(शीघ्र कवीच्या तीन वेता!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
16 Mar 2009 - 7:07 pm

"ह्यांच्या धाकाने आमच्यातला कवी मेला!" असं म्हणणारे प्राडॉ जेव्हा तब्बल तीन-तीन कवितांचा नजराणा घेऊन आलेले बघितले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि आम्ही लगोलग मुद्याला हात घातला ;)

कवितेच्या बागेत
कळ्या सजतात
कविता कळ्यांना
स्वतःच्या केसात खोपा करुन माळतेही.
तसा विडंबक आसुसलेला असतो
कळ्यांच्या निवासी खोप्याला,
होतं काय, ओळींतून सुकलेली फुलं पडतात
आणि विडंबक निराश होतो!

दोन

गावंढळासारखी दळता येत नाही
पिठासारखी भसाभस कविता
मुकाट्यानं शांत बसावं
एका जागी, तर तेही नाही

जालावर येतो हायसे
वाटण्याचे क्षण मिळावेत म्हणून,

तर इथेही कवीच्या कविता
अजाण विडंबकाला पकडून तावडीत
ओळीत कोंडून ठेवतात.
अन कल्पना कुरतडतात त्याच्या, सुंदर

आधीच्याच ढिगारभर वेगळ्या कविता असतांना,
उगाच कविता बघतो..याची,त्याची..
अन, वृत्त-यमकाच्या नावाने बोंबलतही बसतो.

खरं तर या अशाच मुक्तकांवर
एखादा प्रोजेक्ट केला असता,
पण आजकाल टीचभर कविताच
वाट्याला येतात साल्या.

तीन

कवी
सारेच कवी कमाल हमाल झालेले,
आंत्रपुच्छ.
एक-दोन-तीन-चार म्हणताच ऍटॅक आणणारे,

एखादाच कवी असतो
झालेला घोळ निस्तरण्यासाठी निघालेला,
विडंबकाला डब्बलबॅरल आणून देणारा!!

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

16 Mar 2009 - 7:17 pm | आंबोळी

प्राडाँच्या त्या ३ कवितांचे तुम्ही विडंबन केलेत.....
रंगाशेठ तुम्ही धन्य आहात.....

प्रो.आंबोळी

अवलिया's picture

16 Mar 2009 - 7:18 pm | अवलिया

झक्कास !!!

अवांतर - बघा या वेळेला कुरण सोडले होते ना तुम्हाला मोकळे :)

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Mar 2009 - 7:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लै भारी रंगाशेठ! आवडली विडंबनं.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2009 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तीन्ही कवितांचे विडंबन कमालच आहे. वाटलं तीन कविता टाकल्यावर आपण त्या भानगडीत पडणार नाही.
असो...

आधीच्याच ढिगारभर वेगळ्या कविता असतांना,
उगाच कविता बघतो..याची,त्याची..
अन, वृत्त-यमकाच्या नावाने बोंबलतही बसतो.

मस्तच ! :)

मुत्सद्दि's picture

16 Mar 2009 - 10:22 pm | मुत्सद्दि

इतरांना सांगत नाहि,
परंतु चतुरंगजी तुम्हाला म्हणून सांगतो!
"सतत विडंबनाची थोटके ओढणे सोडा आता."
आपल्या कडून सरस व उत्कृष्ठ काव्याची अपेक्षा करत आहे.

पुलेशु.

मुत्सद्दि

श्रावण मोडक's picture

16 Mar 2009 - 10:24 pm | श्रावण मोडक

गावंढळासारखी दळता येत नाही
पिठासारखी भसाभस कविता
मुकाट्यानं शांत बसावं
एका जागी, तर तेही नाही

या ओळीत भावना पोचल्या. आमच्यापर्यंत. तुमचे टार्गेट जे आहे तिथं पोचल्या तर काय बहार येईल. एक तर तशा कविता वाचण्याची वेळ येणार नाही आणि बोनस म्हणजे त्यावरची विडंबनं... हे फक्त त्याच कवितांना लागू आहे. प्रस्तुत विडंबन आणि त्यातल्या मूळ कवितेच्या रस्त्याविषयीच्या ओळींना तर बिलकुल नाही.

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 10:28 pm | भडकमकर मास्तर

मजा आली...

अवांतर : रंगाकाका कच्चा माल कधी पुरवणार?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/