कवि भूषण

शिशिर's picture
शिशिर in जनातलं, मनातलं
8 Feb 2009 - 5:11 pm

फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही.
कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत.
कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे. मिपाकरापैकी कुणाला माहित असल्यास दुरुस्ती करावी.

सजी चतुरंग वीर रंग मे तरंग चढी, सरजा सिवाजी जंग जीतन च्हलत है
'''''''''''''''''''
'''''''''''''''''''
''''''''''''''''''''''''''''''''''''''''नदी नद गबरन के हलत है
एल फैल खैल खैल, खलक मे गैल गैल, गंजन की ठैल ठैल
तारा सो तराने धुरी, धरा मे लगत जिनी, धारा पर पारावार यो हलत है

कवि भूषण चे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजीना संबोधन सरजा सिवाजी अगर सेर(शेर) सिवाजी असे आहे.
कवि भूषण च्या इतर कविता कुठे बघायला/वाचायला मिळतील? मिपाकरानि कळवावे.

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

नीधप's picture

8 Feb 2009 - 6:47 pm | नीधप

एल फैल खैल खैल, खलक मे गैल गैल,
गंजन की ठैल ठैल जल उतरत है

तारा सो तराने धुरी, धरा मे लगत जिमी,
धारा पर पारा__ वारीयो यो हलत है

बाकीचं जाणता राजाच्या कॅसेटस मधे आहे. काढून ऐकावं लागेल. शिवकल्याण राजा कॅसेटमधे पण अजून एक आहे. जेवढं आठवतंय तेवढं लिहिते.
केदार शब्द चुकले तर बरोबर करेलच.

इंद्र जिमी जृंभ पर, बाडव सुअंभ पर
रावण सदंभ पर रघुकुलराज है

दावा दृम दंड पर, चिता मृग झुंड पर
______ जैसे मृगराज है

तेज तम अंस पर कान्ह जिमी कंस पर
त्यो म्लेंच्छ बंस पर शेर शिवराज है

अजूनही आहेत कडवी पण सध्या इतकंच आठवतंय. एकेकाळी आख्खं जाणता राजा पाठ होतं.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पिवळा डांबिस's picture

8 Feb 2009 - 8:39 pm | पिवळा डांबिस

______ जैसे मृगराज है
भूषण वितुंडपर जैसे मृगराज है...
असे शब्द आहेत असं मला वाटतं....

लिखाळ's picture

8 Feb 2009 - 8:57 pm | लिखाळ

आपण चौकशी केलेली कविता या अनुदिनीवर मिळाली.
कविराज भूषणाच्या अजून काही कविता आणि त्यांचे अर्थ आहेत. फार छान संकलन दिसते आहे.
-- लिखाळ.

कलंत्री's picture

8 Feb 2009 - 9:02 pm | कलंत्री

कासीहुंकी कला चली जाती, मथुरा मस्जिद बन जाती,
गर न होते सिवाजी तो सुन्नत सबकी हो जाती...

या आशयाचे काव्य भुषण यांचेच आहे काय?

शिशिर's picture

9 Feb 2009 - 7:22 am | शिशिर

आपण चौकशी केलेली कविता या अनुदिनीवर मिळाली.
कविराज भूषणाच्या अजून काही कविता आणि त्यांचे अर्थ आहेत. फार छान संकलन दिसते आहे.
-- लिखाळ.
आपण दिलेल्या Link बद्दल धन्यवाद. महाकवी भूष्ण च्या कविता अर्थासकट असल्यामुळे वाचताना अधिक आनंद झाला. संकलन खरोखर्च उत्तम आहे. पुनश्च आभारि आहे.

केवळ_विशेष's picture

9 Feb 2009 - 12:58 pm | केवळ_विशेष

गाणं स्टार प्रवाह वर प्रक्षेपित होणार्‍या 'राजा श्री शिवछत्रपती' मालिकेसाठी वापरलं आहे ना...?

मदनबाण's picture

9 Feb 2009 - 1:02 pm | मदनबाण

ते गाण संपूर्ण आहे का ते माहित नाही,,पण त्याची चाल आणि संगीत सुंदर आहे..सध्या ते टायटल सॉंग कुठे डाउनलोडला सापडते का ते पाहतोय्,,अजुन मिळाले नाही !!!
प्रथमेश ने हे गाण सारेगमप मधे गायलेल आहे पण त्याची चाल वेगळी होती.

मदनबाण.....

देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

ढ's picture

9 Feb 2009 - 1:57 pm |

राजा शिवछत्रपती या मालिकेचे शीर्षकगीत

इथून उतरवून घ्या.

मदनबाण's picture

9 Feb 2009 - 2:05 pm | मदनबाण

व्वा..उत्तम !!!

मदनबाण.....

देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

शिशिर's picture

9 Feb 2009 - 3:56 pm | शिशिर

हे घ्या.
प्रेषक ढ ( सोम, 02/09/2009 - 13:57) .
राजा शिवछत्रपती या मालिकेचे शीर्षकगीत

इथून उतरवून घ्या.

छानच Link आहे. गाण्याची चाल फारच जोशपूर्ण आहे. धन्यवाद.

मैत्र's picture

9 Feb 2009 - 4:04 pm | मैत्र

बाबासाहेब पुरंदरे यांचं "महाराज" या पुस्तकात ही संपूर्ण कविता आहे.