सारेगमप- महाराष्ट्राचा आवाज (अद्ययावत)

बाकरवडी's picture
बाकरवडी in जनातलं, मनातलं
7 Apr 2009 - 6:34 pm

सारेगमपचे नवीन पर्व सुरू होउन आता २ आठवडे होतील. या पर्वात १० प्रसिद्धीच्या झोतात असलेले नव्या दमाचे तरूण गायक- गायिका आहेत.

सर्वजण हा कार्यक्रम पहात असतील.परंतु ह्यावेळी कोणीच धागा सुरू केला नाही. का कोणी हा कार्यक्रम पहातच नाही?
का little champs च्या अनपेक्षित निकालाने सगळे कंटाळले काय?
असो,
आपणास या नव्या पर्वाबद्दल काय वाटते ते सांगा.तसेच नवे परिक्षक असलेले पं.मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याबद्दलही सांगा

संगीतप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2009 - 6:40 pm | भडकमकर मास्तर

वाद्कर आनि पन्दित्जींची लै मय्तरी आहे असे वातते.
मल त्यंचे विनोद खुप आवद्तात...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Apr 2009 - 6:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर, जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न निवडणूकांच्या दरम्यान विचारले गेले असताना त्यांची खिल्ली उडवून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

प्रमोद देव's picture

7 Apr 2009 - 6:54 pm | प्रमोद देव

मस्त्र अस्स क्रु नका.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

अरुण वडुलेकर's picture

8 Apr 2009 - 2:15 pm | अरुण वडुलेकर

श्रीखंड पुरीच्या जेवणानंतर ( लि.चॅम्प. च्या पर्वानंतर)
रगडा पॅटिस खाल्ल्यासारखे वाटते.

मराठी_माणूस's picture

8 Apr 2009 - 2:29 pm | मराठी_माणूस

परंतु ह्यावेळी कोणीच धागा सुरू केला नाही

http://www.misalpav.com/node/7114