सामुद्रधुनी

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
9 Mar 2009 - 9:36 pm

जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून
शांततेची कबुतरे उडताना
पाहून गालिब म्हणाला
वल्हव रे नाखवा
वल्हव वल्हव

गुंत्यातला तोरा मिरवत
घाटातली वळणे घेताना
चुकून मॅडोना म्हणाली
जितं जितम्
जितम्

प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेताना सजणी म्हणाली
"अय्या, याला काय अर्थ आहे?"

कवितामुक्तकसद्भावनाशिफारसप्रतिभा

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

9 Mar 2009 - 9:44 pm | मराठमोळा

ही नक्की कविताच आहे का इतर काही? विडंबनकारांसाठी (फुड फॉर थॉट)तर लिहिली नाही ना?

छोटा डॉन's picture

9 Mar 2009 - 9:51 pm | छोटा डॉन

कविता खरोखर मनोरंजक आहेत.
आम्हाला त्यातला गर्भितार्थ वगैरे काढण्याइतकी अक्कल नाही मात्र मज्जा येते आहे हे नक्की, मस्त आहे ...
अजुन थोड्या स्फोटक लिहल्या असत्या तर आम्हाला "वर्जेश सोळंकी"ची हटकुन आठवण झाली असती ...

पुकशु.

------
छोटा डॉन सोळंकी
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 10:06 pm | लिखाळ

डॉन्याशी सहमत आहे. कविता मनोरंजक आहे :)

विडंबनाचा एक लहानसा प्रयत्न केला आहे. :)

-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 9:54 pm | बिपिन कार्यकर्ते

माझ्या कडून साहित्याचे नोबेल प्राईझ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बाकी प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही.....

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

9 Mar 2009 - 10:00 pm | प्राजु

प्रतिक्रिया देण्याची माझी ही लायकी नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नरेश_'s picture

9 Mar 2009 - 9:56 pm | नरेश_

;-) "अय्या, याला काय अर्थ आहे?" ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

जृंभणश्वान's picture

9 Mar 2009 - 10:08 pm | जृंभणश्वान

फारच भारी आहे ही कविता, अशक्य

चतुरंग's picture

9 Mar 2009 - 10:09 pm | चतुरंग

नानू सरंजामे वेगवेगळ्या रुपात अजूनही धरेवर वास करुन आहेत आणि वेळोवेळी हिमालय अन गेलाबाजार सह्याद्रीला तरी उशाशी घेऊन झोपत आहेत हे पाहून आपल्या द्रष्टेपणाची दाद द्यावीशी वाटते!!! :)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 10:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता मात्र मी वारले. दोन दिवसांचा पोटाच्या स्नायूंचा परीपूर्ण व्यायाम झाला... हा असा =)) =)) =)) =))

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

नरेश_'s picture

9 Mar 2009 - 10:47 pm | नरेश_

जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून
शांततेची कबुतरे उडताना
पाहून गालिब म्हणाला
वल्हव रे नाखवा
वल्हव वल्हव लवकर नाहीतर
शीटतील आपल्या डोक्यावर ;-)

गुंत्यातला तोरा मिरवत
घाटातली वळणे घेताना
चुकून मॅडोना म्हणाली
जितं जितम्
जितम्
मॅडोना शी सहमत ;-)

प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेताना सजणी म्हणाली
"अय्या, याला काय अर्थ आहे?"
आपण दोघांनी मिळून ढोसायची
ठरलं होतं ना? :-(

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

शरदिनी's picture

9 Mar 2009 - 10:48 pm | शरदिनी

आपल्याला कविता मजेदार वटल्या हे पाहून बरे वाटले.
धन्यवाद...

बेसनलाडू's picture

10 Mar 2009 - 1:51 am | बेसनलाडू

:O
(गोंधळलेला)बेसनलाडू

धनंजय's picture

10 Mar 2009 - 3:04 am | धनंजय

यातले कौशल्य मला जाणवते, पण भावार्थ निसटतो आहे.

"अय्या, याला काय अर्थ आहे?"

हे ऍबसर्डिस्ट शैलीचे उदाहरण आहे, की विडंबन आहे?
कवयित्रीकडून थोडेसे मार्गदर्शन आवडेल.

(त्याच प्रमाणे "डुर्र डुर्र" कविताही कुशल आहे असे जाणवते, पण...
तगमग मध्ये शब्दकौशल्याचा विपर्यास झाल्यासारखा वाटला. तरी कुतूहल वाटत आहे. म्हणून -) पुढील कवितांसाठी शुभेच्छा.

पक्या's picture

10 Mar 2009 - 6:39 am | पक्या

कविता वाचताना मजा वाटली. पण अर्थातच डोक्यावरुन गेली.
कवितेचा अर्थ उलगडून सांगाल का?

नरेश_'s picture

10 Mar 2009 - 1:06 pm | नरेश_

यातले कौशल्य मला जाणवते, पण भावार्थ निसटतो आहे.
बरोबर आहे , बोलुनचालून आपण डिटेक्टीव. ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2009 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

जयवी's picture

10 Mar 2009 - 2:10 pm | जयवी

शरदिनी......मस्त सुरु आहे शब्दखेळ......मज्जा येतेय :)

सुवर्णमयी's picture

29 May 2009 - 6:14 pm | सुवर्णमयी

क्लासिक
कविता वाचतांना कवितेचा शेवट कसा असेल यावर विचार करत होते, आणि शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीनंतर असेच काहीसे असावे असे वाटले होते:)
सोनाली