(मूल)

लिखाळ's picture
लिखाळ in जे न देखे रवी...
3 Mar 2009 - 6:35 pm

नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे
अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर
उह आह

गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग
अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर
होणार मूल होणार मूल

असतोच दडलेला काहिंच्या मनात
बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर
भरपूर भरपूर

--लिखाळ.
(प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

झेल्या's picture

3 Mar 2009 - 6:39 pm | झेल्या

भन्नाट लिखाळबाबू...!

मुलाचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ एकदम जोरात...!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

टारझन's picture

3 Mar 2009 - 10:23 pm | टारझन

वा !!

- टार्‍या भयंकर

शब्द सौजण्यः तात्या अभ्यंकर

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या !!
आजकाल मिपा वर फारच 'प्रेरणादायक' कविता यायला लागल्या आहेत.

भक्त डुर्राद
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

दशानन's picture

3 Mar 2009 - 6:42 pm | दशानन

=D>

क्या बात है... तुमच्यात आम्हाला श्री सतिश राव दिसू लागले आहेत =))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 6:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खूपच 'उम्फ' आहे या कवितेत.
जरा "अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर" या ओळीचा अर्थ सांगाल का?
=))

अवांतरः अर्थ नाही सांगितलात तर उत्तम!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

दशानन's picture

3 Mar 2009 - 6:45 pm | दशानन

.

=))

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 6:46 pm | लिखाळ

कण्हसूर ह शब्द स्वतःच पूर्ण अभिव्यक्त होणारा आहे .. नादमय आहे .. :)
-- लिखाळ.

विंजिनेर's picture

3 Mar 2009 - 6:46 pm | विंजिनेर

सुरेश भट चावले की काय तुम्हाला... ;)

गणपा's picture

3 Mar 2009 - 6:57 pm | गणपा

आज जागतीक विडंबन दिन काय? अदिती आणि लिखाळरावनी नारळ तर फोडलाच आहे
आता डॉन्या, पिडांकाका, अवलीया, रंगाशेठ, केसु तुमची वाट पहतोय.

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 7:01 pm | छोटा डॉन

काय हे लिखाळभौ, असलं खत्तरनाक लिहतात होय ?
वा-र-लो ...

कवितेतले मार्मिक शब्द सहन न झाल्याने डॉनराव अभयंकरांनी ती कविता एका कागदावर लिहुन त्याचे विमान केले, त्या विमाअनात बसुन आकाशात झेप घेतली व त्यातुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उद्या पेप्रात वाचा ...

स्वगतः आयला विडंबन करावे की काय ? ;)

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 7:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या हो डानराव मैदानात तुम्हीपण! मग आपण एक कौल टाकू या कोण विडंबनसम्राट आहे म्हणून! ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 7:16 pm | छोटा डॉन

एकदा सम्राट पदाचा काटेरी मुकुट घातला की मग अवघड होऊन बसते ...
आम्ही आपले मध्येआध्ये वाटमारी करणारे पेंढारीच बरे ...

प्रयत्न करतो, येईलच इतक्यात ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 7:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डानराव, तो कौलपण आपण कंसातच टाकू या, म्हणजे झालं? ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

चतुरंग's picture

3 Mar 2009 - 7:09 pm | चतुरंग

तुमच्या विडंबनाचा उगम इतका कण्हत कण्हत अन पुलाखालून झाला असेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती बॉ!! ;)

चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Mar 2009 - 7:55 pm | ब्रिटिश टिंग्या

=))

अनिल हटेला's picture

4 Mar 2009 - 5:26 pm | अनिल हटेला

=)) =))

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 7:18 pm | विनायक प्रभू

आवाज लै भारी

अवलिया's picture

3 Mar 2009 - 7:20 pm | अवलिया

विचार करतोय.... पुढे 'नको नाऽऽऽऽ' असे हवे होते का? :?

--अवलिया

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 7:23 pm | लिखाळ

>विचार करतोय.... पुढे 'नको नाऽऽऽऽ' असे हवे होते का?<
एकतर ते मिटर मध्ये बसत नव्हते .. (मिटर - कवितेचा ठेका .. भलतेच अर्थ निघतील नहितर)
आणि ते आले असते तर पुढली दोन कडवी आली असती का? असा वेगळा विचार :)
-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 7:23 pm | विनायक प्रभू

छे. अजुन येउ दे.

प्राजु's picture

3 Mar 2009 - 7:53 pm | प्राजु

=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

3 Mar 2009 - 8:54 pm | रेवती

लिखाळरावांनीही फटकेबाजी सुरू केलीये.
बाप रे! फरच हसतीये मी!

रेवती

संदीप चित्रे's picture

3 Mar 2009 - 9:10 pm | संदीप चित्रे

>> नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे
अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर

कवितेची सुरूवातच एकदम आवडली रे लिखाळ :)

आंबोळी's picture

4 Mar 2009 - 12:02 am | आंबोळी

लिखाळा भन्नाट झालय विडंबन.....
आंबोळी

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 12:12 am | विसोबा खेचर

छ्या! साली ही सुद्धा अंमळ वेडझवीच कविता आहे. डोक्यावरून गेली! :)

तात्या.

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 5:20 pm | लिखाळ

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार :)
-- लिखाळ.