आयुष्य असेच आहे

Primary tabs

रंजन's picture
रंजन in जे न देखे रवी...
19 Sep 2007 - 8:21 pm

आयुष्य असेच आहे
विस्तीर्ण पानासमान
वाचता न येई कोणा
त्यावरील आयुष्यरेषा
....
नकाराच्या गावामध्ये
होकाराची वाट व्हावी
अंधाराच्या रात्रीतून
किरणांना जाग यावी
....
काय म्हणू आकळेना
वाळवीला वाढणार्‍या
अडगळ विसरली..
करे बुद्धीवंता इशारा

चारोळ्याविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 11:00 am | टीकाकार-१

यातिल
"काय म्हणू आकळेना"
मस्तच..

रंजन's picture

20 Sep 2007 - 6:01 pm | रंजन

हाच प्रतिसाद मिळेल असे वाटले होते...
आभार

टीकाकार-१'s picture

20 Sep 2007 - 11:03 am | टीकाकार-१

"विस्तीर्ण पानासमान" आयुष्यावरील "आयुष्यरेषा" म्ह्णणजे काय?