावा!!!!!
आग बाबौ
हाहाहा!!!
हाहाहा!!!
पिडाकाकां
मस्त
लय भारी..
अहाहाहा
अहाहा
मायला.....
मला फोटो
मस्त, मस्तच!! जबराट कट्टा!!!
मलाही दिसत नाहित फोटो
सह्ही...
काका
>>घाटावरचा
जरा जास्तच
पिडाकाका...
सध्या "
जबरी कट्टा :-)
धमाल कट्टा
पिडाकाका
फोटु आणी वृत्तांत
ग्लास,
+१
ज ह ब ह रा ! ! !! !!!!
ख ल्ला स...!
बेष्ट रिपोर्ट
साग्रसंगीत
मस्त...
भ न्ना ट!!!!!
हेच म्हणतो....
जिव जळवा
काकांच्या गावाला...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
च्यायला!
अरेच्या!!
शेवटी
+१
तद् माताय!!!!!!!!!!