Skip to main content

सामुद्रधुनी

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव गुंत्यातला तोरा मिरवत घाटातली वळणे घेताना चुकून मॅडोना म्हणाली जितं जितम् जितम् प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेताना सजणी म्हणाली "अय्या, याला काय अर्थ आहे?"
लेखनविषय:

वाचने 5783
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

ही नक्की कविताच आहे का इतर काही? विडंबनकारांसाठी (फुड फॉर थॉट)तर लिहिली नाही ना?

कविता खरोखर मनोरंजक आहेत. आम्हाला त्यातला गर्भितार्थ वगैरे काढण्याइतकी अक्कल नाही मात्र मज्जा येते आहे हे नक्की, मस्त आहे ... अजुन थोड्या स्फोटक लिहल्या असत्या तर आम्हाला "वर्जेश सोळंकी"ची हटकुन आठवण झाली असती ... पुकशु. ------ छोटा डॉन सोळंकी एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

डॉन्याशी सहमत आहे. कविता मनोरंजक आहे :) विडंबनाचा एक लहानसा प्रयत्न केला आहे. :) -- लिखाळ.

माझ्या कडून साहित्याचे नोबेल प्राईझ!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बाकी प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही..... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रतिक्रिया देण्याची माझी ही लायकी नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नानू सरंजामे वेगवेगळ्या रुपात अजूनही धरेवर वास करुन आहेत आणि वेळोवेळी हिमालय अन गेलाबाजार सह्याद्रीला तरी उशाशी घेऊन झोपत आहेत हे पाहून आपल्या द्रष्टेपणाची दाद द्यावीशी वाटते!!! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

आता मात्र मी वारले. दोन दिवसांचा पोटाच्या स्नायूंचा परीपूर्ण व्यायाम झाला... हा असा =)) =)) =)) =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव लवकर नाहीतर शीटतील आपल्या डोक्यावर ;-) गुंत्यातला तोरा मिरवत घाटातली वळणे घेताना चुकून मॅडोना म्हणाली जितं जितम् जितम् मॅडोना शी सहमत ;-) प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेताना सजणी म्हणाली "अय्या, याला काय अर्थ आहे?" आपण दोघांनी मिळून ढोसायची ठरलं होतं ना? :-( सही /- आगरी बोली - आगरी बाना.

यातले कौशल्य मला जाणवते, पण भावार्थ निसटतो आहे.
"अय्या, याला काय अर्थ आहे?"
हे ऍबसर्डिस्ट शैलीचे उदाहरण आहे, की विडंबन आहे? कवयित्रीकडून थोडेसे मार्गदर्शन आवडेल. (त्याच प्रमाणे "डुर्र डुर्र" कविताही कुशल आहे असे जाणवते, पण... तगमग मध्ये शब्दकौशल्याचा विपर्यास झाल्यासारखा वाटला. तरी कुतूहल वाटत आहे. म्हणून -) पुढील कवितांसाठी शुभेच्छा.

कविता वाचताना मजा वाटली. पण अर्थातच डोक्यावरुन गेली. कवितेचा अर्थ उलगडून सांगाल का?

यातले कौशल्य मला जाणवते, पण भावार्थ निसटतो आहे. बरोबर आहे , बोलुनचालून आपण डिटेक्टीव. ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

क्लासिक कविता वाचतांना कवितेचा शेवट कसा असेल यावर विचार करत होते, आणि शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीनंतर असेच काहीसे असावे असे वाटले होते:) सोनाली