शर्यत

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
10 Apr 2009 - 4:34 pm

आताशा तुझी काळजी वाटते मला.
तु म्हणतेस की बराच शांत झालो आहे.
खरे तर खुप अस्वस्थ आहे.
लग्नानंतरचे १ ले वर्ष सोडले तर तु स्वःतला मुलाभोवती केंद्रीत केलेस.
तुझ्या आयुष्याच्या वर्तुळाचा केंद्रबिंदु होता तो.
अर्थात बाकीच्या जबाबदार्‍या पण समर्थपणे पेलल्यास.
बायको, सुन, काकी, मामी, मावशी ही नाती सांभाळताना कुठेही कमी पडली नाहीस.
सर्व कुटुंबात तुझा उदो उदो आहे.
ही कर्तव्य पार पाडताना कुठे गुंतली नाहीस.
माझ्यात सुद्धा नाही.
अर्थात त्या बाबत आज माझी काहीही तक्रार नाही.
फारसे सख्य नसलेल्या जावेच्या नातीत गुंतायला का लागली आहेस?
तुम्ही दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी कशा काय होत आहात?
का चाहुल लागली आहे तुला सुद्धा?
अगदी माझ्या सारखी.
कुठल्या आईला वाटत नाही की आपल्या मुलाने मोठे व्हावेसे?
पण तशी कसलीच चिन्हे दिसली नाही तुला मुलात.
अगदीच मचुळ होत त्याचे बालपण.
कसलाही त्रास नाही.
तक्रारी नाहीत.
मारामार्‍या नाहीत.
शर्यतीत काय अभ्यासात काय १ ला नंबर नाही.
गॅदरींग नाही की बक्षिसे नाहीत.
पण तुला त्याची काहीही खंत नव्हती.
मी पण ह्या बाबतीत निर्विकार
माझ्या ह्या वृत्तीचा तुला खुप राग
तसा मी तरी मी कुठे होतो.
महीन्याची गऱज नेहेमीच पुरवत होतो.
गरजा वाढल्या, टारगेट वाढले, टारगेट पुरवण्याची धावपळ वाढली.
ही शर्यत जिंकता जिंकता पन्नाशीला कधी आलो ते कळालेच नाही.
माझे सतत नवे करण्याच्य अट्टाहासाने कधी कधी तु घाबरायचीस.
ह्या अट्टाहासात चणचण व्हायची.
तुझ्या काही इच्छा पुर्ण नाही करु शकलो.
पण राजकुमारासारख्या वाढलेल्या माझ्यातल्या मी ने बादशाही सवई कधीच सोडल्या होत्या की.
तुला सारखे आश्चर्य वाटायचे की मला मानमरातब मिळतो तेवढा पैसा का मिळत नाही.
त्याचे नीट उत्तर मी तुला कधीच देउ शकलो नाही.
पण अचानक उसळी मारुन वर आलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे आर्थिक बळ उभे करायला कमी पडलो नाही.
तुला आठवते का?
नउ महीन्याचा मुलगा चंद्राला हातात पकडायचा आग्रह धरायचा.
आता विमान, राजधानी एक्स्प्रेस इवल्याश्या हातात कशा द्यायच्या.
नाकी नउ यायचे त्याला समजावताना.
आज त्याचे आभाळ मोठे झाले आहे.
आणि तु मला विचारतेस्,'एवढा बदल कसा झाला हो'?
अभिमानाने फुललेला तुझा चेहेरा बघताना काळजी वाढते.
आतापर्यंत फॉर्म आणणे, लाईनीत उभे राहाणे,वगैरे कुट्ल्याही गोष्टी मुलाने केल्या नाहीत.
मी होतो ना ही ओझी वाहायला.
आणि आज अचानक सहाव्या सेमिस्टर नंतर माझ्यावर अवलंबुन न राहता 'वेकेशन जॉब' चे अपॉइंट्मेंट चे लेटर घेउन आला.
खुप बरे वाटले.
पण जाणीव पण झाली.
आता माझी गरज फारशी राहीली नाही.
तुमची माझ्यावर अवंलंबुन असायची पण सवय झाली होती.
माझे काय ग? गुंतवीन मी स्वःत ला
पण तुझे काय?
हा हा म्हणता बॅग घेउन परदेशी जायला बाहेर पडेल
मग तुझा त्याच्याशी संपर्क फक्त वेबकॅम वरुन.
अगदी ताई सारखा.
ते सुद्धा त्याला वेळ असेल तेंव्हा.
स्वःतसाठी कधी जगली नाहीस.
आतापासुन तयारी कर. तेवढाच त्रास कमी.
"तो मला बोलवेल का "? हा प्रश्न विचार नकोस.
मी फक्त एकच करु शकतो,
आणखी एक टारगेट ठेवीन.
अजुन३ वर्ष शर्यत धावीन.
त्याच्यावर ओझ न होता तुला सहा महीन्यात त्याच्याकडे पाठवीन.
तुझ्या न पुर्ण झालेल्या इच्छांचे प्रायश्चित्त असेल ते.
मी कीतीही गमजा केल्या तरी तुला एक नक्की सांगतो,
तुम्ही दोघे समोर नसलात तर घरात पाउल टाकायचे धाडस होत नाही मला.
अर्धा तासात जीव कासावीस होतो.
जाता जाता: हे प्रकटन त्या सर्व खास पालकांकरता जे वाट बघत आहेत आपल्या मुलांची किंवा त्यांच्याकरता जे कुटूंब सोडुन मुलांच्या गरजा पुरवण्याकरता परदेशी आहेत.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

10 Apr 2009 - 4:40 pm | दशानन

:)

काय मास्तर आज मुड लै वेगळा आहे राव तुमचा !

खुप सुंदर, वडीलाच्या मनातील घालमेल एकदम उठून दिसली लेखामध्ये !

जिओ !

अवलिया's picture

10 Apr 2009 - 6:14 pm | अवलिया

हेच म्हणतो !

--अवलिया

विनायक प्रभू's picture

10 Apr 2009 - 4:46 pm | विनायक प्रभू

सुपातला रे मी

श्रावण मोडक's picture

10 Apr 2009 - 4:55 pm | श्रावण मोडक

गेले द्यायचे राहून... या स्थितीतील एका बाबीचे प्रकटन.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2009 - 5:24 pm | परिकथेतील राजकुमार

वाह !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

10 Apr 2009 - 5:27 pm | निखिल देशपांडे

विप्र मस्तच लिहिले आहे हो!!!! काही लिहायला शब्दच नाहीत
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

नंदन's picture

11 Apr 2009 - 12:12 pm | नंदन

काही काळ वाचून नि:शब्द झालो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Apr 2009 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!!

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

12 Apr 2009 - 3:04 am | घाटावरचे भट

सहमत.

विसुनाना's picture

10 Apr 2009 - 5:35 pm | विसुनाना

तसा मी तरी मी कुठे होतो.
माझे काय ग? गुंतवीन मी स्वःत ला
पण तुझे काय?

-वा! हृद्य प्रकटन.
पण काळ हेच औषध नाही का?नव्या वाटा आपोआपच तयार होतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे काय ग? गुंतवीन मी स्वःत ला
पण तुझे काय?

स्सही ! अशाबाबतीत स्त्रियांच्या भावनेची मोठी कोंडी होत असावी.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

10 Apr 2009 - 6:39 pm | नितिन थत्ते

प्र का टा आ.

खराटा
(रंग माझा वेगळा)

संजय अभ्यंकर's picture

10 Apr 2009 - 7:31 pm | संजय अभ्यंकर

पटले!

मागे रामदास भाऊंनी लिहिल्या प्रमाणे, पट्ट्या वरून एक उतरतो, तो पर्यंत दुसरा चढतो!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

10 Apr 2009 - 9:49 pm | पिवळा डांबिस

=D> =D> =D>

प्राजु's picture

10 Apr 2009 - 10:23 pm | प्राजु

मास्तर,
वेगळा फॉर्म, वेगळा मूड, वेगळी भाषा... सगळंच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

11 Apr 2009 - 6:07 am | रेवती

छान लिहिलयत. हे तर मोठ्या मुलांबद्दल लिहिलत.
मुलं सुटी झाली आपल्यापासून की तेंव्हाही अशीच पोकळी जाणवते सगळ्या आयांना (आईचे अनेकवचन).
त्यावेळी तर आपल्या समोरच असतात पण खातापिताना भरवण्याची गरज संपते.
पॉटीट्रेनींग झाल्यावर तर भलेशाब्बास!
आतातर कुठल्या शर्टवर कुठली पँट शोभेल असं कधीतरी बघतो माझा मुलगा,
आणि तो मोठा होतोय म्हणून काही कारण नसताना मला धस्स होतं.

रेवती

समिधा's picture

11 Apr 2009 - 6:41 am | समिधा

वेगळा लेख.....
रेवतीशी अगदी सहमत.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मुक्तसुनीत's picture

11 Apr 2009 - 6:17 am | मुक्तसुनीत

प्रकटन आवडले.
आरती प्रभू यांच्या ओळींची आठवण येते :

कुणासाठी , कशासाठी , कुठवर
ओढायचा गाडा ?

रामदास's picture

11 Apr 2009 - 7:09 am | रामदास

अभिनंदन .तुम्ही लिहीलेलं एकाच वाचनात कळलं .
अगदी तळटीप लिहीली नसती तरी कळलं असतं.
ललीत लेखनाच्या प्रांतात आपले स्वागत.

विनायक प्रभू's picture

11 Apr 2009 - 11:30 am | विनायक प्रभू

ह्याला ललीत लेखन म्हणतात काय?
जाता जाता: जोडा मारायला विसरु नका काय?
साथच आली आहे म्हणा की.

अनिल हटेला's picture

11 Apr 2009 - 12:08 pm | अनिल हटेला

वाह !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सर्वसाक्षी's picture

11 Apr 2009 - 2:27 pm | सर्वसाक्षी

एक सफाईदार खेळी खेळुन गेलात. झकास.

चन्द्रशेखर गोखले's picture

11 Apr 2009 - 8:50 pm | चन्द्रशेखर गोखले

वाचलं आणि गप्प झालो.. काय सांगु..?